• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

विकास दर घसरतो कसा?

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 23, 2021
in टोचन
0

त्यादिवशी माझा मानलेला परममित्र पोक्या आणि मी विमाने हवेत उडाल्यावर देशाच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर चर्चा करत होतो. सध्या माझे तरी खिसे फुगलेले आहेत. पोक्या मात्र सतत पैशाचे रडगाणे गात असतो. तशी त्याच्याकडेही पैशाची आवक बर्‍यापैकी असते. तरीही त्याची अर्थव्यवस्था का ढासळते हे मला पडलेले कोडे आहे. देशाचा किंवा राज्याचा अर्थसंकल्प जवळ आला की येणार्‍या बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे जनता आपली वेड्यासारखी डोळे लावून बसते. नको त्या गोष्टी स्वस्त होतात. हे नेहमीचेच आहे. तरीही आम्ही दोघे अर्थसंकल्पाचे दिवस आले की बजेटपूर्व म्हणजे घेण्यापूर्वी आणि बजेटनंतर म्हणजे घेतल्यानंतर तीन-चार दिवस तरी चर्चा करतो.
आम्ही गणितात `ढ’ असलो तरी आम्हा दोघांपैकी कुणालाही देशाचा अर्थमंत्री होण्याची संधी मिळाली असती तर आम्ही देशी-विदेशी दारूसकट सर्व जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून दाखवल्या असत्या. कोणतेही सरकार आले तरी त्यांना महागाई कमी का करता येत नाही हे भाजपचे बुद्धिमान नेते आणि खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्याप्रमाणे आम्हा दोघांनाही पडलेला प्रश्न आहे. उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात बोलताना डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. देशभरात वाढत चाललेल्या महागाईवरून त्यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांची चांगलीच चंपी केली आहे. देशाच्या पंतप्रधानांना सोडा, पण अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, असे सांगत त्यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. वाढत्या महागाईसाठी त्यांनी सीतारामन यांना जबाबदार धरलेच पण महागाई तसेच अन्य मुद्यांबाबत सरकार कुणाचाही सल्ला घेत नाही, अशी खंतही व्यक्त केली. विकास दर घसरला तर नेमके काय करायचे हे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनाही माहिती नसल्याचे ते म्हणाले.
ते वाचून आम्ही दोघे पोट धरून हसू लागलो. पोक्या म्हणाला, ज्या गोष्टी आपल्या माहीत नाहीत त्या या दोघांना माहीत नसल्या तर नवल नाही. आता एखाद्याचा पाय नको तिथे घसरला तर आयत्या वेळी त्याला सावरायला जाणारा माणूस तरी तितका ताकदवान हवा ना! आणि विकास दर म्हणजे काही साधी गोष्ट नसणार. खूप तगडा असणार तो. उलट त्याला सावरताना सावरणाराच त्याच्याबरोबर घसरणार हे साधे गणित आहे. तेव्हा मी म्हणालो, पोक्या शेवटी मुद्दा घसरण्यावर येतो. माणसाचे पाय कधी घसरतात? आपण आपलेच उदाहरण घेऊ, त्याआधी आणखी एक पेग पिऊ… तर ज्यावेळी माणसाचा तोल जातो, त्याला स्वत:ला सावरता येत नाही, आपण हवेतून चालत असल्याचा भास होतो, त्याला स्वत:बरोबर जगाचेही भान नसते, त्यावेळी पहिल्यांदा जीभ घसरते आणि नंतर पाय घसरतात. देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती काही वेगळी नाही. ती सावरणारी माणसे आपल्यासारखी मजबूत हवी. आपण आकडेमोडीच्या बाबतीत `ढ’ असलो तरी डोकेबाज आहोत. आपल्या हातात देशाचा कारभार दिला असता ना तर एका दिवसात देश मालामाल केला असता.
तू म्हणतोस ते खरे आहे टोक्या. कसली बजेट सादर करण्याची नाटके करतात हे लोक! आणि सुटकेमधून कसली ती जाडीजाडी बजेटची पुस्तके आणून वाटतात! मी म्हणतो, यांचा नेहमीच तुटीचा अर्थसंकल्प होतोच कसा? आपला कधी झाला काय? आपला लुटीचा अर्थसंकल्प असला तरी ती लूट सामान्य माणसाच्या खिशातून केलेली नसते. हे लोक तर सामान्य माणसालाच लुटतात. अशाने पुन्हा देशी-विदेशीकडून हातभट्टीकडे घसरण सुरू होईल. आपल्यावर अशी पाळी येता कामा नये टोक्या. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे… वेटर, एक हाफ.
पोक्या, आता बस. आपण यावेळी आपला समतोल राखला ना तरी पुष्कळ झाले. त्या सीतारामन बाईंना वाटल्यास दोघांच्या सहीचे पत्र पाठवू आणि त्यात कशाचे भाव किती ठेवावे याचे कोष्टकच पाठवू. कोणत्याही घरात नवरा-बायकोच्या संसारात एकाच्या किंवा दोघांच्या पगारात घरखर्च चालतो ना. त्यांचेही महिन्याच्या घरखर्चाचे बजेट असते. तिथे देशाचा संसार चालवायचा असतो. घरच्या संसारात थोडा खर्च वाढला तरी पुढच्या महिन्यात थोडी तडजोड म्हणजे
अ‍ॅडजेस्टमेंट करतो. सामान्य माणूस. घरसंसाराचा खर्च लिमिटेड तर देशाच्या संसाराचा अवाढव्य. संसारात उत्पन्नाचे मार्ग नवरा-बायको मुलगा-मुलगी यांचे पगार तर देशाच्या संसाराला उत्पन्नाचे हजारो सोर्सेस. तरीही यांना खर्च भागवण्यासाठी देशाच्या महत्त्वाच्या मालमत्ता विकाव्या का लागतात? भाववाढ का करावी लागते. हा साधा प्रश्न आहे. तोच आम्हा दोघांना आणि डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह देशाच्या कोट्यवधी जनतेला पडला आहे. आम्हाला आमची भीती किंवा काळजी वाटत नाही, पण डॉ. सुब्रमण्यम स्वामींची वाटते आणि स्वामींना देशाची वाटते. आपण फक्त देवाची प्रार्थना करू शकतो. राम-लक्ष्मण जानकी! जय बोलो हनुमान की!

Previous Post

२५ डिसेंबर भविष्यवाणी

Next Post

नया है वह

Next Post

नया है वह

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.