भक्तहो, स्वत:च्या डोक्याचा वापर करा…
फडणवीस यांनी घसा खरडून चुकीची हनुमान चालीसा म्हंटली आणि पुण्यात पाटील काकांनी प्रभावीत होऊन मुलाला सीबीएससीच्या शाळेतून काढून गोळवलकर शाळेत टाकले कारण मुलावर हिंदू संस्कार झाले पाहिजेत…
…पण फडणवीस यांची मुलगी फोर्टच्या कॅथड्रल या कॅथलीक शाळेत शिकते हे त्यांना माहितीच नाही… ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आमचे कार्यकर्ते आणि त्यांची मुलं रस्त्यावर उतरतील असं पंकजाताईचं भाषण ऐकून खाडेकाका रोजंदारीवर न जाता बायकापोरांबरोबर हक्कासाठी रास्ता रोको करणार…
..पण याचं पंकजा ताई त्यांच्या मुलाला नुकतंच बोस्टन युनिव्हर्सिटीमधे शिकायला सोडून आल्या आहेत, हे त्या खाडे काकांना कुठे माहिती आहे…
हिंदुराष्ट्र झाले पाहिजे असं शहा साहेबांचे भाषण ऐकून शर्मा साहेबांनी एका विशिष्ठ धर्माच्या दुकानावर बहिष्कार घातलाय…
पण जय शहा आयसीसी या क्रिकेटच्या बोर्डावर असून नियमितपणे दुबईच्या अरबी शेख लोकांबरोबर मीटिंग करतो हे त्यांना कुठे माहिती आहे…
मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ने प्रभावित होऊन पाटील काकांनी त्यांचा ‘मेड इन चायना’ फोन फेकून दिला…
…पण मोदीजी पेन, गॉगल, कारपासून प्रत्येक गोष्ट इम्पोर्टेडच वापरतात हे कुठे त्यांना माहिती आहे!
हिंदूंनी चार मुलं जन्माला घातली पाहिजेत असं कोण्या साध्वीचं ऐकून लेले काकांनी त्यांच्या नुकतंच लग्न झालेल्या मुलाला आणि सुनेला तयारीला लागा असा सल्ला दिलाय…
..पण त्या साध्वी स्वतः ब्रह्मचारी आहेत हे लेले काकांच्या लक्षातच आले नाही… सगळे डॉक्टर्स -डू असतात, असे संभाजी भिडे म्हणाले, म्हणून धुमाळकाकांनी ठरवलं आता डॉक्टरकडे न जाता आयुर्वेदिक औषधंच घायची…
…पण त्यांना हे माहित नाही की, भिडेंचे उपचार नुकतेच हृदयरोगतज्ञ डॉ. मुजावर या मुस्लिमधर्मिय डॉक्टरांनी केलेत…हिंदुधर्मासाठी आमची पोरं रस्त्यावर उतरतील असं सांगणार्या भाजप आमदार बोन्डेचा मुलगा अमेरिकेत लग्न करून स्थायिक झालाय…
त्यामुळे भक्तांनी भाजप नेत्यांचे ऐकून रस्त्यात उतरून स्वतःची डोकी फोडून घेण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या तुमच्या स्वतःच्या हक्काच्या डोक्याचा वापर करावा.
– विजय चोरमारे
इतिहासात स्वत:च्या कबरी खोदत बसू नका!
जमिनी खोदून मंदिर-मशिद खेळत बसणार्या, जाती-धर्माचे अहंकार बाळगणार्या या देशात सरसकट सगळ्या लोकांचे डीएनए प्रोफायलिंग करावे आणि ते पब्लिक करून टाकावे. स्वतःच्या रक्तात जेव्हा ग्रीक, फ्रेंच, डच, पोर्तुगिज, इंग्रज, मुघल, अफगाण, हून, शक, पारशी, हबशी, इराणी, चिनी इत्यादी असंख्य लोकांचे डीएनए सापडायला लागतील तेव्हा इथल्या लोकांना थोडी जाग यायला लागेल.
तुम्हाला काय वाटतं की फक्त मंदिर पाडून मशिद बांधली गेली किंवा बौद्ध स्तूप/लेणी उद्ध्वस्त करून मंदिर बांधले गेले? धार्मिक स्थळांपेक्षा शेकडो पटीने जास्त माणसे बदलली आहेत आणि जन्माला घातली गेली आहेत. माझ्या, तुमच्या आणि आजूबाजूच्या प्रत्येकाच्या रक्तात सगळ्या जगातल्या लोकांचे डीएनए आलेले आहेत. बाकी दुनिया मंगळावर वस्ती करायला पाहत आहे, एआय वापरून मानवी श्रम संपवायला बघत आहे, ऊर्जेचे नवनवे मार्ग शोधत आहे… आणि हे भीकमागे इतिहासात स्वतःच्या कबरी खोदत आहेत!
– डॉ. विनय काटे