• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home इतर पंचनामा

दगा

- प्रसाद ताम्हनकर (पंचनामा)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 25, 2023
in पंचनामा
0
Share on FacebookShare on Twitter

‘उठा तुम्हाला भेटायला कोणीतरी आले आहे..’ बराकीबाहेरच्या गार्डने आवाज दिला आणि आरव उभा राहिला. आपल्याला भेटायला तुरुंगात कोणी आले आहे हेच त्याच्यासाठी मोठे आश्चर्य होते. कारण ज्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली, त्याच दिवशी ‘तू आम्हाला मेलास’ असे मामामामीने थेट ऐकवले होते. ऑफिसमध्ये थोडेफार जिवलग मित्र होते, पण ते उघडपणे त्याला भेटायला येणे अशक्य होते. सावकाश पावले टाकत तो बराकीबाहेर आला आणि भेटीच्या खोलीकडे निघाला. दारातून आत शिरला आणि त्याची पावले जागीच थबकली. आत खुर्चीवर शेठ धनपत राय बसलेले होते.
‘तुम्ही?’ त्याने आश्चर्याने विचारले.
‘हो! आज धाडस केले आणि तुझ्यासमोर उभा राहिलो. तुझ्यासमोर कसे यायचे आणि कोणत्या तोंडाने तुझी माफी मागायची, हेच कळत नव्हते…’ थरथरत्या आवाजात शेठ धनपत म्हणाले.
आरवला बसलेला धक्का अजूनही कमी झाला नव्हता. ज्या कंपनीने त्याच्यावर हेराफेरीचा आरोप लावला, त्याला कामावरून काढले, पोलीस केस केली, तुरुंगात पाठवले त्याचा कंपनीचा मालक आज त्याच्यासमोर उभा राहून माफी मागत होता.
‘सर तुम्ही…’
‘नाही आरव, मला बोलू दे. पुन्हा हे धाडस करू शकेन का नाही माहिती नाही. आरव, तू निर्दोष आहेस ह्याची मला कल्पना आहे. माझ्या मुलाने हिम्मतने तुला खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे, हे देखील खरे आहे. पण मी फक्त एक बाप नाहीये तर हजारो लोकांचे संसार चालवणार्‍या कंपनीचा मालक देखील आहे. माझ्यानंतर ही कंपनी हिम्मत चालवणार आहे; माझी इच्छा असो नसो- त्याच्या आईनेच मृत्युपत्रात तशी तरतूद करून ठेवली आहे. हिम्मतला खोटे सिद्ध करणे म्हणजे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणे होते आणि ते मी करू शकलो नाही. माझ्यासमोर हजारो कामगारांच्या संसाराचा प्रश्न होता. पण मी स्वतःला माफ देखील करू शकत नाहीये! मी जेलरशी बोललो आहे. इथे तुला कसलाही त्रास होणार नाही, ह्याची काळजी मी घेतलेली आहे. इथून बाहेर पडल्यावर देखील तुझी काही ना काही सोय मी नक्की करेन, अर्थात दुसर्‍या शहरात. कारण, तुझ्या मनात हिम्मतविषयी किती संताप आहे, ते मी त्या दिवशी न्यायालयात बघितले आहे. तुम्ही दोघे एकमेकांपासून लांब असणे सर्वांच्याच हिताचे आहे. शक्य झाले तर आम्हा दोघांना माफ कर..’ एका दमात येवढे सगळे बोलून शेठ धनपत त्याच्याकडे न बघताच तरातरा बाहेर पडले. बहुदा त्यांना आपले पाणावलेले डोळे लपवायचे असावेत.
