• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रेमा, तुझा रंग कसा?

- अभिजित पेंढारकर (पंचनामा)

अभिजित पेंढारकर by अभिजित पेंढारकर
December 23, 2021
in पंचनामा
0

“अभयच्या मनातल्या कितीतरी गोष्टी तो माझ्याशी शेअर करायचा. त्याला काहीतरी टेन्शन आहे, दुःख आहे, हे जाणवत होतं,“ नेहाने रडतरडत बिराजदारांना सांगितलं. अभयच्या अचानक जाण्याने ती खूपच खचून गेल्याचं जाणवत होतं. अभयने अचानक आत्महत्या का केली, याचा एक धागा पोलिसांना मिळाल्यासारखं वाटत होतं. वरून आनंदी दिसणारा अभय अनेक गोष्टी मनात लपवून होता. त्याच दुःखाचा ताण सहन न झाल्यामुळे त्यानं आत्महत्या केली असावी, असं म्हणायला वाव होता.
—-

महिना-दोन महिने आनंदात, उत्साहात असलेल्या वीरकर कुटुंबावर आज शोककळा पसरली होती. खरंतर आज अत्यंत आनंदाचा दिवस. वीरकरांच्या घरातलं शेवटचं कार्य, म्हणजे धाकटा मुलगा अभय याचं लग्न आज होणार होतं. त्यासाठी दोन महिने तयारी सुरू होती. नात्यातली सगळी मंडळी जमली होती. आधी रीतसर नियोजन करून सगळ्यांना निमंत्रणं गेली होती. अभयचं कौतुक होत होतं, लग्नाच्या दिवशी काय काय धमाल करायची, याचं नियोजन आधीपासून झालेलं होतं. मात्र, लग्नाचा दिवस उजाडला, तो एक अत्यंत कटू अशी वार्ता घेऊनच. ज्याच्या लग्नासाठीचा जल्लोष सुरू होता, त्या अभयनेच जगाचा कायमचा निरोप घेतला होता!
कालपर्यंत अगदी उत्साहात, आनंदात असलेल्या अभयचा सतेज चेहरा आज बघवेनासा झाला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता, रंगही बदलला होता. त्याने काहीतरी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली असावी, असाच प्राथमिक अंदाज येत होता. रात्री सगळ्या कुटुंबाने संगीत कार्यक्रमात जोरदार परफॉर्मन्स केले होते. अभय आणि त्याची होणारी बायको प्रणिताही भन्नाट नाचले होते. असं असताना अचानक अभयच्या आयुष्यात असं काय घडलं की त्यानं आत्महत्या करावी? आत्तापर्यंत तो कुणाशीच हे कसं आणि का बोलला नाही? कुणालाच काही अंदाज येत नव्हता.
अभयची आई तर धाय मोकलून रडत होती. तिला सावरणं वडिलांनाही कठीण झालं होतं.
“आजपर्यंत कधी कुठल्या बाबतीत त्याचा त्रास झाला नाही. स्वतःच्या मनात काही दुःख असेल, तरी ते कुणाजवळ बोलून दाखवायचा नाही तो. सगळं मनात ठेवायचा. कायम दुसर्‍याला आनंदी ठेवायचा. आणि आज त्याच्यासाठी एवढा आनंदाचा दिवस आणि तोच….“ तिचा आक्रोश घरातल्या मंडळींना बघवत नव्हता.
ज्या घरात आज सनई-चौघडे वाजणार होते, नववधूचं धूमधडाक्यात स्वागत केलं जाणार होतं, दोघांच्या सुखी स्वप्नांची सुरुवात होणार होती, त्याच घरात आज फक्त वेदना होती, प्रत्येक जण दुःखात बुडून गेला होता. घरावर अवकळा आली होती. पोलिसांना त्यांचं काम करावंच लागणार होतं. इन्स्पेक्टर बिराजदारांनी ही बातमी समजल्यावर घरी भेट दिली.
“हे बघा, जे घडलं ते खूपच वाईट आहे, पण आम्हाला आमचं काम करावं लागणार आहे. तुम्ही दुःखातून सावरून आम्हाला थोडं कोऑपरेट केलंत, तर सगळ्यांच्या सोयीचं होईल.“ त्यांनी अभयच्या वडिलांना बाजूला घेऊन समजावलं.
