• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

या थडग्याखाली दडलंय काय?

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
March 20, 2025
in मर्मभेद
0

गेल्या आठवड्यात काही बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील…
औरंगजेबाची कबर उखडून टाकू असा इशारा काही संघटनांनी दिला आहे. त्यातल्या एका संघटनेने औरंगजेबाचं चित्र म्हणून भारताचा शेवटचा मुघल बादशहा बहादूरशाह जफर याचं चित्र जाळलं… ज्याच्या नेतृत्त्वाखाली भारतातलं १८५७चं स्वातंत्र्यसमर लढलं गेलं, तो हा बादशहा आणि त्याच्या म्यानमारमधील मजारीसमोर कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक झाले आहेत.
आता दुसरी बातमी.
(कठोर दारुबंदी असलेल्या आणि साक्षात रामराज्यच जिथे अवतरले आहे अशा) गुजरातेत एका तरुणाने दारूच्या नशेत चारजणांना उडवलं आणि त्याची गाडी थांबवली गेली, जमावाने त्याला घेरलं तेव्हा तो ‘ओम नम: शिवाय’च्या घोषणा देत होता… आपण सश्रद्ध हिंदू आहोत म्हटल्यावर जमाव हिंसक होणार नाही, आपल्याला मारहाण होणार नाही, याची त्याला खात्री होती… कदाचित पुढे जाऊन शिक्षेतही माफी मिळेल असा त्याचा तर्क नसेलच असे सांगता येत नाही…
तिसरी बातमी.
भारत सरकारची शिक्षणावरची तरतूद आहे एक लाख २८,६४९ कोटी रु. (कुंभमेळा, तीर्थक्षेत्र विकासासाठी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील हिमालयात बनवले जाणारे मार्ग, स्मारकं, पुतळे यांच्यावरची तरतूद स्वतंत्रपणे मोजून पाहायला हरकत नाही…) तामीळनाडू सरकारचा शिक्षणावरचा खर्च असणार आहे ५५ हजार २६१ कोटी रु. म्हणजे देशाच्या शैक्षणिक बजेटच्या निम्मं बजेट आहे शिक्षणाचं, एका राज्याचं. देशाच्या अर्थसंकल्पातली तरतूद जेमतेम अडीच टक्का आहे आणि तामीळनाडूची तरतूद तब्बल २१ टक्क्यांहून अधिक आहे…
चौथी बातमी
ही पण तामीळनाडूचीच बातमी आहे. एका दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतिसाठी नाव नोंदवलेली महिला प्रसूतिसाठी केंद्रात पोहोचलीच नाही, तेव्हा तिथल्या यंत्रणेने शोध घेऊन त्या महिलेला केंद्रात आणले आणि तिची सुखरूप प्रसूती होईल याची काळजी घेतली… तिथे सगळ्या महिलांची अशी नोंदणी असते आणि असा फॉलोअप असतो…
या बातम्या प्रातिनिधिक आहेत… पण, देशात, खासकरून उत्तर भारतात आणि त्या गोपट्ट्याचाच एक भाग बनू लागलेल्या महाराष्ट्रात काय सुरू आहे, दक्षिणेत काय सुरू आहे, हे त्या दाखवून देतात. एखाद्या सरकारचे प्राधान्यक्रम काय असले पाहिजेत, एखाद्या राज्याने आपला विकास कसा करून घेतला पाहिजे आणि आपली अस्मिता कशा प्रकारे जपली पाहिजे, याचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यासमोर कधीकाळी देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र खुज्या नेत्यांनी किती रसातळाला नेला आहे, याचं रोज घडणारं दर्शन विषण्ण करणारं आहे.
औरंगजेबासारखा शक्तिशाली सम्राट या महाराष्ट्रभूमीने नमवला. त्याला इथे झुंजवला आणि इथे देह ठेवायला भाग पाडलं. त्याची कबर हे काही त्याच्या पराक्रमाचं स्मारक नाही, ते छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचं, शंभूराजांच्या बलिदानाचं आणि त्यांच्यापश्चात मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक आहे. त्या औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात कशाला पाहिजे, असा प्रश्न गद्दारांच्या शहेनशहाला पडावा? तुम्हाला इतिहास समजण्यासाठी कोणीतरी कादंबर्‍या लिहायला लागतात. त्यांच्यावर कोणीतरी भरपूर स्वातंत्र्य घेतलेले सिनेमे काढावे लागतात. असे सोयीचा इतिहास सांगणारे सोयीचे सिनेमे पाहून तुम्हाला सोयीच्या उचक्या लागतात? काही शतकांपूर्वी मरण पावलेला औरंगजेब त्या थडग्यात इतकी वर्षं होताच की. तेव्हा नाही आठवलं? बरं आता तुम्ही ते थडगं उकरून नेस्तनाबूत केलंत तरी औरंगजेब काही परत मरणार नाही आणि त्याची इतिहासातली ओळखही पुसली जाणार नाही. एकेकाळी औरंगजेबालाही नमवणारा आणि दमवणारा, पाठकणा ताठ असलेला महाराष्ट्र अस्तित्त्वात होता, याची खूण मात्र कायमची पुसली गेलेली असेल. दिल्लीश्वरांपुढे लोटांगणं घालून सत्तेत टिकून राहिलेल्यांना कदाचित तेच साध्य करायचं असेल. तोच आदेश असेल.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने औरंगजेबाचं नाव असलेल्या औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं; उत्तर प्रदेशात अलाहाबादचं प्रयागराज झालं- पण, या थडगी उकरणार्‍या गँगचे परात्पर पिता आणि सर्वात मोठे आका जिथून येतात त्या गुजरातमधल्या अहमदाबादचं कर्णावती काही झालेलं नाही. ते का? त्यांना याचा जाब विचारणारा एक तरी भोंदुत्ववादी कुणी कधी पाहिला आहे का?
इतकी वर्षं होळीला पोळी आणि धुळवडीला नळी खाणार्‍या आणि ती कोणत्या पद्धतीने मिळाली आहे याची उठाठेव न करणार्‍यांच्या राज्यात उगाचच हलाल विरुद्ध मल्हार असे अस्तित्त्वात नसलेले वाद निर्माण करणारे मंत्री आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमानच नव्हता, असा दावा ते करू लागले आहेत. बालवाडी आणि प्राथमिक शाळेतलं शिक्षण न करताच हे परदेशात शिकायला गेले होते का?
मुळात देशासमोरचे आणि राज्यासमोरचे हे प्रश्न आहेत का? राज्यात ठिकठिकाणी गुंडाराज बोकाळलेलं आहे. तरुण मुलांमध्ये हिंसेचं विकृत आकर्षण निर्माण झालेलं आहे. छोट्या छोट्या टोळ्या बनवून एकेकट्याला गाठून जीव घेण्याचे प्रकार सुरू आहेत. मतं विकत घेण्यासाठीच्या योजनांनी राज्याला खंक करून टाकलेलं आहे. दिल्लीपतींच्या लाडक्या उद्योगपतीच्या घशात अख्खी मुंबई भरवण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. राहणीमानाच्या एकाही निर्देशांकात आपली समाधानकारक स्थिती नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वत्त्वाचा मुडदा पाडून त्याला दिल्लीचा मांडलिक करून घेण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे…
…म्हणजे जे साक्षात औरंगजेबाला जमलं नव्हतं, ते आजचे दिल्लीश्वर सहजतेने करत आहेत…
…चहूबाजूंनी नाडला जात असतानाही चैतन्यहीन कलेवरासारखा लोळागोळा झालेला महाराष्ट्र निष्क्रीयतेच्या थडग्यातच पडून राहावा यासाठी औरंगजेबाचे थडगे उकरण्याचा सगळा खटाटोप आहे.

Previous Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

लोकमान्यांचा मुलगा, प्रबोधनकारांचा मित्र

Related Posts

मर्मभेद

‘लष्कर-ए-होयबा’ आवरा!

May 15, 2025
मर्मभेद

धर्म नव्हे, जात विचारणार!

May 8, 2025
मर्मभेद

धडा शिकवा आणि शिकाही!

May 5, 2025
मर्मभेद

जागो मराठी माणूस, जागो!

April 25, 2025
Next Post

लोकमान्यांचा मुलगा, प्रबोधनकारांचा मित्र

वारकरी होण्याची कसोटी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.