• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चिनी कोविड जगाला भारी पडेल का?

- डॉ. प्रिया प्रभू

Nitin Phanse by Nitin Phanse
January 5, 2023
in भाष्य
0

आता हे नेहमीचे झालेय. दरवर्षी डिसेंबर आला की हा चीनमधला विषाणू नव्या रुपामध्ये जगासमोर आव्हान उभे करतोय. २०१९च्या डिसेंबरमध्ये करोनाचे मूळ वुहान रूप होते, ज्याने या महामारीची ठिणगी पेटवली आणि हळूहळू संपूर्ण जगाला लॉकडाऊनमध्ये जखडले. डिसेंबर २०२०मध्ये डेल्टाने सर्वत्र हाहा:कार उडवायला नुकतीच सुरुवात केली होती, ज्याच्या लाटेमध्ये लाखो मुलांनी पालक गमावले. डिसेंबर २०२१ ओमायक्रोनची बातमी आणि लहान मुलांसाठी चिंता घेऊन आला आणि इम्यून एस्केपमुळे (रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता) तो जगभरात वणव्यासारखा पसरला. नशिबाने डिसेंबर २०२२मध्ये अजून नवा व्हेरियंट सापडला नाहीये. पण ओमायक्रोनची पिलावळ मात्र ५००हून अधिक रुपांमध्ये जगभरात संसर्ग निर्माण करतेय. प्रभावी लसीकरणानंतर कोविड मृत्यूचा धोका खूपसा कमी झाला असला तरी लोकांनी लसीच्या तिसर्‍या डोसकडे पाठ फिरवल्याने तो धोका पूर्ण कमी झालेला नाही. आणि आता चीनमध्ये या बी.एफ. ७ या ओमायक्रोनच्या उपप्रकाराने गंभीर परिस्थिती निर्माण केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आपण सर्वच संभ्रमामध्ये आहोत, २०२३ चे वर्ष कसे असेल? पुन्हा लाट येईल का? पुन्हा लॉकडाऊन होईल का?

चला उत्तरे शोधायचा प्रयत्न करूयात!

चीनमध्ये कोविडचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९मध्ये सापडला असला तरी सायन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार ऑक्टोबर २०१९पासूनच हा नवा विषाणू लोकांना बाधित करत होता. अशीच घटना २००२ मधील पहिल्या एARए (सार्स) महामारीबाबत देखील घडली होती. त्या महामारीची सुरुवात देखील चीनमधूनच झाली होती आणि चीन अशी महत्वाची माहिती जगाला लवकर समजू देत नाही, बातम्या बाहेर येऊ देत नाही, हे तेव्हाच जगाला समजले होते. मात्र त्या २००२मधील महामारीची सर्वात जास्त झळ चीनलाच जाणवली होती. नोव्हेंबर २००२पासून पहिल्या सार्सच्या जगभरात फक्त ८०९४ केसेस झाल्या, पण त्यापैकी ६५ टक्के म्हणजे साधारण ५३२७ रुग्ण चीनमधले होते. त्यावेळी देखील लाखो लोकांना एकाच वेळी क्वारंटाइन करून व युद्धपातळीवर प्रयत्न करून चीनने जून २००३पर्यंत त्या महामारीवर नियंत्रण मिळवले. २००२ ते २००३ मध्ये तो विषाणू केवळ २९ देशांपर्यंत पोचू शकला. भारतामध्ये केवळ ती रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये आढळले होते. पहिल्या सार्स विषाणूला पूर्णपणे थांबवण्यात आपण यशस्वी झालो होतो. त्याचे रुग्ण पुन्हा आढळून आले नाहीत.
