• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

३१ जुलै भविष्यवाणी

- प्रशांत रामलिंग (३१ जुलै ते ६ ऑगस्ट)

प्रशांत रामलिंग by प्रशांत रामलिंग
July 28, 2021
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती

रवी-बुध (अस्त) कर्केत, मंगळ-शुक्र सिंहेत, केतू वृश्चिकेत, शनी-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन (वक्री) कुंभेत, चंद्र मीनेत त्यानंतर मेष, वृषभेत. सप्ताहाच्या अखेरीस मिथुनेत. राहू वृषभेत. ४ ऑगस्ट रोजी कामिनी एकादशी.

मेष – येत्या आठवड्यात खूप सावधपणे पावले टाका. मंगळाचे झालेले राश्यांतर आणि शुक्राबरोबरची युती यामुळे काही प्रमाणात व्यभिचारी वृत्तीचा प्रभाव वाढू शकतो. शुक्र, मंगळ, नेपच्युन या समसप्तक योगामुळे प्रेमप्रकरणात फसगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जबाबदारीने वागा. कुणी आश्वासन देत असेल तर त्यात अडकू नका. घरात भाऊबंदकी होण्याची शक्यता आहे, त्याला रवी, शनी, प्लूटो आणि बुध यांचा समसप्तक योग कारणीभूत ठरू शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. वैवाहिक जोडीदारासोबत सौख्याचा काळ आहे.

वृषभ – काही झाले तरी स्वभावात रागीटपणा येऊ देऊ नका. राशीमध्ये होणार्‍या राहूच्या भ्रमणामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. काळजी घ्या. राशीस्वामींचे सिंहेतले राश्यांतर कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम ठेवेल. ऑगस्ट महिन्याची सुरवात उत्तम राहील. एक आणि दोन तारखेला होणार्‍या शुक्र, चंद्र, मंगळ यांच्या नवपंचम योगामुळे आर्थिक प्राप्ती वाढणार असली तरी घरातील खर्चही वाढू शकतो. घरातील ज्येष्ठ मंडळींशी सामंजस्याने वागा आणि बोला. सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर थोडे सावध राहा. विसंवादामुळे मनस्तापाचे प्रसंग उद्भवू शकतात. मुलांबरोबर सवांद करत राहा.

मिथुन – बाहेरगावी अथवा परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीवर्गाचे प्रयत्न सुरू असतील तर त्यात हमखास यश मिळेल. येत्या आठवड्यात स्वकर्तृत्वातून उत्तम यश पदरात पडू शकते, त्यामुळे आनंदी राहाल. प्रवासातून नव्या ओळखी होतील, त्यामधून चांगला फायदा होऊ शकतो. कामाच्या निमित्ताने दगदग धावपळ होऊ शकते, त्यामधून आरोग्याचा त्रास उद्भवू शकतो. व्यवसाय-नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. गुरुकृपा लाभेल, त्यामुळे कामे मार्गी लागतील.

कर्क – व्यावसायिकांना हा आठवडा लाभदायक राहणार आहे. मनाजोगे आर्थिक लाभ होतील. अनेक दिवसांपासून अडकून राहिलेली जुनी येणी वसूल होतील. याखेरीज काही अनपेक्षित लाभ होण्याचे योग जमून येत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला होत असणारा शुक्र, मंगळ, चंद्राचा नवपंचम योग हा घबाडप्राप्ती मिळवून देईल. द्वितीयेतील सिंहेच्या मंगळामुळे शब्दाची धार वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा.

सिंह – खिसा येत्या आठवड्यात खाली राहणार आहे, खरेदीवर नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे खर्च करताना जरा काळजी घ्या. घरात कुरबुरी होऊ शकतात. उधारउसनवारी वसूल होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या. आठवडा अडथळ्यांचा जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना जरा जपूनच राहा. महिलावर्गाच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

कन्या – कामात अडथळे निर्माण होण्याचा हा काळ आहे. रवी, बुध, शनी समसप्तक योगामुळे कामात अडथळे निर्माण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर काही कारणांमुळे खटके उडू शकतात. हे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्या. व्ययस्थानात होत असणारे मंगळाचे भ्रमण आणि षष्ठातले वक्री गुरूचे भ्रमण यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. चुकून जुन्या आजाराला पुन्हा निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे योग्य काळजी घ्या.

