• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home भाष्य

…आणि तिला मार्ग सापडला

- डॉ. श्रीराम गीत (करियर कथा)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 19, 2023
in भाष्य
0
Share on FacebookShare on Twitter

बॉम्बे सेंट्रलहून गाडी सुटली की तासाभरांनी वसई रोड हे स्टेशन येते. वसई गाव तिथून आठदहा किलोमीटरवर आहे. या स्वरूपाची भारतात अनेक स्टेशन आहेत. गावापासून रेल्वे लाईन बर्‍यापैकी लांब असल्यामुळे त्याला त्या गावाचे नावाला रोड असे जोडून स्टेशन म्हणण्याची पद्धत ब्रिटिशांनी पाडली. पोर्तुगीज प्रभावामुळे वसई गावातली व आसपासची खूपशी लोकसंख्या ख्रिश्चन आहे. हे शुद्ध मराठी ख्रिस्ती, चर्चला देऊळ म्हणणारे आणि मराठीतून प्रार्थना करणारे. सर्व धर्म आणि जमातींमध्ये सलोखा भरपूर.शांत समुद्रकिनारा, सुपारी नारळीच्या बागा, घनदाट वनराई, भरपूर पाऊस आणि मुख्य म्हणजे गावातली शांतता ही वसईची प्रमुख वैशिष्ट्ये. गावातले चर्च, तिथले फादर रविवारची प्रेयर, त्यानंतरचा मास म्हणजेच फादरचे प्रवचन आणि या सगळ्यासाठीचे आमंत्रण देणारी सुरेल स्वरातील घंटा याचे सार्‍या गावाला आकर्षण.
याच वसईमध्ये मारा जन्माला आली. घरात स्थानिक मराठी बोली बोलणारी मारा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल झाली. अभ्यासात फारसं लक्ष नसल्यामुळे हुशार असली तरी मार्क यथातथाच असायचे. पण आवाज मात्र अतिशय सुरेल आणि गोड. वर्गातली कविता असो किंवा चर्चमधली प्रार्थना मारा पुढे हवीच. तिच्या वडिलांचं छोटंसं स्टेशनरीचं दुकान होतं. ती एकटीच, पाठीवर भावंड नसलेली. आईवडिलांची लाडकी मुलगी. घरातली काम आवरून झाली की वडिलांना मदत करायला आईसुद्धा दुकानात जात असे. अर्थातच शाळेतून परत आल्यानंतरचे काही तास तरी मारा घरात एकटीच असे. टीव्हीला जोडणारी केबल येऊन अनेक प्रकारचे चॅनल सुरु होण्याचे ते दिवस होते. हिंदी व इंग्लिश गाण्यांचे चॅनल त्यावेळेला आकर्षक स्वरूपाचे व्हिडिओ दाखवत होते. ‘छायागीताच्या’ जुन्या जमान्यातील आईवडिलांना हे सगळे नवीनच होते. मारा बघत असलेला चॅनल दुकानातून दमून आलेली आई सुद्धा थोडा वेळ बघे. मग ती स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाकडे वळे. हळूहळू माराचे हे गाणे ऐकण्याचे वेड वाढतच गेले. टीव्हीचे वेड एकदा लागले की इतर काही सुचत नाही हेच खरे.
सारेगामा आणि इंडियन आयडॉल यांचा उदय त्याच काळात होत होता. छोट्या छोट्या गावातील नवीन नवीन चेहरे शोधून त्यांच्या आवाजातील गाणी आणि त्यांचे बदललेले रुपडे याचे आकर्षण भारतात गावागावात खोलवर पसरत चाललेले होते. अशात एक बातमी संपूर्ण गावभर पसरली की बोरिवलीला इंडियन आयडॉलची ऑडिशन होणार आहे. वसईच्या कोणालाही बोरिवली जवळ वाटायची, पण मुंबई फार दूर असायची. कारण साधेसे होते वसईहून गाडीने