साप्ताहिक ‘मार्मिक’चे ज्येष्ठ व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने हास्यरेषा अबोल झाल्याची भावना व्यक्त होतेय. आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकार बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यातच दराडे सरांचा नंबर लागतो. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात असलेल्या सत्यगाव या छोट्या खेड्यात जन्मलेल्या दराडे सरांनी बीड येथील कैलाश निकेतनमध्ये कला शिक्षण पूर्ण केले. स्व. एस. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या दराडे सरांचा हात पांढर्याशुभ्र कॅनव्हासवर फिरायला लागला की, जादुई रेषा आपल्याशी बोलू लागतात. रंगरेषांच्या जगात लोकांना घेऊन जाणारे दराडे सर हे कलासक्त कलंदर होते. ‘मार्मिक’मध्ये त्यांची व्यंगचित्रे नियमित प्रकाशित होत होती. दराडे सरांना साप्ताहिक ‘मार्मिक’च्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली…!!