ज्येष्ठ कवी, विडंबनकार, लेखक, कादंबरीकार आणि ‘मार्मिक’ परिवारातील सदस्य डॉ. महेश केळुस्कर यांच्या ‘हसरगुंडी’ आणि ‘झेंडूचे झुले’ या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले. शिवसेनेची धडाडती तोफ असलेले झुंजार नेते, दै. ‘सामना’चे संपादक आणि खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ कवी, लेखक अशोक नायगावकर यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले. यावेळी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार अर्थात तंबी दुराई आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर हेही मंचावर उपस्थित होते. स्वामीराज प्रकाशन आणि शलाका प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकांतील ‘हसरगुंडी’ हा विनोदी गद्यलेखनाचा संग्रह असून ‘झेंडूचे झुले’ या संग्रहात केळुस्करांच्या अफलातून विडंबन कविता आहेत. ‘मार्मिक’साठी आणखी आनंदाची बाब म्हणजे या संग्रहातील बहुतेक विडंबन कविता ‘मस्करिका’ या ‘मार्मिक’मधील सदरातच प्रसिद्ध झालेल्या आहेत. डॉ. केळुस्कर यांचे मार्मिक परिवारातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा.
(छाया : सचिन वैद्य)