चीनने या दुसर्‍या सार्सच्या वेळी झिरो कोविडचा अट्टाहास का धरला हे पहिल्या सार्सच्या माहितीवरून लक्षात येईल. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिआंग झेमिन मार्च २००३मध्ये पदावरून पायउतार झाले आणि हु जिंताव या नव्या राष्ट्राध्यक्षांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पहिल्या सार्सने चीनमध्ये राजकारण व आरोग्य व्यवस्था यावर आपला प्रभाव सोडला होता. २०१९ मध्ये जेव्हा SARS COV2 या दुसर्‍या सार्सचा विषाणू चीनमध्ये सापडला, तेव्हा २००३मध्ये प्रभावी ठरलेले सर्व उपाय चीनने अगदी सुरुवातीपासूनच वापरले- उदा. शहरे बंद करणे, नवी रुग्णालये उभारणे, लाखोंना एकाच वेळी क्वारंटाइन करणे, शहरेच्या शहरे धुवून काढणे, प्रवासावर निर्बंध आणणे, लाखोंच्या तपासण्या करणे इ. या उपायांनी पहिली लाट पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणणे त्यांना शक्य झाले. मात्र तोपर्यंत हा विषाणू चीनमधून बाहेर पडून जगभरात पसरु लागला होता. २००२ ते २०१९ या काळात जागतिकीकरणामुळे जग अजून जवळ आलेले होते आणि विमान प्रवास वाढल्याने तसेच दोन्ही विषाणूंमधील मूलभूत फरकामुळे चीनने लगेच नियंत्रण मिळवलेला SARS COV2 हा विषाणू जगभरात मात्र हाहा:कार उडवत होता. जगाने चीनसारखे उपाय वापरण्याचा प्रयत्न काही काळासाठी केला व ते उपाय अधिक काळ करणे शक्य नसल्याने हा विषाणू उच्चाटन न होता जगामध्ये आता स्थिर झाला आहे, एंडेमिक झाला आहे. आणि आता जग करोनासह जगायला तयार झाले आहे.
चीनने मात्र मार्च २०२०मध्येच करोनाला नियंत्रणात आणले होते, त्यानंतर तो जगभरात पसरत असताना चीनने ओमायक्रोनच्या उद्यापर्यंत जनतेला सुरक्षित ठेवले. ओमायक्रोन वेगळा होता, इम्यून एस्केपमुळे लसीकरण झाले असले तरी त्याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच इम्युनिटीला चकवा देत असल्याने लक्षणविहीन संसर्ग व सौम्य संसर्ग अधिक प्रमाणात होतात. संसर्ग होण्यासाठी विषाणू कमी संख्येने शरीरात जावे लागतात, तसेच संसर्गानंतर कमी दिवसात (अधिशयन काळ) व्यक्ती आजारी पडते. ओमायक्रोन लक्षणाविना पसरतो मात्र त्याची गंभीरता मात्र पूर्ण कमी झालेली नाही, हे चीनमधील मृत्यूंवरून लक्षात घ्यायला हवे. एखादा आजार जितका सौम्य लक्षणांचा असतो, त्याला नियंत्रित करण्याचे निर्बंध तेवढेच जास्त कडक होतात. चीनने झिरो कोविड पॉलिसी न थांबवता अधिक कडक केली व फेब्रुवारी २०२२पासून वाढणारी रुग्णसंख्या मे २०२२मध्ये पुन्हा नियंत्रणाखाली आणली. मात्र गेली तीन वर्षे सुरुच असलेले व कडक होत जाणारे निर्बंध आणि तरीही वाढणारे रुग्ण याने जनता रस्त्यावर उतरली व हट्टाने त्यांनी झिरो कोविड पॉलिसीचे निर्बंध सरकारला बंद करायला लावले. वरवर पाहता ही जनतेची निर्बंधापासून सुटका असे दिसत असले, तरी ऑक्टोबर २०२२पासून वाढत असणार्‍या लाटेच्या मध्येच निर्बंध उठवल्याने आता संसर्गाचे प्रमाण वाढून रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीनमधील हिवाळा नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत असतो व बर्फवृष्टीसह तापमान काही ठिकाणी शून्यापर्यंत जाऊ शकते. उत्तर गोलार्धातील इतर देशांप्रमाणे हिवाळा हा विषाणूप्रसारासाठी उपयुक्त काळ आहे. एका अंदाजानुसार काही निर्बंध न ठेवल्यास पुढील तीन महिन्यांमध्ये चीनमधील ६० टक्के जनता संसर्गित होईल. त्यामुळे येणारा काळ चीनसाठी अतिशय कठीण असणार आहे. विशेषतः तिथली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खेड्यापाड्यापर्यंत मजबूत नाही. त्यामुळे त्यावर ताण येऊन आरोग्यव्यवस्था कोलमडू शकते. कर्व्ह फ्लॅटन करायला जनता साथ देईल का हा चीनपुढील खरा प्रश्न आहे.