त्याच दिवशी संध्याकाळी आरवला स्वतंत्र बराक देण्यात आली. त्याचे जेवण बाहेरुन येऊ लागले, वाचायला पुस्तके देखील देण्यात आली. ११ महिन्याचा हा बंदिवास त्याच्यासाठी आता पूर्ण सुसह्य झाला होता. मनातल्या मनात त्याने शेठ धनपतला कधीच माफ केले होते, मात्र इथून सुटल्यावर हिम्मतची भेट मात्र तो नक्की घेणार होता. हिम्मतला तो कधीच माफ करू शकत नव्हता. झर्रकन त्याच्या डोळ्यासमोर सहा महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला..
१५ एप्रिलचा तो दिवस नुसता उत्साहाने भरलेला होता. आज गायत्री इन्फ्राच्या ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर’ची घोषणा होणार होती. तो विजेता आरवच असणार ह्याबद्दल कोणालाच शंका नव्हती आणि घडले देखील तसे. नोकरीच्या पहिल्याच वर्षात हा सन्मान मिळवणारा आरव पहिलाच कर्मचारी ठरला आणि त्यामुळे दुप्पट शुभेच्छांचा वर्षाव देखील झाला. मात्र ह्या सगळ्या शुभेच्छांपेक्षा आसावरीच्या डोळ्यातले कौतुक त्याला जास्त खुणावत होते. शेठ धनपत आणि त्यांचा मुलगा हिम्मत ह्यांच्यानंतर ऑफिसमध्ये कोणाचा शब्द चालत असेल तर ती होती आसावरी. गेली पाच वर्षे ती गायत्री इन्फ्रामध्ये काम करत होती आणि आता जणू ती शेठ धनपतच्या कुटुंबाचा हिस्सा बनली होती. आज ना उद्या हिम्मतसाठी शेठ धनपत आसावरीला निवडणार, याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नव्हते, अगदी हिम्मतचेदेखील.
पण आरव गायत्री इन्फ्रामध्ये आला आणि चित्र बदलायला सुरुवात झाली. व्यसनी, माजोरी आणि तुसड्या हिम्मतपेक्षा आसावरीसाठी आरव कसा योग्य राहील, ह्याच्या चर्चा ऑफिसात रंगायला लागल्या होत्या आणि आरवच्या दुर्दैवाने त्या हिम्मतच्या कानापर्यंत गेल्या होत्या. आसावरी आणि आरव या दोघांनी एकमेकांना तसे काही जाणवू दिले नसले, तरी दोघांचा जिव्हाळा वाढत चालला होता हे नक्की.
– – –
पुरस्कार समारंभ उरकला आणि ऑफिसची कामे पुन्हा वेगाने सुरू झाली. आरवला आज यायला तसा थोडा उशीरच झाला होता. आल्या आल्या समोर बसलेल्या आसावरीने छानसे स्माईल दिले आणि तो सगळा प्रवासाचा थकवा विसरला. आसावरी समोरचा फोन खणाणला आणि ती गडबडीने हिम्मतच्या केबिनकडे धावली. बर्‍याच वेळाने आसावरी परत आली तेव्हा तिचा टवटवीत चेहरा पूर्ण उतरलेला होता, बहुदा ती रडली असावी, कारण तिचे डोळे देखील लाल जाणवत होते. आरव एकदम गंभीर झाला. बर्‍याच वेळाने त्याला संधी मिळाली आणि वॉशरूमच्या पॅसेजमध्ये त्याने आसावरीला गाठले.
‘आसावरी काय झाले? तुम्ही अपसेट दिसताय..’
‘नाही, काहीच नाही..’ खोटे हसू आणत आसावरी पुटपुटली.
‘तुम्हाला सांगायचे नसेल तर..’ आरव मृदू आवाजात म्हणाला आणि आसावरीने झटकन त्याचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.
‘काय झाले?’
‘हिम्मत..’
‘काय केले त्यांनी?’