अभय अजिबात दुःखी नव्हता, त्याचा चेहरा कायम हसरा असायचा. स्वतःच्या लग्नासाठीही त्यानं उत्साहानं तयारी केली होती, घरातल्यांशी अनेकदा भरभरून बोलत होता, हे बिराजदारांना त्याच्या वडिलांशी, इतर नातेवाइकांशी बोलताना स्पष्टपणे जाणवलं. अर्थात, एवढ्यावर थांबून चालणार नव्हतं. एवढ्या आनंदी मुलानं आत्महत्या का केली असावी, त्याबद्दल कुणाशीच बोलावंसं त्याला का वाटलं नसावं, हा बिराजदारांना पडलेला मोठा प्रश्न होता. शिवाय लग्नाच्या आधीचे सगळे कार्यक्रम सुरळीत सुरू असताना त्यानं लग्नाच्या आदल्या रात्रीच आत्महत्या का करावी, हेही गूढ होतं. संगीत कार्यक्रमानंतर जेवणाच्या वेळीही तो सगळ्यांबरोबर होता. त्यानंतरच काहीतरी घडलं असावं, असा अंदाज पोलिसांनी बांधला. कुटुंबीयांबरोबरच शेजार्‍यांकडेही काही चौकशी करणं महत्त्वाचं होतं.
वीरकरांच्या शेजारी राहणार्‍या कुटुंबाशी त्यांचे अगदी घनिष्ठ संबंध होते. शेजार्‍यांनीही अभयच्या स्वभावाबद्दल कौतुकाचेच उद्गार काढले. कायम सगळ्यांना मदत करणारा, कुणाच्याही संकटकाळात धावून जाणारा उत्साही मुलगा अशीच त्याची ख्याती होती. अभयचे वडील बिझनेस करत होते. खूप मोठा कारभार नसला, तरी व्यवसायात स्पर्धा होती. प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे इतर व्यावसायिकांपेक्षा ते वेगळे होते आणि त्यातूनही कधीकधी वादाचे प्रसंग घडत असत, असं पोलिसांच्या कानावर आलं. भोसले नावाच्या एका व्यावसायिकाबरोबर अभयच्या वडिलांचा काहीतरी मोठा वाद झाला होता. त्यावरून घरात तणाव होता, हेही त्यांना समजलं. अभय वडिलांना खूप मानणारा, संवेदनशील होता.
“माझ्याशी वाकड्यात शिरलात, तर पोराचं लग्न तुम्ही बघू शकणार नाही!“ अशी धमकी या भोसलेने दिली होती, हेही बिराजदारांना समजलं. अभयला वडिलांची अतिशय काळजी वाटत होती. मात्र त्या ताणातून त्यानं आत्महत्या केली असेल का, हा मोठा प्रश्न होता. शिवाय आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यासारखं घडलं तरी काय होतं? शेजार्‍यांची तरुण मुलगी नेहा हिच्याकडून बिराजदारांना याबद्दल थोडाफार उलगडा होण्याची शक्यता दिसू लागली.
“अभय वरवर आनंदी असल्याचं दाखवत असला, तरी मनातून तो खूप डिप्रेस्ड होता. आम्ही लहानपणापासूनचे मित्र. त्याच्या मनातल्या कितीतरी गोष्टी तो माझ्याशी शेअर करायचा. त्याला काहीतरी टेन्शन आहे, दुःख आहे, हे जाणवत होतं,“ नेहाने रडतरडत बिराजदारांना सांगितलं. अभयच्या अचानक जाण्याने ती खूपच खचून गेल्याचं जाणवत होतं.
अभयने अचानक आत्महत्या का केली, याचा एक धागा पोलिसांना मिळाल्यासारखं वाटत होतं. वरून आनंदी दिसणारा अभय अनेक गोष्टी मनात लपवून होता. त्याच दुःखाचा ताण सहन न झाल्यामुळे त्यानं आत्महत्या केली असावी, असं म्हणायला वाव होता. पोलिसांना आता अभयच्या वडिलांचे स्पर्धक आणि त्यांच्याशी भांडण करणारे भोसले यांच्याकडे चौकशी करायची होती.
भोसले हा वरून साधा वाटणारा, पण पक्का पोहोचलेला माणूस आहे, हे बिराजदारांना त्याला भेटल्या भेटल्या लक्षात आलं.
“हे बघा, भोसले. तुम्ही स्वभावाने कसे आहात, लोकांशी कसे वागता, समाजात तुमची काय इमेज आणि वजन आहे, याच्याशी मला देणंघेणं नाही. मी सरळसोट माणूस आहे. बरोबर असेल त्याला सोडायचा आणि चुकीचा असेल त्याला ठोकायचा, हा माझा नियम आहे. तुमच्या इमेजचा, वजनाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही, तेव्हा सरळसरळ उत्तरं देणं तुमच्याच हिताचं आहे.“ बिराजदारांनी गोड शब्दांत भोसलेंना सुनावलं.