अशा परिस्थितीत भारतापुढील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ‘हा चिनी कोविड आपल्याला भारी पडेल का? भारतात पण लाट येईल का व पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल का? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला चीन व आपल्या देशाच्या मूलभूत परिस्थितीमध्ये कोणती साम्ये व कोणते फरक आहेत हे समजून घ्यावे लागेल.
आधी आपले फरक समजून घेऊ.
१. संसर्गाचे प्रमाण
२०१९ ते २०२२च्या सुरुवातीपर्यंत चीनमध्ये फक्त एक लाख रुग्ण होते. २३ डिसेंबर २०२२ला ३.९७ लाख रुग्ण नोंदवलेले आहेत. त्यामुळे त्यांची १४५ करोड जनता करोनाच्या कोणत्याही उपप्रकारापासून पूर्णपणे अनाघ्रात (virgin) आहे. सध्या ओमायक्रोनच्या नकळत प्रसारासाठी अतिशय उत्तम परिस्थिती आहे. निर्बंधाविना चीनमध्ये ओमायक्रोन वणव्यासारखा पसरणार आहे.
मात्र भारतामध्ये अल्फा, डेल्टा व ओमायक्रोन या तिन्ही उप-प्रकारांमुळे संसर्ग झालेले आहेत. त्यामुळे भारताची जनता ओमायक्रोनसाठी अनाघ्रात जनता नाही. भारतात २३ डिसेंबर २०२२पर्यंत एकूण ४.४६ कोटी रुग्ण नोंदवले गेले आहेत. २०२२पासून लोकांनी मोठ्या प्रमाणावर तपासण्या टाळल्यामुळे ओमायक्रोनबाधितांची खरी संख्या याच्या कितीतरी पट अधिक आहे. त्यामुळे ओमायक्रोनचा एखादा उप-प्रकार खूप मोठी गंभीर आजारांची लाट निर्माण करू शकेल, अशी परिस्थिती नाही. मात्र एखादा पूर्णतः नवा उप-प्रकार आला तरच परिस्थिती बदलू शकेल.
२. वापरलेली लस
चीनने राष्ट्रवादाच्या नावाने केवळ चीनमध्ये बनलेली व मृत विषाणू वापरण्याच्या साध्या तंत्रज्ञानाची लस सर्वत्र वापरली आहे. अशा लसी दीर्घकालीन सुरक्षा देऊ शकत नाहीत व अशा लसींची उपयुक्तता ५०-६० टक्के एवढीच असते. तसेच मृत विषाणूजन्य लसींचे प्राथमिक लसीकरण तीन डोस वापरून करावे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश २०२१मध्येच प्राप्त झाले होते. मात्र त्यावर बर्‍याच देशांनी अंमलबजावणी केलेली नाही.
भारतात कोविशिल्डसारखी अधिक प्रभावी व दीर्घकाळ सुरक्षा देणारी लस जास्त प्रमाणात वापरली गेली. यापासून ७०-८० टक्के सुरक्षा मिळत असली तरी त्यापासून पेशीय इम्युनिटीची सुरक्षा देखील मिळते. कोव्हॅक्सिन ही मृत विषाणूची लस असली तरी तिच्या वापराचे प्रमाण कमी आहे व बर्‍याच जणांनी लसीच्या तुटवड्यामुळे संमिश्र लसीकरण केले आहे. या सर्व लसी बनवण्यासाठी मूळ विषाणूच्या जनुकीय मांडणीचा वापर झाला असल्याने ओमायक्रोन संसर्ग टाळण्यासाठी त्यांची उपयुक्तता कमी झाली आहे. मात्र गंभीर आजार व मृत्यूचा धोका मात्र या लसी अजूनही कमी करू शकतात.
