• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

- डॉ. सतीश नाईक, डॉ. उर्मिला कबरे (अपुन अपुन)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 22, 2023
in भाष्य
0

मॉरिशसमध्ये फिरायला आमच्या तिथल्या यजमानांनी छान तयारी केली होती. त्यांनी त्यांच्या ओळखीनं टॅक्सी ठरवली होती. आम्ही देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी राहायला होतो. साहजिक आमच्याकडे असलेल्या दिवसांची नेमकी वाटणी करून चार दिवस चार दिशा कराव्यात, असं ठरवलं होतं. आमच्या या ट्रिपला आता बरीच वर्षं झालीत. त्यामुळं कुठल्या दिवशी कुठली दिशा केली, कुठल्या दिशेला कुठली स्थळं आहेत, हे विस्मरणात गेलंय. त्यामुळं दिशांचा घोळ होऊ शकतो. म्हणून जसं आठवतंय तसं मांडलंय.
मॉरिशस या देशाची राजधानी म्हणजे पोर्ट लुई. शहराला हे नाव अर्थातच फ्रेंच राजाच्या नावावरून पडलंय. शहर आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं, कारण याच शहरात ‘अप्रवासी घाट’ हे पूर्णत: भारतीय वाटणारं नाव असलेली जागा आहे. याच ठिकाणी भारतीय प्रवाशांना घेऊन आलेलं सर्वात पहिलं जहाज लागलं. मॉरिशसच्या सांस्कृतिक इतिहासात या घटनेला नक्कीच महत्व असावं. कारण जागतिक वारसा स्थळ म्हणून या भागाची जपणूक केली जातेय. इथं आलेल्या हिंदुस्थानी मजुरांच्या नशिबी गुलामी नव्हती, कारण ते इथं पोहोचले तोपर्यंत मॉरिशसचा ‘गुलाम कायदा’ संपुष्टात आला होता. मात्र ही मंडळी इथल्या वातावरणात इतकी विरघळून गेली आणि आपल्या अस्तित्वानं त्यांनी इथं इतका फरक केला की इथल्या मार्केटला ‘मार्केट’ न म्हणता ते ‘बाजार’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आम्ही या बाजारात बरीच खरेदी केली. त्यात होजियरी, लेसची तोरणं, सोफ्याच्या मागच्या बाजूला घातली जाणारी कापडं अधिक होती. या बाजारात एक वेगळी वस्तू दिसली. काचेच्या अरुंद तोंडाच्या बाटलीच्या आत चक्क एक बर्‍याच मोठ्या आकाराचं जहाज होतं. या अरुंद तोंडातून ते जहाज कसं काय आत ठेवलं गेलं असेल याचा अचंबा आम्हाला वाटला. असला प्रकार आम्ही प्रथमच पाहत होतो. दिवाणखान्यात नाविन्यपूर्ण शोभेची वस्तू म्हणून ठेवायला ती बरी वाटली. साहजिकच आम्ही ती विकत घेतली. शिवाय तिथला आता पूर्णत: अस्तंगत झालेले ‘डोडो’ पक्षीदेखील वेगवेगळी माध्यमं वापरून बनवलेले होते. आम्ही त्यातलाही एक घेतला.
सांगायला हरकत नाही की या मॉरिशसमध्ये एका नेमून दिलेल्या जागी बाजार भरतो. विक्रीला ठेवायच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळे दिवस ठरवून दिलेले असतात. म्हणजे विशिष्ट वाराला खाण्याच्या वस्तू, दुसर्‍या दिवशी चैनीच्या वस्तू असा प्रकार असतो. तिथं बहुदा व्यापारी आपापली लहान वाहनं घेऊन वस्तू विकायला बसतात. म्हणून या बाजाराला व्हॅन मार्केट म्हटलं जातं. इथल्या खाण्यावरसुद्धा भारतीय छाप आहे. आम्ही ‘गाथो पिमा’ खूप आवडीनं खाल्लं. पिमा म्हणजे मिरची. आणि एकंदर हा प्रकार म्हणजे आपल्याकडचा ‘डाळ वडा’ वाटला. फक्त आपले वडे थोडे चपटे आणि आकाराने मोठे असतात. त्यांचे लहान आणि गोलाकार. चव बरीचशी मिळती जुळती. दुसरा एक पदार्थ म्हणजे ‘धोल पुरी’. आपल्या पुरणपोळीशी साधर्म्य सांगणारी. पण तिखट, चटणीसोबत खायची. तीही मस्त वाटली.
