रशियाने युक्रेनबरोबर जे युद्ध चालवलं आहे, ते काही थांबायचं नाव घेत नाही. तुम्ही अस्सल कोकणी भाषेत पुतीन आणि झेल्येन्स्की यांना काय सल्ला द्याल?
– राजेंद्र भागवत, कोल्हापूर
आवंशीक खाव वरां… कायव झोंबाड चालला रे तुमचा… चिप र्हव… मायझये भांडतत… चिप र्हवा नाय त… पोकल बांबूचे फटके दितंय..
तुम्ही आत्मचरित्र लिहिलेत तर त्याचं नाव काय असेल?
– राजेश शाह, पुणे
मी माझा
तुमच्या आयुष्याचे सार एका गाण्याच्या ओळींमध्ये सांगायचे झाले, तर ते गाणे कोणते असेल?
– विनिता वर्तक, पालघर
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते… मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते.
नाटकाचा तिसरा अंक संपला की तुम्ही काय करता? चौथा अंक रंगवता की…
– अजय सहस्रबुद्धे, नाशिक
चौथा काय?? पाचवा, सहावा पण चालतो. या एकदा सातवा पण करू…
नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्यापैकी एकाची आणि शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्यातील एकीची निवड करायला सांगितले, तर तुम्ही कोणाची निवड कराल? का?
– भावना लोंढे, सातारा
ओम पुरी, शबाना आझमी
मराठीमध्ये अचानक सगळे जण उठून इतिहासाच्या सुपरहीरोचे सिनेमाकरण करणारे भव्यदिव्य ऐतिहासिक व्हीएफएक्सपट बनवू लागले आहेत, ते का?
– अक्षय पाठारे, शिवडी
मागणी तसा पुरवठा
मला अंबानी किंवा अडाणी यांच्या घरात दत्तक जायचे आहे… मी काय करू?
– विनय कारखानीस, रामपूर
आठव्या जन्माची तयारी करा… पुढच्या ७ पिढ्या तर शक्य नाहीयेय.
यंदा पाऊस जोरदार येणार आहे म्हणतात, तुम्ही कशाची पेरणी करणार?
– तारकनाथ सुतार, नवापूर
माझी शेती पावसावर अवलंबून नाही
आलिया आणि रणबीर यांचे अखेर लग्न झाले… उभयतांस तुम्ही काय आशीर्वाद द्याल?
– प्रभा सोनार, कणकवली
किमान ५ वर्ष तरी संसार करा
शिरा पडो मेल्यांच्या तोंडार, असा एक मालवणी वाक्प्रचार आहे… हे लोक रागानेसुद्धा समोरच्याला शिरा खायला घालतात?
– सायमन फालेरो, कल्याण
ते तोंडात असं नाहीयेय, तोंडार, म्हणजे तुमच्या तोंडावर गरम शिरा पडणार, तोंडात नाही.
स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होऊन गेली तरी उन्हाळ्यात विजेची टंचाई, लोडशेडिंग, पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा… हे चित्र बदलणार कधी?
– नयनकुमार सोनवणे, पंढरपूर’
आपण बदलत नाही तोवर बदलणार नाही.
पायाने चालणे आणि डोक्याने चालणे यात फरक काय?
– अशोक परशुराम परब, ठाणे
पायाने चालून आपण अपेक्षित ठिकाणी पोचतो आणि डोक्याने चाललं की आजूबाजूची माणसं पायाने चालायला लागतात. आपल्याला हवी तशी.
माझी आई रोज संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून मराठी मालिका पाहायला बसते. आता तिला सगळीकडे कारस्थानंच दिसायला लागली आहेत. तिला यातून बाहेर कसे काढू?
– रतन मेस्त्री, अक्कलकोट
अक्कलकोटला राहता ना, मग न्या मठात… स्वामी आणतील मार्गावर.
चोरी करणे पाप आहे, देव शिक्षा देईल, असे मानून चोरी न करणारा श्रेष्ठ की चोरी करणे वाईट आहे, म्हणून चोरी न करणारा श्रेष्ठ?
– अक्रम शेख, गोवंडी
नैतिकतेचे धडे लोक गिरवत नाहीत, म्हणून देवाला मध्ये घातला… तर आपण कुणाचंच ऐकत नाही… म्हणजे दैनंदिन व्यवहार मोठा झाला… चांगला का वाईट इथे महत्वाचं नाही उरलं.