• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कसा पण टाका…

तुमचे प्रश्न आणि त्यावर हृषिकेश जोशींचे खुमासदार उत्तर

हृषिकेश जोशी by हृषिकेश जोशी
July 22, 2021
in कसा पण टाका
0

या पावसाचं काही खरं नाही. कधी तो अजिबात पडत नाही. कधी असा पडतो की रस्ते, घरं बुडवतो. शेतात पडत नाही, शहरात रस्त्यावर पडतो. नीट नेम धरून हवा तिथे हवा तितका पाऊस पाडण्याचं विज्ञान विकसित व्हायला हवं, असं तुम्हाला वाटत नाही का?
– संध्या रेळे, बदलापूर
पाऊस हवा तिथंच पडतोय हो, आपण खालची सगळी अरेंजमेंट बदलून बसलोय.

पावसात कावळ्याचं शेणाचं घर वाहून गेलं आहे. चिऊताईचं घर मेणाचं आहे, शाबूत आहे. पण ती काही दार उघडायला तयार नाही. कावळ्याने आता काय करावे?
– सिद्धार्थ लोणकर, बीड
‘१००चा नेटपॅक तुझ्या पोरासाठी मारलाय गं’ म्हणून कावळ्याने ओरडावं. पोराचं सगळं करायचं सोडून चहा टाकेल ती.

‘मुत्तुकौडी कव्वाडी हाडा’ हे माझं आवडतं गाणं आहे… पण या गाण्याच्या या ओळींचा अर्थ मला आजतागायत कळला नाही… काय असेल या ओळींचा अर्थ?
– नितीन झाल्टे, करमाळा
अर्थ न कळताही आवडत होतं ना इतके दिवस? कशाला आता अर्थ समजून घेऊन, इतके दिवस निरर्थक गाणी गात बसल्याचा पश्चाताप करून घेताय?

लैंगिक दृश्यं, शिवीगाळ, प्रक्षोभक मांडणी, डोक्यावर पडलेली पात्रं आणि अतर्क्य वळणं यांच्याशिवाय वेबसिरीज बनू शकत नाही, अशी ओटीटीवाल्यांची समजूत झाली आहे का?
– सोनल आंबेगावकर, जुन्नर
‘लोकांना हेच आवडतं’ हा जो त्यांनी निष्कर्ष काढलेला असतो, तो मोठ्या संख्येने प्रेक्षक अशा कन्टेन्टला पाठ फिरवून जोपर्यंत बदलून दाखवत नाहीत, तोपर्यंत हा समज रूढ राहील.

मनोरंजन विश्व मोठ्या पडद्यावरून आता छोट्या पडद्यावर आणि तिथूनही मोबाइलवर येऊन पोहोचलं आहे. अशा काळात कोरोनासंकट टळल्यानंतर लोक प्रत्यक्ष नाट्यानुभव घेण्यासाठी थिएटरमध्ये येतील, असं वाटतं का?
– दिगंबर तजबीजे, सटाणा
तात्कालिक संकटांना पुरून उरणारी नाटक ही एकमेव कला आहे. इतिहास गवाह है, नाटकाला मरण नाही. भले जग इकडचं तिकडे होवो.

युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी इटालियन प्रेक्षकांना मारहाण केली आणि आपल्या संघातल्या आशियाई आणि कृष्णवर्णीय खेळाडूंना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. आपण या देशांना प्रगत आणि सुसंस्कृत मानतो. सगळीकडे ही अशी वृत्ती सारखीच कशी?
– अनंत घोटिवडेकर, कणकवली
आपल्याला उगाच वाटत असतं बाहेरची माणसं ग्रेट असतात म्हणून. आपली तशी समजूतही करून दिली जाते आणि आपण भुलतोही. पण शेवटी जग गोल आहे हेच आपल्या निदर्शनास येतं.

एखादा माणूस थकला, प्रवास करून आला की त्याला तहान लागते, आपण त्याला पाणी पाजतो. मग युद्धात किंवा लढाईत ‘मी तुला पाणी पाजेन’ अशी गर्जना का केली जाते?
– अभिषेक क्षीरसागर, दत्तवाडी, पुणे
तुम्हीच दिलंय की उत्तर. माणूस एकवेळ अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो, पण पाण्याशिवाय नाही. ‘मी तुला इतका थकवेन की तुला शेवटी पाणी मागायला लागेल आणि तुझ्यावर उपकार म्हणून मी ते पाजेन देखिल’; अशा अर्थाने हा वाक्प्रचार रूढ आहे.

‘अरे भाई निकल के आ घर से, आ घर से, दुनिया की रौनक देख फिर से देख ले फिर से’ या किशोर कुमारच्या लोकप्रिय गाण्याला प्रतिसाद देऊन पुन्हा एकदा निर्धास्तपणे घराबाहेर पडण्याची संधी कधी मिळेल आपल्याला?
– साहेबराव थोपटे, जुन्नर
(कधीतरी) एकदा.

तुम्ही डावे की उजवे?
– स्वप्नील पाटसकर, सातारा
सर्वांप्रमाणेच जन्मजात माझे हृदय डाव्याच बाजूला आहे. पण माझा उजवा मेंदूही कार्यक्षम आहे. म्हणून ‘कर्तव्यात’ डावं उजवं न करता रोजच्या जगण्यात मला बॅलन्स साधता येतो. सगळ्या गोष्टी कोणत्याही एकाच दिशेला गेल्या की फक्त कोसळतातच अशी माझी अनुभवातून आलेली धारणा आहे.

आईचा घो, आईचा घो, येडा झाला का रे, या गाण्यातल्या काव्यगुणांचं विश्लेषण तुम्ही कसं करू शकाल?
– नाना शितोळे, अहमदनगर
ही लिपी देवनागरी असली आणि शब्द मराठीच असले तरी, ही भाषा वेगळी आहे. या भाषेत या गाण्याचा अर्थ आनंदपर्यवसानी आणि तो ही साधा नाही तर उत्कट आणि उत्फुल्लता व्यक्त करावासा वाटणारा, पण या व्यक्त होण्यामध्ये सवंग, खाजगीतले अश्लीलशब्द, जे खरेतर जास्त प्रिय आहेत, पण जाहीर उच्चारता येणार नाहीत म्हणून, ऐकणार्‍याला त्याचा निर्देश तर होईलपण प्रत्यक्षात टाळलेला आहे हे अधोरेखित होईल, आणि त्याचा आनंदही प्राप्त करून देता येईल, असा सभ्य भाषेत जाहीर व्यक्त केल्याचं समाधान देणारा हा आनंद; असा आहे.

Previous Post

मुले ही देवाघरची फुले!

Next Post

सगळ्यांचं सगळं ‘ऐकणारं’ सरकार!

Related Posts

कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 14, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 7, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका…

September 30, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका..

September 23, 2021
Next Post

सगळ्यांचं सगळं ‘ऐकणारं’ सरकार!

३१ जुलै भविष्यवाणी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.