ग्रहस्थिती : गुरू वृषभ राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ, बुध, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, प्लूटो मकर राशीमध्ये, रवि, शुक्र, हर्षल मेष राशीमध्ये, शनि कुंभ राशीत. विशेष दिवस : २६ मे संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.५७ वा., ३० मे कालाष्टमी.
मेष : आर्थिक बाजू चांगली राहील. मुलांकडून चांगली बातमी कानावर पडेल. घरातील वातावरण आनंदी राहील. छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक, मित्रमंडळींची गाठभेट होईल. नोकरीत काळजी घ्या, चिडचिड वाढू शकते. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहारात फसगत होऊ शकते. पती-पत्नीत वाद होऊ शकतात. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकते. मनासारख्या घटना घडतील. सरकारी कामाला उशीर होईल. संयम ठेवा. धार्मिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल.
वृषभ : प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. जुने आजार त्रास देतील. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. नोकरी-व्यवसायात कर्तृत्वात भर पडणार्या घटना घडतील. नोकरी-व्यवसायात पडती भूमिका घ्यावी लागेल. घरात वागताना बोलताना काळजी घ्या, मन शांत ठेवा, ध्यानधारणेसाठी वेळ द्या. नव्या वास्तूच्या संदर्भातील हालचालींना गती मिळेल. व्यवसायात सामंजस्याची भूमिका घ्या. व्यवसायात लाभ होतील. मित्रमंडळींशी बोलताना टोकाची भूमिका घेऊ नका. इस्टेट एजंट, मेडिकल क्षेत्रात उत्तम काळ.
मिथुन : नोकरीत धावपळ होईल. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. सार्वजनिक ठिकाणी सामोपचाराने प्रश्न सोडवा. तरुणांसाठी भाग्योदयकारक घटना घडतील. व्यवसायात लाभ होतील. नवीन नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. मनासारखी संधी चालून येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ आहे. नोकरी, व्यवसायात वेळेचे गणित चुकवून चालणार नाही. विवाहेच्छुकांचे लग्न जमेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याने पुढे चला, फायदा होईल. सामाजिक कामात मन रमेल, ऊर्जा मिळेल.
कर्क : शिक्षण क्षेत्रात, व्यवसायात यशदायक काळ राहील. विदेशात उच्चशिक्षणासाठी जाल. सामाजिक कामातून समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना बुद्धिकौशल्याच्या जोरावर परिस्थितीचा सामना करावा लागेल. नोकरीत पगारवाढ, बढतीचे योग जुळून येतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मिष्टान्नभोजनाचा योग जुळून येईल. येणे वसूल होईल, खिशात पैसे राहतील. उंची वस्तू खरेदी कराल. लेखक, पत्रकार, संपादकांना प्रसिद्धीचे योग. मानसन्मान होईल. घरात बोलताना काळजी घ्या. वाद टाळा. मित्रमंडळींचा सल्ला काळजीपूर्वकच घ्या.
सिंह : भावना नियंत्रणात ठेवा, चूक टाळा. मनासारख्या घटना घडतील, पण त्यासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागतील. युवकांना स्पर्धात्मक यश मिळेल. काही ठिकाणी अंदाज चुकतील, त्यामुळे नुकसान होईल. विचार करून पुढे चला. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. आर्थिक फटका बसेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. धावपळ होईल. अचानक आर्थिक लाभ होईल. सार्वजनिक जीवनात पतप्रतिष्ठा मिळेल. संस्मरणीय घटनांचा अनुभव येईल. महिलांनी आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. चैनीवर खर्च टाळा. नव्या ओळखी कमी येणार आहेत, त्याचा चांगला लाभ होऊ शकतो.
कन्या : मित्र, नातेवाईकांची मदत होईल, समाजात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. आर्थिक नियोजन चुकवू नका. प्रेमप्रकरणात वादाची ठिणगी पडू शकते. घरात अचानक खर्च वाढल्याने चिडचड होईल. नोकरीच्या ठिकाणी उलट उत्तर देऊन वाद वाढवू नका. मनासारख्या घटना घडवणारा काळ असला तरी जपूनच पावले टाका. कोणालाही सल्ला देण्याचे टाळा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. मामा-मावशीकडून चांगला लाभ होईल. खेळाडूंना चांगले यश, सन्मान मिळेल.
