• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home भाष्य

आता नॉर्दर्न लाईट्स

- डॉ. सतीश नाईक, डॉ. उर्मिला कबरे (अपुन अपुन...)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 27, 2023
in भाष्य
0
Share on FacebookShare on Twitter

किरूनानंतर आमचा मुक्काम होता ट्रॉम्सो नावाच्या शहरात. इथं आमचा नॉर्दर्न लाईट्सचा पाठलाग संपणार होता. जवळपास बेट म्हणता येईल असं हे शहर नॉर्वेच्या अगदी उत्तरेला वसलेलं आहे. आपल्या मापदंडांमध्ये याला शहर म्हणता येईल की नाही हे सांगणं थोडं अवघड आहे. कारण ‘शहराची’ लोकसंख्या जेमतेम ८०,०००च्या आसपास आहे. फार तर तालुक्याचं ठिकाण किंवा मुंबई, पुण्यासारख्या शहरांच्या महानगरपालिकांचे दोन तीन वॉर्ड वाटावेत इतकाच याचा व्याप.
खरं तर हे एक बेट आहे. नॉर्वेच्या मुख्य भूभागाला एका पुलानं आणि बोगद्यानं जोडलं गेलेलं आहे. पण इथली लोकं भारतीय जेवणावर तुटून पडत असावीत. कारण तिथल्या एकमेव भारतीय (परदेशात ज्याला ‘इंडियन फूड’ किंवा भारतीय जेवण म्हणतात ते देणारं रेस्टॉरंट, ते खरंच भारतीय माणसाचंच असेल याचा कोणताही भरवसा नसतो- ते भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, इतकंच कशाला अफगाणी व्यक्तीचंही असू शकतं. म्हणजे एकप्रकारे ते भारतीय उपखंडाचं म्हणता येईल)
रेस्टॉरंटमध्ये तीन तीन दिवस आधी आगाऊ नोंदणी केल्याशिवाय जेवायला मिळत नाही. विशेष म्हणजे आम्ही जेवणाचं टेबल बुक करायला गेलो तेव्हा तिथं आम्हाला एक नाशिकची मुलगी भेटली. ती त्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. मराठी माणूस जगात कुठं कुठं पोचलाय याची ती चुणूक म्हणायला हरकत नाही. पण आमची अशी ‘ओळख’ असूनही आमचा वशिला लागू शकला नाही. आम्हाला जेवण न घेताच परत फिरावं लागलं. त्या रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरातून येणारा मसाल्याचा सुगंध नाकात साठवून ठेवत आम्ही विन्मुख फिरलो.
शहराच्या आसपास भरपूर टेकड्या आहेत. इथं २१ मे ते २१ जुलै या काळात मध्यरात्रीचा सूर्य दिसतो. पण शहर थोडंसं उंचावर असल्यानं संधिप्रकाश बराच काळ रेंगाळतो. त्यामुळं या काळात एकप्रकारे खरी रात्र दिसतंच नाही. याउलट २६ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या काळात सूर्य प्रत्यक्षात नजरेला पडत नाही. तो कुठेतरी डोंगराआड लपलेला असतो. संधिप्रकाशाच्या उजेडालाच दिवस म्हणावा लागतो. या कारणानं म्हणा की आणखी काही, जानेवारीच्या शेवटी जेव्हा सूर्यदर्शन होतं तेव्हा तो दिवस चक्क सेलिब्रेट केला जातो; त्या दिवशी चक्क उत्सवासारखा माहोल असतो. आम्ही गेलो होतो मार्चमध्ये. तोपर्यंत दिवस-रात्र बर्‍यापैकी समसमान झालेले होते. त्यामुळं यातली गम्मत आम्हाला तरी अनुभवायला मिळाली नाही.
शहरात प्रवेश करताना लागणार्‍या पुलाच्या पलीकडे एक उंच टेकडी आहे. स्टोरसाईननेन हे त्या टेकडीचं नाव (हा इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे उच्चार झाला, नॉर्वेच्या भाषेत कदाचित वेगळा उच्चार असू शकेल)टेकडीवर उभं राहून संपूर्ण शहर दिसतं. तिथं जायला केबल कार आहे. मध्यरात्रीचा सूर्य पाहायला लोक तिथं हमखास जातात. प्रत्यक्ष शहरात प्रवेश करताना एक सुंदर चर्च लागतं. टेकडीवरूनही ते त्रिकोणी आकाराचं चर्च फार छान दिसतं. हे आर्क्टिक कॅथेड्रल.
किनार्‍यावर एक अत्यंत उत्तम असं आर्क्टिक म्युझियम आहे. हे छोटंसं म्युझियम एका वेअरहाऊसवजा जागेत वसवलं आहे. म्युझियम पाहताना ग्लोबल वॉर्मिंगमुळं बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त फटका या देशांना बसतोय याची जाणीव पदोपदी होत होती किंवा जगाला याची आवर्जून जाणीव करून द्यावी म्हणून ते बनवलंय की काय असं वाटावं, अशी त्याची मांडणी आहे. शिवाय शहरात आणखी एक म्युझियम आहे. १९४४ साली दुसर्‍या महायुद्धात बुडवल्या गेलेल्या जर्मनीच्या एका जहाजावर ते आधारित आहे. आम्ही गेलो तेव्हा ते खुलं नव्हतं. ते फक्त उन्हाळ्यात सुरू असतं.
