त्या दिवशी सक्काळी सक्काळी माझा मानलेला परममित्र पोक्या घाईगडबडीत माझ्या घरी आला तेव्हा मी घाबरलोच. मला म्हणाला, टोक्या मला खरोखरच फार भीती वाटतेय आपली संस्कृती बुडण्याची. मी म्हणालो, पोक्या अरे वेडा आहेस की काय? भारतीय संस्कृती इतकी लेचीपेची नाही बुडण्याइतकी. तुझ्या डोक्यात हे भूत कुणी भरवलंय? त्यावर पोक्या म्हणाला, ते काही असूदे पण आपण आपल्या संस्कृतीरक्षक चित्राताई वाघबाई यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे… तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा त्या मॉडेलगर्ल ऊर्फी संदर्भात काहीतरी बोलतोय. मी म्हटलं, हो मलाही तसंच वाटतंय. नाहीतर चित्राताईंनी एवढं आकांडतांडव केलं नसतं. आपण त्यांना भेटून पाठिंबा जाहीर करूया आणि त्यानंतर त्या अंगप्रदर्शक मॉडेल गर्ल ऊर्फीलाही भेटून तिचेही विचार जाणून घेऊया. म्हणजे एकूण अंगप्रदर्शन, भारतीय संस्कृती, त्याबद्दल भाजपची विचारधारा याबद्दल एकूणच आपल्या आधीच्याच अगाध ज्ञानात आणखीन भर पडेल. तसेच आम्ही दोघे चित्राताईंना भेटण्यासाठी संपूर्ण अंग झाकेल अशा कपड्यात डोक्यावर काळी टोपी घालून गेलो. तेव्हा त्या घरी पूजा करत होत्या. आम्ही दाराची घंटा म्हणजे बेल वाजवल्यावर त्यांनी दरवाजा उघडला आणि म्हणाल्या, या. इथे सोफ्यावर बसा. पाच मिनिटांत देवपूजा आटोपल्यावर मी बाहेर येते असं सांगून त्या देवघरात गेल्या. आम्हा दोघांना त्या पूर्वीपासून ओळखत असल्यामुळे आणि आताची आमची पोझिशन माहीत असल्यामुळे आम्ही मनमोकळ्या गप्पा मारू शकत होतो. थोड्या वेळाने त्या मसालेदुधाचे तीन कप घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या, घ्या. आपण एकत्रच हे पीत पीत बोलूया. नंतर शुद्ध, सात्विक नाश्ता घेऊया.
मी म्हटलं चित्राताई हे जे काही चाललंय त्या संदर्भात तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोघे प्रत्यक्षच न राहवल्यामुळे तुमच्या भेटीला आलो. आज आपल्या पक्षातील नेते मंडळी वरवर तुमच्या बाजूने असल्याचे दाखवत असली तरी बहुतेक त्या उठवळ ऊर्फीच्या बाजूनेच आहेत. तिचे विविध पोझिशनमधले फोटो, व्हीडिओ अगदी चविष्टपणे बघत असतात. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही तुम्हाला एकटंच पाडलंय. एवढं संस्कृतीरक्षणाचं महान कार्य तुम्ही करत आहात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. वेळ पडल्यास तुमच्या नेतृत्वाखाली त्या लबाड ऊर्फीच्या घरावर मोर्चा काढण्यासाठीही तुम्हाला मदत करू. तुमच्याबरोबर मोर्चात सहभागी होऊ. म्हणजे तिच्याशी वाटाघाटी करण्यासाठी जाणार्या शिष्टमंडळात मात्र तुम्ही आम्हा दोघांना घ्या. म्हणजे तिचे जवळून दर्शन घडेल आणि तिचे विचार परिवर्तन करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना हातभारही चर्चेने लावता येईल.
त्याबरोबर चित्राताई म्हणाल्या, प्रश्नच नाही. तुमच्यासारखी माझ्या विचारांची माणसं माझ्याबरोबर असतील तर मला आनंदच होईल. पण आता मात्र अति झालंय त्या ऊर्फीचं. तिला कुठेतरी चाप लावलाच पाहिजे. अहो, बघा ना. तिच्यामुळे आपली संस्कृती वाहून चाललीय. म्हणून एक संस्कृतीरक्षक म्हणून मला माझं कर्तव्य स्वयंप्रेरणेने पार पाडण्याची उत्स्फूर्त प्रेरणा मिळाली. माझं आंदोलन जर यशस्वी झालं तर इतिहासात सच्ची संस्कृतीरक्षक म्हणून माझ्या नावाची नोंद होईल. या सार्याला कुठेतरी आळा बसलाच पाहिजे. स्वैराचाराला आणि अशा नंगानाच करणार्या मॉडेलना वेळीच रोखलं पाहिजे. ते माझं कर्तव्य आहे. पण त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्या ऊर्फीला नोटीस पाठवायची सोडून मलाच नोटीस पाठवतात. खर्याची दुनिया राहिलीच नाही माझ्या मित्रांनो. कसले आदर्श ठेवतेय ती ऊर्फी या तरुण पिढीपुढे! प्रत्येक घरात पोरीबाळी आहेत. त्यांच्यावर किती विपरीत परिणाम होईल तिचा नंगानाच पाहून. म्हातारे बघत असतील मिटक्या मारत, पण मला या तरुण पिढीची चिंता वाटतेय. म्हणूनच अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या नंग्या प्रवृत्तीशी लढण्यात हार मानणार नाही. अशा उठवळ प्रवृत्तींना आळा घालताच पाहिजे. मी तीस वर्षे राष्ट्रवादीत होते. पण अशा प्रवृत्तीला आम्ही कधीच पाठिंबा देत नव्हतो. आमच्या नेत्या, कार्यकर्त्या या समाजापुढे स्त्री पेहरावाचा आदर्श होता.