तूळ : नोकरीत कामाचा ओघ वाढेल, त्याचा भविष्यात चांगला फायदा होईल. सामाजिक कार्य करणार्या मंडळींची प्रतिमा उंचावेल. व्यावसायिकांचा खिसा भरलेला राहील. छोट्या कारणामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतील. पतीपत्नीत वाद होतील, तुटेपर्यंत ताणू नका. नोकरीत विदेशात जाल. थकीत येणी झटपट येतील. नशीब बलवत्तर राहील. नव्या ओळखी कामी येतील. घरगुती समारंभांमुळे जुने मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आध्यात्मिक कार्याला वेळ द्याल. हातून दानधर्म होईल. संशोधकांना यश देणारा काळ राहील. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
वृश्चिक : यशप्राप्तीसाठी झटाल, त्यामधून मानसिक समाधान मिळेल. मित्रमंडळींशी बोलताना काळजी घ्या. व्यवसायात जबाबदारी वाढेल. नवीन ऑर्डर मिळेल, आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल. मार्केटिंग, इंजिनीरिंग क्षेत्रात चांगला काळ अनुभवाल. चित्रकार, कलाकार, शिल्पकारांना नव्या संधी मिळतील. शेअर, सट्टा, लॉटरीमधून चांगला लाभ होईल. पण त्याच्या आहारी जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी अवांतर बोलणे टाळा. आर्थिक बाजू तपासूनच पुढे जा. नवा व्यवसाय सुरू करताना घाई करू नका. फसवणूक होईल. सोशल मीडियावर काळजी घ्या.
धनु : चिंतनातून मन ताजे होईल. उत्साह वाढेल, कामे सहज पूर्ण होतील. गुरुरुकृपेमुळे अडचणीतून बाहेर पडाल. घरात धार्मिक कार्य होईल. नोकरी, व्यवसायात कामासाठी अधिक वेळ द्या. संततीकडून चांगली बातमी कळेल. महागडी वस्तू खरेदी करण्याच्या मोहात अडकू नका. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल. चिडू नका, रागावू नका, अडकलेली कामे मोकळी होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मिक क्षेत्रासाठी वेळ दिल्याने मानसिक समाधान मिळेल. बाहेरचे खाणे टाळा. पोटाचे विकार उद्भवू शकतात. कुटुंबासोबत पर्यटन होईल.
मकर : ठामपणे निर्णय घ्या. खंबीर राहा. हाती घ्याल, ते काम पूर्ण होईल. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात तणाव येतील, पण ही स्थिती फार काळ रहाणार नाही. घरात धार्मिक कार्य घडेल. घरात वाद घडू शकतात. सामाजिक कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळतील. मित्र, नातेवाईकांच्यात व्यक्त होताना काळजी घ्या. कलाकार, संगीत क्षेत्रात चांगला काळ आहे, नव्या संधी चालून येतील. बुद्धीचातुर्याच्या जोरावर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मन जिंकाल. कामाची दगदग होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ : नवीन संधी चालून येतील, यश मिळेल, आर्थिक आवक वाढेल. मुलांच्या वागण्याबोलण्याकडे लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची चांगली साथ लाभेल. त्यामुळे कामातला हुरूप वाढेल. कामानिमित्ताने बाहेरगावी प्रवास कराल. बोलताना नम्रता अनेक कामे मार्गी लावेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. गैरसमज टाळा. व्यवसायाच्या नियोजनात काळजी घ्या. फायदा होईल. नातेवाईकांशी वाद घडतील. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा, आर्थिक हिशेबात गल्लत करू नका. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.
मीन : दूरचे प्रवास टाळा, मनस्ताप घडतील. अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगला काळ अनुभवाल. नव्या संधीचा फायदा करून घ्या. नव्या संकल्पना मार्गी लागतील. नोकरीत एकाग्रता ठेवा, एखादी छोटी चूक महागात पडू शकते. कौटुंबिक क्षेत्रात वातावरण चांगले राहील. घरातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला माना. अति आत्मविश्वास दाखवू नका, फसगत होईल. खेळाडूंचा सन्मान होईल. घरातील ज्येष्ठां बरोबर वादाचे प्रसंग घडतील.