ग्रहस्थिती : गुरू, हर्षल मेष राशीत, बुध, राहू नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ, प्लूटो, मकर राशीमध्ये, रवि, शुक्र, शनि, कुंभ राशीमध्ये, केतू कन्या राशीमध्ये. विशेष दिवस : २४ मार्च होळी, २५ मार्च धुलिवंदन, २७ मार्च तुकाराम बीज, २८ मार्च संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी.
मेष : आर्थिक बाजू बेताची राहील. तरुणांच्या मनासारखी कामे पूर्ण होतील. मौजमजेवर खर्च होईल. सरकारी कामे रेंगाळतील. अचानक धनलाभ होईल. महत्वाचे निर्णय घेणे टाळा. कलाकार, खेळाडू, लेखक, संगीतसर्जकांसाठी चांगला काळ. शुभघटना कानी पडेल. नोकरीत वरिष्ठांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात कामाचा व्याप वाढून प्रकृतीवर ताण येईल. पती-पत्नीत किरकोळ कुरबूर होईल. उच्च शिक्षण घेणार्यांच्या बाबतीत चांगली बातमी कानावर पडेल.
वृषभ : नोकरीत काळजी घ्या. व्यवसायात काम पूर्ण करण्यासाठी अधिकचे श्रम घ्या. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी येईल. वेळापत्रक विस्कळीत होऊन आरोग्यावर परिणाम होईल. काळजी घ्या. विवाहेच्छुकांना मनासारखे स्थळ चालून येईल. सामाजिक कार्यात वेळ देताना भान ठेवा. अचानक आर्थिक लाभ होईल. अचानक खर्च वाढेल, चिडचिड होईल. वेळेचे व्यवस्थापन करा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या.
मिथुन : कुटुंबात तणाव निर्माण होतील. आर्थिक बाजू सांभाळताना कसरत करावी लागेल. नियोजन करा. तरुणांना मोठे यश मिळेल. नोकरी मिळेल. व्यवसायात उत्साह वाढेल. नव्या ऑर्डर मिळून आर्थिक बाजू भक्कम होईल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग. रखडलेले येणे वसूल होईल. उधारउसनवारी देणे टाळा. भावांबरोबर किरकोळ वाद होतील. खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. कुटुंबात वातावरण उत्तम राहील. ध्यानधारणेमधून समाधान मिळेल.
कर्क : छोटे काम पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट पडतील, मनस्वास्थ्य बिघडेल. व्यवसायात चूक महागात पडेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. ध्यानधारणेत मन रमवा. मामा-मावशीकडून लाभ होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात बुद्धिकौशल्याने काम मिळवा. नव्या संकल्पना राबवताना थोडे थांबा आणि नंतरच पुढे जा.
सिंह : रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागेल. भागीदारीत कुरबुरी होतील. महत्वाचे काम पुढे ढकलावे लागल्याने चिडचिड होईल. स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. महिलांशी जपून बोला. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत पैशाचे व्यवहार काळजीपूवर्क करा. घाई-गडबडीत मोठी चूक होईल. नोकरीत प्रमोशन, व्यवसायात वृद्धी होईल. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाल. संगीत, कला, चित्रकला या क्षेत्रांत उत्तम काळ. अतिउत्साह टाळा. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल.
कन्या : मुलांकडून त्रासदायक स्थिती निर्माण होऊ शकते, काळजी घ्या. कोर्ट कचेरीची कागदपत्रे हाताळताना काळजी घ्या. घरातल्या मंडळींकडे लक्ष द्या. भाऊ-बहीण यांच्या प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. काहीजणांना नव्या नोकरीच्या संधी येतील. प्रमोशन, पगारवाढीबरोबरच विदेशवारीची संधी मिळू शकते. मेडिकल, कृषी क्षेत्रात उत्तम काळ. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या.
तूळ : नोकरीत त्रास, मानसिक ताण वाढेल. मित्रांशी जेवढ्यास तेवढे वागा, वाद टाळा. तरुणांना लाभदायक काळ. व्यवसायात घवघवीत यश मिळेल. नव्या ओळखींमधून लाभ होतील. शुभघटनांचा अनुभव येईल. सरकारी कामांत नियमाचे पालन करा. प्रवासात विशेष काळजी घ्या. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. नात्यात कडवटपणा टाळा. महिलांना धनलाभ होईल.
वृश्चिक : आर्थिक अडचणी दूर होतील. कामे फटाफट पूर्ण होतील. सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नातेवाईकांशी वाद होतील. वास्तू, वाहन खरेदीत काळजी घ्या. व्यावसायिक भागीदारीत कटकटी होतील. थकीत येणे वसूल होईल. खर्च काळजीपूर्वक करा. मौजमजेवर खर्च टाळा. घरात ज्येष्ठांना पोटाचे विकार सतावू शकतात. संशोधन क्षेत्रात चांगले यश मिळेल. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत शब्दाने शब्द वाढवू नका. संततीकडून चांगली बातमी कळेल. जमीन खरेदी-विक्री करणार्यांना अचानक लॉटरी लागेल.
धनु : आठवड्याची सुरुवात कंटाळवाणी होईल. मौजमजेकडे कल राहिल्याने आर्थिक गणित विस्कळीत होईल. तरुणांना विदेशात शिक्षणाच्या संधी चालून आल्यामुळे उत्साह वाढेल. पण अतिउत्साहात चुकीचा निर्णय घेऊ नका. व्यवसायात धनवर्षा अनुभवाल. नवीन ओळखींमधून मोठे काम मार्गी लागेल. घरगुती समारंभात नातेवाईक, मित्रमंडळींची भेट होईल. अचानक नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. लॉटरी, सट्टा, शेअरमध्ये गुंतवणूक टाळा. विज्ञान क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल.
मकर : व्यावसायिक उलाढाल वाढून नवीन संधी चालून येतील. उतावळेपणा नको. अति आत्मविश्वास घातक ठरेल. सरकारी कामे लांबणीवर पडल्याने मनस्वास्थ्य बिघडेल. घरात ज्येष्ठांच्या औषधोपचारावर पैसे खर्च होतील. महिलांशी जपून वागा. आध्यााfत्मक ठिकाणांना भेटी द्याल. नोकरीत आपलेच म्हणणे बरोबर असा हट्ट नको. व्यवसायात जपूनच पावले टाका. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको. उधार-उसनवारी टाळा.
कुंभ : आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. संमिश्र घटनांचा अनुभव येईल. तरुणांना मनासारखे यश मिळेल. नोकरीत झटून काम करा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. व्यावसायिकांची आर्थिक बाजू भक्कम होईल. कापणे, भाजणे अशा प्रकारचे अपघात घडू शकतात. सावध राहा. आर्थिक बाजू पाहूनच खर्च करा. अति उत्साह नको. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. अन्यथा पोटाचे आजार होतील. कोणाच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका.
मीन : काम मार्गी लावण्यासाठी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. विदेशात कामाची संधी मिळेल, मात्र घाईने निर्णय करू नका. पर्यावरण क्षेत्रात चांगला अनुभव येईल. लेखक, पत्रकार, संगीत सर्जकांना उत्तम काळ राहील. शुभ घटनांचा अनुभव येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. कोणत्या न कोणत्या कारणामुळे घरात मोठा खर्च होईल. बँकेत कर्ज मिळवण्यासाठी हालचाल करत असाल तर ते काम रेंगाळू शकते. दांपत्यजीवनात आनंद लाभेल. घरात ज्येष्ठांच्या मताचा आदर करा.