‘त्याने आज माझ्यावर शंका घेतली. तुम्हाला पुरस्कार मिळाला त्या दिवशी तुम्ही मला पार्टीला कुठे घेऊन गेला होतात, असे थेट विचारले त्याने मला.’
‘मग तुम्ही खरे काय ते सांगायचे ना..’
‘मी खूप प्रयत्न केला पण त्याला ते पटले नाही. तसेही ऑफिसात आपल्याबद्दल ज्या चर्चा चालतात..’
‘तसे आपल्यात काही नाही ना?’ मिश्किलपणे आरवने विचारले आणि आसावरी चक्क लाजली आणि त्याचा हात सोडून पळाली. पळता पळता समोरच्या व्यक्तीला चक्क धडकली. तो हिम्मत होता.
तो दिवस आरवसाठी कसा वार्‍याच्या मखमली झुळकेसारखा पार पडला. दिवसभर आसावरीचे नजर चोरणे, कधी त्याच्याकडे चोरून पाहणे, तर कधी गालातल्या गालात हसणे… त्याच्या हृदयावर मोरपीस फिरवीत होते. रात्रभर काही त्याला झोप लागली नाही. पण आजचीच नाही, तर पुढल्या कित्येक रात्री आता आपल्या नशिबात झोप नाही ह्याची त्या बिचार्‍याला कल्पना नव्हती.
– – –
सकाळी उत्साहाने तो ऑफिसात पोहोचला तेव्हा ऑफिसचे वातावरण काहीसे गंभीर होते. शेठ धनपतांच्या केबिनमधून हिम्मत आणि त्यांच्या भांडणाचे आवाज बाहेरपर्यंत पोहोचत होते. शेवटी खांदे पडलेले आणि चेहरा मलूल अशा अवस्थेत शेठ धनपत बाहेर आले आणि आरवकडे एक दु:खी नजर टाकत ते सरळ ऑफिसच्या बाहेर पडले.
‘मिस्टर आरव, ताबडतोब माझ्या केबिनमध्ये या!’ हिम्मत गरजला. आरव शांतपणे त्याच्या मागोमाग निघाला. हिम्मतने एक फाइल आरवसमोर टाकली. आरवने शांतपणे ती उचलली. आतमध्ये ऑफिसच्या रोख व्यवहारांच्या नोंदी होत्या.
‘साक्षी एंटरप्राईझेसच्या नोंदी काय काय आहेत मिस्टर आरव?’
‘सर नवी फर्म आहे. हिला आपण ६, १३ आणि १८ एप्रिलला रोख पेमेंट केले आहे. एकूण पेमेंट साधारण ३ लाख २५ हजार आहे.’
‘आणि हे पेमेंट कशाच्या बदल्यात केले आहे मिस्टर आरव?’
‘हे काय नोंदी आहेत ना सर. बिल क्रमांक १७८, २८९ आणि ३२०. वाळूची बिले आहेत सर ही.’
‘ही बिले खोटी आहेत मिस्टर आरव. अशा नावाची कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही आणि तो पत्ता देखील खोटा आहे!’ समोरचा पेपरवेट गोल फिरवत हिम्मत म्हणाला आणि आरवच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचवेळी दारावर टकटक झाली आणि एक थुलथुलीत पोटाचा आणि चेहर्‍यावरूनच लबाडी जाणवणारा पोलीस अधिकारी दोन हवालदारांसह आत शिरला.
तब्बल पाच सहा महिने आरवची केस चालू होती. एक आसावरीच काय ती धडपड करत होती. पण तिच्या ताकदीला देखील मर्यादा होत्या. हिम्मतची ताकद अफाट होती. खुद्द ऑफिसमधल्या दोघांनी आरव व्यसनी आणि जुगारी असल्याचे ठामपणे सांगितले. एका अनोळखी गुंडाने तर आरव त्याचे दोन लाख देणे असल्याची साक्ष दिली. आरवचे मामा तर त्याच्याशी संबंध कायदेशीररीत्या तोडल्याची नोटीस देऊन मोकळे झाले होते. कोर्टात आरवचे असे काही चित्र रंगवले गेले की, एक सुशिक्षित पण निर्ढावलेला, पाताळयंत्री गुन्हेगार कोर्टासमोर आला आहे. पण जजसाहेब सहृदयी आणि चाणाक्ष असावेत आणि त्यांना काय चालू आहे त्याचा अंदाज आला असावा. अर्थात, त्यांना पुराव्याआधारेच निकाल द्यायला लागणार होता आणि पुरावे आरवला दोषी ठरवत होते. आरवला ११ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. निकाल ऐकायला आसावरी कोर्टात हजर नव्हती हेच काय ते सुख…
‘आरव सरदेशमुख… हाऊ आर यू बेटा?’ जेलर साहेबांनी प्रेमाने आवाज दिला आणि आरवने पुस्तकातून मान वर केली. इतक्या दिवसांच्या सहवासात त्याने अनेकांना लळा लावला होता, त्यातले जेलर साहेब देखील एक होते.
‘मज्जा मा… तुम्ही कसे आहात?’
‘मी आज तुझ्यापेक्षा जास्त आनंदात आहे आणि ते देखील तुझ्यासाठी?’
‘नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?’ आरवने आश्चर्याने विचारले.
‘अरे १५ ऑगस्टच्या निमित्ताने चांगले वर्तन असणार्‍या, शिक्षेचा कमी कालावधी राहिला असलेल्या काही कैद्यांची दर वर्षी सुटका करण्यात येते. मी ह्या वर्षी तुझे नाव सुचवले होते आणि ते पक्के झाले आहे. तू दोन महिने आधीच मोकळा होतो आहेस.’ जेलर साहेबांनी प्रेमाने त्याचे हात हातात घेतले आणि आरवच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. इथून बाहेर पडल्यावर तो हिम्मतच्या डोळ्यातदेखील अश्रू आणणार होता, पण दुःखाचे आणि वेदनांचे…
– – –
शेठ धनपत विस्फारलेल्या डोळ्यांनी सुन्नपणे समोरच्या दृश्याकडे पाहत होते. त्यांना आधार देऊन शेजारी आसावरी उभी होती आणि ती देखील तेवढीच सुन्न झालेली होती. समोरचे हिम्मतचे प्रेत मात्र डोळे सताड उघडे ठेवून कोणत्याही जाणिवेच्या पलीकडे गेलेले होते.
‘त्यांना आधी दारूतून गुंगीचे औषध दिले गेले आहे आणि त्यानंतर तोंडावर उशी दाबून त्यांचा खून करण्यात आला आहे,’ समोर उभ्या असलेल्या इन्स्पेक्टरने काळेंनी माहिती दिली.
औषध काय, उशी काय… हिम्मत मेला हे तेवढे सत्य..’ शेठ धनपत म्हणाले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
‘सर, मला कल्पना आहे, ह्या वयात तरुण मुलाच्या मृत्यूने तुमच्यावर काय आघात झाला असेल. पण त्याच्या खुन्याला फाशी व्हावी आणि हिम्मतला न्याय मिळावा असे तुम्हाला वाटत नाही का?’ इस्न्पेक्टरच्या प्रश्नाने शेठ धनपतच्या मुठी एकदम आक्रमकपणे आवळल्या गेल्या आणि त्यांनी मान वर केली. दु:खी, हतबल बापाच्या चेहर्‍याची जागा आता चक्क एखाद्या हिंस्र जनावराने घेतल्यासारखे वाटत होते.
‘हिम्मतच्या खुन्याला शिक्षा मिळणार इस्न्पेक्टर, पण तो कायदा नाही हा शेठ धनपत देणार!’ शेठ धनपत गरजले. त्या क्रूर आवाजाने आसावरी देखील दोन पावले मागे सरकली.
‘तुमचा कोणावर संशय?’
‘हिम्मत उर्मट होता, पण त्याला शत्रू म्हणावे असे कोणी नसावेत.’ आसावरी दबक्या आवाजात बोलली.
‘कोणाशी काही पूर्वीचे वैर?’ इस्न्पेक्टरच्या प्रश्नाने आसावरी दचकली आणि तिच्या चेहर्‍यावरचे बदलते रंग इन्स्पेक्टर काळेंच्या अनुभवी नजरेने अचूक टिपले.
‘मिस आसावरी.. तुम्हाला काही सांगायचे आहे?’
‘आ.. आ.. आरव…’ बोलताना तिचे सर्वांग थरथरत होते.
‘पण तो तर तुरुंगात आहे..’ शेठ धनपत म्हणाले.
‘तो कालच १५ ऑगस्टच्या निमित्ताने लवकर बाहेर आला आहे…’ खाली मान घालत आसावरी पुटपुटली.
‘..आणि तो येऊन सगळ्यात आधी तुला भेटला?’ शेठ धनपतने कठोर आवाजात विचारले आणि आसावरीचा चेहरा सर्व काही सांगून गेला.
– – –
‘सर हाताचे ठसे जुळतायत,’ हवालदार मोरेंनी माहिती दिली आणि दुसर्‍या क्षणी समोरच्या खुर्चीत बसलेल्या आरवच्या गालावर काळेंची थप्पड पडली. आरव अक्षरशः खुर्चीसकट खाली कोसळला.
‘तू लाख नाही म्हण रे! पुरावे सगळे काही उघडे पाडतात. बोला आता पटापट… कसा खून केलास हिम्मतचा?’
‘साहेब, मी कबूल करतो की मी आधी खोटे बोललो होतो, मी हिम्मतकडे गेलो नव्हतो म्हणून. मी त्याच्याकडे गेलो होतो साहेब. पण मी गेलो तेव्हा तो मरून पडला होता. देवाची शपथ साहेब! मी त्याला हात देखील लावला नाही. मी प्रचंड घाबरलो होतो. मी तसाच उलट्या पावली पळत सुटलो. पळत असताना कुठे धडकलो, कुठे हात लावले मला देखील आठवत नाहीये..’ आरव गदगदत्या स्वरात सांगत झाला.
आरवने कितीही हात जोडले, विनवण्या केल्या तरी पुरावे काही वेगळेच सत्य समोर आणत होते. आरवचे बोलणे ना इन्स्पेक्टर काळेंनी मान्य केले, ना कोर्टात न्यायाधीशांनी. आरवला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. ह्या सुनावणीला मात्र आसावरी कोर्टात हजर होती, हेच काय ते आश्चर्य.
– – –
‘उठ रे नालायक.. तुला भेटायला कोणीतरी आले आहे..’ बराकीबाहेरच्या गार्डने आवाज दिला आणि आरव उभा राहिला. आपल्याला भेटायला तुरुंगात कोणी आले आहे हे आज पुन्हा त्याच्यासाठी मोठे आश्चर्य होते. सावकाश पावले टाकत तो बराकीबाहेर आला आणि भेटीच्या खोलीकडे निघाला. दारातून तो आत शिरला आणि त्याची पावले जागीच थबकली. हे स्वप्न तर नाही? का नियतीने केलेला नवा विनोद?
आत खुर्चीवर शेठ धनपत राय बसलेले होते.
‘तुम्ही?’ त्याने आश्चर्याने विचारले.
‘हो! आज धाडस केले आणि तुझ्यासमोर उभा राहिलो. तुझ्यासमोर कसे यायचे आणि कोणत्या तोंडाने तुझी माफी मागायची हेच कळत नव्हते…’ ह्यावेळी देखील शेठ धनपतरायने मागचेच शब्द पुन्हा उच्चारले फक्त ह्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक विकट हास्य होते.
‘मागच्या वेळी असेच भेटलो होतो नाही आपण आरव? तेव्हा खूप संयमाने अभिनय करावा लागला होता मला. अपराधी चेहर्‍याने खरे वाटावे असे सत्य बोलणे फार कठीण असते मित्रा. मला विचार ना.. ’
‘तुम्ही इथे का आला आहात?’
