• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home फ्री हिट

सर्फराजवर नशीब का नाराज?

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 27, 2023
in फ्री हिट
0
सर्फराजवर नशीब का नाराज?
Share on FacebookShare on Twitter

‘‘निवड समितीला स्लिम-ट्रिम युवक हवे असतील, तर त्यांनी फॅशन शोमध्ये जाऊन काही मॉडेल सिलेक्ट करावेत आणि त्यांच्याकडे बॅट-बॉल सोपवून क्रिकेट खेळवावे. त्यांनाच संघात स्थान द्यावे. तुमच्याकडे सर्व आकारांचे क्रिकेटपटू आहेत, त्यावर जाऊ नये. धावा काढण्याची आणि बळी मिळवण्याची क्षमता याआधारे संघ निवड करावी,’’ अशा शब्दांत माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावस्कर यांनी निवड समितीवर नुकतीच तोफ डागली. मुंबईच्या २५ वर्षीय सर्फराज खानला डावलल्याबद्दल गावस्कर यांनी हे खडे बोल सुनावले आहेत. याचे ताजे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेसाठी चेतन शर्मा यांच्या निवड समितीने सर्फराजला संघात स्थान दिले नाही. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत धावांचे सातत्य राखून बर्‍याचदा मुंबईचा तारणहार ठरणार्‍या सर्फराजला भारताच्या कसोटी संघाचे दरवाजे अद्याप खुले का झाले नाहीत, हाच प्रश्न सध्या क्रिकेटक्षेत्रात चर्चेत आहे.
‘‘खेळाडू तंदुरुस्त नसेल, तर तो दिवसाअखेरीस शतक पूर्ण करू शकणार नाही. सर्फराजने त्रिशतकसुद्धा झळकावले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यो-यो चाचणी हाच तंदुरुस्तीचा निकष केला आहे. शतकानंतरही सर्फराज क्षेत्ररक्षणासाठी उतरतो. क्रिकेटसाठी आपण किती तंदुरुस्त आहोत, हे त्याने सिद्ध केले आहे,’’ असे विश्लेषण गावस्कर करतात. यातून सर्फराजचे नेमके काय चुकते आहे, हा सवाल अधिक गंभीर होतो.

सातत्यपूर्ण कामगिरी

सर्फराजच्या खात्यावर ३७ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत ३,५०५ धावा जमा आहेत. यात १३ शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची धावांची सरासरी ८१.५१ इतकी लक्षवेधी आहे. ही सरासरी ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसर्‍या क्रमांकाची ठरते. २०१९च्या रणजी क्रिकेट हंगामापासून सर्फराज मुंबईसाठी अविरत धावा करीत आहे. २०१९-२०च्या हंगामातील सहा सामन्यांत त्याने १५४.६६च्या अक्राळविक्राळ सरासरीने ९२८ धावा केल्या. त्यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. यात ३०१ धावांच्या संस्मरणीय खेळीचाही समावेश आहे. २०२०-२१चा हंगाम करोना साथीमुळे होऊ शकला नाही. पण २०२१-२२मध्ये रणजी करंडक स्पर्धेचे पुनरागमन होताच सर्फराजची धावांची टांकसाळ पुन्हा सुरू झाली. या हंगामातीलही सहा सामन्यांत त्याने १२२.७५च्या सरासरीने तीन शतकांसह ९८२ धावा केल्या. मुंबईला रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात सर्फराजचा सिंहाचा वाटा होता, हेही कुणी नाकारू शकणार नाही. अंतिम सामन्यात मध्य प्रदेशकडून मुंबईचा संघ पराभूत झाला, पण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सर्फराजने पटकावला. सर्फराजने भारत-अ संघाचे प्रतिनिधित्व करताना चार सामन्यांतील सात डावांत ३४.१६च्या सरासरीने २०५ धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतके आणि पाच बळींचाही समावेश आहे. बांगलादेश-अ संघाविरुद्धच्या मालिकेत तो छाप पाडू शकला नाही. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कठीण परिस्थितीत त्याने नाबाद ७१ धावांची खेळी साकारली होती. यंदाच्या रणजी हंगामातही सर्फराजने पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत. मुंबईने नुकताच दिल्लीविरुद्धचा रणजी सामना गमावला. पण या सामन्याच्या पहिल्या डावात सर्फराजने संकटमोचकाची भूमिका बजावत १२५ धावा केल्या होत्या. या लढवय्या क्रिकेटपटूने पुन्हा स्वत:ला सिद्ध केले. तरीही ‘फलनिष्पत्ती’ झाली नाही. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी महत्त्वाच्या असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यावर स्वाभाविकपणे सर्फराज निराश झाला. तो रात्रभर झोपू शकला नाही. वडील नौशाद खान यांनी त्याला पाठबळ दिले, अन्यथा हे नैराश्य त्याला आणखी बोचले असते. फक्त गावस्करच नव्हे, तर इरफान पठाण, आकाश चोप्रा, दोडा गणेश, हर्षा भोगले या सर्वांनी सर्फराजला संधी न दिल्याबद्दल आश्चर्य प्रकट केले आहे.

कारकीर्दीतील वाद

सर्फराजची ओळख मुंबईच्या क्रिकेटला झाली, ती त्याच्या शालेय क्रिकेट दिवसांत. सर्फराजने हॅरिस शील्ड क्रिकेटमध्ये ४२१ चेंडूंमध्ये ४३९ धावा करीत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला तेव्हा. २००९मध्ये हा पराक्रम केला, तेव्हा सर्फराज फक्त १२ वर्षांचा होता. रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना त्याने ५६ चौकार आणि १२ षटकारांची आतषबाजी केली. शालेय दिवसांत त्याच्यावर वयचोरीचाही ठपका ठेवण्यात आला. परंतु चाचण्यांनंतर तो निर्दोष ठरला. मग मुंबईच्या १९ वर्षांखालील संघातून उत्तम कामगिरीच्या बळावर त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघातही स्थान मिळवले. इतकेच नव्हे, २०१४ आणि २०१६च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले. २०१५मध्ये मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करताना उपांत्य फेरीचा सामना जिंकून दिल्यानंतर सर्फराजची निवड समितीच्या विरोधातील आक्षेपार्ह वागणूक प्रकाशात आली. त्यावेळी सर्फराज आणि सूर्यकुमार यादव यांना संघातून वगळल्यात आले होते. उत्तम वर्तणुकीची हमी म्हणून त्याचे दोन वर्षांचे सामन्याचे मानधन रोखून ठेवण्यात आले होते. त्यामुळे वर्तणूक हा मुद्दा त्याच्या विकासाला हानीकारक ठरताना दिसतो आहे.

कसोटी संघातील तीव्र स्पर्धा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघात इशान किशन, केएस भरत आणि सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरलेला नसल्याने किशन किंवा भरत यापैकी एकाला संधी मिळेल. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये नाणे खणखणीत सिद्ध करणार्‍या सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागेल, असे मत काही दिवसांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने प्रकट केले होते. पण त्याला कसोटी संघाची संधी लवकर चालून आली. पण या संघात सर्फराजला स्थान मिळू शकले नाही. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे, हे राहुलच्या पथ्यावर पडेल. पण रवींद्र जडेजासुद्धा दुखापतीतून सावरून परतला आहे. संघातील प्रत्येक स्थानासाठीची स्पर्धा पाहता सर्फराजला भारतीय संघात स्थान देऊनही प्रत्यक्षात खेळायची संधी मिळेल, याची खात्री देता येत होती का? पण तरीही सूर्यकुमारपेक्षा (४४.४५च्या सरासरीने ५,५४९ धावा) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्फराजची निवड सरस ठरली असती, हे आकडेवारीच सांगते. सूर्यकुमारने यंदाच्या रणजी क्रिकेटमध्ये हैदराबादविरुद्ध ९० आणि सौराष्ट्रविरुद्ध ९५ धावा केल्या होत्या. पण सूर्यकुमारलाही प्रत्यक्ष संधी मिळणे अवघड आहे. कारण रोहित शर्मा, शुभमन गिल या सलामीवीरांनंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर खेळणार. त्यामुळे पुढील मधल्या फळीत केएल राहुल, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा अशी तीव्र स्पर्धा आहे. उर्वरित तीन स्थानांपैकी खेळपट्टीनुसार एक फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाज किंवा तिन्ही वेगवान गोलंदाज असे समीकरण आखले जाईल.
सर्फराजला डावलल्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी निवड समिती ग्राह्य मानत नाही का? की ‘आयपीएल’मधील कामगिरीचा विचार केला जातो? की अन्य कोणत्या निकषांची पूर्तता करण्यात सर्फराज अपयशी ठरला, हे मुद्दे आता चर्चेत आले आहेत. सर्फराजने भारत-अ संघाकडून मिळालेल्या संधीचे सोने केले नाही, हे एक कारण मांडले जाते. सर्फराजची बंगालचा अभिमन्यू ईश्वरनशी तुलता केली जाते. ईश्वरनने ‘अ’ संघाकडूनही उत्तम कामगिरी केली आहे. २०१५-१६च्या ‘आयपीएल’ हंगामात सर्फराजच्या तंदुरुस्तीबाबत कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर सर्फराजने तंदुरुस्ती आणि वजन यावर मेहनत घेतली. तो गेली अनेक वर्षे ‘आयपीएल’ची तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होतो आहे.
पद्माकर शिवलकर, राजिंदर गोयल, अमोल मुझुमदार, मिथुन मन्हास आणि एस. शरथ यांनी देशांतर्गत क्रिकेट गाजवूनही भारतीय संघातले स्थान त्यांच्या नशिबात नव्हते. गुणवान खेळाडूंची देशात मुळीच वानवा नव्हती. पण त्या स्थानावरील खेळाडू देशाकडून चांगली कामगिरी करीत होते, म्हणूनच इतरांना संधी मिळाली नाही. सूर्यकुमार आज वयाच्या ३२व्या वर्षी भारतीय संघातून चमकत आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने वयाच्या ३१व्या वर्षी तब्बल १२ वर्षांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले आहे. हे धडे पंचविशीतल्या सर्फराजसाठी अपरिहार्य आहेत. सर्फराजसाठी भारतीय संघाचे दार उघडण्यासाठीची प्रतीक्षा दीर्घ असली तरी ती निराशाजनक निश्चित नाही.

[email protected]

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

सरकारी काम, पळू नकोस लांब!

Related Posts

फ्री हिट

नेतृत्वक्षम स्मिथ!

March 23, 2023
फ्री हिट

क्रीडा पत्रकारितेचे भीष्म पितामह

March 16, 2023
लीग आटवा, क्रिकेट वाचवा!
फ्री हिट

लीग आटवा, क्रिकेट वाचवा!

March 16, 2023
फ्री हिट

शर्माजींची शर्मनाक गच्छंति!

February 24, 2023
Next Post
सरकारी काम, पळू नकोस लांब!

सरकारी काम, पळू नकोस लांब!

आनंदाचे डोही व्यंगचित्र तरंग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.