ग्रहस्थिती : रवि मेषेत, हर्षल वृषभेत, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : २४ मे शनिप्रदोष, २५ मे शिवरात्री, २६ मे सोमवती अमावस्या, सुरुवात दुपारी १२.१२ वा. श्री शनेश्वर जयंती, २७ मे अमावस्या समाप्ती सकाळी ८.३२ वा., ३० मे विनायक चतुर्थी.
– – –
मेष : प्रेमप्रकरणात चांगला अनुभव येईल. विवाहेच्छूंसाठी चांगला काळ. नोकरीत जपून राहा. प्रतिक्रिया देणे टाळा. कमी चर्चा आणि अधिक काम करा. व्यवसायात वाद टाळा. घरात जमवून घ्या. प्रवासात काळजी घ्या. व्यवसायात नव्या कल्पना पुढे नेताना आर्थिक नुकसान होईल. घरात शुभकार्य घडेल, वातावरण आनंददायी राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. अतिविश्वास नको. संततीकडून चांगली बातमी येईल. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. तरुणांनी ध्येयपूर्तीसाठी अधिक प्रयत्न करावा.
वृषभ : नोकरीत अधिक कष्ट करा. व्यवसायात काळजी घ्या. मंदीचा सामना कराल. प्रवासात वेळ जाईल. मौजमजेवर खर्च करू नका. येणे वसूल होईल. घरातील अडकलेले प्रश्न मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. कामे मार्गी लावताना घाई नको. प्राध्यापकांना यश देणारा काळ. कामात मनावर ताबा ठेवा. संसर्गजन्य आजारापासून दूर राहा. घरासाठी महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळा. मालमत्तेसंदर्भातील चर्चा पुढे ढकला. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. महिलांशी जपून बोला. घरातील ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरातील वातावरण चांगले ठेवा.
मिथुन : नोकरीत कामाचा ताण वाढेल. व्यवसायात आर्थिक बाजू उत्तम राहील. घरात ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. कौटुंबिक सहल घडेल. तरुणांना यश मिळेल. काही कामे अनपेक्षितपणे पुढे जातील. महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. शिक्षणक्षेत्रात चांगला काळ. वाणीवर नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात सबुरी ठेवा. वैद्यकीय क्षेत्रात चांगले दिवस. नव्या ओळखी कामी येतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मनाविरुद्ध घटना घडतील. नातेवाईकांशी वाद होतील. व्यवसायात काळजी घ्या.
कर्क : जुने दुखणे डोके वर काढेल. नोकरीत पगारवाढ, प्रमोशन होईल. तरुणांनी संयमाने काम करावे. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक गणित सांभाळा. गुंतवणुकीतून लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात लौकिक वाढेल. अहंकार टाळा. महिलांनी आरोग्य सांभाळावे. मुलाकडे लक्ष द्या. अनोळखी व्यक्तीबरोबर जपून व्यवहार करा. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ. नोकरीची संधी मिळेल. व्यवसायात अधिक काम पडेल. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल.
सिंह : आर्थिक गोंधळ घडवणार्या घटना टाळा. सरकारी काम पुढे सरकेल. किरकोळ दुखापती घडतील. व्यवसायात तीव्र स्पर्धा अनुभवाल. तरुण मौजमजा करतील. नोकरीनिमित्ताने प्रवास होईल. मित्रांना मनातल्या गोष्टी सांगू नका. नोकरीत अधिक विचार टाळा. संततीच्या वागण्याकडे लक्ष द्या. तरुणांना यश मिळेल. नोकरी मिळेल. आरोग्याकडे लक्ष ठेवा. डोके व पोटाचे विकार होऊ शकतात. उधार-उसनवारी टाळा. वडीलधार्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात सन्मान होईल.
कन्या : घरातील कामात वेळ खर्च होईल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. नोकरीत कौतुक होईल. कामात चुका टाळा. व्यवसायवृद्धीच्या योजना आखाल. भागीदारीत व नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार करताना जपून. कामात आळस जाणवेल. नोकरी-व्यवसायातील फायद्याच्या गोष्टी जगजाहीर करू नका. सल्ला घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. कामात अति आत्मविश्वास नको. संततीकडून चांगली बातमी कळेल. नोकरीत वाहवा होईल. रखडलेले काम मार्गी लागेल.
