केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परवा झालेले नवे अध्यक्ष मनोज सोनी ऊर्फ अपूर्वानंद, शिक्षण : पहिल्याच प्रयत्नात १२ वी नापास! तदनंतर स्वामीनारायण पंथ स्वीकारून अपूर्व प्रगती, तद्वतच निष्काम कर्मयोगी बनले! गुजरातमध्ये यांना ‘छोटे मोदी’ म्हणून ओळखले जाऊ लागले! तदनंतर त्यांनी गोरडा प्रकरणात अत्यंत माणुसकीची भिंत उभारण्यात अग्रेसर होते, असा अहवाल सांगतो.
आश्चर्य म्हणजे अपूर्वानंद यांचे ही पॉलिटिकल सायन्स याच विषयात डॉक्टरेट झालेली आहे! सर्वात कमी वयात हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरू ही प्रशंसा मिळविली आहे! वरीलप्रमाणे त्यांनी आता भारतातील सर्वोच्च नोकरी करिता असणार्या आयोगाचे ते चेअरमन बनले (बनविले?) गेले आहेत!
सन्यस्थ असणारे मनोज सोनी हे अपूर्वानंद बनले होते ते पुनश्च मनोज सोनी बनले, बे सनातनी भारतातील हे पाहिले वहिले आणि एकमेव उदाहरण आहे व ते आचंद्रसूर्य नांदेल! बदललेल्या देशाची व्याख्या यापेक्षा काय वेगळी असू शकते! भावांनो, हे आहे हिमनगाचे टोक, तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आता खरी संघर्षाची सुरुवात आहे! अभ्यास करावा तर जिल्हाधिकारी होईल आणि भक्त बनलो तर हजारो जिल्हाधिकारी तयार करील! जसे की माननीय सोनी साहेबांच्या क्ष्नयी-तालीममध्ये तयार होतील!
सरांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा…
ताजा कलम : आदरणीय मनोज सोनी तथा स्वामी अपूर्वानंद यांचा भाजपा आणि आरएसएस यांच्यात असलेला अखंड जिवाभावाचा संबंध हा निव्वळ योगायोग समजावा!