• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत…

- गुरुदत्त सोनसुरकर (डीएसपी)

गुरुदत्त सोनसुरकर by गुरुदत्त सोनसुरकर
August 18, 2021
in डिरेक्टर्स स्पेशल
0
अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत…

‘मैं परफेक्ट सिनेमा नहीं बनाता’ म्हणणार्‍या इम्तियाज अलीचा ‘रॉकस्टार’ एक चित्रपट म्हणून जर चुकला असेल तर कुठे चुकलाय ते मला कळत नाही; पण ‘रॉकस्टार’ एका कलावंताचं बेबंद असण्याची मीमांसा, झलक आणि त्याची तगमग, आत्मनाशी वृत्तीही दाखवतो. किती लिहावं?… इम्तियाझ… तुला सलाम! शेवटी ‘रॉकस्टार’ आहे रणबीर आणि इम्तियाजचा आणि तितकाच तो आहे ए. आर. रहमान आणि इर्शाद कामीलचा.
—-

‘चिंगारी कोई भडके’ या गाण्याचा आता बर्‍यापैकी प्रसिद्ध झालेला एक किस्सा आहे. आर. डी. बर्मनच्या गिटारिस्टने एक चुकीची कॉर्ड वाजवली आणि सगळे हसायला लागले. पण आरडीने परत त्याच्याकडून ती चुकीची कॉर्ड वाजवून घेतली आणि त्या गाण्याच्या सुरुवातीला तो अजरामर इफेक्ट जन्माला आला. तो चुकलेला टोन नव्हताच खरंतर. बघण्याचा दृष्टिकोन असतो आपला. चूक बरोबर किंवा सही या गलत हे दावे बर्‍याच वेळा आपापल्या दृष्टिकोनातून केले जातात नाही का?
‘यहां से बहोत दूर, गलत और सही के उस पार एक मैदान है. वहीं मिलूँगा तुझे.’ रुमीच्या वचनावर आधारित या संवादाने इम्तियाज अलीचा ‘रॉकस्टार’ सुरू होतो आणि पुढचे अडीच तास वाहात जातो. एखाद्या जखमेप्रमाणे. कधी ही जखम बुजलेली वाटते आणि कधी भळकन रक्त उसंडून धावू लागतं.
‘मैं परफेक्ट फिल्म बनाने का दावा नहीं करता’, ‘जब वुई मेट’ यशस्वी झाल्यानंतर दिग्दर्शक इम्तियाज अली एका चर्चासत्रात बोलत होता. त्याच्या अंगभूत प्रांजळपणे त्याचे सिनेमे थोडेसे भरकटलेले वाटू शकतात हे मान्य करत होता. ‘जब वुई मेट’ त्याला स्वत:ला फार ग्रेट वाटला नसावा. इम्तियाजच्या डोक्यात अनेक वर्षं एक कथा रुंजी घालत होती. त्याच्या एका जाट मित्रावर आधारलेली. त्या कथेचं नाव होतं ‘रॉकस्टार’.
‘रॉकस्टार’ आधी हृतिक रोशनला ऑफर झाला होता. पण त्या वेळी कथेत नायकाचा मृत्यू होत असल्याचं लिहिलं होतं म्हणून हृतिकने चित्रपट नाकारला. रणबीरने या चित्रपटासाठी इम्तियाजला होकार दिला, तेव्हा रणबीर आणि इम्तियाज दोघांनी मिळून कथानायकाचा मृत्यू काढून टाकला. गंमत म्हणजे इम्तियाजला नायिका म्हणून करीना कपूर हवी होती. पण चित्रपटाची कथा आणि काही प्रसंगांची गरज पाहता इम्तियाजने हे धाडस केलं नाही.
‘रॉकस्टार’ची कथा जनार्दन जाखड या संगीतवेड्या मुलाची आहे. दिल्लीच्या कॉलेजमध्ये शिकणार्‍या जनार्दन उर्फ जेजेला शिक्षणात फारसा रस नाही. लहानपणापासूनच गिटार वाजवणार्‍या जेजेला जिम मॉरिसनप्रमाणे रॉकस्टार व्हायचं आहे. घरचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने तशी त्याला पैशांची ददात नाही. पण त्याला आयुष्याचं, कलेचं गांभीर्य लक्षात आलं नाहीये. अजागळ आणि बराचसा बावळट असलेल्या जनार्दनला कॉलेज कॅन्टीनचा मॅनेजर खटाना सांगतो, संगीत किंवा कुठल्याही कलेचा अस्सल सूर तेव्हा लागतो जेव्हा त्या कलेला वेदनेची जाणीव होते. टुटे हुए दिल से संगीत निकलता है.
