ग्रहस्थिती : रवि, बुध, हर्षल वृषभ राशीमध्ये, गुरु मिथुन राशीमध्ये, प्लुटो मकर राशीत, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ कर्क राशीमध्ये, केतु कन्या राशीत. दिनविशेष : ३० मे विनायक चतुर्थी, १ जून अरण्यषष्ठी, ३ जून दुर्गाष्टमी, ६ जून निर्जला स्मार्त एकादशी.
– – –
मेष : कुटुंबाची जबाबदारी घ्या. आर्थिक नियोजनात गल्लत टाळा. नोकरी-व्यवसायात कामे पुढे नेण्यासाठी शॉर्टकट नको. बदल स्वीकारा. मनमानी टाळा. नव्या योजनांना आकार मिळेल. घरात उत्साही वातावरण राहील. अचानक धनलाभ होईल. व्यवसायात यशदायी काळ. व्यवहार सांभाळा. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रांशी आर्थिक व्यवहार टाळा. वास्तूचे व्यवहार पुढे ढकला. तरुणांना मनासारख्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात आनंददायी काळ. कर्जप्रकरणे व विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील.
वृषभ : कर्तृत्वाला आकार देऊ शकाल. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. शेजार्यांना मदतीसाठी धावून जाल. नोकरी-व्यवसायात कामाचे गणित बिघडून राग अनावर होईल. मन शांत ठेवा. नवीन लोकांच्या संपर्कातून कामे पुढे जातील. व्यवसायात तीव्र स्पर्धेतून यश मिळेल. शुभघटना कळून उत्साह वाढेल. आरोग्य सांभाळा. महागडी वस्तू खरेदी कराल. नव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याआधी विचार करा. कौटुंबिक देवदर्शनातून समाधान मिळेल. येणे वसूल होईल. मुलांमुळे डोकेदुखी वाढेल.
मिथुन : नोकरीत उत्तम स्थिती राहील. अस्वस्थता वाढवून घेऊ नका. घरात शब्द वाढवू नका. सल्ले देऊ नका. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. प्रवासात आरोग्य सांभाळा. ज्येष्ठांचा सल्ला माना. तरुणांच्या नावलौकिकात भर पडेल. उद्योजकांनी शांतपणे निर्णय घ्यावा. व्यसनाधीनांपासून दूर राहा. कामात पत्नीचा हातभार लागेल. समाजकार्यात यशदायी काळ. मुलांकडे लक्ष ठेवा. वेगावर नियंत्रण ठेवा. साहित्यिकांचा गौरव होईल. उत्साहवर्धक बातमी कळेल. व्यवसायाची आयडिया सुचेल. विचारपूर्वक काम करा. मालमत्तेचे वाद मार्गी लागतील. बुद्धीचातुर्याच्या जोरावर यशस्वी व्हाल.
कर्क : व्यवसाय, कला क्षेत्रात अनपेक्षित यश मिळेल. नव्या ऑर्डर मिळून आर्थिक बाजू भक्कम होईल. शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक यांना यशदायी काळ. विवाहाची बोलणी पुढे जातील. तरुणांना कष्ट पडतील. संयम ठेवा. ध्यानधारणेचा फायदा होईल. आर्थिक बाजू नीट सांभाळा. नातेवाईकांच्या मदतीने काम सुकर होईल. हिशेबनीसांनी काळजी घ्यावी. वादात मध्यस्थी टाळा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहील. प्रवासात दगदग होईल. विदेशात नोकरी मिळेल. प्रेमप्रकरणात जपून राहा.
सिंह : आवडत्या कामातून पैसा कमावाल. व्यवसायात पडती बाजू घ्या. कामाकडे बारीक लक्ष द्या. गैरसमजकारक वर्तन टाळा. नोकरीत अहंकार नको. कामाचे नियोजन करा. जमीन-जुमल्याच्या व आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मालमत्तेच्या वाटणीत घाई टाळा. कलाकारांचा उत्कर्ष होईल. कुटुंबासाठी व समाजकार्यात वेळ खर्च होईल. तरुणांचा चैनीकडे कल राहील. उधार-उसनवारी नको. कोणताही निर्णय घेताना भावना बाजूला ठेवा. अति उत्साह टाळा. अध्यात्म, वाचन, भ्रमंतीत मन रमवा.
कन्या : मोठ्या व्यक्तीच्या सहवासात कामे पुढे सरकतील. आर्थिक सल्ला, जनसंपर्क क्षेत्रात संधी मिळतील. नोकरीत कामे पुढे ढकलू नका, प्रलोभनाला बळी पडू नका. गुंतवणूक लाभ देईल. संयम ठेवा. व्यवहारात काळजी घ्या. घरखर्च वाढेल. कामानिमित्त विदेशात जाल. पार्टनरशिपमध्ये वाद होतील. नातेवाईक, मित्रांना मदत कराल. घरात शुभकार्य होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. मनाविरुद्ध झालेली घटना त्रास वाढवेल. आध्यात्मिक प्रगती होईल. तरुणांना संधी व यश मिळेल.
