ग्रहस्थिती : शुक्र मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतू सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन मीन राशीत, रवि, गुरु मिथुन राशीमध्ये, बुध कर्क राशीत. दिनविशेष : ६ जुलै देवयानी आषाढी एकादशी आणि मोहरम, ८ जुलै भीमप्रदोष, १० जुलै गुरुपौर्णिमा व्यासपूजा.
– – –
मेष : प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन नोकरीतून उत्कर्ष घडेल. तरुणांनी वाणीवर ताबा ठेवावा. संयम बाळगावा. व्यवसायात नवीन काम मिळेल. फक्त आपणच बरोबर, हे दाखवू नका. कामानिमित्त दूरचा प्रवास होईल. घरात ज्येष्ठांचा आदर करा. जपून वाहन चालवा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. नव्या ओळखी कामी येतील. अचानक नुकसान होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. पावसाळी सहलीत काळजी घ्या. मुलांकडून आनंददायक बातमी कळेल.
वृषभ : इच्छा पूर्ण होईल. कौतुक होईल. तरुणांनी यश टिकवण्यासाठी श्रम घ्यावे. महिलांना यशदायी काळ. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. जवळच्या व्यक्तीचा भाग्योदय होईल. घरगुती कार्यक्रमात आप्तेष्ट भेटतील. व्यावसायिक विदेशात जातील. आर्थिक नियोजनात काळजी घ्या. मित्रांना मदत करताना जपून. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. संशोधक, कलाकारांचा भाग्योदय होईल. नवी नोकरी मिळेल. जाहीर व्यक्त होणे टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घरात आनंददायी घटना घडेल.
मिथुन : गुरुपौर्णिमा लाभ देईल. कामे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठ खूष होतील, नवीन जबाबदारीतून उत्कर्षाची संधी मिळेल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मुलांकडून चांगली कामगिरी घडेल. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. ज्येष्ठांशी वाद टाळा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. भागीदारीत दोघांनी संयमाने घ्या. विदेशात नोकरीची संधी येईल. खेळाडूंकडून चमकदार कामगिरी होईल, संततीकडे लक्ष ठेवा. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. जपून गुंतवणूक करा.
कर्क : विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तरुणांचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात उलाढाल वाढेल. नोकरीत जमवून घ्या. धनलाभ होतील. शेअर, सट्टा, जुगारापासून दूर राहा. मामा-मावशींची मदत मिळेल. दांपत्य जीवनात किरकोळ कुरबुर होईल. मोठी खरेदी करताना व्यवहार तपासा. जुनी गुंतवणूक अनपेक्षित लाभ देईल. पालकांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. मित्रांशी उधार उसनवारी, चेष्टामस्करी टाळा. व्यवसाय वाढवण्याच्या संधी येतील. विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह : प्रगतीचा आलेख चांगला राहील. मनातील गोष्ट जपून बोला. आनंदाची बातमी कळेल. नोकरीत वरिष्ठ खूष राहतील. व्यवसायात यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या. पावसाळी सहलीची मौज लुटाल. तरुणांना शिक्षण, संशोधन, विज्ञान क्षेत्रात नव्या संधी मिळतील. व्यवसायात आत्मविश्वास आणि कामाचा वेग वाढेल. नवे प्रयोग विचारपूर्वक करा. नोकरीत प्रवास घडेल. खिसा पाकीट सांभाळा. अनोळखी व्यक्तीला माहिती देताना काळजी घ्या. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. थकीत येणे वसूल होईल. संयम ठेवा. सरकारी कामे मार्गी लागतील. संततीकडे लक्ष ठेवा.
कन्या : तरुणांना यश मिळेल. कामासाठी विदेशात जाल. आर्थिक नियोजन करा. भावंडांशी जमवून घ्या. जवळच्या व्यक्तीची चिंता सतावेल. कोर्टाची कामे पुढे सरकतील. नोकरी-व्यवसायात यशदायी काळ. भागीदारी व्यवसायाला गती मिळेल. संततीकडे लक्ष द्या. शेजार्यांशी वाद टाळा. अडकलेले काम भावंडांच्या मदतीने पूर्ण होईल. आयटी अभियंत्यांना यश मिळेल. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. अतिविश्वास दाखवणे टाळावे.