“साहेब, आमचं भांडण झालं होतं, हे खरं आहे. आमचा धंदाच असा आहे ना साहेब, की प्रामाणिकपणे वागून चालत नाही. दुसरा माणूस तसं वागत असेल, तरीही आम्हाला त्याचा फटका बसतो. मी फक्त त्यांना समजावलं होतं. भांडलो नव्हतो की धमकी दिली नव्हती.“ भोसलेने त्याची बाजू मांडायचा प्रयत्न केला, पण तो काही सगळंच खरं बोलत नाहीये, याची बिराजदारांना कल्पना होती. भोसलेची सगळी कुंडली त्यांनी आधीच काढून ठेवली होती. मात्र, तो टग्या आणि बदमाश असला, तरी त्यानं लग्नघरात जाऊन अभयला काही दगाफटका केला असेल किंवा आत्महत्या करण्यासारखी वेळ त्याच्यावर आणली असेल, अशी काही शक्यता जाणवली नाही. गरज लागेल तेव्हा चौकशीसाठी यावं लागेल, असं सांगून बिराजदारांनी त्याची रवानगी केली.
पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आला, त्यात रात्री ११ ते १ या काळात अभयला विषबाधा झाल्याचं स्पष्ट होत होतं. या वेळी तो कुठे बाहेर गेला होता का? घरी काही वेगळं घडलं होतं का, या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्त्वाचं होतं.
बिराजदारांना सगळ्या घटनाक्रमात काहीतरी गडबड वाटत होती. अभय आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी घरच्यांना काहीच खबर लागली नसेल? त्याला एकट्याला असं सोडलंच कसं असेल? त्यावेळी घरातली माणसं कुठे होती? सगळ्यांना ते एवढ्या उशिरा, पहाटे कसं कळलं? आधी तो कुणाशीच काही बोलला नसेल?
आजूबाजूच्या माणसांकडे चौकशी करताना पोलिसांना एक खबर लागली, ती म्हणजे रात्री उशिरा अभय गच्चीत गेला होता. शेजारीच राहणार्‍या एका काकांनी त्याला गच्चीत बघितलं होतं. तो कुणाशीतरी बोलत होता. अंधारामुळे समोरची व्यक्ती त्यांना काही दिसली नव्हती, पण त्यांची काहीतरी वादावादी सुरू होती, हे निश्चित. कदाचित तेच त्याच्या आत्महत्येचं कारणही असू शकेल, असं बिराजदारांना वाटलं. त्यांनी आता मुलीकडच्या मंडळींच्या घरी जाऊन थोडी माहिती घ्यायचं ठरवलं. मुलीच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला होता. तिच्या सुखी संसाराची स्वप्नं बघत असताना अचानक हा आघात झाला होता.
“अभयचे घरच्यांशी संबंध कसे होते?“ प्रणिताच्या आईवडिलांचं सांत्वन केल्यानंतर बिराजदारांनी त्यांना विश्वासात घेत विचारलं. “जे काही असेल, ते मोकळेपणानं सांगा. तुम्ही सांगाल ते आमच्यापाशीच राहील,“ असा विश्वासही दिला.
अभय मनाने खूपच चांगला, मनमिळाऊ मुलगा होता, असं प्रणिताच्या आईवडिलांनी सांगितलं. प्रणिताही आनंदात होती. तिला नव्या घरी जाण्याची उत्सुकता होती, अभयच्या घरच्यांनीही तिला छान वागणूक दिली होती, तिचं कौतुक सुरू होतं. सगळ्यांशी एकत्रितपणे बोलताना बिराजदारांना एक गोष्ट नक्कीच खटकली. अभयच्या घरी एकदा प्रणितावरूनच काही छोटा वाद झाला होता, असा विषय निघाला; पण आईने तो विषय टाळला, हे काही त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी त्यांची नेहमीची युक्ती वापरली. प्रणिताला त्यांनी स्वतंत्रपणे भेटायला बोलावलं.
“सर, अभय खरंच स्वभावाने चांगला होता, पण मीच त्याच्याबद्दल एकदा चुकीचा समज करून घेतला आणि त्याच्याशी घरी जाऊन भांडण केलं होतं,“ प्रणिताने कबुली दिली. त्यानंतर तिनं जी काही माहिती दिली, त्यामुळे बिराजदारांच्या भुवया उंचावल्या. एक शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली होती. त्यावरून त्यांना आता आणखी धागे शोधायचे होते. त्यांनी लगेच त्यांची टीम कामाला लावली.
