ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल, वृषभ राशीत, मंगळ, केतू सिंह राशीत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन मीन राशीत, गुरु मिथुन राशीत, रवि, बुध कर्क राशीत, प्लुटो मकर राशीत. दिनविशेष : २८ जुलै विनायक चतुर्थी, २९ जुलै नागपंचमी, ३० जुलै श्रियाळ षष्ठी, १ ऑगस्ट दुर्गाष्टमी.
– – –
मेष : संयमाने यश मिळेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षा ठेवू नका. कामाचे ओझे बाळगू नका. हातातलं काम अचूकपणे करा. आर्थिक नियोजनात कुचराई नको. महागड्या वस्तूंच्या मोहात पडू नका. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. सल्लामसलतीनेच मोठा निर्णय घ्या. अनोळखी व्यक्तीशी जपून व्यवहार करा. तरुणांना व्यवसायाच्या नव्या कल्पना सुचतील. मित्र, नातेवाईकांकडून हिरमोड होईल. ध्यानधारणा, योगाला वेळ द्या. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. कुटुंबात अतिउत्साह आणि उतावळेपणा टाळा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. लेखक, प्रकाशक, कलाकारांना चांगला काळ.
वृषभ : मन मोकळे करा, प्रश्न मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात नियोजन करा. व्यवसायात यश मिळेल. घरातले प्रश्न सोडवताना सुसूत्रता ठेवा. तरुणांना यशासाठी कष्ट घ्यावे लागतील. घाई, राग टाळा. अहंकार दूर ठेवा. निर्णय घेताना काळजी घ्या. नोकरदारांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या. संततीकडून चांगली बातमी कळेल. ज्येष्ठांच्या मतांचा आदर करा. शेअर, लॉटरी, सट्ट्यामधून लाभ मिळेल. समाजकार्यात कौतुक होईल. लेखकांना सन्मान मिळेल.
मिथुन : इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. कामाचे नियोजन काळजीपूर्वक करा. नोकरी-व्यवसायात बाजू पडती राहील. वाद टाळा. घरातील वातावरण तापू देऊ नका. ज्येष्ठांची मने दुखावू नका. धार्मिक ठिकाणी मन:शांती मिळेल. तरुणांचा उत्साह वाढेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. मनासारखी नोकरी मिळेल. येणे वसूल होईल. मुलांकडून मानसिक त्रास वाढेल. युवकांना यश मिळेल. मौजमजेवर पैसे खर्च होतील. प्रेमप्रकरणात वाद होईल. प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होईल.
कर्क : खाचखळग्यांचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. सहनशक्ती ठेवा. तरुणांना मोठे यश मिळेल. संयम कामी येईल. संशोधकांना यश मिळेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात नियोजन उपयुक्त ठरेल. महिलांनी निर्णय घेताना घाई टाळावी. दांपत्यजीवनात किरकोळ वाद ताणू नका. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल. मित्रांच्या सल्ल्याने निर्णय घेणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी जपून वागा. छंदातून आनंद मिळेल.
सिंह : आवाका पाहून पुढे जा. नोकरी-व्यवसायात नियोजन करा. बँकेच्या कामात गोंधळ होईल. तरुणांनी विचारपूर्वक पुढे जावे. कामानिमित्त प्रवास कराल. कुटुंबातील प्रश्न शांतपणे सोडवा. चित्रकार, कलाकारांसाठी यशदायी काळ. आईवडिलांशी वाद होतील. महिलांनी हेकटपणा टाळावा. येणे वसूल होईल. घरात कामाचे कौतुक होईल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवहारात काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. अति आत्मविश्वास टाळा. महिलांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल.
कन्या : मदतीची अपेक्षा न ठेवता स्वबळावर पुढे जा. नियोजन करा. काही निर्णय पुढे मागे झाले तरी नाराज होऊ नका. नोकरीत सौजन्य दाखवा. सल्ले देऊ नका. हो ला हो करा. ब्रोकर, एजंट, मेडिकल, कृषी क्षेत्रात उत्तम काळ. कुटुंब, आप्तेष्टांसाठी वेळ खर्च होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. भावंडांशी वाद टाळा. व्यवसायात आवक भक्कम राहील. घरात आपलेच रेटू नका. नवी नोकरी मिळेल. कामासाठी बाहेरगावी जाल. समाजकार्यात सन्मान होतील. नव्या योजना यशस्वी होतील.
तूळ : अति हाव टाळून गुंतवणूक करा. शिक्षणात प्रगती होईल. क्रीडाक्षेत्रात यश मिळेल. विदेशात शिक्षण घेऊ शकाल. तरुणांना निर्णय घेताना त्रास होईल. प्रेमप्रकरणात वाद होतील. नोकरीत कामाचा कंटाळा येईल. खर्चात वाढ होईल. घरात गैरसमजातून नाराजी होईल. मोजकेच बोला, सल्ला देणे टाळा. प्रवासात काळजी घ्या. महिलांना यशदायी काळ. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. मनाविरुद्ध प्रवास कराल. व्यवसायात पैसे, नव्या ऑर्डर मिळतील. काम वेळेत पूर्ण करा. दांपत्यजीवनात आनंदी राहाल. मित्रांकडून लाभ मिळतील. शुभघटना घडतील. सरकारी कामात नियमाचे पालन करा.
वृश्चिक : मनातल्या गोष्टी जाहीर करू नका. आपणच बरोबर, हे दाखवू नका. नोकरीत मनाची चलबिचल टाळा. घरात गैरसमज टाळा. जुनी गुंतवणूक लाभ देईल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. समाजकार्यात प्रतिष्ठा वाढेल. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. नवीन वास्तू घेण्याची चर्चा सकारात्मक होईल. येणे वसूल होईल. जमीन खरेदी-विक्रीत लॉटरी लागेल. खर्च नियंत्रित ठेवा. संशोधक, खेळाडूंना यश मिळेल. संततीकडून चांगली बातमी येईल. मित्रांशी जपून बोला. व्यवसायात तत्वांशी तडजोड नको.
धनु : अडकलेले प्रश्न सुटतील. तरुणांनी मानसिक संतुलनासाठी ध्यान, प्राणायाम करावा. घरात वातावरण आनंदी राहील. चांगली बातमी कळेल. नोकरीत डोके शांत ठेवा. समाजकार्यात प्रतिमा उंचावेल. साहित्यक्षेत्रात गौरव होईल. नातेवाईकांना मदत कराल. खानपानावर नियंत्रण ठेवा. जुना व्यवहार पूर्ण झाल्याने मन आनंदी होईल. व्यवसायात आत्मविश्वास आणि सहनशीलता यांची सांगड घाला. मनासारखी गोष्ट न झाल्याने खट्टू होऊ नका. विदेशात शिक्षणाची संधी मिळाल्याने उत्साह वाढेल.
मकर : व्यवसायात नियोजन करा. आप्तेष्टांशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवा. अचानक खर्च वाढेल. आर्थिक नियोजन चोख ठेवा. वाद, गैरसमज टाळा. मन:शांती टिकवा. संसर्गजन्य आजारापासून जपा. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठांच्या मतांचा आदर करा. कामानिमित्त प्रवास कराल. तरुणांचे मन:स्वास्थ्य बिघडेल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात जपून पावले टाका. उधार-उसनवारी टाळा. मालमत्तेचे विषय पुढे ढकला. वाहन जपून चालवा. लॉटरी, सट्टा, शेअरपासून दूर राहा.
कुंभ : मुलांच्या यशामुळे घरात वातावरण आनंदी राहील. व्यवसायात अधिक श्रम करा. वेळ व पैशाचे नियोजन करा. मामाची मदत मिळेल. नोकरीत न पटणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. अडकलेले काम पूर्ण होईल. नोकरदारांनी आळस झटकून काम करावे. अति आत्मविश्वास टाळा. विदेशात व्यवसाय विस्तार कराल. ज्येष्ठांचे ऐका. खिशातले पैसे पाहूनच नियोजन करा. नोकरीत धावपळ होईल. वेळेचे गणित बिघडेल. आरोग्यावरही परिणाम होईल.
मीन : कामाशी काम ठेवा. नोकरीत झटपट निर्णय नको. व्यवसायात सबुरी आवश्यक. मनातले मनात ठेवा. मुलांकडून चांगली बातमी कळेल. आर्थिक यश मिळेल. सरकारी कामे रेंगाळतील. व्यवसायात मनासारखे घडेल. घरातले वातावरण उत्तम ठेवा. पर्यावरण क्षेत्रात नव्या संधी मिळतील. जनसंपर्क, ब्रोकर, लेखक, संगीत क्षेत्रात उत्तम काळ. स्पर्धापरीक्षेत यश मिळेल. कर्जप्रकरण रेंगाळेल. शुभघटना अनुभवाल. दांपत्यजीवनात आनंद मिळेल. महिलांना प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी त्रासदायक ठरतील.