अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ वृषभेत, शुक्र कर्वेâत, रवि सिंहेत, बुध कन्येत, केतू तुळेत, प्लूटो (वक्री)- शनि (वक्री) मकरेत, गुरु (वक्री)- नेपच्युन (वक्री) मीनेत, चंद्र सिंहेत, त्यानंतर कन्या, वृश्चिकेत, १ सप्टेंबर रोजी शुक्र सिंहेत. दिनविशेष – २७ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या, ३० ऑगस्ट रोजी हरितालिका तृतीया, ३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी, १ सप्टेंबर रोजी ऋषिपंचमी.
मेष – अनेक दिवसांपासून थांबलेल्या गोष्टी अमावस्येनंतर प्रगतीपथावर येतील. रवीचे शनिच्या दृष्टीत होणारे राश्यांतर मनावरील दडपण दूर करेल. नाराजीचा सूर मावळेल. अंग झटकून कामाला लागा. गृहसौख्य लाभेल. नव्या वास्तूचा लाभ होईल. संततीबाबतीत शुभवार्ता कळेल. व्यापार्यांना कंत्राटी कामातून लाभ होईल. शनि-मंगळ नवपंचमयोग सरकारी अधिकार्यांना लाभदायक आहे. सहकुटुंब देवदर्शनाला जाल.
वृषभ – वक्री शनि दशमभावात, राहू-हर्षल केंद्रयोगामुळे आरोग्य समस्या किंवा नियमबाह्य कामामुळे अडचणी येतील. उद्योग व्यवसायात झपाट्याने यश मिळेल. बुधाचे पंचमातील भ्रमण, गुरु-बुध दृष्टियोगामुळे सकारात्मक वातावरण होईल, कामाचा उत्साह वाढेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. उच्चशिक्षणचा मार्ग मोकळा होईल. सभा, चर्चासत्र गाजवाल. मध्यस्थाची जबाबदारी येईल. गायन, अभिनय, संगीत स्पर्धेत सहभागी व्हाल. शेअर बाजार, जुगार, लॉटरीमधून चांगला पैसा मिळेल.
मिथुन – वैवाहिक सौख्य मिळेल. नोकरीत यश मिळेल. पंचमेश शुक्रामुळे संततीच्या कारणाने कौटुंबिक मतभेद होतील. मनस्ताप होईल. बंधूवर्गाला मदत कराल. कागदपत्रांची शहानिशा करा. सरकारी संस्थाकडून चांगले लाभ मिळतील. व्ययातील मंगळामुळे स्वभाव हटवादी झाल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रवासात काळजी घ्या. पैसे मिळण्यास उशीर होईल. घरापासून दूर बदली होऊ शकते.
कर्क – उणी दुणी न काढता घरात एकोप्याने राहा. सप्तमात वक्री शनी आणि वक्री प्लूटो, त्यामुळे घरात, व्यवसायात वाद टोकाला जाऊ शकतो. त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. आर्थिक बाजू भक्कम राहणार असली तरी वायफळ खर्च करू नका. लाभातील मंगळाचे भ्रमण १६ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे, आरोग्य सांभाळा. आजार अंगावर काढू नका. भविष्यात त्रास होईल. संततीसाठी लाभदायक काळ. विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रतिष्ठा मिळेल.
सिंह – शुक्लकाष्ठे कमी होतील. नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात हेवेदावे झाले असतील तर ती परिस्थिती पूर्णपणे निवळेल. रविच्या स्वराशीतील राश्यांतर यामुळे कामासाठी ऊर्जा मिळेल. महिलांना पोटाचे दुखणे उद्भवू शकते. कामाच्या निमित्ताने प्रवास करताना काळजी घ्या. व्यावसायिक घोडदौड सुरु राहील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा, कामे झटपट मार्गी लागतील.
कन्या – मागून बोलणार्यांपासून सावध राहा. रवी-मंगळ केंद्रयोगामुळे डोळ्याचे आजार होतील. बेफिकिरी टाळा. काका मदत करतील. सरकारी कामे मार्गी लावा, अन्यथा त्रास होईल. प्रवास घडतील, आर्थिक गणित विस्कटेल. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. सप्तमातील वक्री गुरूमुळे जोडीदाराबरोबर वाद होतील. वैवाहिक जीवनात ब्रेकअपपर्यंत प्रकरण जाईल.
तूळ – शुक्र आणि वक्री शनि यांचा समसप्तक योग, लग्नी केतू, सप्तमात राहू-हर्षल वक्री त्यामुळे सगळे काही आलबेल असणार नाही. संसारात कष्ट आणि निराशा पदरी पडेल. समाजात
बॅकफूटवर जावे लागेल. कामात असंतोष वाढल्याने आर्थिक नुकसान होईल. बढतीसाठी प्रयत्न कमी पडतील. कामानिमित्ताने परदेशप्रवास घडेल. अष्टमातील मंगळामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्यास आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा.
वृश्चिक – वैवाहिक जोडीदार, व्यवसायातील भागीदारांबरोबर वाद होतील. मंगळ सप्तमात, सप्तमेश शुक्र वक्री शनि आणि गुरूच्या दृष्टीत. संततीची शैक्षणिक कामे रेंगाळतील. अपयश येऊ शकते. आर्थिक समस्या राहणार नाहीत. कामाची धावपळ वाढेल. आजोळ, मामा यांच्याकडून अनपेक्षित मदत मिळेल. शेअर बाजारातून आर्थिक लाभ होतील.
धनु – शुभ गोष्टीचा अनुभव येईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. गुरु-बुध दृष्टी योगात कामात घवघवीत यश मिळेल. राहू-केतू अपेक्षित यश मिळवून देतील. नव्या घराच्या, वाहनाच्या विचाराला चांगली गती मिळेल. घरात पूजापाठ होईल. धार्मिक सहलीसाठी वेळ द्याल. सामाजिक कामासाठी मदत कराल. महत्वाच्या कामात गुरुबंधू, वडील यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल.
मकर – नोकरी, व्यवसायातील कामाचा ताण निवळेल. अपेक्षित बदल दिसतील. वडीलधार्यांसाठी येणारा काळ त्रासदायक आहे. महत्वाच्या कामात अडचणी येतील. गुरु-बुधाचा दृष्टियोग असल्याने मदतीचा हात मिळेल. बुद्धीच्या जोरावर अडचणीतून मार्ग काढाल. शनि-मंगळाचा नवपंचमयोग वाट शोधण्यास मदत करेल.
कुंभ – व्यवसायात जम बसेल. प्रॉपर्टी खरेदीविक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. शुक्राचे एक सप्टेंबर रोजी होणारे सिंहेतील राश्यांतर करमणूक, कलाक्षेत्रातील मंडळींना यश देईल. नोकरदारांसाठी चांगला काळ आहे. महिलांना अनपेक्षित लाभ मिळेल. शुक्र-मंगळ केंद्रयोगामुळे प्रेमप्रकरणात यश मिळेल. रासायनिक क्षेत्र, गणिततज्ज्ञ अशा व्यवसायिकांना लाभदायक राहणार आहे.
मीन – आरोग्याची काळजी घ्या. संततीची महत्वाची कामे अडून राहतील. कामात विलंब होईल. नवी गुंतवून टाळा. घरात धार्मिक कार्य घडेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरदारांसाठी उत्तम काळ आहे. महिलांसाठीही काळ चांगला आहे. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर नवे काम मिळवाल. सरकारी कामे मार्गी लागतील.