दोन्ही लग्नघरांतल्या कुटुंबीयांकडे चौकशी करून झाली होती. आता आणखी संबंधितांकडूनही माहिती काढायची होती. अभयच्या पोटात जे विष गेलं, ते मेडिकलमध्ये सहजासहजी मिळण्यासारखं नव्हतं. त्याच्यापर्यंत ते आलं कुठून, हेच पोलिसांना शोधून काढायचं होतं. हाती लागलेल्या पुराव्यांवरून एकेक कडी जोडत पोलिसांची टीम एका दुकानापर्यंत पोहोचली. रासायनिक खतं आणि द्रव्यं विक्री करणारं हे दुकान होतं. तिथे गेल्यावर पोलिसांना सगळाच उलगडा झाला. बिराजदारांनी आता थेट पुन्हा अभयचं घर गाठलं.
“मी आधीच सांगितलं होतं, आमच्याशी प्रामाणिक राहा. सगळी माहिती द्या. पण तुम्ही आमच्यापासून काही गोष्टी लपवल्या आहेत,“ बिराजदारांनी अशी सुरुवात केल्यावर सगळे चपापून एकमेकांकडे बघायला लागले. “आधीच सगळं सांगितलं असतं, तर अभयच्या मृत्यूचं कारण शोधायला जास्त वेळ लागला नसता. कदाचित, त्याचा जीवही वाचला असता,“ ते म्हणाले, तेव्हा सगळे अभयच्या आठवणीने पुन्हा हळहळले.
“त्याचं प्रणिताशी लग्न होणार असलं, तरी त्याच्या आयुष्यात आणखी एक मुलगी होती. हे खरंय का?“ त्यांनी विचारल्यावर पुन्हा कुजबूज सुरू झाली. अभयच्या वडिलांना आता राहवेना. आम्हाला कुणाची बदनामी करायची नव्हती, म्हणून आम्ही गप्प राहिलो, असं त्यांनी सांगितलं.
“हा चांगुलपणाच कधीकधी नडतो.“ बिराजदार म्हणाले. एव्हाना एक महिला पोलिस अधिकारी शेजारच्या घरातून नेहाला घेऊन तिथे आली होती. तिला बघून सगळे चपापले.
“तुमच्या मुलानं आत्महत्या केलेली नाही. हिनं त्याला विष पाजून मारलंय!“ असं बिराजदारांनी जाहीर केलं, तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसला.
“या मुलीचं अभयवर प्रेम होतं. अभयला ती चांगली मैत्रीण वाटत होती. त्याचं लग्न ठरलं, तशी ती अस्वस्थ झाली. त्याला समजावूनही तो ऐकेना, तेव्हा तिनं त्याला मारून टाकायचा निर्णय घेतला.“ बिराजदारांनी स्पष्टपणे सांगितलं. नेहा ओक्साबोक्शी रडत होती. रागाच्या भरात आपण काय केलं, याची तिला उशिराने जाणीव झाली होती. नेहाबद्दल प्रणितालाही संशय होता, म्हणूनच तिनं अभयला त्याबद्दल विचारलं होतं आणि त्यावरून घरात वाद झाले होते. पण प्रणिताच्या मनातला संशय नंतर दूर झाला.
नेहानं अभयला समजावलं, पण तो ऐकेना तेव्हा त्याला रात्री उशिरा एकट्यानेच गच्चीत यायला सांगितलं आणि तिथेच त्याला प्रेमाच्या गोष्टी करून गोडीगुलाबीने विष पाजलं. तिनं वडिलांच्या मित्राच्या दुकानातून हे विष घेतलं होतं आणि तिथूनच पोलिसांना सगळा उलगडा झाला होता. काही वेळाने त्याचा परिणाम होईल आणि आपण कुणाला सापडणार नाही, असा तिचा अंदाज होता. पोलिसांच्या नजरेतून मात्र तिचं बोलणं, तिच्या संशयास्पद हालचाली, काही सुटलं नव्हतं आणि त्यातूनच या खुनाचा उलगडा झाला होता.
प्रेमाचे रंग खुलत असतानाच या अघोरी प्रेमाने अभयच्या आयुष्याचा घात केला होता.

Previous Post

ही भिंत पुन्हा उभी राहू नये!

Next Post

२५ डिसेंबर भविष्यवाणी

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post

२५ डिसेंबर भविष्यवाणी

विकास दर घसरतो कसा?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.