अशी आहे ग्रहस्थिती
राहू-हर्षल मेषेत, मंगळ- वृषभेत, केतु- तुळेत, बुध- मकरेत, २८ फेब्रुवारीपासून बुध कुंभ राशीत, शनि-रवि-नेपच्युन कुंभेत, गुरु-शुक्र मीन राशीत, चंद्र- मेष राशीत, त्यानंतर वृषभ, मिथुन आणि कर्क राशीत. दिनविशेष – ३ मार्च रोजी आमलिका एकादशी.
मेष : आगामी आठवडा तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आर्थिक देवाण घेवाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील. अचानकपणे धनलाभ होईल. रवि-शनि लाभात, सोबत नेपच्युन त्यामुळे मित्र मंडळींपासून सावध राहा. फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात. आपल्याला दिलेला शब्द समोरील व्यक्ती पाळणार नाही. त्यामुळे महत्त्वाची कामे मागे पडतील. त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. नवी गुंतवणूक करण्याचा प्लॅन काही काळासाठी पुढे ढकला. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याचे योग आहेत. विवाहेच्छुक मंडळींसाठी चांगला काळ रहाणार आहे. व्यावसायिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. नवी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न सुरु असेल तर त्यामध्ये चांगले यश मिळू शकते.
वृषभ : अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे सरकारी काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु असेल तर त्यामध्ये अडचणी येतील. दशम भावात नेपच्युन रवि आणि शनी. त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. सरकारी नोकरांनी थोडे सावधान राहायला हवे. चुकून एखादे प्रकरण अंगाशी येऊ शकते. त्यामधून नोकरीवर गदा येण्याचे प्रसंग घडू शकतात. कुटुंबात असणारे मतभेद चव्हाट्यावर येतील. हा प्रसंग होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे झाले. संततीसाठी उत्तम काळ रहाणार आहे. त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. कलाकार मंडळींसाठी उत्तम कला रहाणार आहे. चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मिळालेले दिसतील. त्यामुळे नवीन खरेदी होईल. विद्यार्थी वर्गासाठी उच्च शिक्षणासाठी अनुकूल काळ रहाणार आहे.
मिथुन : या महिन्याच्या अखेरीनंतर चांगली फळे मिळतील. बुधाचे २८ फेब्रुवारीनंतर होणारे राश्यांतर लाभदायक ठरणार आहे. काही घटनांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ असा अनुभव येईल. पण त्यामुळे नाराज होऊ नका. कर्म स्थानात गुरु-शुक्राची उत्तम स्थिती रहाणार आहे. त्यामुळे काही नवीन कामे मार्गी लागताना दिसतील. शनि मंगळाची दृष्टी षष्ठम भावावर त्यामुळे प्रवास करताना आपल्या आरोग्याची काळजी घ्या. वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे. संततीच्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळताना दिसेल. त्याचा मानसन्मान होईल. दाम्पत्य जीवनात चांगले अनुभव येतील. प्रेम आपुलकी वाढेल. मानसिक स्थिती उत्तम रहाणार आहे. आनंद मिळेल. एखादी महागडी वस्तू खरेदी कराल.
कर्क : नोकरदार मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे. आवडीच्या ठिकाणी बदली मिळू शकते. काहीजणांना कामाच्या निमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. पगारवाढीतून चांगला लाभ मिळेल. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. संततीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खेळाडूसाठी उत्तम काळ. स्पर्धेत यश मिळेल पण समाधान मिळणार नाही. नवीन घर घेण्याचा विचार सुरु असेल तर तो मार्गी लागू शकतो. एखाद्या समस्येमुळे अचानक खर्च करावा लागू शकतो, त्यामुळे चिडचिड होईल. पण शांत राहा.
सिंह : आपल्या दाम्पत्य जीवनात रुसव्या फुगव्याचे प्रसंग घडतील. त्यामुळे कुटुंबात अशांती निर्माण होईल. कोर्टात दावे सुरु असतील तर त्यामध्ये अपयश येईल. नोकरीच्या ठिकाणी कटकटी होतील. अपेक्षित कामे झटपट मार्गी लागणार नाहीत, त्यामुळे संघर्षमय आठवडा राहणार आहे. त्यामुळे तुर्तात कामे करण्याचे टाळा. पूजा-पाठ करण्यात मन रमवा. ध्यान-धारणा केली तर उत्तम. २५ आणि २६ तारखेला अनपेक्षित खर्च वाढू शकतो. नवीन ओळखी होतील, त्यामधून भविष्यात लाभ मिळतील. नवी वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती मार्गी लागले.
