• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कहाणी एकात्मतेची… बुंदीच्या लाडवांची!!

- वैभव भाल्डे (सुग्रास)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 22, 2025
in खानपान
0

मध्यंतरी श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लीश’ सिनेमा पुन्हा बघण्यात आला. सगळा कथाविस्तार, अभिनय, मुळातच जुळून आलयं सगळं, त्यामुळे कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा न येणार्‍या पठडीतला आहे ना? सगळ्याबरोबरच या सिनेमातल्या नायिकेचं बुंदीचे लाडू बनवणं मनाला भावलं माझ्या. तसाही बुंदीचा लाडू हा आवडीचाच प्रांत!
शुभकार्य म्हटले की बुंदीच्या लाडवांना पर्याय नसतोच, वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या हे समीकरण जपत व सांभाळत आलोय नाही का आपण? अगदी पुलंच्या नारायणाचं लहानगं लेकरूही हातात हा बुंदीचा लाडू घेऊनच पेंगुळतं!! प्रसादाचा म्हणून मिळणारा ठिकठिकाणचा बुंदी लाडूही आपण खात असतोच की. तिरुपतीचा असो वा इतर कोणते मोठे देवस्थान. आमच्या पुण्याच्या मठातही उत्सवांना हमखास मिळतो या ताज्या बुंदीच्या लाडवांचा प्रसाद.
अलिबागला गणपतीमध्ये नैवेद्यासाठी विविध प्रकार आणायचो. त्यात कडक बुंदीच्या लाडवांची वर्णी लागायचीच!! बेळगावच्या बाजूला मिळणारा गुळाच्या पाकातला बुंदी लाडूपण खाल्ल्याचे स्मरतेय. साधारण पण कडक किंवा नरम अशी वर्गवारी होत असली तरी आजकाल मोतीचुराच्या म्हणजे बारीक कळीच्या बुंदी लाडवांची चलती जास्त आहे. एकसारख्या आकाराच्या कळ्यांचा हा मोतीचुराचा लाडू मला उगीच जास्त नटवेपणा किंवा शिष्ठपणा केल्यासारखा वाटतो, तर साधा बुंदीचा लाडू कसा आपल्यातला वाटतो, अघळपघळ नी सर्वसामान्य!!
लहानमोठी, थोडी ओबडधोबड, कशीही बुंदी असली तरी लाडवांच्या रुपात बसली की ती शुभंकराची दूत बनतेच!! तसं बघितलं नं तर फार काही साहित्य लागत नाही आणि एकदा तंत्र जमलं की विशेष काही कठीणही नाहीत हे लाडू बनवणं. वाटीभर बारीक दळलेलं हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, तेवढीच साखर, साजुक तूप, पाणी, सुका मेवा आणि वेलदोड्याची पूड हे जिन्नस असले की बनवू शकतो आपण बुंदीचे लाडू. सर्वात आधी चाळलेल्या बेसनात जरुरीनुसार पाणी मिसळून बुंदीचे पीठ भिजवावे. हे पीठ फार घट्ट झाले तर झार्‍यातून पडत नाही आणि फार पातळ असले तर बुंदी नीट पडत नाही. बुंदी चपटी पडत असेल तर किंचित पाणी वाढवा आणि थेंबासारख्या आकाराची होत असेल तर पीठ वाढवायचं. गोल गरगरीत बुंदी पडली की अर्धा गड जिंकलाच की आपण. साखरेच्या एकतारी कोमट पाकात बुंदी कालवून ठेवायची आणि गरम असतानाच लाडू वळायचे. गार झाल्यावर जर बुंदीने पाक शोषला पूर्ण तर लाडू वळणं कठीण जातं. बुंदी तळण्यापासून सुरू झालेला घमघमाट लाडू जिभेवर विरघळला की मनात जास्तच दरवळतो!!
साखरेच्या पाकात पडली की बुंदी जशी बुंदी न राहता लाडू बनते, जणू सार्थक होते नाही का आजवरच्या कष्टाचे? रंग, रूप, आकार सगळं बाजूला सारून एकदा का ते बुंदीचे दाणे एकत्र व्हायला पुढे सरसावले की हा आनंदघन तयार झालाच म्हणून समजा. यात सर्वात महत्वाचं, सर्व कणांना सांधण्याचं काम करणारा पाकही फार महत्वाचा ठरतो बरं!!
बुंदीच्या प्रत्येक दाण्याचं मूळ स्वरूप जसं एकचं बेसनाचं मिश्रण असतं तसंच आपणही सगळे एकाच हाडामांसाचे बनलोय की. बाह्य भेद सोडले तरी मूळ स्वरूप हे एकच आहे. विनाकारण जोपासलेले हे भेदाभेद विसरून सुखदु:खात एकमेकांशी समरस झालं की आपलीच मनं उभारी घेतात. मात्र हे बुंदीचं एकत्र येणं टिकवण्यासाठी जशी पाकाची गरज असते, जो लाडू तर सांधतोच पण गोडवाही देतो, तसाच समाजाला एकसंध ठेऊ शकेल असा पाक म्हणजे सकारात्मक आणि डोळस नामस्मरण. मनामनांतील कटुता नकळत नाहीशी करण्याचे काम तर हे नाम करतेच, पण मनांना सांधण्याचेही काम हे नाम करतेच की. नकोशा बाह्यभेदांची बंधनं आपोआप गळतात व आयुष्याला झळाळी येते.
मूळची आयरीश असलेली सिस्टर निवेदिता जेव्हा स्वामी विवेकानंदांची शिष्या बनून भारतात आली तेव्हा सर्वांना काळजी होती की माताजी श्री सारदादेवी तिला कसं स्वीकारतील? मात्र सर्वार्थानं जगतजननी असलेल्या माताजींनी सर्व अंदाज खोटे ठरवत निवेदिताला मनोमन स्वीकारले. भाषेचा अडसर त्या भावभावनांच्या राज्यात जसा कधी जाणवलाच नाही, एकमेकींच्या धरलेल्या हातातून जणू केवळ त्या सूक्ष्म संवेदनाचीच देवाणघेवाण होत होती. माताजींना एखाद्या नातीचं असावं तसं कौतुक होतं निवेदिताचं. त्यांनी सुरू केलेली शाळा स्वत: बघायला जाऊन त्याची प्रचितीच दिली माताजींनी.
एकदा का मूळ स्वरुपाची खूण पटली नं मनाला की आपोआप या भेदाभेदांना थारा उरत नाही, बाह्योपचारांच्या पलीकडे अंतरंगात नामाची गोडी पाझरली की आपोआपच प्रत्येक जीवात शिवाचे अस्तित्व जाणवायला लागते नी त्या आपल्या मूळ रूपाशी अनुसंधानित होण्यातला आनंदच निराळा, दैवीच खरं तर हे सगळं, बुंदीच्या लाडवाप्रमाणेच केवळ कल्पनेनंच मनोमन सुखावणारं!!

Previous Post

टिंग टिंग भास्कर

Next Post

तोमार बाबा

Related Posts

खानपान

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
खानपान

निर्मळ, पारदर्शक बदाम हलवा

April 25, 2025
खानपान

मांस आणि भाज्यांचा ‘स्ट्यू’

April 4, 2025
खानपान

पारंपारिक वन डिश मिल

April 4, 2025
Next Post

तोमार बाबा

राशीभविष्य

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.