तूळ : परिस्थिती स्वीकारून पुढे जा, तडजोड टाळा. नोकरीत भावना बाजूला ठेवून पुढे जा. गोड बोलून काम पुढे न्या. काम होणार असेल तरच चर्चा करा. आश्वासने देऊ नका. कुटुंबातील वातावरण चांगले राखा. ब्रोकरनी व्यवहारात काळजी घ्यावी. आरोग्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष नको. व्यवसायात चुका टाळा, यश मिळेल. तरुणांना नोकरीची संधी येईल. सरकारी कर्मचार्यांनी नियम पाळावे. नोकरीत चुका ठेवू नका. बुद्धिवादी, विचारवंत, लेखकांचा सहवास लाभेल. घरात शब्दाने शब्द वाढू देऊ नका. मित्र मदत करतील.
वृश्चिक : सकारात्मक विचाराने नोकरी-व्यवसायात यश मिळेल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तरुणांनी तडजोड केल्यास कामे पुढे सरकतील. मुलांना यश मिळेल. कर्तृत्वावर चार चाँद लागतील. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. मनासारख्या गोष्टी घडतील. आध्यात्मिक कार्यातून मन:शांती मिळेल. व्यवसायात लक्ष विचलित होऊ देऊ नका. शेअर, लॉटरी, सट्टा यातून लाभ संभवतो. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. वाहन चालवताना काळजी घ्या. जुने येणे येईल, आर्थिक बाजू चांगली राहील. वादाचे प्रसंग नकोच.
धनु : अनेक दिवसांपासून डोक्यात असणारे विषय मार्गी लागतील. आपण बरोबर आहोत हे दाखवू नका. नोकरी-व्यवसायात सामंजस्य दाखवा. कामे अलगद पुढे सरकतील. उच्चशिक्षणाचा प्रश्न पुढे जाईल. मित्रांना केलेली मदत समाधान देईल. मित्रांच्या गाठीभेटींमुळे खूष राहाल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. उधारी टाळा. आर्थिक नियोजनात चूक नको. घरात वेळ द्याल. कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. नोकरीत विदेशात जावे लागू शकते. कामाचा झपाटा व उत्साह वाढेल. दांपत्य जीवनात आनंदाचा काळ.
मकर : फसव्या आश्वासनांपासून दूर राहा. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात एकाग्रता वाढवा. वरिष्ठ कामावर खूष होतील. तरुणांसमोर आव्हाने येतील. नोकरीत मेहनत करा. नव्या नोकरीची संधी मिळेल. नातेवाईक, मित्रांच्या गाठीभेटी होतील. सार्वजनिक जीवनात वाणीवर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल. जुगार, सट्टा, शेअरपासून दूर राहा. गुंतवणूक चांगला लाभ देईल. आरोग्याची छोटी तक्रार हलक्यात घेऊ नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ.
कुंभ : आत्मविश्वासाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. नोकरीत कर्तृत्व दाखवाल. नातेवाईकांशी मतभेद होतील. व्यवसायात संयमाने घ्या. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. साहसी निर्णय घेताना सल्ला घ्या. नव्या घराचा प्रश्न मार्गी लागेल. ध्यानधारणेतून मन शांत ठेवा. काम पूर्ण होण्यात अडचणी येतील. नोकरीत काम वाढेल. अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या ओळखीमुळे अडकलेले काम मार्गी लागेल. संततीकडून शुभवार्ता कळेल. जुन्या गुंतवणुकीमधून लाभ होईल. प्रवासात चांगला अनुभव येईल. पर्यटनाचे प्लॅन कराल. कलाकार, पत्रकारांसाठी उत्तम काळ आहे.
मीन : क्षमता ओळखून पुढे जा. वाद उकरून काढू नका. सरकारी कामांत शॉर्टकट टाळा. सामाजिक कार्यातून ऊर्जा मिळेल. नोकरीत संधी पाहून पुढे जा. घरातील वाद बाहेर नेऊ नका. कौटुंबिक प्रश्न मार्गी लावताना कसरत होईल. मुलांच्या बाबतीत चिंता वाढेल. तरुणांचा वेळ मौजमजेवर खर्च होईल. व्यावसायिकांना कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. खेळाडूंना यश मिळेल. लेखक, प्रकाशकांचा सन्मान होईल. प्रवासात काळजी घ्या. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल.