• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
April 26, 2024
in टपल्या आणि टिचक्या
0

□ ईव्हीएममधील गडबडीच्या तक्रारींकडे लक्ष द्या – सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला ‘टोचन’.
■ या आयोगाला टोचन लावून भंगारात नेऊन टाकण्याची वेळ येणार आहे लवकरच, इतका तो निष्क्रीय झालेला आहे.

□ कोविड बॉडी बॅग घोटाळ्याचे पुरावे नाहीत; मिंधे सरकारच्या सुडाच्या राजकारणाला दणका.
■ मतदार या गद्दार वृत्तीच्या सडलेल्या ‘बॉडी’ला बॅगेत भरून विसर्जन करायला सज्ज होत आहेतच!

□ मोदींचा सत्तेचा उन्माद रोखायलाच हवा – शरद पवार.
■ जनतेला सक्षम, ठोस पर्याय दिसला की ती तो रोखेलच.

□ केजरीवाल यांना तुरुंगातच मारण्याचा भाजपचा कट – ‘आप’चा गंभीर आरोप.
■ सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी नीच प्रवृत्ती आहे ही!

□ मिंध्यांकडून एसटी गाड्यांवर निवडणूक जाहिराती.
■ निवडणूक आयोग झोपला आहे काय?

□ नरेंद्र मोदी हे फेल झालेले इंजीन – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.
■ त्याच्या मागे दुर्दैवाने देशाची गाडी जोडलेली आहे… ते वेळेत विलग केलेले बरे.

□ मोदींना दुसर्‍याचे श्रेय लाटण्याची सवय – भाजपचे माजी खासदार स्वामी यांची टीका.
■ स्वत:चे काही करायला कर्तबगारी लागते, काही न करता ढोल वाजवायला बेपारी होशियारी लागते, तेवढीच त्यांच्यापाशी आहे.

□ मला दिल्लीला जाण्याची हौस नाही – पंकजा मुंडे.
■ तुमच्या हौसेला तुमच्या पक्षात विचारतो कोण?

□ धमकी देणार्‍याला माझा नंबर द्या – सुप्रिया सुळे यांचे मतदारांना आवाहन.
■ अशा धमक्या देणारे भ्याड असतात, समोरासमोर नडत नाहीत. जरा आवाज झाला की बिळात जातात.

□ भाजपची सत्ता आल्यास निवडणुका, आरक्षण संपवतील – आम आदमी पार्टीचा मोदी सरकारवर हल्ला.
■ त्यांची एकंदर वाटचाल त्या दिशेने चालली आहे. मात्र सगळ्या भारतावर ते हा नरकात जाण्याचा अजेंडा लादूच शकणार नाहीत. यादवीकडे नेत आहेत देश.

□ भाजप, मनसेची अंतर्गत नाराजी मिंधेंना भोवणार – कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचे टेन्शन वाढले.
■ भाजप, मनसे कशाला, तिथले असली शिवसेनेचे कट्टर शिवसैनिकही पुरेसे आहेत त्यांना घरी बसवायला.

□ सरकारच्या टुकार साड्या आदिवासी महिलांनी भिरकावल्या
■ मुळात बरोब्बर निवडणुकीच्या काळात भिकारड्या का होईना, साड्या वाटणं हा आचारसंहितेचा भंग नाही का?

□ गारेगार माथेरानची झाली भट्टी; पारा ४० अंशावर.
■ आता तिथले लोक कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जातील?

□ रामनवमीला प. बंगालमध्ये भाजपाने हिंसाचार घडवला – ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप.
■ त्यांनी जय सियारामचा गोडवा जय श्रीरामच्या ऊग्र युद्धघोषणेत बदलला आहे तो यासाठीच. तोंडी राम आणि बगलेत नथुराम घेऊन फिरतात ते.

□ लोकहो, पाकीटमार शोधा – शरद पवारांचे आवाहन.
■ ज्यांनी स्वेच्छेने पाकीट काढून, वर शकुनाचा एक रुपया ठेवून, हळद, कुंकू, अक्षता वाहून पाकीट या भामट्यांच्या हातात दिलं आहे, त्यांचं काय करणार पवार साहेब!

□ बेकायदा फेरीवाल्यांना नोटीस कशाला? सरळ उचला! – हायकोर्टाचे महापालिकेला निर्देश.
■ आणि मग हप्ते काय हायकोर्टाचे पट्टेवाले देणार? काहीतरीच काय ओ जजसाहेब!

□ उत्तर मुंबईत भाजपने दिला दिल्लीचा नेता पियूष गोयल.
■ कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या म्हणत त्यांचं बारसं जेवायला त्यांचेच इथले लोक पुरेसे आहेत.

□ महाविकास आघाडीच्या झंझावातापुढे छगन भुजबळांनी हात टेकले; नाशिक मतदारसंघातून माघार.
■ असेही पडणारच होते. झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली, इतकंच.

□ मोदींनी देश विकून देश चालवला, त्याला विकास म्हणायचे का? – नाना पटोले.
■ डोक्यात मेंदूच्या जागी गोमय भरलेल्या भक्तांना कसं समजावून सांगणार पण हे नाना!

□ मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांची सभा उधळली.
■ असाही त्यांच्या सभेने काय फरक पडणार होता, सुंठेवाचून खोकला गेला.

□ पुढच्या दोन महिन्यांत एकनाथ शिंदे दिसणार नाहीत – प्रकाश आंबेडकर यांचा दावा.
■ त्यांच्याविना महाराष्ट्राचं राजकारण किंवा सार्वजनिक जीवन ओसही पडणार नाही… त्यांना पाहण्याची इच्छा तरी कोणाची आहे?

□ स्मृती इराणी यांनी अमेठीत केलेली पाच कामे सांगावीत – काँग्रेसचे आव्हान.
■ अमेठीत? कुठेही केलेली पाच कामं सांगावीत!

□ शहापुरात महायुतीच्या प्रचाराचा फ्लॉप शो; भाड्याने आणलेल्या माणसांची जेवणासाठी रेटारेटी.
■ लोक प्रचाराला भाड्याने येतात तेव्हा ते जेवणासाठीच येतात बिचारे.

□ मिंधेंच्या आचारसंहिता भंगाकडे प्रशासनाची डोळेझाक.
■ प्रशासन ताटाखालचं मांजर बनून बसलेलं आहे यांच्या.

Previous Post

मतदानात आळस कराल, तर देशाला खड्ड्यात न्याल!

Next Post

शांतता, निवडणूक आयोग झोपला आहे…

Related Posts

टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 22, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 15, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 8, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 5, 2025
Next Post

शांतता, निवडणूक आयोग झोपला आहे...

असली भाजपा कुठे आहे?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.