कन्या : विवाहेच्छुक मंडळींसाठी उत्तम काळ रहाणार आहे. चर्चासत्रात सहभागी व्हाल. विदेशातील व्यक्तीची ओळख होईल. प्रेमात यश मिळताना दिसेल. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. चुकून मोठी फसवणूक होऊ शकते. इव्हेंट मॅनॅजमेन्ट, समालोचक या मंडळींना चांगले यश मिळेल. कामाच्या संधी वाढलेल्या दिसतील. त्यामधून आर्थिक लाभ मिळेल. काही मंडळींना आजारपणाच्या समस्या निर्माण होतील, त्यामुळे हॉस्पिटलची पायरी चढावी लागू शकते. त्यामुळे अचानक खर्च वाढू शकतो.
तूळ : कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, ते तुम्हाला फार महागात पडू शकते. शुक्र-गुरु सोबत त्यामुळे काळजी घ्या. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही वेळेला धाकधूक निर्माण करणारे प्रसंग घडतील. कामातून समाधान मिळणार नाही आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शत्रूवर विजय मिळवाल. खेळाडूंना चांगले यश मिळेल. मित्रमंडळी, नोकर यांना मदत कराल. २६ आणि २७ या तारखांना अनपेक्षित धनलाभ होतील. लॉटरी, सट्टा या मधून काही जणांना आर्थिक लाभ मिळतील.
वृश्चिक : उत्तम आठवडा रहाणार आहे. रवि-चंद्राची उत्तम स्थिती त्यामुळे उत्साह वाढलेला दिसेल. आठवड्याची सुरुवात धमाकेदार होईल. सरकारी नोकरदार मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे. गुरु-शुक्राची पंचम भावातील स्थिती. संततीला स्कॉलरश्िाप परीक्षेत चांगले यश मिळेल. पत्रकार, कवी, लेखक, संगीतकार, प्रकाशक या मंडळींना चांगला काळ जाणार आहे. दाम्पत्य जीवनात आनंद मिळवून देणारा काळ राहणार आहे. यश मिळवून देणारा काळ रहाणार आहे.
धनु : घरात कौटुंबिक कार्यक्रम घडेल. नातेवाईकांच्या भेटी होतील, त्यामुळे आनंदाचे वातावरण रहाणार आहे. वास्तूविषयक प्रश्न मार्गी लागताना दिसतील. सौख्यकारक घटनांचा काळ रहाणार आहे. बंधुवर्गात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हेवेदावे होतील. त्यामधून भांडणाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो वादविवादाचे प्रसंग टाळा. महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासात फसवणूक होऊ शकते. खिसा पाकीट सांभाळा. कानाचे आजार निर्माण होण्याची शक्यता. शेजारधर्म पाळावा लागणार आहे, यात शंका नाही.
मकर : व्यसनापासून दूर रहाणं हिताचे ठरेल. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्या पैशावर नियंत्रण ठेवा, अवास्तव पैसे खर्च करू नका. प्रेमी युगुलांसाठी आनंद देणारा आठवडा राहणार आहे. काही मंडळी धार्मिक कार्यात सहभागी होतील. समाजसेवा करणार्या मंडळींसाठी चांगला काळ राहाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जावे लागणार आहे. अति आत्मविश्वास नको. वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लावताना अडचणी येतील. घरात शांतता ठेवा. वादाचे प्रसंग झाले तर त्यामध्ये फार पडू नका.
कुंभ : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्यावर मानसिक दडपण येईल. सुखस्थानात मंगळ त्यामुळे घरात वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा. धन स्थानातील गुरु-शुक्र युती आपल्यासाठी आशादाई आणि लाभदायी राहणार आहे. आर्थिक बाजू भक्कम रहाणार आहे. जमिनीचे व्यवहार करणारी मंडळी, बांधकाम व्यावसायिक, यांच्यासाठी फायदा मिळवून देणारा कला राहणार आहे. पती-पत्नीमध्ये कुरबुरीचे प्रसंग घडतील. गुंतवणुकीमधून चांगले आर्थिक लाभ मिळताना दिसतील.
मीन : काही कामे होतील, काही अडकतील. त्यामुळे मन समाधानी राहणार नाही. घरात खर्च वाढणार आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार डोक्यात सुरु असेल तर थोडे थांबा आणि निर्णय घ्या. अल्प कालावधीसाठी केलेली गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. सेवा क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगले यश मिळताना दिसेल. मित्र मंडळी, नोकर यांच्याकडून चांगले सहकार्य मिळणार आहे.