ग्रहस्थिती : हर्षल मेषेत, गुरु वृषभेत, राहू, नेपच्युन मीनेत, मंगळ मिथुनेत, रवी, शनि, कुंभ राशीत, केतू कन्या राशीत, बुध, शुक्र, राहू, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : २२ मार्च कालाष्टमी, २५ मार्च पापमोचनी स्मार्त एकादशी, २६ मार्च भागवत एकादशी, २७ मार्च प्रदोष, २८ मार्च अमावस्या आरंभ रात्री ७.५६ वा.
मेष : घरासाठी वेळ द्याल. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. नोकरी व्यवसायात अडचणीचे प्रसंग येतील. व्यावसायिकांचे गणित बिघडू शकते. तरुणांना नोकरीची संधी येईल. नव्या ओळखीमुळे जुने काम पुढे सरकेल. सरकारी कामात घाई टाळा. आर्थिक व्यवहारात सावध राहा. सामाजिक कार्यकर्ते विचारवंत, लेखक, पत्रकारांचा मानसन्मान होईल. महिलांना यशदायी काळ. स्वभावाला मुरड घाला. चिडण्याने मनस्वास्थ्य बिघडेल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील.
वृषभ : नोकरीत कौतुक होईल. व्यावसायिकांना नव्या ऑर्डर मिळतील. कामाचे आणि वेळेचे गणित पक्के बसवा. नव्या वास्तूचा विषय मार्गी लागेल. आर्थिक नियोजनात पक्के राहा. लॉटरी, सट्टा, शेअरमधून लाभ मिळेल, पण त्याच्या फार प्रेमात पडू नका. तरुणांना आनंदाची बातमी कळेल. मित्रमंडळी, नातेवाईकांशी बोलताना काळजी घ्या. बँकेचे व्यवहार काळजीपूर्वक करा. कुटुंबीयांशी जपून बोला. तेलकट पदार्थ खाणे टाळा. ज्येष्ठांच्या आणि महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणाला सल्ले देत बसू नका.
मिथुन : खर्च वाढतील, योग्य नियोजन करा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. ध्यानधारणा, योगामुळे आरोग्य उत्तम राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळून काम वाढेल. जुने मित्र भेटतील. अहंकारी वृत्ती बाजूला ठेवा. तरुणांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल. क्रीडापटूंना यश मिळेल. मित्रांच्या सल्ल्यापासून, लॉटरीपासून दूर राहा, नुकसान होऊ शकते. मुलांकडे लक्ष द्या. उच्च शिक्षण घेण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात नियोजनपूर्वक पुढे जा. कामाची व्याप्ती वाढेल. आर्थिक बाजू भक्कम करा. यश मिळेल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील.
कर्क : नोकरी-व्यवसायात नव्या संधींचा फायदा घ्या. घाईत निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यातून आत्मशांती मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत करियरला आकार मिळेल. दगदगीचा आरोग्यावर परिणाम होईल. महागडी वस्तू खरेदी करण्याच्या मोहात पडू नका. सरकारी कामे लांबणीवर पडतील. भावनांना वाट करून देऊ नका. प्रेम प्रकरणात जरा जपून. सामाजिक कामात वेळ जाईल. व्यवसायात चातुर्याच्या बळावर यश मिळेल. जुने येणे वसूल होईल. तरुणांचा आनंद वाढेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा.
सिंह : नोकरीत कामाचा भार वाढेल. संयम ठेवा. कठीण प्रश्नांच्या बाबतीत थोरामोठ्यांचे मार्गदर्शन घ्या. व्यवसायात जपून पावले टाका. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. उधारीने पैसे देणे टाळा. मुलांची बाजू समजून घ्या. व्यवसायात नव्या कल्पना तूर्तास पुढे ढकला. महिलांना अचानक आर्थिक लाभ होईल. चैनीवर खर्च टाळा. सार्वजनिक जीवनात संस्मरणीय घटना अनुभवाल. गुंतवणुकीच्या फसव्या आश्वासनापासून दूर राहा. युवकांना स्पर्धात्मक यश मिळेल. कोणताही निर्णय घाईने करू नका.
कन्या : घरासाठी वेळ आणि पैसे खर्च कराल. कामाचे गणित विस्कळीत होईल. व्यवसायात यश मिळेल. नोकरदारांना कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. नातेवाईकांशी मतभेद होतील. खेळाडूंना यश मिळेल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. मित्र, नातेवाईकांना सल्ला देऊ नका. व्यवसायात सावधतेने पावले टाका. मामा, मावशी यांच्याकडून आर्थिक लाभ होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य चांगले ठेवा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. उत्तराला प्रत्युत्तर देऊ नका. वाद होऊ शकतोच.
तूळ : शांत आणि संयमी भूमिका ठेवा. नोकरीत वरिष्ठांपुढे जाऊ नका. घरातल्यांसह सहलीसाठी जाल. कलाकारांसाठी सन्मानदायक काळ. ब्रोकरांना लाभ मिळेल. भावंडांशी वाद टाळा. मेडिकल क्षेत्रात फायदा होईल. आठवड्याअखेरीस कामाचा कंटाळा येईल. नशीब बलवत्तर राहील. नव्या ओळखी फायदेशीर ठरतील. संशोधकांना यश मिळेल. घरगुती समारंभात मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आध्यात्मिक कार्याला वेळ द्याल. दानधर्म होईल. व्यवसायात आस्ते कदम चाला. नोकरीत विदेशात जाण्याचे योग जुळून येतील.
वृश्चिक : किरकोळ मानापमानाकडे दुर्लक्ष करा. घरात वाद टाळा. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मुलांकडून आनंदवर्धक बातमी कळेल. मित्रांशी बोलताना जुन्या वादांना फोडणी देऊ नका. तरुणांना प्रगतीचे नवीन पर्याय सापडतील. छांदिष्टांना छंदातून चांगली आमदनी मिळेल. नातेवाईक, मित्रांना आर्थिक मदत कराल. नियमांचे उल्लंघन करू नका. चित्रकार, शिल्पकारांकडून खास कलाकृती आकाराला येईल, कौतुक होईल. इंजिनीयरिंग, मार्केटिंगमध्ये चांगला काळ. नोकरीत कामाशी काम ठेवा. कागदपत्रे तपासूनच सही करा. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळेल.
धनु : काम पुढे नेण्यासाठी अधिकचे कष्ट घ्या. आर्थिक बाजू सक्षम राहील. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. नातेवाईकांना मदत करावी लागल्याने आर्थिक गणित बिघडू शकते. उधार-उसनवारी टाळा. जुनी गुंतवणूक लाभ मिळवून देईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महागडी वस्तू खरेदी करू नका. दांपत्यजीवनात आनंद मिळेल. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करा, अडकलेली कामे मोकळी होतील. नव्या वाहनाची खरेदी कराल. आध्यात्मिक क्षेत्राला वेळ द्याल. बाहेरचे खाणे टाळा. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. घरात धार्मिक कार्य होईल. नोकरी, व्यवसायात अधिक वेळ द्यावा लागेल. अपयशी तरुणांनी नाराज न होता नव्या उमेदीने काम करावे.
मकर : जुने काम पूर्ण झाल्याने मनावरील दडपण कमी होईल. तरुणांचा मौजमजेकडे कल राहील. पैशाचे नियोजन करा. नोकरदारांना प्रवास करावे लागतील. धार्मिक कार्यातून सकारात्मक वृत्ती वाढेल. नवीन गुंतवणूक खात्री करूनच करा. तरुण शिक्षणात प्रगती करतील. व्यवसायात चांगला काळ. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. ज्येष्ठांचा सल्ला माना. शेअर ब्रोकर, इस्टेट एजंटांना लाभदायक काळ. संधीचा फायदा करून घ्या. नोकरीत एकाग्रता ठेवा. खेळाडूंचा सन्मान होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ : नोकरीत तडजोड करावी लागेल. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. ज्येष्ठांशी बोलताना काळजी घ्या. दांपत्यजीवनात कुरबुरीचे प्रसंग घडतील. संयम ठेवा. मुलांकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. कामात मित्रमंडळींची साथ मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. तरुणांचा उत्साह वाढेल. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा. नातेवाईकांशी वाद होतील. कामानिमित्ताने प्रवास कराल. व्यवसायात काळजीपूर्वक पावले टाका.
मीन : कामाचा कंटाळा टाळा. घरात कलह टाळा. नोकरीत वाढीव कष्ट करावे लागतील. बोलणे गोड ठेवा. चातुर्याच्या जोरावर वरिष्ठांचे मन जिंकाल. सामाजिक क्षेत्रात नव्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात हाती घ्याल ते काम पूर्ण होईल. मनासारख्या घटना घडतील. सार्वजनिक ठिकाणी जपून व्यक्त व्हा. कलाकार, संगीतसर्जकांना चांगला काळ, नव्या संधी चालून येतील. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळा.