ज्येष्ठ पत्रकार आणि ‘मार्मिक’ या लोकप्रिय व्यंगचित्र साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना नुकताच मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे स्वरुप असलेल्या या पुरस्काराचे वितरण उरुळी कांचन येथे डिसेंबरमध्ये होणार्या परिषदेच्या अधिवेशनात करण्यात येणार आहे. ‘दर्पण’कारांच्या नावाने दिला जाणारा हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात आला आहे.