३. विषाणू-प्रसारासाठी पूरक वातावरण
गेल्या सर्व लाटांमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोक बंदिस्त घरांमध्ये राहात असल्याने विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होतो. अमेरिकेतील करोना, फ्लू आणि आरएसव्ही या तीनही विषाणूंच्या एकत्रित उद्रेकाने हे दाखवून दिले आहे. चीनमध्ये पुढील काही महिने हे हिवाळी वातावरण असणार आहे. भारतातील हिवाळा मात्र कोविड रुग्णसंख्या वाढवत नाही, हे आपण गेल्या तिन्ही लाटांच्या वेळी अनुभवले आहे. अर्थात, करोना प्रसार होत राहतो व फेब्रुवारी–मार्च दरम्यान रुग्णसंख्या वाढू लागते, असेही दिसून आले आहे. त्यामुळे गाफील न राहता प्रसार थांबवण्याच्या कृती सर्वांनी करणे आवश्यक आहे.
४. संसर्गामुळे मिळणारी इम्युनिटी
चीनमधील जनतेला कोणताही संसर्ग न झाल्याने संसर्गामुळे इम्युनिटी मिळालेली नाही. त्यांची भिस्त पूर्णपणे लसीकरणाच्या इम्युनिटीवर आहे. मात्र मृत विषाणू लसीचे चार डोस आवश्यक असताना तेथील काही जनतेचे तीन डोस व बर्‍याच जनतेचे केवळ दोन डोस एवढेच लसीकरण झाल्याने ती इम्युनिटी देखील अपुरी आहे.
भारतातील जनतेने काही स्वघोषित तज्ज्ञांच्या सल्ल्यामुळे ओमायक्रोन संसर्ग टाळण्यासाठी कृती करणे थांबवले व यामुळे बरेच जण बाधित झाले. तत्पूर्वी लसीकरण झाले असल्यास प्रत्येक संसर्ग एखाद्या बुस्टरप्रमाणे काम करतो. मात्र इम्यून एस्केप करू शकणार्‍या ओमायक्रोन संसर्गामुळे इम्युनिटी तुलनेने कमी प्रमाणात तयार होते व ती कमी काळ टिकणारी असते, असे संशोधनामध्ये आढळून आले आहे. तसेच ओमायक्रोनचा प्रत्येक नवा उप-प्रकार अधिकाधिक इम्यून एस्केप म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीला चकवून संसर्ग करत असल्याने संसर्गामुळे मिळणारी इम्युनिटी भविष्यातील संसर्गाविरुद्ध पूर्ण सुरक्षा देऊ शकत नाही.
तथाकथित नैसर्गिक इम्युनिटीच्या आमिषापोटी व तथाकथित तज्ज्ञांच्या सल्ल्याला भुलून ओमायक्रोन संसर्गाचे पुन्हा स्वागत करण्याचा चुकीचा निर्णय कोणीही घेऊ नये. कोविड सर्दीचा आजार नसून एक शरीर-संस्थात्मक आजार आहे, हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे व कोविडपश्चात परिणाम आपण अनुभवत देखील आहोत. मात्र, जनतेला ओमायक्रोन संसर्गाचा अनुभव असल्याने पुन्हा संसर्ग झाले तरी गंभीर आजारांचे प्रमाण मात्र नक्कीच कमी राहील.
५. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था
चीनमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट नाही, तसेच ती सर्वदूर पसरलेली देखील नाही. गेल्या तीन वर्षांत या व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी काही खास प्रयत्न केले गेल्याचेही दिसून आले नाही. त्यामुळे अचानक व वेगाने वाढणारी रुग्णसंख्या अनेक मृत्यू घडवून आणू शकते. आरोग्य कर्मचारी देखील संसर्गाला बळी पडून उपचार प्रणाली कोलमडू शकते. भारतात मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जाळे अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोचलेले होते. पहिल्या लाटेपासून अतिशय वेगाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोविड सक्षम बनवण्याचे प्रयत्न प्रत्येक राज्य सरकारांनी केले आणि आता अगदी ग्रामीण रुग्णालय स्तरापर्यंत ऑक्सिजननिर्मिती होत आहे व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. गावांमधील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी उपलब्ध आहेत. तसेच आवश्यकतेनुसार बेड्सची संख्या वाढवण्याची क्षमता आपल्याकडे आहे. संकट आले तरी आपण जनतेची काळजी घेण्यास सक्षम आहोत. शहरी भागामध्ये सुविधा वाढवण्याची गरज आहे. मात्र तेथे इतर पर्याय देखील उपलब्ध असतात. त्यामुळे रुग्ण वेळेत दवाखान्यात पोचला तर कोविड-मृत्यू टाळणे शक्य आहे.
आता चीन व आपल्यामध्ये साम्यस्थळे काय आहेत हेही बघायला हवे.
१. लोकसंख्येचे प्रमाण
चीन आणि भारताच्या लोकसंख्येमध्ये आता केवळ चार कोटींचाच फरक उरला आहे. २०२३च्या सुरुवातीलाच भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. लोकसंख्या समान असली तरी चीनचे क्षेत्रफळ भारतापेक्षा जवळजवळ तीन पट आहे. त्यामुळे लोकसंख्येची घनता म्हणजे गर्दी भारतामध्ये प्रचंड प्रमाणात आहे, विशेषतः शहरांमध्ये. त्यामुळे सर्वत्र वायुवीजन सुधारणे व बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे ही कृती संसर्ग नियंत्रणासाठी अतिशय लाभदायक ठरेल.
२. सरकारवर अविश्वास ठेवणारी जनता
चीनमधील झिरो कोविड व्यवस्थेला समर्थन देणे शक्य नसले, तरी दीर्घकालीन दृष्टीने बघितले तर पहिल्या सार्सप्रमाणे पहिलीच लाट थोपवणे जगाला शक्य झाले असते, तर आता करोनासह जगण्याची वेळ आपल्यावर आली नसती. कोविडचे पोस्ट-कोविड आणि दीर्घकालीन परिणाम पाहता सरकारने करोना संसर्गसंख्या कमी ठेवण्यासाठी जनतेचे सहकार्य मिळवणे अपेक्षित आहे. पण संवादाचा अभाव असल्याने सरकार केवळ सक्ती करते व अनेक गैरसमज पसरत राहतात. त्यामुळे वेळोवेळी जनता सरकारी नियमांचे पालन न करता कधी कधी तर अशास्त्रीय मागण्या करताना आढळते. गेल्या वर्षभरात सरकारच्या लसीकरणाच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद त्यामुळेच मिळाला आहे.
३. साथ-नियंत्रण आणि राजकारण यांची सरमिसळ करणारी सरकारे
जी तत्परता कोविडच्या पहिल्या लाटेपूर्वी म्हणजे भारतीय जनता कोविडबाबत अनाघ्रात असताना दाखवायला हवी होती, तशी तत्परता म्हणजे मास्कवापर वगैरे आता या ओमायक्रोनच्या संभाव्य दुसर्‍या लाटेच्या वेळी दाखवली जात आहे. पहिल्या लाटेच्या वेळी मात्र मास्कऐवजी गमछा वापरण्याचा सल्ला दिला गेला होता. मास्कवापर ही अशी बंद-चालू करण्याची गोष्ट नसून गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वांची सुरक्षा वाढवण्यासाठी वायुवीजन वाढवणे व जोखमीच्या ठिकाणी सार्वजनिक मास्कवापर सतत सुरु ठेवण्याची गरज होती. कोविड संसर्ग टाळणे दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक आहे.
