• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नया है वह…

- वैभव मांगले

Nitin Phanse by Nitin Phanse
September 22, 2022
in नया है वह!
0

काय सांगता? आता ‘अलबत्या गलबत्या’ नाटकात चिंचि चेटकीणीच्या भूमिकेत तुम्ही नाही? अरेरे, काका, तुम्ही असं का केलंत?
– आर्या सबनीस, अंधेरी
पु.लं.च एक वाक्य आहे… आपल्या ताटातून कुठे किती शितं सांडायची हे ठरलेलं असतं.

अहो केवढा हा धो धो पाऊस. परतीचा पाऊस म्हणायचा की भरतीचा पाऊस? हे सगळे ऋतू असं डोकं फिरल्यासारखे का वागायला लागले आहेत हल्ली?
– राणी पाटील, चंदगड
वा.. अहो तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे… माणूसच ताळतंत्र सोडतोय तर निसर्ग तसं उत्तर देणारच ना… तो तरी बिचारा तुमचा अत्याचार किती सहन करेल?

मांगले साहेब, आपन कट्टर मराठी मानूस हाये. आपन डायवरची नोकरी पन करत नाय. हलकी समजतो ती. मंग कंडक्टरची नोकरी, ती पन सेमी कंडक्टरची नोकरी गुजरातला गेली, तर इतका बवाल कशाला भिडू?
– राजू चांदेकर, भायखळा
मुळात आपल्याला नोकर्‍यांचीच काय गरज… नोकर्‍या केल्या तर उत्सव, सण, लग्न, मिरवणुका, दिंडी-पालख्या यांच्यात नाचणार कोण??

आता शाळेतून मुलांना गृहपाठच द्यायचा नाही, असा काहीतरी कायदा होतोय. मुलांना घरी बसल्याबसल्याच हव्या त्या डिगर्‍या वाटल्या जातील का हो लवकरच? तुम्हाला काय वाटतं?
– स्वप्ना पाटोळे, नागपूर
आपण परत आदिवासी कसे होऊ यासाठीचा खटाटोप चालला आहे सगळा… आदिमानव होण्याकडे प्रवास.

तुम्ही हिंदी सिनेमे पाहता का? अलीकडे पाहिलेला आणि खूप आवडलेला हिंदी सिनेमा कोणता?
– बशीर तांबोळी, रत्नागिरी
नाही… पुष्पा.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर महाराष्ट्राचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
– चित्रा पारकर, नेर्ले
गुजराथी लोक अप-डाऊन करतील.

नाटक सुरू असताना आपल्या किंवा सहकलाकाराच्या संवादाने, आविर्भावाने फुस्सकन हसायलाच आलं आणि बेअरिंग सोडून हसलात, असं कधी झालंय का? काय करता अशावेळी?
– सावनी प्रदीप, पुणे
खूपदा होतं… पण त्यावर मात करून पुढे जायचं असतं.. नाहीतर नाटक थांबेल.

सार्वजनिक गणेशोत्सवाला सध्या येत चाललेलं कर्णकर्कश्श, बाजारू आणि थिल्लर स्वरूप बदलण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, असं तुम्हाला वाटतं?
– प्रथमेश पवार, सांगली
हो… कारण ते समाजाला हवंय… बहुसंख्यांना त्याचा त्रास होईल तेव्हा ते कमी होईल.

महाराष्ट्रात डीजेचे स्पीकर, दहीहंडीसाठी हंड्या, गरबा खेळण्यासाठी दांडिया, ढोल, ताशे, गुलाल आणि लेझर लाइट यांचे कारखाने टाकले तर मराठी तरुणांना पुष्कळ रोजगार मिळू शकेल, नाही का?
– विनीत वर्तक, वसई
होय… पण ते तरी इमानदारी आणि मेहनतीने करा.

आपल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी मोबाइलवर मोठ्या आवाजात काही ना काही ऐकण्याचा रोग जडलेला आहे.
तुमच्या नाट्यप्रयोगातही असा रसभंग आणि एकाग्रता भंग करणारा व्यत्यय येतच असेल. अशावेळी काय करता?
– स्नेहल जोशी, ठाकुर्ली
खूपदा… पण आम्ही प्रयोग थांबवतो.

नवर्‍याने बायकोचा आणि बायकोने नवर्‍याचा मोबाइल एकमेकांच्या गैरहजेरीत तपासावा की तपासू नये?
– ऋचा बागवे, गिरगाव
तपासू नयेत, अन्यथा एका महिन्यात घटस्फोट नक्की.

हृदयनाथ मंगेशकरांनी जवळपास ४० वर्षांपूर्वी संगीतबद्ध केलेली मराठीतली कितीतरी गाणी आजपण ताजी टवटवीत वाटतात. काही मोजके अपवाद वगळले तर अलीकडची गाणी मात्र आठवडाभर पण लक्षात राहात नाहीत. असं का होतं?
– श्रीनिवास हळबे, ठाणे
सृजन नावाची गोष्ट असते आणि ती चिंतन, अभ्यास, ऐकणं-पाहणं यातून तयार होते.. आणि त्यासाठी वेळ द्यावा लागतो… तो सध्या कुणाकडेच नाहीयेय…

Previous Post

मुंबई मेरी जान!

Next Post

इतरांच्या ताटात डोकावणे सोडा…

Next Post

इतरांच्या ताटात डोकावणे सोडा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.