तूळ : व्यवसायात गणिते चुकतील. नोकरीची संधी मिळेल. उत्पन्न व खर्चाचा मेळ घाला. प्रवासाच्या नियोजनात चूक होऊ शकते. मालमत्तेचे व्यवहार जपून करा. बँकेची कामे पुढे सरकतील. उधार-उसनवारी टाळा. गुंतवणूक करताना काळजी घ्या. सरकारी कामे पूर्ण होतील. मित्रांना आर्थिक मदत करताना विचार करा. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. येणे वसूल होईल. व्यवसायात तणाव वाढेल. नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. विमा, वित्त क्षेत्रात चांगले अनुभव येतील.
वृश्चिक : नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. कामानिमित्त प्रवास कराल. आर्थिक नियोजन कठीण बनेल. नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. अचानक खर्च वाढेल, वेळेचे गणित बिघडेल. सामाजिक कार्यात मान वाढेल. आयटी क्षेत्रात विदेशात जाण्याची संधी मिळेल. इच्छा पूर्ण होतील. मामा-मावशींचे, बंधूवर्गाचे सहकार्य मिळेल. लेखकांचा सन्मान होईल. मार्वेâटिंगमध्ये चांगले दिवस. आपलेच म्हणणे रेटू नका. ज्येष्ठांचा सल्ला माना. कलाकारांना यश मिळेल.
धनु : नोकरीत धावपळ होईल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील. नव्या कल्पना यश देतील. मित्रांशी वाद टाळा. व्यवहाराआधी कागदपत्रे तपासा. नातेवाईकांना सल्ला देऊ नका. तरुणांनी घाईने निर्णय घेणे टाळावे. यश, नोकरी मिळेल. सामाजिक, धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ. नव्या ओळखींमधून कामे मिळतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठ कामावर खूष राहतील, कामचुकारपणा करू नका. मित्रांना मदत करावी लागेल. मौजमजेपासून दूर राहा. व्यवसायाचा विदेशात विस्तार पुढे जाईल. मित्रांशी चेष्टामस्करी नको.
मकर : मुलांचे प्रश्न सोडवा. चारचौघांत जपून बोला. तरुणांच्या मनावरील दडपण कमी होईल. स्पर्धेत, व्यवसायात यश मिळेल. नोकरीत कौतुक होईल. घरात आडमुठेपणा टाळा. नातेवाईकांना मदत करताना कसरत होईल. कामाचा आळस नको. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी मिळेल. कलाकार, अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. कोर्टकचेरीची कामे लांबतील. खेळाडूंकडून चमकदार कामगिरी होईल. पावसाळ्यात काळजी घ्या. चित्रकार, शिल्पकारांना संधी मिळतील. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. संततीकडून चांगली बातमी कळेल.
कुंभ : आर्थिक निर्णयात जाणकारांचा सल्ला घ्या. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. पत्नीची मदत होईल. उधारी मार्गी लागेल. नोकरीत अधिक मेहनत घ्या. घरात सुसंवाद ठेवा. आपणच बरोबर, हे दाखवू नका. सुगंधी द्रव्य बनवणार्यांना लाभ मिळेल. दूरचे प्रवास घडतील. नियम सोडून काम करू नका. भागीदारीत सबुरीने घ्या. मित्रांशी व्यवहार करताना काळजी घ्या. वादविवाद टाळा. सामाजिक क्षेत्रात काळजी घ्या. कलाकार, संगीतकारांना सन्मान मिळवून देणारा काळ. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या.
मीन : नोकरीत विदेशात जाण्याची संधी मिळेल. तरुणांच्या मनावर दडपण वाढेल. व्यक्त होणे टाळा. मुलांना शिक्षणात अपेक्षित यश मिळेल. शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ. वास्तू घेताना थांबा. गुंतवणूक काळजीपूर्वक करा. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीची शक्यता आहे. व्यवसायात अडचणी येतील. आर्थिक बाजू चांगली राहील. मित्रमंडळींशी मतभेद होतील. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. घरातल्यांसोबत देवदर्शनाला जाल. नोकरीत वरिष्ठ खूष राहतील. घरासाठी वेळ द्याल. छोटेखानी कार्यक्रम होईल.