महासाथ सुरु असताना नेहमी शास्त्रीय मार्गदर्शनाने निर्णय घेणे ही काळाची गरज असते. उदा. कोविडच्या डेल्टा लाटेमध्ये मंदिरे न उघडण्याचा निर्णय. चीनमध्ये देखील संसर्ग वाढत असतानाच निर्बंध उठवले गेले आहेत. खरे तर योग्य वेळी झिरो कोविडचा आग्रह सोडून टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवायला हवे होते. आता मात्र मृत्यूंची चिंता न करता जनतेला संसर्ग होऊन लाट लवकर संपवणे व देशाचे अर्थकारण लवकर सुरळीत करणे असा त्यांचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
४. लसीकरणाचे कमी होत गेलेले प्रमाण
लसींबाबत अनेक संभ्रम पसरलेले आहेत. पोस्ट-कोविड परिणाम लसीकरणामुळे होतात अशा समजुतीपायी लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. विविध वैद्यकीय प्रणालीमधील व्यावसायिक रुग्णांना लस न घेण्याचा उफराटा सल्ला देखील देतात. सोबतच्या फोटोमध्ये ऑगस्ट २२पर्यंत विविध वयोगटामध्ये लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस घेणार्‍यांची संख्या दर्शवली आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये लस घेणार्‍यांची संख्या कमी होत गेली आहे. प्रिकॉशन डोस घेणारे २०-३० टक्क्यांहून अधिक नाहीत. ६० वर्षावरील केवळ २५ टक्के लोकांनी तिसरा डोस घेतलेला दिसतोय. गेल्या सहा महिन्यांमध्ये एकूण लसीकरण २०४ कोटीवरून २२० कोटी इतकेच वाढले आहे. म्हणजे सर्व गटांमध्ये मिळून फक्त चार कोटी लसी दिल्या गेल्या आहेत.
चीनमध्ये देखील वयस्कर व्यक्तींनी लस घेणे टाळले होते. मार्चमध्ये चीनमधील साधारण ८०+ वयाच्या २० टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला होता. ते प्रमाण आता वाढून फक्त ४० टक्के झाले आहे. चीनमध्ये मृत्यू होण्याचे हे मुख्य कारण आहे आणि आपली परिस्थिती देखील काही खास चांगली दिसत नाहीये. लसीकरणाची एकूण संख्या महत्वाची नसते, ते लसीकरण कोण घेतंय हे जास्त महत्वाचे असते. लसीकरणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेतील डॉ. माईक रायन म्हणतात. – ‘So the challenge that China and other countries still have is: are the people that need to be vaccinated, adequately vaccinated, with the right vaccines and the right number of doses and when was the last time those people had the vaccines.’ अर्थात, चीन व इतर देशांसमोरील मुख्य आव्हान पुढीलप्रमाणे आहे – ज्या लोकांना लसीकरणाची सर्वाधिक आवश्यकता आहे त्यांचे पुरेसे लसीकरण झाले आहे का? त्यासाठी योग्य प्रकारची लस वापरली गेली आहे का? गरजेनुसार आवश्यक तितके डोस त्यांनी घेतले आहेत का? आणि त्यांनी शेवटचा डोस नेमका कधी घेतला आहे?’
आपल्याला भविष्यात कोविड मृत्यू होऊ नयेत यासाठी या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. शक्य असल्यास ओमायक्रोन बुस्टरवर काम करावे लागेल आणि तोपर्यंत जोखीम अधिक असलेल्या व्यक्तींनी तरी लस घ्यावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच तरुणांनी लस घ्यावी यासाठी अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील. शेवटच्या डोसनंतर बराच काळ उलटला असल्यास स्वतःच्या जोखमीवर सर्वांनी नियमपालन वाढवायला हवे. हा मार्ग अवघड आहे.