लागणारे मोठे स्टेशन बोरीवली. शाळेतील शिक्षक, चर्चचे फादर, माराचे आई वडील आणि मुख्य म्हणजे मारा स्वतः या सगळ्यांना ही एक पर्वणीच वाटली. ‘गाव की छोरी बोरीवली में जाकर नाम कमायेगी’ असे अनेकांच्या मनातही आले. झाले एकदाचे जायचे ठरले. मग त्यासाठीची जोरदार तयारी सुद्धा सुरू झाली. अनेकांनी कधी न ऐकलेला, माहितीसुद्धा नसलेला पियानो चर्चमध्ये हजरच होता. वायोलिन वाजवणारे दोघेजण गावात साथीच्या तयारीचे होते. माराच्या आवडीचे एक गाणे, पियानोच्या साथीवर वाजवल्या जाणार्‍या एका प्रसिद्ध गाण्याची नक्कल आणि नुकत्याच आलेल्या सिनेमातील एक गाजलेले गाणे यावर तयारी सुरू झाली. माराच्या गळ्यावर आणि घशावर ताण पडू नये याची काळजी घ्यायची असते, हे पण विसरून रोज जोरदार तालीम सुरू झाली.
माराने निवडलेली तीनही गाणी सुरेल आणि छान बसली होती. मारा पण खूप आनंदात होती. माराचे आई वडील त्या दिवशी जाण्यायेण्यासाठीच्या खर्चाच्या तजवीजींच्या मागे लागलेले होते. वसईमध्ये खाऊन पिऊन सुखी असलेले कुटुंब जरी असले तरी सुद्धा अचानक उद्भवणार्‍या अशा खर्चाला तोंड देण्याची त्यांची तशी श्रीशिल्लक कधीच नसे. माराला नवीन ड्रेस शिवला गेला. आकर्षक कालानुसार फॅशनची हेअर स्टाईल करून आणली. पार्लरमधे जाऊन चेहरा उजळला. मारा आरशात स्वत:ला पाहून चकित होईल, असा हा साज झाला होता. स्वप्ने पाहण्याचेच तिचे किशोरवय.
आणि अखेर तो दिवस उजाडला. शाळेतील गाण्याचे शिक्षक, आईवडील आणि मारा दिलेल्या वेळेच्या आधी एक तास बोरिवलीला पोहोचले. निवडीची पद्धत आधीच वर्षभर टीव्हीवर पाहिलेली असल्यामुळे त्याची सगळ्यांना कल्पना होती. तरी हॉलच्या बाहेरची गर्दी आणि कडक सुरक्षा बघून तिला भांबावायला झालेच होते. रीतसर फॉर्म भरून, नोंदणी झाल्यावर सगळेजण वाट पाहात थांबले. एकेक उमेदवार आत जात होता आणि पाच सात उमेदवार झाल्यावर एखादाच विजयाची आरोळी देत बाहेर येत होता. त्याची आरोळी ऐकून पुढच्या नंबराचा उत्साह जरी वाढत असला तरी निवडला गेलेल्या नंबरानंतर आपला नंबर आला, म्हणून धाकधूकही वाढत होती. जयपराजयाचा हा खेळ मन दडपून टाकणाराच. अनेक जण पंचविशीतले होते, तर मारा जेमतेम पंधराची.
असे करता करता दुपारचे तीन वाजले. पोटात कावळे ओरडत होते. मात्र नंबर येईतोवर बरोबर आणलेला डबा खायची कोणाचीच इच्छा नव्हती. सकाळपर्यंत उत्साहात असलेली मारा आता मनाने खूपच ढेपाळलेली, शरीराने दमलेली होती आणि तशातच तिच्या नंबरचा पुकारा झाला.