दिवसभर व्यवस्थित भटकल्यावर रात्र पडायला लागली, तेव्हा पुन्हा एकदा नॉर्दर्न लाईट्सची हुरहूर लागली. सुदैवानं या दिवशी निसर्गानं आम्हाला अजिबात निराश केलं नाही. आकाश चांगलंच निरभ्र होतं. सृष्टी एकंदरीत नॉर्दर्न लाईट्सना अनुकूल होती. ही गंमत अधिक प्रकर्षानं अनुभवता यावी तर शहरापासून थोडं दूर शहरी प्रकाशापासून लांब जावं लागतं. यासाठी आम्ही एक छोटं बसवजा वाहन आधीच ठरवलं होतं. वाहनचालक, त्याचा एक मदतनीस अशी दोनच माणसं सगळी टूर सांभाळत होते. त्यांनी आम्हाला प्रथम आडबाजूच्या समुद्रकिनारी नेलं. संध्याछाया सुरू व्हायचा अवकाश आमचे डोळे चक्क विस्फारायला लागले. कारण आकाश वेगळ्याच प्रकाशलाटांनी भरायला लागलं. जसजसा अंधार वाढायला लागला तसतसा या लाटा वाढायला लागल्या. आकाश अधिकाधिक उजळू लागलं. एका दिशेनं निळसर हिरवा प्रकाशझोत येतोय न येतोय तोच दुसरीकडे गुलाबी जांभळा प्रकाशझोत यायचा आणि इथे बघू की तिकडे बघू असं होऊन जायचं. हे दृश्यच खूप मनोहारी होतं. त्यामुळं रात्र चढत असताना आणि त्याचबरोबर थंडी वाढत असतानादेखील आमचा पाय तिथून निघत नव्हता. लहान मुलांसारखे ‘इकडे बघ’, ‘अरे ते बघ’ असं ओरडत सगळ्यांच्या माना वर आकाशाच्या दिशेला लागल्या होत्या.
पण त्या टूर ऑपरेटरच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्याने बळजबरीनं आम्हाला तिथून बाहेर काढलं. कारण समुद्रकिनार्‍यावर दूरवर शहरी प्रकाश दिसत होता. त्याने नॉर्दर्न लाईट्स दिसण्यात अडथळा येतो असं त्याचं म्हणणं होतं. तो नेमकं काय सांगतोय हे थोड्याच वेळात आम्हाला समजलं. शहरापासून दूर जंगलाच्या ठिकाणी तो आम्हाला घेऊन गेला. तिथं अक्षरशः नॉर्दर्न लाईट्सची आतषबाजी चालली होती. काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर जे काही आम्ही पाहिलं ते शब्दात सांगता येणं कठीण आहे. आतषबाजी हा शब्ददेखील तोकडा पडावा, डोळ्याचं पारणं फिटावं इतकं ते सगळं अफलातून होतं.
आम्ही मूर्खासारखे आमच्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात आकाशातला तो चमत्कार साठवण्याचा प्रयत्न करत होतो. मूर्खासारखं असं म्हटलं कारण हा प्रकार नेहमीच्या कॅमेर्‍यात नेहमीच्या पद्धतीत पकडता येत नाही. त्यासाठी कॅमेर्‍याचा शटरस्पीड खूप कमी ठेवावा लागतो. एकतर गडद अंधारात उभे असलेले आपण दिसत नाही आणि पुरेसा प्रकाश कॅमेर्‍यात न आल्यामुळं आकाशातली रंगांची उधळण फोटोत येत नाही.
आमच्या टूर ऑपरेटरकडे यावर उत्तर होतं. त्याने आपल्या कॅमेर्‍यात शटरस्पीड कमी ठेवला, आमचे चेहरे नीट दिसावेत म्हणून एका टॉर्चने आमच्यावर प्रकाशझोत टाकला. त्यामुळं नॉर्दर्न लाईट्स सकट आमचा फोटो निघाला!
अतिपरिचयात अवज्ञा हे आम्हाला त्या दिवशी पुरेपूर पटलं. निसर्गानं इतकं भरभरून दिल्यावर हळूहळू आम्हाला थंडी जाणवायला लागली. तरीही कुडकुडत काही वेळ आम्ही तग धरला. आम्ही आकाशाकडे डोळे लावून बसलेलो असताना इथे आमच्या टूर ऑपरेटरचा मदतनीस कामाला लागला होता. त्याने आमच्या हातात हॉट चॉकलेटचा गरम गरम पेला दिला. त्या प्रचंड थंडीत आम्हाला स्वर्गसुख मिळालं. हॉट चॉकलेटच्या जोरावर आम्ही आणखी काही वेळ तिथं राहू शकलो. मग थंडी सोसण्याची आमची सहनशक्ती संपली. एकेक करून आम्ही गाडीच्या उबेत शिरायला सुरुवात केली. आमचा नॉर्दर्न लाईट्सचा पाठलाग संपला होता. मनं तृप्त झाली होती. इतके दिवस केलेल्या भ्रमंतीची, काही दिवस सोसाव्या लागलेल्या निराशेची यशस्वी सांगता झाली होती.
भारतात परत आल्यावर कळलं की अनेकांना या नॉर्दर्न लाइट्सनी हुलकावणी दिलेली आहे. बरेच दिवस राहूनही त्यांना त्यांचं दर्शन झालेलं नाही. निसर्ग आहे तो. तो काही आपल्या मनाप्रमाणं, आपल्या वेळापत्रकाप्रमाणं काम करत नाही. ते तुमच्या नशिबात असावं लागतं. एक नक्की आम्ही मात्र खूप नशीबवान ठरलो होतो.

Previous Post

कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

Next Post

बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023
भाष्य

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
भाष्य

परतीचा प्रवास

March 23, 2023
भाष्य

आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

March 23, 2023
Next Post

बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

किती नासाडी कराल रे अन्नाची!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.