कारण बहुतांश जनता कॉन्स्पिरसी थियरी म्हणजे ‘करोना एक षडयंत्र आहे’ या विचारधारेच्या आहारी गेली आहे. त्यांना यातून बाहेर काढायचे असेल तर संवाद, शंकानिरसन, योग्य शास्त्रीय माहिती व त्यांच्या गरजांना प्रतिसाद या चतु:सूत्रीचा अवलंब करावा लागेल. तरच आपण कोविड पासून अधिकाधिक सुरक्षित होऊ. लेखाच्या सुरुवातीलाच आपण बघितले की हे नवनवे व्हेरियंट येणे आता नेहमीचेच झालेय. जोपर्यंत विषाणूला नवनवे संसर्ग करता येतील, तोपर्यंत नवे व्हेरियंट तयार होतच राहणार आहेत आणि हे भविष्यातील व्हेरियंट अधिकाधिक संसर्गक्षम आणि आपल्या इम्युनिटीला अधिकाधिक चकवा देणारे असणार आहेत हे नक्की आहे. त्यातील एखादा अधिक घातक देखील निघू शकतो. त्यामुळे नव्या व्हेरियंटवर लक्ष ठेवायला हवे.
कोविड हा आजार संपूर्ण शरीराला बाधित करून दूरगामी परिणाम घडवून आणतो, एवढे आपण आत्तादेखील (तीन वर्षांच्या संशोधनानंतर) जाणतो. लसीकरणानंतर व लसीकरणामुळे आपण गंभीर आजार व मृत्यूचा धोका कमी करू शकतो, हे देखील वारंवार दिसून आले आहे. ओमायक्रोनविरुद्ध सध्या उपलब्ध असलेल्या आपल्या लसी मृत्यू व गंभीर आजार टाळण्यासाठी प्रभावी आहेत, याचा पुरावा चीनने आपल्याला आता दिला आहे. संसर्ग टाळण्यासाठी उत्तम वायुविजन आणि जिथे जोखीम जास्त असेल– उदा. बंदिस्त जागा अशा ठिकाणी योग्य मास्कचा वापर करणे उपयुक्त आहे, हे देखील सर्वांना माहित आहे. संसर्ग पसरू नये म्हणून शंका आली की लगेच तपासणी व सर्व आजारी माणसांनी मास्क वापरणे व घराबाहेर न पडणे महत्वाचे आहे, याची जाण आपल्याला आहे. तसेच आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आता कोविड-सक्षम आहे. त्यामुळे लॉकडाऊनसारखे पर्याय आता वापरायची वेळ सहसा येणार नाही. संसर्ग-नियंत्रण खुद्द जनतेच्या हाती असल्याने सुरक्षेचे नियम पाळून निर्बंध टाळणे सहज शक्य आहे. तसेच ओमायक्रोन संसर्ग हा शक्यतो लक्षणविहीन किंवा सौम्य सर्दीसारखी लक्षणे असणारा असू शकतो. त्यामुळे फक्त लक्षण असलेल्या रुग्णांबाबत काळजी न घेता सर्व जनतेने नियमांचे पालन वाढवणे संसर्ग प्रसार टाळण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे महामारीचे हे चौथे वर्ष सुरु होताना तरी आपण शहाणे होणार आहोत का, हा मुख्य प्रश्न आहे. ‘न्यू नॉर्मल’ हे शब्द कागदावर राहणार की त्यांचा स्वीकार आपल्या दैनंदिन वागण्यात होणार? यापुढील सर्व वर्षे आपल्याला ‘करोनासह जगायचे आहे’ हे आता मान्य करायला हवे. मात्र करोनाला घाबरत जगायचे नाही, करोनाला दुर्लक्षून किंवा नाकारून जगायचे नाही तर करोनाला जाणून, करोनाला स्वीकारून, योग्य जबाबदारीच्या वर्तनासह करोनाला नियंत्रित ठेवत सुरक्षितपणे जगायचे आहे.
चीनसह जपान, अमेरिका, कोरिया व ब्राझील येथे करोना डोके वर काढू पाहतोय, या आपल्यासाठी सावध होण्याच्या हाका असतात, घाबरण्याच्या नाही. वर सांगितलेल्या साध्या सोप्या कृती चिनी कोविड आपल्यावर कधीच भारी होऊ देणार नाहीत!
