मेष : काळ चांगला आहे. इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे ठरेल. थोडी धावपळ होईल. उकाडा वाढतोय, त्याचा प्रकृतीवर परिणाम होऊ देऊ नका. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. खबरदारी घेऊन व्यवहार करा. व्यवसायात उन्नीस-बीस स्थिती राहील. वायफळ खर्च टाळा. मित्रमंडळींच्या भेटी होतील. कुटुंबासाठी वेळ द्याल. आर्थिक नियोजन उत्तम ठेवा.
वृषभ : भावाचे सहकार्य मिळेल. मालमत्तेसंदर्भातील वाटाघाटी मार्गी लागतील. ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीत वाद घडल्यास शांत राहा. छोट्या-मोठ्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करा. विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. मार्वेâटिंग तज्ज्ञ, व्यापारीr यांच्यासाठी चांगले दिवस आहेत. कलाकारांचा गौरव होईल. समाजकार्यासाठी वेळ द्याल. धार्मिक कार्यात मन रमवाल. काहीजणांना मोठे अनपेक्षित लाभ मिळतील.
मिथुन : नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक फायदा मिळाल्यामुळे नवा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा निर्माण होईल. पण विचार करून पावले टाका. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. शिक्षणक्षेत्रात उत्तम काळ राहील. एखाद्या विषयावर संशोधन होईल. नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. जुनी थकीत रक्कम अचानक हातात पडेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. मनासारखा खर्चही करू शकाल.
कर्क : सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. कुणाशी काय बोलतो यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शब्दाने शब्द वाढवू नका. कुटुंबात, अन्यत्र वाद विकोपाला जाऊ शकतात. शांती आणि संयम ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. जुनी प्रॉपर्टी कागदपत्रे तपासून विचारपूर्वकच खरेदी करा. खेळाडूंसाठी आगामी काळ यशदायी राहील. व्यावसायिकांना बरकत मिळवून देणारा काळ आहे. त्याचा लाभ करून घ्या.
सिंह : कार्यक्षेत्र वाढेल. नवीन संधी चालून येतील. व्यवसायातला आलेख चढता राहील. आध्यात्मिक कार्यातून मानसिक शांती लाभेल. दानधर्म होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाला चांगली गती मिळेल. वरिष्ठांकडून मान मिळेल. कामाचे कौतुक होईल. घरात गेटटुगेदर होईल. तरुणांसाठी उत्तम काळ. प्रेम प्रकरणात वादाचे प्रसंग निर्माण होतील. जपून राहा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
कन्या : कवी, संगीतकार, कलाकारांसाठी काळ उत्तम आहे. नातेवाईकांबरोबर वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. प्रवासात काळजी घ्या, खिसा पाकीट सांभाळा. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. पण पैसे कसेही खर्च करणे टाळा. नव्या वास्तूच्या खरेदीचे नियोजन कराल. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. परिस्थिती पाहून निर्णय घ्याल, तर फायद्यात राहाल.
तूळ : मनासारख्या घटना घडतील. मन आनंदी राहील. नोकरीत पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. घरातील मंडळींसाठी भरपूर वेळ खर्च कराल. एखादी सहल आयोजित कराल. मुलांकडून एखादी शुभ बातमी कानावर पडेल. त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, अपघात टाळा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. संशोधनक्षेत्रात चांगले दिवस आहेत. कामानिमित्ताने विदेशात जावे लागेल.
वृश्चिक : वादात मध्यस्थी करायला जाऊ नका. प्रकरण अंगलट येऊ शकते. अचानक धनलाभ होईल. व्यवसायाच्या ठिकाणी नोकरवर्ग त्रास देऊ शकतो. शांतपणे प्रसंगाला सामोरे जा. कोणताही निर्णय विचार करून घ्या. लॉटरी, जुगार, सट्टा यापासून दोन हात लांब राहा. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. पैसे उधळू नका. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. प्रेम प्रकरणात कटू अनुभव येण्याची शक्यता आहे.
धनू : व्यावसायिकांना ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. कामाचा ओघ वाढेल. तरुणांना लॉटरी लागेल. नोकरीच्या ठिकाणी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा, म्हणजे त्रास होणार नाही. एखादे आव्हान समोर उभे राहील. त्यातून चाणाक्ष पद्धतीने मार्ग काढा. राजकीय क्षेत्रात अचानक एखादी जबाबदारी मिळू शकते. विदेशात नोकरी मिळवण्याच्या प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये नक्की यश मिळेल. आंधळा विश्वास ठेवून व्यवहार करू नका. सरकारी कामे झटपट मार्गी लागतील.
मकर : मनासारख्या घटना न घडल्याने अस्वस्थता वाढेल. मित्रांबरोबर भटकंती होईल. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, कानाचे दुखणे असे त्रास उद्भवू शकतात. वादात पडू नका. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू शकतो. नव्या व्यवसायाची घडी चांगली बसेल. सामाजिक कार्यात मन रमवाल. संततीच्या एखाद्या कारनाम्याचा त्रास होऊ शकतो. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल. पत्रकार, संपादक, लेखकांसाठी उत्तम काळ राहील.
कुंभ : काही दिवसांपूर्वीच्या नव्या ओळखींचा फायदा होईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांत यश मिळेल. मनासारख्या नोकरीची संधी सहज मिळेल. आर्थिक गुंतवणूक करणे तूर्त टाळा. सामाजिक जीवनात मानसन्मानाचे प्रसंग घडतील. ओळखीच्यांना वा मित्रमंडळींना उसनवारी देणे टाळा. नातेवाईकांमध्ये कटुता येईल.
मीन : आरोग्यक्षेत्रात उत्तम काळ राहील. नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील. नाकासमोर चालत राहा. कोर्ट-कचेरीतील वादांवर निर्णय येण्यास अजून काही काळ जाईल. नवे घर, जमीन घेण्याचा विचार मार्गी लागेल. मनासारखी वस्तू मिळेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. संततीकडून शुभवार्ता कानावर पडेल. कलाकारांसाठी उत्तम काळ आहे. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल.