कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्श्युरन्स कंपनीने प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या दमदार सादरीकरणाने ‘मी फॉर माय सिटी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पाचव्या पर्वाची सांगता केली. या भव्य कार्यक्रमाला नामवंत कलाकार उपस्थित होते. देशभरातील निवडक लोकगायकांनी त्यात उत्तमोत्तम संगीत सादर केले.
‘मी फॉर माय सिटी’ सीझन-५ नोव्हेंबर २०२२ मध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आणि देशभरातील नवीन लोक आवाजांकडून प्रवेश मागविण्यात आले आणि त्यांना त्यांची प्रतिभा व लोकसंगीतावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
याप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन पुढे म्हणाले, ‘लोकसंगीत शतकानुशतके आपल्या समाजाचा एक भाग आहे. भाषेतील अडथळे दूर करून लोकांना एकत्र आणण्याच्या क्षमतेमध्येच लोकसंगीताचे सौंदर्य आणि वेगळेपण दडलेले आहे. संगीत हे त्याच्या निर्मात्यांच्या आणि कलाकारांच्या भावना, विश्वास आणि दृष्टिकोन दर्शविते. कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्श्युरन्सच्या भारतातील लोकसंगीताला बळकटी देण्याच्या उपक्रमाशी जोडले गेल्याचा मला खूप आनंद होत आहे.
यावेळी उपस्थित कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्श्युरन्सचे एम.डी. आणि सी.ई.ओ. अनुज माथुर म्हणाले, ‘समाजात सकारात्मकता आणण्यासाठी ‘मी फॉर माय सिटी’ उपक्रमाची कल्पना रचण्यात आली होती जेणेकरून जनतेला त्यांच्या पुढील जीवनात या विचारधारेशी नाते जोडता येईल आणि त्याचा प्रसार करता येईल. सीझन-५ सह, सर्व लक्ष भारतातील लोकसंगीतावर आहे, जे स्थानिक समुदायांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि संरक्षण करू देते. शंकर महादेवन यांच्यासारख्या देशातील उत्कृष्ट गायकांसोबत आम्ही काम करतो आणि एकत्रितपणे भारतातील प्रख्यात अशा लोकसंगीताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. स्वर धरोहर फाऊंडेशनसोबत आम्ही सहयोग साधल्याने स्थानिक कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्यास मदत होईल.
कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्श्युरन्सच्या मुख्य वितरण अधिकारी तरन्नुम हसीब, पुढे असे म्हणाल्या, ‘भारताच्या लोकसंगीताच्या वंशाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ‘मी फॉर माय सिटी’ माध्यमातून व्यासपीठ प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे आणि हे कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्श्युरन्सच्या आपल्या प्रियजनांना दिलेल्या आश्वासनांचे संरक्षण आणि पालन करण्याच्या ब्रँड तत्त्वज्ञानाची एक शक्तिशाली आठवण करून देते. सीझन ५ च्या माध्यमातून लोकसंगीताचा नवा आवाज सादर करून आणि त्यांची ओळख निर्माण करून आपल्या पारंपारिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा आमचा मानस आहे. भारतातील समृद्ध सांस्कृतिक संगीताची उब क्वचितच अनुभवायला मिळणार्या तरुण पिढीपर्यंत पारंपारिक लोकसंगीत पोहोचवण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.
‘मी फॉर माय सिटी’ सीझन-५ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि म्हणून कंपनीला भारतातील २९ राज्यांतून लोकसंगीताच्या नोंदी प्राप्त झाल्या. त्यात २० ते ३५ वयोगटातील १,८२७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. या शर्यतीत १,१३२ अर्जांसह उत्तर विभाग आघाडीवर होता आणि त्या पाठोपाठ अनुक्रमे पूर्व (२९६), दक्षिण (२१२) आणि पश्चिम (१८७) क्षेत्रांचा क्रमांक लागला होता.