या बाजारातली एक आठवण आजही स्मरणात आहे. तिथं भाजीवाल्यांकडे मोबाईल होते. त्या काळात भारतात नुकतेच मोबाईल आले होते. त्यांचे दर सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळं फक्त पैसेवाले मोबाईल वापरायचे. मॉरिशसमध्ये भाजीवाल्या बायांकडे सुद्धा मोबाईल आहे याचं आश्चर्य वाटणं नवल नव्हतं. आता आपल्याकडची परिस्थिती काही वेगळी नाही. जमान्यातल्या सामान्य माणसाला मोबाईल वापरताना पाहून आश्चर्य वाटायचे दिवस केव्हाच संपलेत. पण तीसेक वर्षांपूर्वी आमची बोटं तोंडात गेली होती हे नक्की.
दुसरा एक अनुभव आम्हाला नवा होता. तिथं कॉन्टिनेन्ट नावाचा मोठा विस्तीर्ण मॉल होता. मॉल म्हणजे जिथं माशांपासून कारच्या टायरपर्यंत सगळं काही मिळतं अशी जागा. तेव्हा आपल्याकडे मॉल संस्कृती रुजली नव्हती. आमच्यासाठी तरी हा प्रकार नवीन होता. आम्ही तिथं भरपूर खरेदी केली. आपल्याकडे तेव्हा उपलब्ध नसलेल्या काही कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या चक्क भारतात घेऊन आलो. तेव्हा भारतात रास्पबेरी, पेअर, अननस अशी कोल्ड्रिंक मिळत नव्हती, ती आम्ही हावरटपणे विकत घेतली आणि इथं आणली. त्यानंतर खूपच कमी दिवसात हे सगळं आपल्याकडे आलं आणि म्हणता म्हणता रुजलं.
तर आपण पोर्ट लुईमध्ये होतो. इथं आम्हाला कॉर्नर हाऊस नावाचं खूप मोठं स्टेशनरीचं दुकान दिसलं होतं. नावासकट ते लक्षात राहिलं कारण दुकानाचा मालक बराच विक्षिप्त होता. ही माहिती आम्हाला आमच्या ड्रायव्हरने पुरवली होती आणि त्या दुकानात जरूर जा, असा आग्रह त्याने धरला होता. आता खरंच गंमत वाटतेय या गोष्टीची. वाईटही वाटतंय की आपण केवळ त्या व्यक्तीचा विक्षिप्तपणा अनुभवायला दुकानातून काहीही घ्यायचं नसताना तिथं गेलो होतो.
पोर्ट लुईमध्ये सर्वात जास्त आवडलं आणि मनात भरलं ते तिथलं बंदर. कोदा वॉटर फ्रंट. मस्त सुंदर आणि स्वच्छ किनारा, अजिबात गर्दीबिर्दी नसलेलं हे ठिकाण मनात भरलं. शिवाय तिथं खाण्यापिण्याची चंगळ होती. जवळपास जगभरचे कितीतरी पदार्थ तिथं मिळत होते. मासे खूपच ताजे फडफडीत होते. आम्ही या पदार्थांवर चांगलाच ताव मारला. तिथंच उभ्या असलेल्या एका बोटीवजा वास्तूमध्ये कॅसिनोदेखील होता. आम्ही पूर्वी कॅसिनो कधीच पाहिला नव्हता म्हणून तिथं गेलो. एकाग्रतेने जुगार खेळण्यात मंडळी रंगली होती. त्यांचं आमच्याकडे जराही लक्ष नव्हतं. पण आम्हीच त्या वातावरणात अस्वस्थ झालो. कोंदट जागी सिगारेटचा धूर होता. त्यानेही कासावीस झालो. हा अनुभव तितकासा रुचला नाही हे मात्र खरं.
