ग्रहस्थिती : रवि, बुध, हर्षल वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत, प्लुटो मकर राशीत, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत. दिनविशेष : २१ जून योगिनी स्मार्त एकादशी, २२ जून भागवत एकादशी, २३ जून सोमप्रदोष, शिवरात्री, २४ जून अमावस्या प्रारंभ सायं ७ वा. २५ जून, समाप्ती सायं. ४.०१ वा.
– – –
मेष : आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांच्या कानी खूषखबर पडेल. तरुणांमध्ये चैनबाजी वाढेल. आमदनी व खर्चाचा मेळ साधणे कठीण बनेल. मनस्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसायात प्रवास घडतील. बोलताना काळजी घ्या. व्यवसायात हेका चालवू नका. तरुणांनी घाई टाळावी. विद्यार्थ्यांसाठी यशदायी काळ. आर्थिक बाजूचे नियोजन करा. संततीवर लक्ष ठेवा. कामात अतिउत्साह नको. सकारात्मक विचारांनी मन प्रसन्न राहील. बुद्धीकौशल्याच्या जोरावर यश मिळवाल. राग व्यक्त करणे टाळा.
वृषभ : ज्येष्ठांच्या व मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च होतील. मित्रांबरोबर मौजमजा कराल. व्यवसायाचे आर्थिक गणित विस्कटेल. नोकरीत चांगला काळ. आर्थिक नियोजनात खबरदारी घ्या. व्यवसायात अडचण येऊ शकते. भावनेत अडकू नका. मित्रांशी बोलताना काळजी घ्या. धार्मिक कार्य कराल. भागीदारीत धीराने घ्या. मनासारख्या घटना घडतील. तरुणांना नव्या संधीचे सोने करण्याचे योग आहेत. नोकरी मिळेल. काळजीपूर्वक स्वीकारा. मित्रांचा सल्ला कामी येईल. मुलांकडे लक्ष द्या.
मिथुन : बजेट पाहूनच घरासाठी महागडी वस्तू खरेदी करा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्याल. मुलांना अनपेक्षित यश मिळेल. व्यवसायात लाभ मिळेल. नोकरीत हुशारी कामी येईल. उच्चशिक्षणाच्या बाबतीत विचारपूर्वक पुढे जा. पैशाचे गणित सांभाळा. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. चांगले अनुभव येतील. छंदामधून नव्या संकल्पना सुचतील. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. खेळाडूंना यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. लेखक, कलाकारांचा सन्मान होईल.
कर्क : सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नव्या ओळखीचा फायदा होईल. नोकरीत प्रवास करावा लागल्याने वेळापत्रक बिघडेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उंचावेल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. व्यवसायात शांत राहा. घरात किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धार्मिक सहल आयोजित कराल. नवीन ओळखीच्या व्यक्तीला माहिती देणे टाळा. पत्नीशी अरेरावी नको. मालमत्तेचे व्यवहार काळजीपूर्वक करा. शेअर, लॉटरीमधून लाभ होईल.
सिंह : कामाकडे दुर्लक्ष होईल. मनस्ताप वाढेल. धार्मिक कार्य कराल. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. आईवडिलांचा सल्ला ऐका. तरुणांना यशासाठी झटावे लागेल. व्यवसायात योजना सफल होतील. नव्या कल्पना पुढे जातील. बँकेची कामे मार्गी लागतील. मित्रांच्या वादात मध्यस्थी टाळा. भागीदारीत तणाव होईल. नमते घ्या. ध्यानधारणा, योगा करा. दानधर्म होईल. सर्वाधिक वेळ कुटुंबासाठी खर्च होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. तरुण मौजमजेवर खर्च करतील. नवीन नोकरी मिळेल. वाहन चालवताना चूक नसताना ताप होईल.
कन्या : नोकरी-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नव्या संकल्पना आर्थिक बाजू भक्कम करतील. घरात छोटा समारंभ होईल. कलाकारांचे कौतुक होईल. व्यवसायातील अडचणीतून कौशल्याने मार्ग काढा. शब्दाने शब्द वाढू देऊ नका. तरुणांना छोट्या कामांतून समाधान मिळेल. विरोधात वातावरण तयार झाले तरी आपले काम करत राहा. व्यवसायविस्ताराच्या योजना लांबणीवर टाका. सरकारी कामे रेंगाळून चिडचिड होईल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रांच्या सल्ल्याने नुकसान होईल.
तूळ : गुरुकृपेने कामे पुढे सरकतील. कुटुंबाची साथ मिळेल. भावंडांशी वाद टाळा. व्यवसायात योजना मार्गी लागतील. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. एखादे काम न झाल्याने नाराज होऊ नका. नोकरीत चुका टाळा. वरिष्ठांशी जपून बोला. व्यवसायाचे गणित बिघडू शकते. तरुणांना ध्येयपूर्तीसाठी अधिक कष्ट पडतील. आव्हानांतून मार्ग निघेल. महागडी वस्तू खरेदी करू नका. मधुमेह, हृदयविकारग्रस्तांनी काळजी घ्यावी. प्रलोभनांपासून दूर राहा. मामाकडून लाभ मिळेल. कलाकार, संगीतकार, ब्रोकर, खाद्यपदार्थ व्यावसायिकांना यश मिळेल. मुलांकडे लक्ष द्या.
वृश्चिक : व्यवसायात श्रम घ्या. नोकरीत अधिकार वाढतील. पगारवाढ, बढती होईल. मुलांना यश मिळेल. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. नवीन नोकरी मिळेल. मनाचे आरोग्य सांभाळा. दगदगीचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. चूक टाळा. चोख काम करा. आर्थिक व्यवहारात घाई नको. कुटुंबासाठी अधिक खर्च होईल. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. मित्रांना आर्थिक मदत कराल. येणे वसूल होईल. देवदर्शनाला जाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. वाद टाळा. शिक्षक, संशोधकांना यश देणारा काळ.
धनु : विवाहेच्छुंंसाठी चांगला काळ. मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. अचानक लांबचा प्रवास कराल. कामात अति आत्मविश्वास दाखवू नका.व्यवसायात नवीन आयडिया सापडेल. विदेशात शिक्षणाची योजना मार्गी लागेल. कामात प्रामाणिक राहा. आपले विचार, मते इतरांवर लादू नका. तरुणांना ताण येईल. आरोग्याचे गणित बिघडेल. नव्ाी गुंतवणूक करताना जपून. कौटुंबिक तणावामुळे मनस्वास्थ्य खराब होईल. नोकरीत बढाया टाळा. प्रेमप्रकरणात मीठ कालवू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल.
मकर : नोकरीत सबुरीने घ्या. आर्थिक नियोजनात चुका टाळा. मालमत्ता घेण्याचा विचार पुढे सरकेल. व्यवसायात चूक होईल. कामात संयम ठेवा. तरुणांना यश मिळेल. आयटी इंजिनियर, विमा एजंट, गुंतवणूक सल्लागार, औषध विक्रेते, लेखक, पत्रकार, प्रकाशकांसाठी चांगला काळ. आर्थिक भुर्दंड बसेल असे काही करू नका. नोकरीत सहकार्यांना विश्वासात घ्या. गरजेपुरताच खर्च करा. महिलांनी पावसाळ्यात आरोग्य सांभाळावे. बँकेची कामे मार्गी लागतील. मित्रांशी जुने वाद उकरू नका.
कुंभ : कामाचा गौरव होईल. जनसंपर्क, पत्रकारितेत चांगला काळ. कामाचे चोख नियोजन करा. आरोग्याच्या समस्यांमुळे खर्च वाढतील. स्पर्धापरीक्षेत यश मिळेल. व्यक्तिमत्वात चांगले बदल झाल्याने करियर घडेल. आमदनी व खर्चाचा ताळमेळ साधा. पोटाचे विकार डोके वर काढतील. बंधने पाळा. नव्या ओळखीतून व जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. व्यवसायात उत्साह वाढेल. नोकरीत विदेशात जाल. कुटुंबातील मानापमानाकडे दुर्लक्ष करा.
मीन : नोकरीत मान वाढेल. घरातील जुने विषय पुढे सरकतील. भावनेच्या भरात निर्णय टाळा. उधार उसनवारी करू नका. व्यवसायात एखादी गोष्ट न पटल्यास त्यावर विचार नको. तुमचे मार्गदर्शन कामी आल्याने अहंकारी बनू नका. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. घरात आनंदाची बातमी कळेल. छोटेखानी समारंभ होईल. मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मित्रांना वेळ पाहून पैसे द्या. सामाजिक कार्यात वाहवा होईल. युवा वर्गाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तरुणांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल. नोकरीत अवघड काम युक्तीने मार्गी लावाल. खेळाडूंना चांगले यश मिळेल.