लांबलचक बोळकंडीवजा जेमतेम उजेडाच्या कॉरिडॉरमधून कोणीतरी तिला हाताला धरून आत घेऊन गेले. ही लांबलचक अंधारी वाट कधी संपेल असे वाटत असतानाच तिच्यावर एकदम दिव्यांचा झोत पडला. एवढा प्रखर उजेड तिने कधीच अनुभवला नव्हता. मात्र अंधुक उजेडात बसलेल्या एका परीक्षकांचा आश्वस्त आवाज तिने ऐकला. तरीही हातापायाला सुटलेला कंप व घशाला पडलेली कोरड काही कमी होईना. काही सेकंद आसपास कोण कोण उभे आहेत, काय चालले आहे, या कशाचाच तिला पत्ता लागत नव्हता. गोड शब्दात, समजुतीच्या शब्दात, प्रोत्साहन देणार्‍या आवाजात एका परीक्षकाने तिला आत्ता काय गाणार म्हणून विचारले तेव्हा ती थोडीशी भानावर आली. तिने मेहनतीने तयार केलेल्या तीन गाण्यातील पियानोवर बसवलेले गाणे तिला एकदम आठवले. त्याचे नाव तिने सांगितले.
माराचा व तिला गाण्याची तालीम देणार्‍या सगळ्यांचा एक मोठ्ठा आणि महत्त्वाचा गोंधळ झाला होता. तिला ऑडिशनमधे कसलीही वाद्याची साथ न घेता गाणे म्हणून दाखवायचे होते. टीव्हीवर असे कार्यक्रम पाहिले असले, तरी प्रत्यक्षात ही गोष्ट माराच काय, पण तिचे प्रशिक्षक पण विसरलेले होते. परीक्षकाने खूण केली तरी माराला सूरच सापडेना. स्वतःचाच आवाज एवढ्या बंदिस्त साऊंडप्रुफ खोलीमध्ये ओळखीचा वाटेना. मग घशात आवंढाही दाटून येऊ लागला आणि व्हायचे तेच घडले. गाण्याचे पहिले कडवे संपायच्या आतच परीक्षकांनी नकाराची कर्कश्श आवाजातील घंटा वाजवली. रडवेल्या माराला पुन्हा एकदा येण्यासाठी तोंडभरून (सांत्वनपर) शुभेच्छा दिल्या. बाहेर येताच भुकेची जाणीव झालेल्या माराने बरोबर नेलेला डबासुद्धा खायची इच्छा नाही असे सांगितले. माराने खायला नकार दिला तशी तिची अवस्था बघून सगळे तसेच उलट पावली वसईला परतले. समजूत तरी कोण कोणाची घालणार? सारेच खूप निराश झालेले.
नंतर मात्र सहसा घडू नये अशी एक वाईट गोष्ट घडली. ती म्हणजे माराने त्या दिवसापासून गाणे गायचेच सोडले. एवढेच नव्हे तर गाणी ऐकणे पण पूर्णपणे बंद केले. जसे की गाणे तिच्या जीवनातूनच संपले.गायब झाले म्हणा ना! तिला समजावण्याचे सगळ्यांचे प्रयत्न थकले. आईवडिलांनी, मैत्रिणींनी सुद्धा हात टेकले. यथाकाल माराची दहावीची शाळापण संपली. वसईमध्येच कला शाखेत तिने बारावी संपवली. जायचे म्हणून, शिकायचे म्हणून ती शिकत होती एवढेच. मार्क फार चांगले नसले तरी बारावीला तिला प्रथम वर्ग मिळाला होता. पुढे कुठे शिकायला जायचे? काय करायचे? पदवी कोणत्या विषयात? याच्याबद्दल घरात चर्चा चालू असताना चर्चचे फादर अचानक घरी आले. त्यांच्या कानावर घडलेल्या सगळ्या गोष्टी होत्याच. मारा कोणाचेही ऐकत नाही. गाणे तिने कायमचे सोडले आहे याचे त्यांनाही दुःख झाले होते. मात्र त्यांनी कोणाशीही न बोलता वेगळीच माहिती काढलेली होती. ती सांगून माराची पुढची शिक्षणाची सोय काय करता येईल याबद्दल काही गोष्टी मनाशी ठरवूनच ते तिच्या घरी आले होते. फादर घरी आल्याने आई-वडिलांना आनंद झाला होता. त्यांच्या दृष्टीने तो त्यांचा सन्मानच होता. माराच्या मनावर थोडेसे दडपण आले असले तरी सुद्धा बर्‍याच दिवसांनी चर्चमध्ये रविवारी प्रार्थनेच्या दरवेळी माराला पुढे बोलवणारे फादर आज घरी आले म्हणून तिलाही आनंद झालेला होता. पण ते कशासाठी आले आहेत याचा तिला अंदाज लागत नव्हता. माराच्या आईला बाबांनी चहा करायला सांगितला, तर फादरनी त्यांना थांबवले आणि आईला पण समोर बसायला सांगितले. सगळेजण समोर ऐकायला बसल्यानंतर प्रवचन देण्याच्याच सुरात फादरनी बोलायला सुरुवात केली. सहसा प्रवचनाचा सूर लावला तर समोरचे सगळे मन लावून ऐकतात असा त्यांचा अनुभव होता.