जवळच असलेल्या एका गार्डनला आम्ही भेट दिल्याचं चांगलंच आठवतंय. नाव मात्र विसरून गेलोत. तिथं अगदी वेगळ्या प्रकारची झाडं झुडुपं तिथं पाहायला मिळाली. आजही लक्षात असलेली वनस्पती म्हणजे ‘जायंट लिली’. आम्ही मुद्दाम वनस्पती म्हटलंय कारण हे झाड नाही. आपल्या कमळाच्या जातीची वनस्पती आहे. तिची पानं इतकी मोठ्या आकाराची आणि मजबूत असतात की त्यावर एखादं लहान मूल सहजी शांतपणे बसू शकेल. किंबहुना तसं मूल बसलेला फोटो बागेत आवर्जून लावला आहे. आठवतंय की आम्ही जायंट लिलीसोबत त्या गोंडस बाळाच्या फोटोचाच फोटो काढला होता.
याच बागेत आणखी एक पूर्वी कधीही न पाहिलेली गोष्ट होती. प्रचंड मोठ्या आकाराची कासवं. मोठी म्हणजे ज्यांच्या पाठीवर आपण सहज बसू शकू आणि कासव जराही विचलित न होता आपल्याला एखादा फेरफटका मारून आणू शकेल!
आम्हाला आठवतंय त्याप्रमाणे हा सगळा भाग मॉरिशसच्या उत्तरेकडे आहे. (थोडी चूकही होऊ शकते). पण त्या दिवसाचा हा प्रवास आमच्या चांगलाच लक्षात राहिला तो परतीच्या वेळच्या अनुभवामुळं. या देशावर कित्येक वर्षं युरोपियन लोकांचं राज्य होतं. त्यामुळं त्यांनी युरोपियन लोकांचे छंद, त्यांचे खेळ, त्यांच्या आवडीनिवडी आत्मसात केल्या आहेत. आम्ही परतताना एक वेगळीच घटना घडली. अचानक सगळीकडचे रस्ते बंद झाले. रस्त्यावर अनेक तरुण उतरले होते. त्यांनी रस्त्यावर गोंधळ घालायला सुरुवात केली होती. दूरवर आम्हाला जाळपोळ सुरू असलेली दिसत होती. अचानक दंगल झाली होती. कारण होतं फुटबॉल सामन्याचं. कुठला तरी एक संघ हरला होता आणि त्या संघाचे समर्थक रस्त्यावर उतरून गडबड करत होते. त्याला क्रेऑल विरुद्ध इतर असं वळण लागलं होतं. इवल्याशा देशात असं काही घडू शकतं हे समजणं कठीण जात होतं. आमच्या घरी परतायचा रस्ता तर पूर्णत: बंद करायची पाळी आली होती. आम्ही काही काळासाठी थोडे चक्रावलो. आता घरी कसं परतायचं हा प्रश्न होताच. पण गाडी चालवणारा आमचा मित्र चांगलाच धीराचा होता. शिवाय त्याला सगळ्या देशाची उत्तम माहिती होती. मॉरिशसमध्ये साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं तिथं ऊसाची शेतंही बरीच आहेत. त्यानं मोठ्या हिकमतीनं गाडी शेतांमधल्या अरुंद कच्च्या मातकट रस्त्यांवर घुसवली. आम्ही बोटीसारखे हेलकावे खात कसाबसा प्रवास केला. संपूर्ण प्रवासात सगळे विलक्षण घाबरलो होतो. चारीबाजूंच्या ऊसाच्या फडांकडं बारीक लक्ष ठेऊन होतो. जराशी हालचाल दिसली तरी घाबरेघुबरे होत होतो. सुदैवानं रस्त्यात काही घडलं नाही. घराजवळ आल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Previous Post

जन पळभर म्हणतील हाय हाय…

Next Post

दोन नवरे, फजिती ऐका!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

दोन नवरे, फजिती ऐका!

स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.