ग्रहस्थिती : रवि-बुध-गुरु-शुक्र-हर्षल वृषभ राशीमध्ये, मंगळ मेष राशीत, शनि कुंभ राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू-नेपच्युन मीन राशीत, केतु कन्या राशीत. विशेष दिवस : २५ जून रोजी अंगारकी, संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री १० वाजून २३ मिनिटे, २८ जून रोजी कालाष्टमी आणि श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू.
– – –
मेष : नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होतील. कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे उगाचच अरे ला कारे करू नका. मन:स्वास्थ्य बिघडेल. व्यवसायात अधिक काळजीपूर्वक काम करा. व्यवसायवृद्धीत तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. थकीत येणे वसूल होईल. पण पैसे कसेही खर्च करू नका. युवकांनी निर्णय घेताना घाई करू नये. संततीकडे लक्ष ठेवा. काहींना अचानक धनलाभ होईल. आर्थिक नियोजन बिघडून देऊ नका. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. लेखक, पत्रकारांसाठी चांगला काळ.
वृषभ : युवा वर्गासाठी उत्कर्षकारक काळ. नोकरी शोधणार्यांना मनासारखी संधी चालून येईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. घरात आनंदवार्ता कानी पडेल, छोटा समारंभ होईल. जुने मित्र, पाहुणे भेटतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मनस्थिती उत्तम ठेवा. ध्यानधारणा, योगासाठी वेळ राखून ठेवा. मालमत्तेचे प्रश्न तूर्तात पुढे ढकला. मौजमजेवर पैसे खर्च होतील. कल्पकतेमधून नवीन कल्पना आकार घेतील. नियोजन करून त्या पुढे न्या.
मिथुन : नोकरीच्या ठिकाणी बोलण्यामधून गैरसमज होऊ देऊ नका. नातेवाईकांकडून मदत मिळणार नाही. नव्या ओळखींतून कामे मार्गी लागतील. व्यवसाय विस्तारात काळजी घ्या. नाहीतर आर्थिक नुकसान होईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारींनी डोके वर काढल्याने खर्च वाढेल. आर्थिक बाजू चांगली ठेवा. नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करा. अन्यथा नुकसान होईल. युवावर्गाला सकारात्मकता वाढवणारा काळ अनुभवता येणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा.
कर्क : नोकरीत कामाचा ताण वाढेल. अधिकच्या कामाचा आरोग्यावर परिणाम होईल. वेळेचे नियोजन करा. व्यवसायात दगदग वाढेल. कामाचे नियोजन बिघडेल. शेतकरीवर्गासाठी चांगला काळ. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मित्रमंडळींशी वागताना काळजी घ्या. चेष्टामस्करीतून वाद टाळा. संततीकडून चांगली बातमी कानी पडेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. ज्येष्ठांचा सल्ला माना. अनेक दिवसांपासूनची मनातली इच्छा पूर्ण होईल. उतावळेपणा करू नका, त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
सिंह : व्यवसायात चांगला काळ अनुभवाल. मनासारख्या गोष्टी घडतील. शेअर बाजारातून अपेक्षित लाभ मिळेल, पण त्याच्या फार आहारी जाऊ नका. धार्मिक ठिकाणी जाल. दानधर्म होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळवून देणारा काळ. आपल्या कार्याचा सन्मान होईल, कामाचा हुरूप वाढेल. सरकारी कामे रेंगाळल्याने चिडचिड होईल. कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी सल्ला घ्या. आर्थिक बाजू चांगली राहणार असली तरी वायफळ खर्च टाळा. मानसिक समाधान वाढेल. बंधू वर्गाकडून चांगली मदत मिळेल, किरकोळ कारणामुळे नाराज होऊ नका. आध्यात्मिक गोष्टींमध्ये वेळ खर्च होणार आहे.
कन्या : सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी आटापिटा करावा लागल्याने चिडचिड होईल. नोकरीत उत्साह वाढवणार्या घटना घडतील. व्यवसायात घवघवीत यश देणारा काळ राहील. काही जणांना प्रवास करावा लागेल. त्यात काळजी घ्या. मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी घटना घडू शकते. सार्वजनिक जीवनात उगाच भांडणे करू नका. एखादे प्रकरण अंगलट येऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी डोकेदुखी वाढवतील. डॉक्टरी सल्ला घ्या. घरात बेचैनी वाढवणारी एखादी घटना घडू शकते. मार्केटिंग क्षेत्रात चांगला काळ. नवीन व्यवसायामधून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात.
तूळ : सामाजिक कार्यात सहभाग वाढल्याने मानसिक समाधान मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंबात मतभेद टाळा. बंधू-भगिनीशी वाद होतील. व्यवसायवृद्धीच्या योजना यशस्वी होतील. नोकरीत नमते घ्या. सार्वजनिक जीवनात आपलेच म्हणणे रेटू नका. वाद टाळा. अचानक लाभ मिळेल. व्यवसायात हिशेब करताना काळजी घ्या. संततीकडून चांगली बातमी कळेल. आरोग्याचा तक्रारी डोके वर काढतील. व्यायाम करा. नोकरीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बोलताना काळजी घ्या.
वृश्चिक : नोकरीत द्विधा मनस्थिती निर्माण होईल. सल्ला मसलतीने प्रश्न मार्गी लावा. संततीला शिक्षणक्षेत्रात, स्पर्धात्मक यश मिळेल. कुटुंब, व्यवसायातील परिस्थितीचा स्वीकार करून पुढे पाऊल टाका. किरकोळ वादाकडे लक्ष देऊ नका. सामाजिक कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळेल. खांद्यावर वेगळी जबाबदारी पडल्याने कामातला उत्साह वाढेल. व्यवसायात एखादी तक्रार डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. जनसंपर्क, पत्रकारिता, लेखन या क्षेत्रात नव्या संधी मिळतील. विदेशात व्यवसाय विस्ताराची चर्चा सरकेल. उच्च रक्तदाब असणार्यांनी काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा.
धनु : घरासाठी खूप वेळ खर्च होईल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी पडेल. व्यवसायात प्राप्ती वाढल्याने सकारात्मकता आणि आत्मविश्वासात वाढ होईल. शुभघटनांचा अनुभव येईल. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला घ्या. अति फायद्याच्या प्रलोभनांपासून दूर राहा. बँकांची कामे मार्गी लागतील. क्रीडापटूंना यश मिळेल. भागीदारीत किरकोळ वाद घडतील. सरकारी काम पूर्ण होईल. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंचा सन्मान होईल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाचे विकार होतील. अचानक धनलाभ होईल. मित्रांशी बोलताना काळजी घ्या. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. भागीदारीत नमते घ्या.
मकर : मित्रमंडळींच्या साथीमुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-निमित्ताने प्रवास होतील. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. मन विचलित करणार्या घटना घडल्या तरी शांत राहा. व्यवसायात ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केल्याचा आरोग्यावर परिणाम होईल. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी येईल, भविष्यात त्याचा फायदा होईल. मध्यस्थी, सल्ला देणे टाळा. पैशांचे नियोजन करा. आश्वासने देणे टाळा. आत्मविश्वास कायम ठेवा. निर्णय घेताना घाई नको. भानगडीच्या प्रश्नात पडू नका, डोकेदुखी वाढू शकते.
कुंभ : घरात वागताना बोलताना काळजी घ्या, वादाचे विषय टाळा. नोकरीत मनाविरुद्ध घडणार्या घटनांना शांतपणे सामोरे जा. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. सोशल मीडियाचा जपून वापर करा. सकारात्मक विचार करा. व्यवसायात अति आत्मविश्वासातून नुकसान होऊ शकते. चित्रकार, कलाकारांसाठी काळ यशदायी आहे. सन्मान होऊ शकतात. घरातील जेष्ठांशी वाद होईल. थकीत येणे वसूल झाल्याने आर्थिक बाजू बळकट होईल. युवा वर्गाला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. घाई टाळा.
मीन : व्यवहारात काळजी घ्या. व्यवसायात महत्वाचा निर्णय घेणे टाळा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवी गुंतवणूक फायदा मिळवून देईल. घरासाठी वेळ द्याल. नातेवाईक, मित्रमंडळींची गाठभेट होईल. उधार-उसनवारी टाळा. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. राग आवरा. नोकरीत कमी बोला आणि काम करा. युवा वर्गाला नव्या क्षेत्रात संधी मिळतील. नवीन वास्तू घेण्याच्या विचाराला गती मिळेल. व्यवसायात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. कसोटीच्या काळात बुद्धीकौशल्याचा फायदा होईल. व्यवसायात मतभेद टाळा.