तूळ – या आठवड्यात अनपेक्षित लाभ मिळणार आहेत. आठवड्याच्या सुरवातीच्या दोन दिवसांनंतर होत असलेल्या शुक्र, मंगळ आणि चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे काही अविस्मरणीय घटनांचा अनुभव येईल. धनस्थानातला केतू पैसे अडकवून ठेवेल, उसने पैसे कुणाला देऊ नका, बुडतील. व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी तडजोड स्वीकारण्याखेरीज पर्याय नाही, कायद्याच्या चौकटीत राहून काम करा, उसी में भलाई है.

वृश्चिक – मनासारख्या घटना घडण्याचा काळ आहे. नोकरदारांसाठी प्रमोशनचे योग जुळून येत आहेत. समाजात प्रतिष्ठा मिळेल. त्यामुळे आनंदी राहाल. लाभातल्या केतूमुळे स्वभाव थोडा चिडचिडा होईल, त्यामुळे कुणाचा अपमान होणार नाही याची खबरदारी घ्या. विद्यार्थीवर्गाला हा आठवडा शुभ जाईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल, त्यामुळे ताणतणाव जाणवणार नाही.

धनू – अडथळ्याची शर्यत नशिबात आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना नियोजनपूर्वक करा, म्हणजे त्रास होणार नाही. आठवडा फारसा अनुकूल नाही. सध्या सुरू असणार्‍या साडेसातीची तीव्रता जाणवेल. कामे अडकून राहतील. परदेशात कामाच्या संदर्भात बोलणी सुरू असतील, तर त्यात खंड पडेल, त्यामुळे मन अस्वस्थ होईल. विद्यार्थीवर्गाला हा आठवडा एकदम लकी राहणार आहे.

मकर – धार्मिक कार्यात मन रमवाल. त्यामुळे मन समाधानी राहील. साडेसातीचा काळ सुरू आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहार सांभाळा. विमा किंवा स्थावर मालमत्तेसंदर्भात हालचाली करण्यासाठी चांगला काळ आहे. बँकिंग व्यवसायासंदर्भात कोणाची जबादारी घेऊ नका, उगाचच कुठेतरी अडकाल. वक्री शनीच्या लग्नात होत असणार्‍या भ्रमणामुळे निर्णयक्षमता कमकुवत होईल, त्याकडे लक्ष द्या.

कुंभ – काही कारणांमुळे खर्चात भर पडू शकते. मात्र, गुरूकृपेमुळे अनपेक्षित लाभ होतील. एखादे काम झटव्ाäयात मनासारखे पूर्ण होईल, त्यामुळे चेहर्‍यावर हसू दिसेल. कुटुंबाबरोबर वावरताना प्रश्न चिघळणार नाहीत याची काळजी घ्या. सुखस्थानातला राहू आणि एक व दोन ऑगस्ट रोजी होत असणारे चंद्र-राहू योग यामुळे निराशा वाढू शकते. त्यामुळे संयम बाळगा, श्रद्धा-सबुरीने घ्या, म्हणजे नेमका मार्ग सापडेल.

मीन – कुटुंबात वाद सुरू असतील तर ते वेळीच मिटवा. कामाच्या ठिकाणी सकारात्मक राहा, फायदा होईल. रक्तदाबाचा विकार असणार्‍या मंडळींनी योग्य खबरदारी घ्यावी, एखादा नवा त्रास मागे लागू शकतो. आगीपासून दोन हात दूरच राहा. देवदर्शनासाठी प्रवासाचे योग जमून येत आहेत. ईश्वरभक्तीने मनाला समाधान लाभेल. ते सध्याच्या काळात तुमच्यासाठी आवश्यक आहे.

Previous Post

सगळ्यांचं सगळं ‘ऐकणारं’ सरकार!

Next Post

बगिचा परिषदेने गवर्नर गोरामोरा

Related Posts

भविष्यवाणी

राशीभविष्य

May 15, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

May 8, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

May 5, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

April 25, 2025
Next Post

बगिचा परिषदेने गवर्नर गोरामोरा

आभाळ फाटलं की आपणच ते फाडलं…?

आभाळ फाटलं की आपणच ते फाडलं...?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.