• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मोबाइल हॅक होतो तेव्हा…

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 22, 2024
in पंचनामा
0

सायबर विश्वात वावरताना खूप काळजी घेणे आवश्यक असते, इथे सोशल मीडियावर असणारी खाती हॅक करण्याचे प्रकार सहजपणे घडत असतात. सोशल मीडिया खात्याच्या बरोबरीनेच काही वेळेला मोबाइल हॅक करण्याचे प्रकार देखील घडतात, हा देखील सायबर गुन्ह्याचा एक प्रकार म्हणता येईल. मोबाईल हॅक करण्याचा प्रकार होतो कसा, हे आपण या कथास्वरूप उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
सुरेश आणि रेश्मा हे दोघे पतीपत्नी. एकेकाळी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्या दोघांनी आयटीमध्येच पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि दोघांनी आयटीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हे दोघेजण एकाच कंपनीमध्ये वेगवेगळ्या विभागांत काम करत होते. सुरेश हा सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये निष्णात होता. त्यामुळे कंपनीने त्याला अमेरिकेला पाठवण्याचे निश्चित केले होते. अमेरिकेत जाऊन काम करण्याची संधी मिळणार म्हणून सुरेशने त्याची तयारी देखील सुरू केली होती. पण एके दिवशी अचानक कंपनीने सुरेशला अमेरिकेऐवजी बेंगळुरूमध्ये प्रमोशन देऊन पाठवण्यात येणार असल्याचे त्याला सांगितले. सुरुवातीला निराश झालेल्या सुरेशने आपल्याला प्रमोशन मिळत आहे, त्यामुळे पुढे करियरच्या दृष्टीने आपल्याला फायदाच होईल, असा विचार करून ती संधी घेतली. दरम्यान, रेश्मा पुण्यातच कार्यरत होती. सुरेशचा कार्यालयातला वावर, त्याची महिला सहकार्‍यांशी असणारी मैत्री, त्यामध्येच आता सुरेश बंगळुरूमध्ये जाणार असल्याने रेश्माच्या मनात त्याच्याबद्दल अचानक संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरेशला अनेक मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम रेश्माकडून सतत सुरू असायचे. सुरेशच्या वागण्या-बोलण्यात काही फरक पडत नाही ना, याकडे रेश्मा कायम लक्ष ठेवून असायची.
तिचा संशय बळावणार्‍या घटना घडत गेल्या. सुरेश जसा बेंगळुरूला गेला तसा त्याच्या वागण्यात काही प्रमाणात फरक पडल्याचे रेश्माला जाणवत होते. त्यामुळे रेश्माची बेचैनी वाढू लागली होती. याबद्दल तिने ऑफिसमध्ये काम करणार्‍या अयुबकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, अयुबने त्याच संधीचा फायदा घेत रेश्माला, मी तुला सुरेश दररोज कोणाशी बोलतो, किती वेळ बोलतो, याची माहिती मिळवून देतो, असे सांगितले. फक्त या कामासाठी तुला दर महिन्याला ३० हजार रुपये द्यावे लागतील. तुला या महिन्याचा रिपोर्ट हवा असेल तर तू मला पैसे दिलेस तर मी तो तुला देऊ शकतो. फक्त यासाठी मला सुरेशच्या मोबाइलचा ग्सग् नंबरची आवश्यकता आहे, असे अयुबने रेश्माला सांगितले. त्यानंतर रेश्माने घरी असलेल्या मोबाईलच्या बॉक्सवरून तो नंबर अयुबला दिला. सुरेशचा मोबाइल नंबर अयुबला माहित होता. रेश्माने अयुबला तू काम सुरू कर, मी तुला सुरुवातीला २० हजार रुपये देते, असे सांगितले. रेश्माने दुसर्‍या दिवशी अयुबला २० हजार रुपये दिले. तुला दोन दिवसात सुरेशच्या फोनचा रिपोर्ट देतो, असे त्याने तिला सांगितले. दोन दिवसांनी तो चालढकल करू लागला. पुढल्या आठवड्यात रिपोर्ट देतो, पुढल्या महिन्यात तुला अहवाल देतो, असे सांगत तो रेश्माची दिशाभूल करत होता. त्यामुळे रेश्माला यात आपली फसवणूक होत आहे असे वाटल्यामुळे तिने या प्रकाराची माहिती सायबर सुरक्षेमध्ये काम करणार्‍या आपल्या भावाला दिली. हा सगळा प्रकार फसवणूक करणारा आहे, असे सांगत त्याने सायबर सेलमध्ये काम करणार्‍या एका मित्राला सगळा घटनाक्रम सांगितला.
रेश्माने या कामासाठी अयुबला जे पैसे दिले होते, ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे, पण नेमका हा प्रकार काय आहे, याचा शोध घेण्यासाठी थोडे दिवस थांबण्याचा सल्ला त्यांनी रेश्माला दिला होता. अयुबकडून रिपोर्ट मिळतो का, याची वाट पाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यान, या गोष्टीला दीड महिना होऊन गेला तरी देखील अयुबकडून रेश्माला रिपोर्ट मिळाला नव्हता. तू रिपोर्ट कधी देणार आहेस, देणार नसशील तर माझे पैसे परत दे, असा तगादा रेश्माने अयुबकडे लावला होता.
एके दिवशी अयुबने रेश्माला ऑफिसबाहेर असणार्‍या पार्किंगमध्ये बोलावले. सुरेशच्या मोबाइल नंबरचे डिटेल्स, वॉटसप चॅट याची प्रिंट आऊट रेश्माला दिली. आपल्याला दिलेली माहिती ही सुरेशचीच आहे ना, याची रेश्माने खात्री केली. त्यात तिला संशयास्पद असे काहीच सापडले नाही. आपल्याला मिळालेली माहिती रेश्माने सायबर सुरक्षेमध्ये काम करणार्‍या त्या व्यक्तीमार्फत सायबर पोलिसांपर्यंत पोहोचवली. तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला होता, म्हणून पोलिसांनी त्याची खात्री करण्याचे ठरवले. रेश्माच्या म्हणण्यानुसार सुरेशचे कॉल डिटेल्स, व्हॉट्सअप चॅट हे खरे होते. त्याचे कारण म्हणजे त्यामध्ये तिचे स्वतःचे व्हॉटस्अप दिसत होते. ही बाब उघड होऊ नये. आपणच आपल्या नवर्‍याचा मोबाइल हॅक करण्याचे काम केले आहे, हे कोणाला समजू नये अशी रेश्माची इच्छा होती.
पोलिसांनी या सगळ्या प्रकाराची गोपनीय पद्धतीने तपासणी करण्याचे ठरवले. सायबर पोलिसांनी अयुबचा पत्ता शोधून त्याच्या घराजवळ राहणार्‍या एका टेलरच्या मुलीला बनावट ग्राहक म्हणून त्याच्याकडे मदत मागण्यासाठी पाठवले. अयुबची भेट घेऊन तिने मला माझ्या पतीच्या फोनची सगळी माहिती काढायची आहे, त्यासाठी मी पैसे देण्यास तयार आहे, तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील, अशी विचारणा तिने अयुबकडे केली. तेव्हा या सगळ्या कामासाठी तुम्हाला ३० हजार रुपये द्यावे लागतील, तुमची तयारी आहे का, अशी विचारणा त्याने त्या मुलीकडे केली. तेव्हा त्या मुलीसोबत असणार्‍या साध्या वेशातील पोलिसांनी अयुबला पकडले आणि तू हे कशा प्रकारे करतोस, अशी विचारणा त्याच्याकडे केली. तेव्हा सुरुवातीला आढेवेढे घेणार्‍या अयुबने हे काम वेबसाइटच्या माध्यमातून करण्यात येते असे सांगत त्याची माहिती पोलिसाना दिली. इथे कोणती माहिती द्यायची, हे सांगतानाच या साईट विदेशातून चालवण्यात येत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सुरुवातीला आपण गंमत म्हणून स्वत:च्या मोबाइलच्या बाबत हा प्रकार करून पहिला होता, ती खरी निघाली. त्यामुळे हे करण्याचे डोक्यात आल्याचे त्याने सांगितले. आपण जे करत आहोत ते चुकीचे आणि बेकायदा आहे याची आपल्याला कल्पना नव्हती असे त्याने पोलिसांना सांगितले. भारतात असे कृत्य करणे हे कायद्याने गुन्हा ठरत असल्याने त्यावर कडक कारवाई करण्यात आली.
विदेशातील कंपन्याच्या माध्यमातून हे करण्यात येत होते, त्यासाठी त्या मोबाइलवर एक फसवा एसएमएस पाठवण्यात येत असे त्याला एक लिंक जोडलेली असे. युझरने ती ओपन केल्यावर त्याच्या नकळतपणे त्याच्या हॅण्डसेटमध्ये एक अ‍ॅप इन्स्टॉल करण्यात येत असे. त्याच्या आधारे माहिती चोरण्याचा उद्योग करण्यात येत असे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये शोध घेण्याचे काम करून सरकारच्या सहकार्याने विदेशातून चालवण्यात येणार्‍या या वेबसाइटवर बंदी घातली. अयुबने केलेल्या या प्रकाराबद्दल त्याला शिक्षा झाली.

हे लक्षात ठेवा

– स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या हातात असतो, त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे मोबाइल वापरणार्‍या मंडळींना आपल्याला अनोळखी नंबरवरून एसएमएस किंवा लिंक आली, तर कृपया ती उघडू नका.
– कोणतेही संशयास्पद, बेकायदा अ‍ॅप डाऊनलोड किंवा ते आपल्या मोबाइलवर इन्स्टॉल करू नका. तसे केले तर आपल्या मोबाइलचा अ‍ॅक्सेस हा दुसर्‍या व्यक्तीकडे जाऊ शकतो.
– दुसर्‍याच्या मोबाइलमधील डेटा हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळवणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे, त्यामध्ये तीन वर्ष शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अनोळखी एसएमएस, लिंक यापासून दोन हात दूरच राहिले तर अशा प्रकारांत तुमची फसगत होणार नाही.

Previous Post

कच्चा लिंबू ते चॅम्पियन!

Next Post

अनासक्तीची पाऊले, सांगती कमळफुले…

Next Post

अनासक्तीची पाऊले, सांगती कमळफुले...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.