बास.
जनार्दन आता वेदनेचा शोध घेऊ लागतो. स्टीफन कॉलेजमधली श्रीमंत आणि सुंदर अशी हीर कौल ही दिल तोडनेवाली मशीन है असं तो मित्रांकडून ऐकतो आणि हीरकडून दिल तोडून घ्यायला जाणून बुजून स्वतःचा अपमान करून घेतो. या गडबडीत त्याची आणि हीरची मैत्री होते. हीरचं लग्न ठरलेलं आहे. म्हणून त्यापूर्वी जंगली जवानी वगैरे तत्सम चित्रपट पाहणे, देशी दारू पिणे अशा इच्छा पूर्ण करायला ती जेजेची मदत घेते. तिच्या लग्नाकरता जेजे घरी थाप मारून काश्मीरला जातो. कार्यात समरसून मदत करतो. त्यावेळी हीरला जाणवतं ती जेजेच्या प्रेमात पडली आहे. पण खूप उशीर झाला असतो. लग्न होऊन प्रागला जाण्याआधी ती जेजेचं जॉर्डन असं रुबाबदार नामकरण करते. दिल्लीला परतणार्‍या जॉर्डनलासुद्धा काहीतरी निसटल्याचं जाणवत असतं. घरी परतल्यावर भावांचा मार खाऊन जॉर्डन कुटुंबाच्या व्यवसायात जुंपून घेतो. पण काही महिन्यात पैशांची अफरातफर केली म्हणून त्याचे भाऊ त्याला परत मारहाण करून घराबाहेर काढतात. आधीच हीरच्या नसण्याने व्याकूळ झालेल्या जॉर्डनला आता खर्‍या दुःखाची ओळख होऊ लागते. बेघर भटकणारा जॉर्डन एका मशिदीत राहतो, मग खटानाकडे आश्रय घेतो. खटाना जॉर्डनचा मॅनेजर बनतो आणि मग जॉर्डनला म्युझिक कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट्स मिळवून देत त्याचा रॉकस्टार बनण्याचा प्रवास खटाना सुरू करतो.
दरम्यान जॉर्डनला प्रागला जाण्याची संधी मिळते आणि तो परत एकदा हीरला भेटतो. यावेळी मात्र त्यांच्यातलं अव्यक्त प्रेम सर्व बंधनं तोडून व्यक्त होऊ लागतं. हीर विवाहित असल्याने तिला याची टोचणीही लागली आहे. प्रागमधून निघताना जॉर्डन हीरच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो आणि तिथल्या पोलीस कस्टडीमध्ये डांबला जातो. आता भारतात तो बॅड बॉय म्हणून मीडियाचा आणि त्याच्या चाहत्यांचा लाडका आहे. पण जॉर्डनला स्वत:ला माहीत नाहीये त्याचा प्रवास कुठे चाललाय.
यावेळी तिसर्‍यांदा त्याच्या आयुष्यात हीर येते. एका दुर्धर आजाराने ग्रासलेली. जॉर्डनला तिला यावेळी मात्र गमवायची नाहीये. तो हरेक प्रयत्नांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण…
रॉकस्टार संपतो तेव्हा आपल्याला एक प्रश्न देऊन जातो.
म्हटलं तर प्रश्न आणि म्हटलं तर उत्तर.
काय असतं प्रेम?
जॉर्डन आणि हीरच्या प्रेमाचा शेवट काय झाला?
किंबहुना तो शेवट म्हणावा का?
खरंतर या चित्रपटाचा शेवट बर्‍याच लोकांना कळला नाही किंवा मुळातच आवडला नाही आणि चित्रपट संपलाय हे बर्‍याच लोकांना समजलं नाही किंवा मान्य नव्हतं. काहीतरी ठोस ठाशीव घटना घडून ‘दि एन्ड’ची पाटी पाहण्याची सवय आम्हाला वर्षानुवर्षं आहे.
पण तरीही ‘रॉकस्टार’ तुमच्या मनात घर करून राहतो. कधी मनातलं बोलता येत नसेल तेव्हा कदाचित गुणगुणत असाल, ‘जो भी मैं.. कहना चाहूँ… बर्बाद करें… अल्फाज़ मेरे’ किंवा कधी मन उसळून म्हणत असेल, ‘सड्डा हक़ एत्थे रख’ किंवा कधी तेच मन विद्ध होऊन हळुवार गात असेल, ‘तुम हो… पास मेरे… साथ मेरे हो तुम यूं…’
रॉकस्टार कुठेतरी रुजून राहतोच. अर्थात यात संगीतकार ए. आर. रहमान आणि गीतकार इर्शाद कामील यांचा मोठा वाटा आहेच; पण ‘रॉकस्टार’च्या गाण्यांवर फक्त आणि फक्त इम्तियाज अलीच्या जॉर्डन आणि हीरच्या गोष्टीची छाप आहे. ती गोष्ट जी तुमच्या आमच्या आयुष्यातही कधी घडली असेल, पण आपण जॉर्डनसारखा वेडेपणा न करता ती गोष्ट विसरून, आयुष्याची कास पकडून, तोल सांभाळत कसंबसं इथपर्यंत आलेलो आहोत आणि एखाद्या रात्री ती वेडी गोष्ट आठवलीच तर एखादी आर्त गझल ऐकत, डोळ्यातली टिपं कोणाला दिसणार नाहीत अशा बेताने पुसतो.
‘कुठल्या तरी गोष्टीच्या कुठल्या तरी पानात
सापडेल तुला गोष्ट आपलीही दडलेल्या रानात’
असं म्हणत आठवणींना मनाच्या कार्पेटखाली ढकलून ठेवतो.
जॉर्डनला हे जमलंच नाही, उमजलंच नाही. आणि हीरला? तिलाही खूप उशिरा कळलं आणि तोवर परतीचे दोर कापले गेले होते.
इम्तियाजच्या कथेत हा बॉय मीट्स गर्ल अँड दे सेट आऊट ऑन अ जर्नी हा फॉर्म्युला असतोच, पण दरवेळी तो भावनांच्या नव्या क्लिष्ट व्यापारात गुंतत जातो आणि आपल्यालाही गुंतवतो. त्याचे हे बॉय आणि गर्ल दर कथेत वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेले असतात आणि म्हणूनच त्यातली परिस्थितीची मांडणीसुद्धा वेगळी होत जाते.
इकडे जॉर्डन जेव्हा जनार्दन आहे, तेव्हा तो बावळट वाटेल इतका बालिश आहे. त्याचं सुरुवातीचं जिम मॉरिसन बनण्याचं स्वप्न आणि तेव्हा केलेली बडबड किंवा हीरकडून हृदयभंग करवून घेण्यासाठी चालवलेली धडपड हसू आणते आणि जनार्दनच्या बौद्धिक आकलनक्षमतेवर शंकाही येते. हीरने हाकलल्यानंतर आपला प्रेमभंग झालेला आहे असं वागत समोसे खाणारा जनार्दन तिथल्या पोर्‍यावर खेकसतो, ‘इत्ती सी चटनी में दो समोसे खाऊं मैं?’ पण त्याचा नंतर जॉर्डन या विक्राळ प्राण्यात होणारं रूपांतर पाहता तो आधी असाच निर्लेप, आणि निष्पाप असेल हे पटतं. हा जनार्दन जो दारू अजिबात पीत नाही, हीरला कंपनी द्यावी म्हणून हॉ हॉ करत ते जळजळीत द्रव्य घशाखाली ढकलणारा जनार्दन अगदी सरळ आहे. लहान मुलासारखा मस्ती करणारा.
हीर आधी अगदी एखाद्या राणीसारखी शिष्ट आणि खडूस वागणारी मुलगी वाटते, पण नंतर कळतं की तिच्या आत एक अवखळ मुलगी आहे, जिला जुन्या दिल्लीमधल्या काळोख्या थिएटरमध्ये लागणारे अश्लील चित्रपट बघायचे आहेत, स्वस्त दारू पिऊन धिंगाणा घालायचा आहे. जॉर्डनमध्ये आपण अडकलो आहोत हे हीरला कळतं, तेव्हा येणार्‍या फरफटीची तिला आधीच कल्पना येते असं वाटतं. खाली तिच्या लग्नाच्या रोषणाई करत असलेल्या जॉर्डनकडे ती अनिमिष बघत असते तेव्हा… जेव्हा मेहंदी लागलेल्या हातांनी ती जॉर्डनला कवटाळते आणि त्याला म्हणते ठीक से हग कर…
‘रॉकस्टार’ दरवेळी… दरवेळी खूप आत ढवळाढवळ करून जातो.
जॉर्डन जे वागतोय ते चुकीचं आहे, पण ते खूप खरंही आहे आणि मग जर ते खरं असेल तर चुकीचं कसं असेल? सामाजिक नीतीनियम वगैरेंना काडीचीही किंमत न देणारा जॉर्डन म्हणतो…
बे-सलीका मैं
उस गली का मैं
ना जिसमे हया,
ना जिसमे शर्म
हीर कोमात आहे, जॉर्डन शो सोडून पळत आलाय. त्याचा मॅनेजर चिंताक्रांत. हीरच्या काळजीनं वेडापिसा जॉर्डन त्याला म्हणत राहतो, ‘मेरा दिल नहीं टूटना चाहिये बस.’ एखाद्या आर्टिस्टला जमणारं मॅक्सिमम बालिश ब्लॅकमेल… मुंबईच्या वेश्यावस्तीत, दिल्लीच्या दर्ग्यात भान हरपून गाणारा जॉर्डन हा थेट ‘त्या’च्याशी कनेक्ट होऊन राहिलाय… आणि इथं हीरशी… तिला कासावीस होऊन तो म्हणतो देखील… ‘मैं सिर्फ तुझसे ही सेट हूं.’
विवाहित असूनही जॉर्डनबरोबर फिरतोय याचा हीरला गंड आहे… त्यात दिवसेंदिवस जॉर्डनचं बेछूट होत जाणं… त्यामुळे तिचं लग्न मोडू शकतं याची सतत टांगती तलवार. हीर त्याला तोंडाला येईल ते बोलून हाकलून लावते. सौ दर्द बदन पे पैâले हैं, हर करम के कपडे मैले हैं, म्हणत जॉर्डन अजूनच बेबंद होत जातो. त्याला काँट्रॅक्टमध्ये बांधणारा प्लॅटिनम म्युजिकचा मालक धिंग्रा त्याच्या बॅड बॉय प्रतिमेचा फायदाच करून घेतो. ‘मार्केट में निगेटिव्ह ही चलता है’ म्हणत.
कथेत एक अतिशय महत्त्वाचं पात्र आहे उस्ताद जमील खाँ. बॉलिवुडचा मूळ रॉकस्टार शम्मी कपूर यांनी हा पाहुणा वावर अविस्मरणीय केलेला आहे. जमील खां हे दिग्गज शहनाईवादक आहेत. बेघर जॉर्डनला त्यांनी हजरत निजामुद्दीन दर्ग्यात बेभान होत गाताना हेरलं आहे. ‘मैने भी आपको पिपुडी बजाते देखा है. मुझे क्लासिकल समझ नहीं आता. एक ही चीज बार बार क्यूँ बजाते हो,’ म्हणणार्‍या जॉर्डनचा त्यांना राग येत नाही. धिंग्राला ते सांगतात, ‘ये बडा जानवर है. इस पर उसका हाथ है. इनायत है.’
जॉर्डनची होरपळ हे त्याचं प्राक्तन आहे हेही त्यांना कळलं आहे हे त्यांच्या कणवभरल्या डोळ्यांतून पाझरत राहतं. शम्मी कपूर यांनी आयुष्यातली ही शेवटची भूमिका जबरदस्त केली आहे. खिडकीतून जॉर्डनच्या होर्डिंगकडे बघत असलेले जमील खां अविस्मरणीय आहेत.
‘रॉकस्टार’मधला जॉर्डन हा फक्त रणबीर कपूर या अभिनेत्यासाठी लिहिला गेला की काय असं वाटावं इतका रणबीरने तो जिवंत केलेला आहे. आधीचा बावळट पण साफ मनाचा जनार्दन ते नंतरचा बेछूट, आक्रमक जॉर्डन हा आलेख रणबीरने कमाल साकारलेला आहे. ‘कुन फाया’ गाण्यात तो देहभान विसरून वर पाहात राहतो. अंगावर शहारा येतो. हीर झालेल्या नर्गिस फाखरीचा हा पहिलाच सिनेमा. अनेकांना तिचं हीर असणं खटकलं आहे. हीरच्या भूमिकेसाठी दीपिकाला विचारणा झाली होती म्हणतात. कदाचित मग रॉकस्टार अजूनच वरच्या पातळीवर गेला असता. कुमुद मिश्रा यांचा खटाना आणि पियूष मिश्रा यांचा धिंग्रा ‘रॉकस्टार’ची खुमारी वाढवतात. आणि हो तेव्हाची नवोदित अदिती राव हैदरीसुद्धा.