मुंबई विद्यापीठात कलिना येथील परिसरात ललित कलेतील पदवी देणारा एक अभ्यासक्रम चालतो. त्यात नृत्य, नाट्य, गायन, वादन या सर्व कलांमध्ये गती किंवा आवड असलेल्या कोणालाही प्रवेश परीक्षेला सामोरे जाऊन प्रवेश मिळतो. त्यानंतर यातील प्रशिक्षण घेऊन काही वर्षानी विद्यार्थी पदवीधर म्हणून बाहेर पडतो. आवडीच्या विषयातच प्रशिक्षण घेतल्यामुळे व अभ्यासाचे दडपण नसल्याने विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांगीण होत जाते. यासाठीचा सर्व खर्च चर्चतर्फे उपलब्ध असलेल्या गरजू हुषार मुलांसाठीचे निधीतून कसा मिळू शकेल याची मी काळजी घेईन असेही त्यांनी सांगितले. गाण्यातील प्रशिक्षण, तेही मुंबई विद्यापीठात राहून नामवंत गुरूंकडून गुरुकुल पद्धतीने शिकवले जाते, हे पण सांगायला फादर विसरले नाहीत. ही सगळी माहिती त्या तिघांना नवीन तर होतीच, पण मुंबईला जाण्याचे स्वप्न तिघांच्याही मनात कधीच नव्हते. गेली तीन वर्षं गाण्याचे नाव सुद्धा न काढणारी मारा हे सारे ऐकून चकित झालेली होती. तिने लगेच फादरना एकच प्रश्न विचारला,’ फादर पण मला गाणे जमेल का? गेल्या तीन वर्षांत मी अजिबात गायले नाहीये.’ फादरनी पटदिशी तिचे आवडते गाणे म्हणायची आज्ञाच दिली. तिचे सुरेल गाणे ऐकून तिघांचेही मन सहजगत्या मोहोरले. यानंतरची वाटचाल साधी सरळ, सरधोपट होती. मुंबई विद्यापीठाची ललित कला केंद्राची प्रवेश परीक्षा माराने उत्तम रीतीने पार पडली. तिला तेथील वस्तीगृहात प्रवेश मिळाला. चर्चतर्फे तिच्या शिक्षण खर्चाची व्यवस्था झाल्याने आई-वडिलांनी सुस्कारा टाकला होता. मुंबईच्या कॉसमॉपॉलिटन वातावरणात रुळण्याकरता तिला फार पंचाईत पडली नाही. गाण्याच्या सर्व नव्या जुन्या प्रकारात शिकताना तिचा सहभाग असे. जोडीला ललित नाटकांत छोट्या मोठ्या भूमिका करण्यातही ती सहज रमत गेली. पुस्तकी अभ्यासाचे दडपण कधीच गेले होते. तिच्यातील कलागुणांना सगळ्या अंगाने फुलवणारा हा अभ्यासक्रम चर्चच्या फादरनी शोधला व सुचवला त्याचे तिने यथार्थ सार्थक केले.
पदवी दरम्यानच मुंबईतील सुप्रसिद्ध पृथ्वी थिएटर व एनसीपीए या कला चळवळीचे केंद्र असलेल्या संस्थात तिचा पडद्यामागचा वावर सुरू झाला. पदवीनंतर एक दोन छोटी कामे मिळवून त्यातून कमाई सुद्धा सुरू झाली. एका चॅनलवरील मालिकेत तिला एक महत्त्वाची भूमिकाही मिळाली. भूमिका होती एका गाणार्‍या यशस्वी मुलीची. माराच्या गळ्यातील गाण्याने पुन्हा सूर पकडला होता.

तात्पर्य : कला क्षेत्रात वाटचाल खडतरच असते. मात्र स्पर्धेतील हार न मानता हवे ते करण्याची नेमकी दिशा सापडणे महत्त्वाचे असते. हातातील एखादी संधी गेली म्हणजे आकाश कोसळत नसते. ती संधी पुन्हा रीतसर प्रशिक्षणातून नक्की मिळते. अर्थात स्वतःमध्ये कलागुण नक्की हवेत. ते तुम्हालाच ओळखावे लागतात.

जेवण आणि करिअर

हेन्री फोर्डना एका इंजिनीयरला दोघातून निवड करायची होती. ऑफिसमध्ये बोलवण्याऐवजी त्या दोघांना घेऊन ते जेवायला गेले. सुंदरसे जेवण संपवताना त्यांनी एकाला सांगितलं, तू उद्या ऑफिस मध्ये कामाला ये. दुसर्‍याला मात्र जेवायला सोबत केल्याबद्दल धन्यवाद दिले. धन्यवादचा अर्थ कळून त्याने विचारले, ‘सर, एक प्रश्न विचारू शकतो का? तुम्ही मला का नाकारलेत? संपूर्ण जेवणाच्या काळात ना तुम्ही माझे कौशल्य विचारलेत, ना माझ्या कामाची माहिती घेतली, ना इंजीनियरिंगमधला एकही प्रश्न विचारलात. मग नाकारण्याचे कारण कळेल काय?’ अत्यंत शांतपणे फोर्ड यांनी उत्तर दिले. जेवण आल्यानंतर त्यात तू आधी चव न घेताच मिठाची चिमूट टाकलीस. समोर आलेली वस्तू न जोखताच त्यात दुरुस्ती करणारा मला आवडत नाही. दुसरी गोष्ट तू फक्त माझ्याशी अत्यंत नम्र होतास. पण वेटर्स आणि अन्य कर्मचारी यांची दखलसुद्धा घेतली नाहीस. या उलट तुझ्याबरोबरचा इंजिनियर दरवेळी प्रत्येकाला थँक्यू म्हणत होता. तुझे सर्व लक्ष फक्त माझ्याकडेच होते. साहेबाकडे लक्ष देणार्‍या अन् सहकार्‍यांकडे दुर्लक्ष करणारा सहसा अयशस्वी ठरतो असं माझं मत आहे. पुन्हा एकदा जेवणाला सोबत केल्याबद्दल तुला धन्यवाद देतो.
छोटी गोष्ट छोटासा प्रसंग, खूप मोठा धडा शिकवणारा.
मराठीत रूपांतरण केलंय सहज समजण्यासाठी, एका घडल्या प्रसंगाचे.

Previous Post

‘महाराष्ट्र केसरी’ची गर्जना ऑलिम्पिकमध्ये का घुमत नाही?

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

भाष्य

नाय नो नेव्हर…

January 27, 2023
भाष्य

किती नासाडी कराल रे अन्नाची!

January 27, 2023
भाष्य

आता नॉर्दर्न लाईट्स

January 27, 2023
भाष्य

कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

January 27, 2023
Next Post

टपल्या आणि टिचक्या

शिवसेना बनली हिंदू रक्षक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023

भविष्यवाणी २८ जानेवारी

January 27, 2023

अन हरवलेला सापडला…

January 27, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.