तूळ : गुरुपौर्णमा लाभाची राहील. कमी बोला, जास्त काम करा. तरुणांना यश देणारा काळ आहे. कलाकार, चित्रकारांचा गौरव होईल, नव्या संधी मिळतील. व्यवसायात यश मिळवाल. अति उत्साह टाळा. नोकरीत नव्या योजनांना गती मिळेल. आत्मविश्वास दुणावेल. योगा, ध्यानातून समाधान मिळेल. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. नोकरीनिमित्ताने विदेशात असणार्यांना लॉटरी लागेल. व्यवसायात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. घरात खर्चाचे प्रमाण वाढून कुरबूर होईल.
वृश्चिक : कलाकारांच्या मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात यश मिळेल. सरकारी कामात शॉर्टकट नको. समाजकार्याचा गौरव होईल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. संततीकडून सुवार्ता कळेल. मार्वेâटिंग, रियल इस्टेटमध्ये तसेच क्रीडापटूंना यशदायी काळ. मालमत्तेचे प्रश्न सुटतील. ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत सतर्क राहा. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. घरातला आनंद वाढेल. व्यवसायविस्तार तूर्तास पुढे ढकला. उधार-उसनवारी नकोच. अचानक धनलाभ होऊ शकतो.
धनु : आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नवीन घर घेण्याच्या विचारांना गती मिळेल. तरुणांच्या संकल्पनांचे व्यवसायात रूपांतर होईल. जपून बोला. नोकरी-व्यवसायात काम पूर्ण करण्यासाठी धावपळ होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. बंधूंच्या तब्येतीची तक्रार निर्माण होऊ शकते. मुलांकडे लक्ष द्या. नोकरीत चांगली स्थिती राहील. समाजसेवेत वेळ खर्च होईल. मन स्थिर ठेवा. घाई टाळा. सरकारी कामात अडथळे येतील. घरात वाद होतील. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाल. मोह टाळा.
मकर : येणे वसूल होईल. बँकेची कामे मार्गी लागतील. कलाकारांना नवे काम मिळेल. हिशेबनीसांनी काळजी घ्यावी. अहंकार टाळा. काही गोष्टी मौनाने साध्य करा. महिलांशी आदराने वागा. कुटुंबाला वेळ द्याल. नोकरीत आजचे काम उद्यावर टाकू नका. मित्रांशी बोलताना काळजी घ्या. सरकारी कामे अडकल्याने हिरमोड होईल. तरुणांना करियर आणि शिक्षणाच्या संधी चालून येतील. कलाकार, संगीतकार, ब्रोकर, मेडिकल क्षेत्रात चांगला काळ अनुभवाल. नवीन मालमत्ता घेण्याचा विचार पुढे जाईल.
कुंभ : कामाचे कौतुक होईल. तरुणांना यश मिळेल. समाजकार्यात सन्मान वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कंटाळा येईल. व्यवसायात अधिक श्रम घ्या. डोळे झाकून व्यवहार करू नका. घरातील वातावरण बिघडवू नका. ज्येष्ठांशी सुसंवाद ठेवा. अचानक धनलाभ होतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. डायबिटीस, हृदयरोग असणार्यांनी काळजी घ्यावी. कलाक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. मोठे सामाजिक कार्य घडेल. नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल, फक्त विचार करूनच पुढे जा.
मीन : तरुणांना यशाची दारे खुली होतील. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. विवाहेच्छुकांसाठी आगामी काळ चांगला आहे. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. कायदेशीर कटकटींची काळजी अगोदरच घ्या. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन वास्तू घेण्याच्या योजनेला गती मिळेल. काळजीपूर्वक पावले टाका. व्यवसायात घवघवीत यश मिळेल. अति आत्मविश्वास टाळा. कुटुंबासोबत प्रवास होईल. नोकरदारांनी डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे. नातेवाईकांशी चेष्टा मस्करी नको. मुलांना यश मिळेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.