– पण आपल्या आताच्या पक्षातल्या मॉडेलिंग करणार्या अमृताताई यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं?
– तो त्यांच्यातील गुणांचा आविष्कार आहे. त्या सुंदर नृत्यही करतात. ही इश्वरी देणगी आहे. त्यांची या डर्टी ऊर्फीशी मुळीच तुलना करू नका. अस्सल सोनं आणि चौदा कॅरेट यातील फरक कळला पाहिजे. तुम्ही ऊर्फीच्या घरावर न्यायच्या मोर्चाची तयारी करा. निदान लाखभर स्त्रिया जमतील याची व्यवस्था करा. मीसुद्धा ‘भाजपा माझा’ चॅनेलवरून आवाहन करते. निदान दोन लाखाचा हा मोर्चा असेल. आगे बढो.
मी पोक्याला म्हटलं, मोर्चाला बायका जमवायला वेळ लागेल. त्याआधीच आपण आपली ओळख लपवून आम्ही तुझे चाहते आहोत असं सांगून ऊर्फीची आजच भेट घेऊ आणि तिची भूमिकाही समजावून घेऊ…
आम्ही ताबडतोब ऊर्फीचे शूटिंग ज्या हॉटेलमध्ये होतं, तिथे आमच्या एका पत्रकार मैत्रिणीला मध्यस्थी करायला लावून तिची दहा मिनिटांची अपॉइंटमेंट मिळवली ती सारी गुप्तता राखून. आम्ही तिला भेटलो तेव्हा त्या रूममध्ये ती पंजाबी ड्रेसमध्ये अगदी रिलॅक्स मूडमध्ये होत्ाी. मी गेल्या गेल्या तिला भलामोठा पुष्पगुच्छ दिला तेव्हा ती म्हणाली, ‘नंतर फक्त पुष्पगुच्छ मिठीत घेऊन मॉडेलिंग करते अगदी वस्त्रविरहित.’ आम्ही दचकलोच. म्हणाली, ‘डोन्ट अप्रâेड. मी फक्त माझ्या नव्या सासूबाईंना घाबरते. आज चित्रा वाघने मुझे सुधार दिया, लेकिन अभी भी बहुत सुधार बाकी है. मैं उनकी माफी चाहती हूं. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू…’ आम्ही हे ऐकून चाटच झालो. ती म्हणाली, ‘मैंने ये ट्वीट भी किया है. अब तो सारे देश में व्हायरल भी हुआ है.
त्यावर मी बोललो, आम्ही मोर्चाच्या गडबडीत होतो. त्यामुळे पाहायचं राहून गेलं असेल. तुमच्या घरावरच महिलांचा भव्य मोर्चा आणणार होत्या चित्राताई.
– अब उसकी जरूरत ही नहीं. मुझे पछतावा हो रहा है. अब जो कुछ करुंगी वो चार दिवारों के अंदर करुंगी. मेरा मॉडेलिंग भी. तुम्हें मालूम नहीं गांव में कितने गरीब अवस्था में मैंने दिन काटे हैं. बाप ने दुसरी शादी की और हमें घर छोड़ना पडा. मैं पैसा कमाने के लिए मुंबई आयी. सिनेमा स्टुडिओ में गयी. एक्स्ट्रा नटी के काम मिलते थे. सिरीयल में गयी. आखिर बिग बॉस में इतनी चमक गयी की मेरा नाम इंडस्ट्री में हुआ. घर खरीदा. मां और बहन को मुंबई में लाया. एक अच्छी मॉडेल के रूप में मेरी पहचान हुई. आज मैं पचास करोड की मालकीन हूं. मुझे ये चित्राबाई वाघ का नाटक झुठा लगता है. अमृताजी और परमपूज्य रामदेव बाबाजी के सन्माननीय उपस्थिती में महिला योग संमेलन हुआ था. वहां रामदेवजी बोले थे कि महिला वस्त्रविरहित ज्यादा सुंदर लगती है. बाबाजी के उन शब्दों से मैंने प्रेरणा ली और आहिस्ते आहिस्ते मॉडेलिंग में ज्यादा अंगप्रदर्शन करने लगी. वो मेरे प्रेरणास्थान हैं. मैं ऐरोगैरों से नहीं डरती. आपसे मिलके बडी खुशी हुई. आभारी हूं.
आम्ही तेथून काढता पाय घेतला आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भेटीला गेलो. त्या शांत होत्या. म्हणाल्या, तुम्ही का आलात ते समजलं. कोण असली आणि कोण नकली ते जगाला समजतं. संस्कृतीरक्षक म्हणे! तुमच्या पक्षामध्येच आधी जागृती करा म्हणावं. या तुम्ही.
आम्ही तिथून निघालो. चित्राताईंच्या घरी आलो. मोदीजींना फोन करून मोर्चाबद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले, ये सब बकवास की बाते हैं. पार्टी को और बदनाम ना करो. मोर्चा बिर्चा मत निकालो. असं म्हटल्यावर चित्राताई चिडीचूप झाल्या आणि आम्हीही काढता पाय घेतला.