• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

सुंदराबाईंचा पर्दाफाश

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 22, 2025
in प्रबोधन १००
0

बापाची कसरत आणि मुलीची फसगत हे प्रबोधनकारांचं पुस्तक १९२६ सालच्या एप्रिल महिन्यात प्रकाशित झालं. बावला मुमताज प्रकरणावर इंदूरच्या तुकोजीराव होळकरांची बाजू लढवल्यानंतर त्याच धर्तीचं हे आणखी एक लिखाण. महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांत एकच बाजू येत असल्यामुळे त्यामागचं कारस्थान सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे.
– – –

मुंबई नगरपालिकेचा नगरसेवक अब्दुल कादर बावलाचा खून आणि त्यामागे त्याची रखेल मुमताज बेगम हिच्या अपहरणाचा प्रयत्न या गुन्ह्यांचं बालंट इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्यावर आलं, तेव्हा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणी वर्तमानपत्रांनी त्यांच्या बदनामीची मोहीम चालवली. इतर बहुसंख्य ब्राह्मणेतर वृत्तपत्रं भांबावून गेलेली असताना प्रबोधनने मात्र होळकरांची बाजू जोरात लावून धरली. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्रभर झालेलं एकतर्फी वातावरण फिरलं. प्रबोधनची लोकप्रियताही वाढली. या प्रकरणावरच्या लेखांच्या पाचेक पुस्तिकाही प्रबोधनकारांनी काढल्या. त्याचीही विक्रमी विक्री झाली. त्यातली द टेम्प्ट्रेस ही एक इंग्रजी पुस्तिका तर थेट ब्रिटिश साम्राज्याच्या संसदेत पोहोचली. हे काही पेड जर्नालिझम नव्हतं. इंदूर सरकारकडून कोणत्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता केवळ विचार म्हणून ते होळकरांची बाजू घेऊन उभे होते. टेम्प्ट्रेसमधल्या एका उल्लेखामुळे झालेल्या बॉम्बे क्रॉनिकलच्या बदनामी खटल्यात प्रबोधनकारांनी आपलं सर्वस्व गमावलं. तरीही त्यांनी न्यायाची बाजू घेण्याचा ठाकरी बाणा काही सोडला नाही. त्यांनी लवकरच इंदूरशी संबंधितच एका प्रकरणात पुन्हा उडी घेतली.
बापाची कसरत आणि मुलीची फसगत या छोट्या साठ पानी पुस्तिकेतून आपल्याला आज प्रबोधनकारांची ही उलट सलामी वाचता येते. उपशीर्षकानुसार ही दोन आणे किमतीची पुस्तिका कानपूरच्या सुंदराबाई प्रकरणावर आधारित आहे. ही काही कादंबरी नाही किंवा या प्रकरणाचा सांगोपांग इतिहासही नाही. ही खास प्रबोधनकारी शैलीतली उलटतपासणी आहे. हा खरं तर एक दीर्घ लेखच आहे. प्रबोधनकारांच्या जवळपास प्रत्येक पुस्तिका आधी प्रबोधनमध्ये प्रकाशित झालेली आढळते. पण तसं या पुस्तिकेच्या बाबतीत झालेलं नाही. त्यामुळे हा पुस्तिकेसाठी लिहिलेला स्वतंत्र लेख असू शकतो किंवा आज आपल्याला उपलब्ध नसलेल्या प्रबोधन किंवा लोकहितवादीच्या अंकातला लेख असू शकतो. पण तो कुठलाही का असेना, ही पुस्तिका आपल्याला एका अत्यंत रोचक प्रकरणाची ओळख करून देते. प्रबोधनमध्ये ही पुस्तिका लवकरच प्रसिद्ध होईल, अशा जाहिराती जवळपास दोन तीन महिने आल्यात.
या पुस्तिकेचा मुख्य विषय असलेलं सुंदराबाई प्रकरण काय आहे, हे पहिल्याच पानावर दिलं आहे. ते असं, इंदोरचे जहागीरदारी दिवाण कृष्णराव पळशीकर यांच्यावर विवाहाची जबरी करून त्यांची इस्टेट लाटण्यासाठी रचलेल्या भिक्षुकी गुप्त कटाचा आश्चर्यकारक मुद्देसूद इतिहास. कादंबरीपेक्षा रसाळ व हृदयरम्य कल्पनेलाही चकविणारे डावपेच. सुंदराबाईच्या वृत्तपत्री करुण कहाणीनं विव्हळ होऊन इंदोरचे कोल्हापूर बनवू पहाणार्‍यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. `शुभमंगल साऽऽवधान आरोळ्यांत केवढें भयंकर संकट असतें, हे अखिल हिंदुजनांनी या पुस्तकात पहावे.`
इंदूर दरबारची वंशपरंपरागत दिवाणगी कृष्णराव रामराव पळशीकर यांच्याकडे होती. त्या काळात त्यांना वार्षिक २५ हजारांचं उत्पन्न असणारी जहागिरी होती. त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलीही झाल्या. त्यातली एकच मुलगी जिवंत राहिली. तिचं लग्नही हे पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा म्हणजे एप्रिल १९२६च्या आधी थाटामाटात झालं होतं. पण १९०८ साली त्यांची आई आधी वारली आणि पाठोपाठ १९१३ साली पत्नीही वारली. पळशीकर दिवाण तसे तरुण असूनही आजारी होते. त्यांना अपस्मार म्हणजे फिट्सचा इतका त्रास होता की त्यातून त्यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. ते आपल्या मुलीलाही ओळखेनासे झाले. ते कधीतरी शुद्धीवर असत तर कधी भ्रमिष्टासारखे वागत. त्यामुळे इंदूर सरकारने त्यांची काळजी घेण्यासाठी
डॉक्टर, त्यांच्या वैयक्तिक तसंच जहागिरीच्या देखरेखीसाठी सरकारी अधिकारी नेमले.
पण त्यात अचानक भलतंच प्रकरण निर्माण झालं. इंदूर संस्थानचे एक पेन्शनर गोविंद गणेश निघोजकर यांनी पळशीकरांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर साधारण एखाद्या वर्षाने इंदूर सरकार दरबारी अर्ज केला. त्यात त्यांनी विधुर झालेल्या पळशीकर दिवाणांशी आपल्या १२ वर्षांच्या मुलीचं, सुंदराबाईचं लग्न लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कथा सांगितली की त्यांच्या कुलस्वामीने स्वप्नात येऊन तशी आज्ञा केली आहे. दिवाण आजारी असल्याने त्यांना दुसरं कुणी मुलगी देणार नाहीच, तरीही परमेश्वर आज्ञेमुळे मी तसं करण्यास तयार आहे. त्यामुळे माझ्या मुलीचं भलं होईल आणि परमेश्वरकृपेने दिवाणही बरे होतील. पुढच्या अर्जात निघोजकरांनी मुहूर्तही सांगितला. दरबारातल्या ब्राह्मण कारकुनांच्या मदतीने मोठ्या अधिकार्‍यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. पण सर्वत्र नकार मिळत होता. मग छोटीबाई कांबळे नावाच्या सरकारी सुईणवजा डॉक्टरने पळशीकर दिवाणांची तब्येत लग्न करण्यासाठी लायक असल्याचं सर्टिफिकेट दिलं. पळशीकरांची गीताबाई नावाची एक मावशीही अचानक इंदूरात आली.
या सगळ्यामागे वेडसर दिवाणाची जहागीर आपल्या हातात घेण्यासाठीचा कट होता. आजारी दिवाणाचा मृत्यू झालाच तर त्यांची जहागीर सरकारजमा होईल, ही चिंता होती. एक ब्राह्मणी जहागीर काहीही करून बहुजनी सरकारच्या ताब्यात जाता कामा नये, यासाठी हा सारा बनाव होता. सरकारी अधिकारी हे जाणून असल्यामुळे त्यांनी निघोजकरांच्या अर्जाला होकार दिला नव्हता. पण सरकारने परवानगी दिली नाही, तरी लग्न लावून दिल्यास पुढे ते सरकारला निभावावं लागेल, या विचारांनी दिवाणांच्या लग्नाचा कट रचण्यात आला. त्यात सुंदराबाईंचे वडील गोविंद निघोजकर आणि दिवाणांची मावशी गीताबाई हे आघाडीवर होते. इंदूरचे राजे आणि देखरेखीसाठी असलेले डॉक्टर संस्थानात नाहीत, असा २४ मे १९२५चा मुहूर्त ठरला. गीताबाईंनी सरकारी अधिकार्‍यांना खोटं बोलून दिवाणांना निघोजकरांच्या घरी आणलं. तिथे लग्नाची तयारी झाली होती. निघोजकरांचे काही नातेवाईक होते. दक्षिणेच्या प्रलोभनाने भटजीही आणले होते.
पण हे बिंग फुटलं. दिवाणांची जबाबदारी असणारे सुपरिटेण्डंट रणदिवे पोलिसांना घेऊन निघोजकरांच्या घरी पोचले. पोलिसांनी लग्न थांबवलं. सरकारी परवानगी न घेता दिवाणांचं लग्न लावणं बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. त्यावर निघोजकरांच्या कुटुंबाने रडारड सुरू केली. निघोजकर आणि गीताबाईंनी त्रागा केला. १२ वर्षांच्या छोट्या सुंदराबाईंना काही कळतही नव्हतं. इतर उपस्थितांनी हात वर केले. पोलिसांनी चीफ मिनिस्टरकडून आदेश मागवला. त्यांनी लग्नाला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पोलिस दिवाण पळशीकरांना घेऊन घरी आले. इथे लग्न मोडलं तरी निघोजकर मानायला तयार नव्हते. त्यांनी इंदूरमधल्या ब्राह्मणांची सभा घेतली. त्यात हे लग्न झाल्याचा दाखला मिळवला. त्यानंतर शृंगेरीचे शंकराचार्य इंदूरमध्ये आले असताना त्यांच्याकडूनही एक दाखला मिळवला. पण कायद्यानुसार यापैकी कुणीच लग्नाच्या ठिकाणी हजर नसल्यामुळे या दाखल्यांना अर्थ नव्हता.
पण पत्रकबाजी होत राहिली. पुढे कोर्टकज्जे झाले. सुंदराबाईच्या बाजूने बोलणार्‍या साक्षीदारांच्या जबान्या खोट्या असल्याचं सिद्ध झालं. सुंदराबाईंचं दिवाण पळशीकरांशी लग्नच झालं नाही, सरकारला फसवण्याचा कट असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. हे सगळं होईपर्यंत सुंदराबाई १९ वर्षांच्या झाल्या. त्या आता सज्ञान होत्या. आपलं लग्न झालेलं असूनही आपल्यावर इंदूर सरकारने कसा अन्याय केला, याच्या कहाण्या त्या महाराष्ट्रभर फिरून सांगू लागल्या. त्यांनी वॉइसरॉयकडे अर्जही केला. पण कोर्टाचा निकाल स्पष्ट असल्याने वॉइसरॉयने त्यांना उभंही केलं नाही. पण पुणेरी वर्तमानपत्रांना बहुजनी संस्थानांच्या विरोधात बोलण्यासाठी नवा विषय सापडला होता. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बदनाम केलं, तसंच या प्रकरणात इंदूरलाही बदनाम करण्याचा चंग ब्राह्मणी पत्रकारांनी बांधला होता.
त्याला उत्तर देण्यासाठी प्रबोधनकारांनी हे पुस्तक लिहिलं. बावला मुमताज प्रकरणात त्यांना पुरावे शोधावे लागत होते. तसं इथे नव्हतं. सुंदराबाई चुकीच्या असल्याचं कोर्टात सिद्ध झालं होतं. त्यामुळे प्रबोधनकारांनी कोर्टात सिद्ध झालेली तथ्य आणि युक्तिवादच पुस्तकात मांडून टीकाकारांची तोंडं कायमस्वरूपी बंद केली आहेत. त्यातलं स्टोरीटेलिंग जबरदस्त आहे. वाचकाने पुस्तक हातात घेतलं की तो सगळी साठ पानं वाचल्याशिवाय खाली ठेवत नाही. खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याचा आक्रमक पवित्रा आपल्याला खिळवून ठेवतो. अर्पणपत्रिकेपासून उपसंहारापर्यंत रोखठोक दृष्टिकोन पाहायला मिळतो. त्यामुळे संस्थानी दरबारातली एक रोचक कहाणी इतक्यापुरतं हे पुस्तक उरत नाही.
उदाहरणादाखल प्रबोधनकार अर्पण पुत्रिकेत लिहितात, इंदोराधिपती सर तुकोजीराव होळकर यांच्या राज्यसंन्यासाला कारण झालेली परिस्थिती निर्माण करण्याच्या कामी ज्या मढी पत्रकारांनी आपल्या कलमबहाद्दरीची शिकस्त केली; भटी पत्रांची कोल्हेकुई बेगुमान सुरू असता, ज्या क्षत्रिय मराठा पत्रकारांनी, पुढार्‍यांनी, कौन्सिलरांनी व फंडोबांनी दगडी पुतळ्याचे मौन धारण करण्याइतकी क्षत्रिय तेजाची चमक दाखविली आणि २७ फेब्रुवारी १९२६ रोजी राजसंन्यासाची खबर जाहीर होताच ज्यांना ज्यांना हर्षवायु झाला, त्या सर्व देशी परदेशी संत महंतांना त्यांच्या स्वाभिमानी देशसेवेबद्दल हे पुस्तक नाईलाजाने अर्पण केले आहे.
पुस्तकाच्या उपसंहारात लिहिलेलं सारही महत्त्वाचं आहे. ते असं, सुंदराबाईच्या विवाहासाठी तिच्या बापाने गीताबाईच्या सहाय्याने जो गुप्तकट उभारला, त्याची सर्व हकीगत आतापर्यंत दिली. त्या कटाचा खोडसाळपणा विचारात घेता, आज सुंदराबाईवर जो प्रसंग आला आहे, तो कितीही शोकास्पद असला तरी त्याची जबाबदारी तिच्या बापावरच पडते आहे. कटाचा उपद्व्याप आणि स्वतःच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी इंदोराधिपती न्यायाधीश इत्यादिकांची केलेली धाडसी बदनामी, यामुळे दयेच्या याचनेचाही हक्क ते गमावून बसले. महाराजांनी पळशीकरांचे निराळ्याच मुलीशी लग्न लावले किंवा आणखी वर एक दत्तकही दिला, तरी त्याबाबत तक्रार करून सुंदराबाईला अथवा तिच्या पित्याला आपल्या गुप्त कटाचे मण्डन आणि ‘प्रâॉड’ करून लावलेल्या लग्नाचा हक्क कसा सिद्ध करता येतो? इंदोर सरकार ज्या दिवाणाचे पालक, त्यांचे एक नाहीतर दहा लग्ने त्यांनी लाव्ाली, तर त्यामुळे या गुप्त कटवाल्यांच्या पोटात दुखण्याचे काय कारण? गुप्त कटाने व लुच्चेगिरीने बळजबरीचा विवाह लावून दिवाणाची इस्टेट लाटण्याची बापाची कांचनभटी कसरत अखेर मुलीच्या भयंकर फसगतीला कारण कशी झाली, इंदोर संस्थानची बदनामी करणारी भटी कारस्थाने कशा स्वरूपाची असतात आणि त्याचा पडसाद अंग्रेजी खालसात उमटविण्याच्या विपर्यासी धडपडी कशी असतात, एवढे या प्रकरणावरून वाचकांना स्पष्ट समजून येईल अशी आशा आहे.
प्रबोधनकारांचं हे पुस्तक तसं दुर्लक्षित असंच आहे. पुस्तकाचा विषयही कधीच इतिहासजमा झालाय. प्रबोधनकार ज्या देशी संस्थानांची बाजू घेऊन भांडतात, त्यांचं सोयरसुतकही कोणाला उरलेलं नाही. तरीही भक्कम युक्तिवाद अत्यंत रसाळ तरीही ठाम भाषेत कसे करावेत, याचं हे पुस्तक वस्तुपाठ आहे.

Previous Post

टूर निघालीऽऽ पुंवाकऽऽ पुक पुकऽऽ…

Next Post

भक्तीची नव्हे, मुक्तीची चळवळ!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post

भक्तीची नव्हे, मुक्तीची चळवळ!

राष्ट्रपतींच्या नथीतून सुप्रीम कोर्टावर तीर!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.