पण शेवटी ‘रॉकस्टार’ आहे रणबीर आणि इम्तियाजचा आणि तितकाच आहे ए. आर. रहमान आणि इर्शाद कामीलचा. रहमानचं, आत्म्याच्या तारा छेडणारं संगीत आजही मन विदीर्ण करतं. ‘साड्डा हक’ हे त्या वर्षीचं तरुणाईचं अँथम होतं, तर ‘जो भी मैं कहना चाहूं’ हे आजही आपल्या भावना नीट न मांडू शकणार्‍या कित्येक अभागी जीवांच्या पसंतीचं गीत आहे. ‘कुन फाया कुन’बद्दल काय बोलावं! थेट ‘त्या’च्याशी जोडलं गेल्याचा अनुभव आहे हा. इर्शाद कामीलचे तरल शब्द, रहमानचं अभूतपूर्व संगीत, रणबीरचं जॉर्डन असणं… आणि चित्रपटाला इम्तियाजचा स्पर्श असणं.
‘मैं परफेक्ट सिनेमा नहीं बनाता’ म्हणणार्‍या इम्तियाज अलीचा ‘रॉकस्टार’ एक चित्रपट म्हणून जर चुकला असेल तर कुठे चुकलाय ते मला कळत नाही; पण ‘रॉकस्टार’ एका कलावंताचं बेबंद असण्याची मीमांसा, झलक आणि त्याची तगमग, आत्मनाशी वृत्तीही दाखवतो.
किती लिहावं?… इम्तियाझ… तुला सलाम! बडे जानवर अक्सर इंसानी बस्तियों में मारे जाते हैं या सर्कस में नचाये जाते हैं. कई जॉर्डन मारे गए, कई क्रिएटिव्हिटी के सर्कस में नाच रहे हैं और कई द़फ्तरों में दिवाली का बोनस ना मिलने की कड़वाहट रम के घूँट के साथ निगल रहे हैं… त्यांच्यासाठी इम्तियाझनं तमाशा केला, ते नंतर कधी….
काटे चाहे जितना
परों से हवाओं को
खुद से ना बच पायेगा तू
तोड आसमानों को
फुंक दे जहानों को
खुद को छुपा ना पायेगा तू
आपण अस्सल कलावंत असं म्हणत असतो पण अस्सल कलावंत अपनी असलीयतवर येतो तेव्हा चाहते, रसिक हे त्याला किंवा तिला काही नको असतं. दिसत असते फक्त कला… किंवा मग जाळत असते त्या कलेला जन्म देणारी एखादी खोल खोल जखम. आणि कलावंत फिरत राहतो अश्वत्थाम्यासारखा चिरंतन वेदना घेऊन.
जॉर्डनसारखा उघडपणे. किंवा कदाचित तुमच्या आमच्यासारखा एकांताचे काळोखे कोपरे शोधत.
कट इट!

(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post

खाणे आणि गाणे एकसाथ…

Related Posts

जमूरा कोण, ‘मदारी’ कोण?
डिरेक्टर्स स्पेशल

जमूरा कोण, ‘मदारी’ कोण?

October 14, 2021
दृष्टीपलीकडचे दाखवून जाणारा `स्पर्श?’
डिरेक्टर्स स्पेशल

दृष्टीपलीकडचे दाखवून जाणारा `स्पर्श?’

September 30, 2021
सत्यप्रिय मरा है… सत्यप्रिय मरते ही हैं…
डिरेक्टर्स स्पेशल

सत्यप्रिय मरा है… सत्यप्रिय मरते ही हैं…

September 16, 2021
‘देशकर्तव्य’ शिकवणारा सणसणीत सरफरोश!
डिरेक्टर्स स्पेशल

‘देशकर्तव्य’ शिकवणारा सणसणीत सरफरोश!

September 2, 2021
Next Post
खाणे आणि गाणे एकसाथ…

खाणे आणि गाणे एकसाथ...

दिव्याच्या अवसेचे खायचे दिवे

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.