• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आदर्श शिवसैनिक कसा असावा?

- दिलीप मालवणकर

Nitin Phanse by Nitin Phanse
June 28, 2024
in भाष्य
0

आदर्श शिवसैनिक कसा असावा, याचे ताजे उदाहरण आज पुन्हा एकदा समोर आले. कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किशोर जैन यांना उमेदवारी जाहीर केली होती. यापूर्वी ही निवडणूक पुढे ढकलली गेली होती, तरी किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी प्रचारही सुरू केला होता. त्यांनी माझ्याशीही संपर्क साधून नवीन मतदार नोंदविण्यात सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मतदार नोंदणीही करण्यात आली.
आत्ता फक्त निवडणूक जाहिर होऊन नामनिर्देशन पत्र भरण्याचा अवकाश होता. अचानक राजकीय समीकरण बदलले व हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागला. उद्धव साहेबांनाही अवघडल्यासारखे झाले असावे. त्यांनी किशोर जैन यांना, ही निवडणूक आपल्याला लढवता येत नाही, तू अर्ज मागे घे, असे सांगताच कोणतीही कुरबुर न करता जैन यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निवडणूक लढविण्याची तयारी करून पालघर ते सिंधुदुर्ग इतक्या मोठ्या मतदारसंघात, ज्यात पाच जिल्हे व सहा लोकसभा मतदारसंघ येतात तिथे गेली सहा महिने संपर्क मोहीम राबवून पदवीधर मतदारांची नव्याने नोंदणी केलेली असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर निव्वळ पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून माघार घेणे, हे येरागबाळ्याचे काम नाही.
उमेदवारीसाठी व राजकीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी साठमारी करण्याच्या या काळात किशोर जैनसारखा निष्ठावंत व आज्ञाधारक सैनिक लाभणे अतिदुर्मिळ उदाहरण आहे. आमच्या येथे तर उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करूनही मान वर करून दिमाखात वावरणारे, पदासीन होणारे नेते नेतृत्व करताना दिसतात. पक्षाचा उपमर्द करून पक्षाचा उपभोग घेणारे वैयक्तिक स्वार्थासाठी, भ्रष्टाचार दडपण्यासाठी मिंधे गटात जाऊन आपल्या मूळ पक्षावर गाढवाचा नांगर फिरवण्याचे दु:साहस करण्याचे मनसुबे उराशी बाळगणार्‍यांचे नातेवाईक आपल्या पक्षात प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवणारे उभयचर प्राणी; आज आपल्या पक्षात असून ते सत्तेच्या मलिद्याचे रवंथ करून स्वत:ची आरती ओवाळण्यासाठी बडव्यांचा कळप सोबत बाळगतात. कोणी विरोध केला तर त्यांचे बडवे डॉबरमनसारखे अंगावर धावून जातात तर कधी कधी चावाही घेतात. तर दोन ढुढ्ढाचार्य नेते त्यांची पाठराखण करतानाही आपण पाहत आहोत. निव्वळ निधी मिळाला नाही किंवा निधी कमी मिळाला या लंगड्या सबबीखाली मिंधेंच्या गोठ्यात जाणारे आपण पाहतोच आहोत. पक्षप्रमुख जीवघेण्या आजाराने रुग्णशय्येवर जखडलेले असताना पक्षाने लायकीपेक्षा कितीतरी पटीने अधिक दिलेले नेते स्वत:ची औकात विसरून गनिमांशी हातमिळवणी करून गारदी बनतात, हेही आपण पाहत आलोत.
शिवसेनेच्या सुगीच्या दिवसात पात्रता नसताना विधान परिषदेवर वर्णी लावून घेणार्‍या नीलम गोर्‍हे या अडचणीच्या काळात घुमजाव करून निष्ठेची विष्ठा करतात, हेही आपण पाहत आहोत. त्याचवेळी दीड वर्ष प्रत्यक्ष तडीपारी भोगणारे सुरेश पाटील, एम. के. मढवी, वारंवार तडीपारीची धमकी येऊनही पथभ्रष्ट न होता, पक्षाशी इमान राखणारे विजय साळवी, १०३ दिवसाचा तुरुंगवास भोगूनही तीळभरही निष्ठा ढळू न देता बाजीप्रभूंप्रमाणे खिंड लढवणारे संजय राऊत, घरादारावर नांगर फिरूनही, निष्ठा ढळू न देणारे असंख्य तानाजी मालुसरे आजही शिवसेनेत आहेत. मिंधे गटावर रोज प्रहार करून त्यांना भंडावून सोडणारा त्यांच्या धमक्या व पोलिसी कारवाईला धूप न घालता अविचल असणारा माझ्यासारखा शिवसैनिक असो की रणरागिणी जी मिंधे गटाला थेट भिडते अशा आशा रसाळ, ठाणे या बालेकिल्यात गनिमांशी एकाकी झुंज देणारे राजन विचारे, कल्याणचे हर्षवर्धन पालांडे अशा निष्ठावंतांची फौज उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे.
खरा शिवसैनिक कसा असावा? याची असंख्य उदाहरणं आहेत. परळचे चंदू मास्तर जे भगवा गार्डचे सैनिक होते, त्यांनी कम्युनिष्टांचा खातमा करून तुरुंगवासही भोगला होता. त्या चंदू मास्तरांचा मुलगा शिवसेना नेते कै. वामनराव महाडिक यांच्या मुलाच्या चुकीमुळे बंदुकीची गोळी लागून धारातीर्थी पडतो. हे दु:ख किती विशाल असेल याची कल्पना करा. परंतु हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या एका शब्दाखातर पुत्रवियोगाचे दु:ख विसरून पुन्हा शिवसेनेसाठी सर्वस्व झोकून देणारा शिवसैनिक दुर्मिळाहून दुर्मिळ आहे. असे निष्ठावंत व आदर्श शिवसैनिक आहेत म्हणूनच काही पानं झडली, फांद्या गळून पडल्या तरी शिवसेनेचा वटवृक्ष व कामधेनू न वठता आजही बहरलेला आहे.

Previous Post

अमोल कीर्तिकर लढणार आणि जिंकणार!

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.