• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home मनोरंजन

वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

- संदेश कामेरकर

Nitin Phanse by Nitin Phanse
March 23, 2023
in मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

शाश्वत नोकरी असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांचा शाश्वत पेन्शन हवी या मागणीसाठी संप सुरू असताना, नोकरीचाच भरवसा नसलेल्या असंघटित क्षेत्रातील एका माणसाची गोष्ट सांगणारा ‘झ्विगाटो’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ओरिसा राज्यातील भुवनेश्वर शहरात घरोघरी अन्न पोहोचवणार्‍या मानसची ही गोष्ट आहे. मानस, त्याची आजारी आई, घर सांभाळणारी पत्नी, शाळेत जाणारी दोन मुले असं त्याचं कुटुंब. फॅक्टरीमधील फ्लोअर मॅनेजरची नोकरी गमावल्यानंतर उदरनिर्वाहासाठी मानस फूड डिलिव्हरी अ‍ॅपसाठी डिलिव्हरी बॉयचं काम स्वीकारतो. त्यानंतर त्याचं जीवन ग्राहकांनी त्याला दिलेलं रेटिंग, दंड आणि इन्सेन्टिव्हच्या मागे धावतं. मानसच्या कामात प्रगती होत नसल्याने त्याची पत्नी प्रतिमा सफाई कर्मचारी म्हणून मॉलमध्ये काम करण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याचा पुरुषी अहंकार दुखावतो. मानसला चांगली नोकरी मिळते का? तो अडचणींवर मात करेल का आणि त्याच्या कुटुंबाचं पुढे काय होतं हे पाहायला हा चित्रपट पाहावा लागेल.
नोकरी नसल्याने किंवा नोकरी गेल्याने, सुशिक्षित माणसांना जगण्यासाठी रोज कमवा रोज खा, अशा प्रकारची नोकरी करणं आज भाग पडत आहे. या गिग इकॉनॉमीमध्ये उद्योजकाला पर्मनंट नोकर नको आहेत. याच शहरी मनरेगा कामाचे प्रतिनिधित्व करणार्‍या डिलिव्हरी बॉयला काम करताना काय अडचणी येतात हे चित्रपटात दिसतं. अ‍ॅप कंपन्या ‘इन्सेन्टिव्ह’ नावाचे गाजर देऊन डिलिव्हरी बॉयना जास्तीत जास्त डिलिव्हरी करायला भाग पाडतात. त्यांचे विविध स्तरांवर कसे शोषण केले जाते, ते दाखवणारे ‘वो मजबूर है, इसलिए मजदूर है’ (तो मजूर आहे कारण तो असहाय्य आहे) ‘वो मजदूर है, इसलिए मजबूर है’ (तो असहाय्य आहे कारण तो मजूर आहे) गुलामी यह भी है सिर्फ मालिक नहीं दिखता, मानसचे असे संवाद मनाला स्पर्शून जातात.
मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणार्‍या सामान्य माणसाची गोष्ट मांडताना दिग्दर्शिका नंदिता दास यांनी चित्रपटाची मांडणी साधी सरळ ठेवली आहे. कथेत कोणतेही चढउतार नसल्याने एका सरळ रेषेत ही गोष्ट आपल्यासमोर येते. बाईकवरून डिलिव्हरी करणार्‍या मानसला, एक गरीब माणूस सायकलवर डिलिव्हरी होईल का असं विचारतो आणि मध्यांतर होतं. सिनेमाच्या गोष्टीला कलाटणी मिळून पुढे काहीतरी घडेल असं वाटतं, पण नंतर त्या विषयाचं काहीच होत नाही. बायकोच्या नोकरीला विरोध करणार्‍या मानसचे अचानक होणारे हृदयपरिवर्तन हेही सिनेमाच्या शेवटासारखं अकल्पित आहे.
अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि राजकारण हे एकमेकांशी निगडित आहेत हे माहीत असूनही, सिनेमात जेव्हा या गोष्टी तुकड्या तुकड्यांनी येतात तेव्हा कथेच्या प्रवाहात अडथळा येतो. सामाजिक कार्यकर्ता गोविंदराज (स्वानंद किरकिरे) आंदोलन करत आहे, वेगळ्या श्रद्धेच्या माणसाला टार्गेट केले जाणे, इत्यादी अनेक सिक्वेन्स कथेत घुसवल्यासारखे वाटतात. चित्रपट संथ गतीने पुढे सरकतो. छायाचित्रकार रंजन पालित यांनी भुवनेश्वरच्या कोंदट रस्त्यांमधून सामान्यांचे जग कुशलतेने चित्रित केले आहे.
मानसची गंभीर भूमिका करून कपिल शर्माने विनोदी इमेज तोडली आहे. कपिल या ओव्हर-द-टॉप कॉमेडियनची झलक तुम्हाला एकदाही मिळणार नाही. बनियानमध्ये वावरणारा घरगुती पुरुष, उद्या काय होईल याची चिंता करणारा कुटुंब प्रमुख, इन्सेन्टिव्हसाठी ग्राहकांना सेल्फी मागणारा, वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी सिग्नल तोडणारा अशा वेगवेगळ्या भूमिकेत कपिल छाप सोडतो. प्रतिमाच्या भूमिकेत शहानाने उत्तम अभिनय केला आहे. स्थानिक झारखंड भाषेतील उच्चार आणि देहबोलीतून ती दखल घ्यायला भाग पाडते.
चित्रपटाला डॉक्युमेंटरीसारखी ट्रीटमेंट दिली आहे, ज्यामुळे कंटाळा येऊ शकतो पण एक वेगळा विषय आणि चांगला अभिनय यासाठी एकदा पाहायला हरकत नाही.

Previous Post

दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

Next Post

जेवणातील ऊर्फी जावेद

Related Posts

मनोरंजन

नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

June 2, 2023
मनोरंजन

इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

June 2, 2023
मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो
मनोरंजन

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

May 26, 2023
सार्वकालिक ‘मेरे अपने’…
मनोरंजन

सार्वकालिक ‘मेरे अपने’…

May 25, 2023
Next Post

जेवणातील ऊर्फी जावेद

फिशिंग फ्रॉड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023

राशीभविष्य

June 3, 2023

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.