‘माफी मागायला. मात्र ह्यावेळी अगदी खरी आणि मनापासून माफी मागायला. माझ्या स्वार्थासाठी तुझे आयुष्य बरबाद केले त्यांची खंत मला आयुष्यभर जाणवेल… बहुदा.’ डोळे मिचकावत शेठ धनपत म्हणाले.
‘तुम्ही केलेत हे सगळे? का आणि कसे?’ उद्वेगाने आरव किंचाळला.
‘पर्याय नव्हता. स्वत:चे आयुष्य पणाला लागले की ह्या स्वार्थी जगात माणूस स्वत:चाच विचार करतो. हिम्मत माझा सावत्र मुलगा. त्याच्या आईला मृत्यूच्या वेळी काही शंका आली असावी, त्यामुळे तिने ही कंपनी हिम्मतच्या नावे केली. मी तुला म्हणालो होतो ना, ही कंपनी हिम्मतच चालवणार, भले माझी इच्छा असो वा नसो., त्याचे कारण हेच.’
‘पण ह्या सगळ्याशी माझा काय संबंध?’
‘म्हणले तर काहीच नाही अन् म्हणले तर ह्या सगळ्या कहाणीचा हीरो. तू कंपनीत आलास. हिम्मतपेक्षा सरस निघालास आणि मुख्य म्हणजे आसावरीवर भाळलास. तुला बघून हा प्लान सुचला. इतकाच काय तो तुझा संबंध.’
‘म्हणजे मला हिम्मतने नाही तर तुम्ही..’
‘येस परफेक्ट ओळखलेस! हिम्मत तुझा रागराग करायला लागला होता आणि मी ती संधी सोडली नाही. बिलांच्या हिशेबात घोळ केला आणि मुद्दाम तो हिम्मतच्या नजरेला येण्याची व्यवस्था केली. तू तावडीत सापडल्यावर हिम्मत तुला नक्की सोडणार नव्हता. एक क्षण तुला फक्त नोकरीवरून हाकलावे असे त्याला वाटले होते. मग प्लान फसला असता. म्हणून मी त्याच्या निर्णयाची तरफदारी करत तुझे कौतुक सुरू केले आणि हळूच आसावरीचा देखील विषय काढला. शांत होत असलेली आग पुन्हा भडकली आणि हिम्मतने तुला तुरुंगाचा रस्ता दाखवला. मी मात्र तुझ्या मनात माझे रूप हतबल बापाचे, कंपनीच्या मालकाचे असल्याचे ठसवले. तू बाहेर पडल्यावर हिम्मतला गाठणार हे नक्की होते. मी त्याच वेळेची वाट बघत होतो. १५ ऑगस्टला तू सुटलास आणि तुझ्या आधी मी हिम्मतला गाठले इतकेच. सो माय बॉय… आज पुन्हा एकदा, मात्र ह्यावेळी अगदी काळजापासून तुझी माफी मागतो. तुझ्या ह्यावेळच्या तुरुंगवासात देखील तुला कसलाही त्रास होणार नाही ह्याची काळजी मी घेतली आहे. येतो मित्रा..’
‘एक मिनिट.. माझी आसावरी..’ गळ्यातला हुंदका दाबत आरव विचारता झाला.
‘श्श! आसावरी नाही.. ती आता मिसेस धनपत राय होणार आहे. मी मगासपासून जो प्लॅन प्लॅन म्हणतोय ना.. तिनेच तर आखला होता.’ गोड हसत शेठ धनपत बाहेर पडले आणि आरव तिथेच मटकन खाली बसला.

Previous Post

लेकुरे उदंड जाहली…

Next Post

आईस्क्रीम आणि फ्लफी केक

Related Posts

पंचनामा

हव्यास

May 11, 2023
पंचनामा

ब्लॅक विडो

April 27, 2023
पंचनामा

झूम मिटिंग

April 20, 2023
पंचनामा

षडयंत्र

April 13, 2023
Next Post

आईस्क्रीम आणि फ्लफी केक

राशीभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023

राशीभविष्य

June 3, 2023

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.