मग कधी सुरुवात करताय ‘करोनासह जबाबदारीने जगण्याची’?

(लेखिका मिरज येथील रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.)

[email protected]

चीनच्या बातम्यांची खातरजमा करावी…

२०२०मध्ये कोरोनाला सुरुवात झाली, तेव्हा तो कोंबड्यांमधून पसरतो, अशी चर्चा होती. त्याचा परिणाम देशभरातल्या पोल्ट्री व्यवसायावर झाला होता. वस्तुस्थिती तशी होती काय, याचा खुलासा तेव्हा कुणी केला होता का? आता देखील तशीच परिस्थिती आहे. मुळात चीनमध्ये जी काही कोरोनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणतात, बातम्यांच्या, व्हिडिआेंच्या माध्यमातून आपण जे काही पाहतो आहोत, ते खरेच आहे काय, याची शहानिशा भारत सरकारने करायला हवी. तिकडचे व्हिडिओ पाहून आपल्याकडे लोक चिंताक्रांत होऊ लागलेले आहेत. चीनमधून येणार्‍या बातम्यांवर विश्वास ठेवण्यासारखी त्या देशाची विश्वासार्हता आहे का?
चीनमध्ये वास्तव्यास असणारी भारतीय मंडळी तिथे अशी काही परिस्थिती नाही, असे सांगत आहेत, तर दुसरीकडे चीनचे सरकार अधिकृतपणे कोरोनामुळे आपल्याकडे रोज तीन ते पाच जणांचा(च) मृत्यू होत असल्याचे सांगत आहे. एका आंतरराष्ट्रीय मेडिकल मॅगझिनमध्ये देखील चीनमध्ये कोरोनामुळे काही लाखांत मृत्यू होतील, असे म्हटले आहे. आता ही सगळी माहिती कानावर पडली की संभ्रम निर्माण होतो. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन चीनमधल्या स्थितीचं अधिकृत भारतीय आकलन स्पष्ट करावं. त्यातून नेमकं चित्र कळेल आणि चीनमध्ये सुरु आहे ते संशयास्पद आहे काय, याचाही खुलासा होईल.
सध्या जगभरात जपान, जर्मनी, इटली, ब्राझील, अमेरिका, या देशांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले आहेत. हे देश व्यापारी देश आहेत, त्यामुळे उद्योग व्यवसायाच्या विस्तारासाठी या देशातील मंडळी जगभर फिरत असतील. भारतातही विमानतळावर विदेशातून येणार्‍या मंडळींची रँडम पद्धतीने कोरोना चाचणी सुरु झाली आहे. पण ही रँडम तपासणी थांबवून केंद्र सरकारने विदेशातून येणार्‍या प्रत्येकाची कोरोना तपासणी अनिवार्य करावी. कोरोनाची लक्षणे आढळून आली तर अशा व्यक्तीला पाच ते सात दिवस विलगीकरण कक्षात ठेवून त्यावर उपचार करावेत. असे केल्यामुळे कोरोनाला वेशीवरच अडवता येईल.
नव्या विषाणूचे स्वरूप लक्षात घेऊन भारतात कोरोनाच्या लसीची पुढील आवृत्ती तयार होण्याची आवश्यकता आहे. कोरोना जगात दीर्घकाळ राहणार आहे. त्यात छोटे-मोठे बदल होत राहतील. त्याचा विचार करून भारतातील संशोधकांनी जुन्या लसीपेक्षा अधिक सक्षम प्रकारची लस तयार करण्याची आवश्यकता आहे. कोरोना देशात पुन्हा येणार का, याचे उत्तर कुणीच देऊ शकणार नाही. पण कोरोनाला रोखण्यासाठी सर्व बाजूनी सजग राहिलेच पाहिजे.

– डॉ. अविनाश भोंडवे
(शब्दांकन – सुधीर साबळे)

Previous Post

भिक्षुकशाहीचे बंड

Next Post

भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.