बिल्कीस बानो
बलात्कार्यांचे करती स्वागत
खुन्यांनाही सोडती मोकाट
असले कसले गुजरात सरकार
सुप्रीमोंनीच मोडले पेकाट
स्त्री मुक्तीच्या मारती गप्पा
आक्रोश नाही माझा कळला
निगरगट्ट ते भाजप सरकार
नाही कुणाचा जीव कळवळला
न्यायदेवतेला बटीक बनवून
त्यांचे घेता अधिकार हाती
सुप्रीमांनीच न्याय देऊन
शेवटी खायला लावली माती
—– —– —–
एकनाथ शिंदे
आम्ही पाईक लोकशाहीचे
कशावरही आणू बंदी
हीच आमची सरकारशाही
आमच्यापुढे व्हा रे नंदी
त्यांचे किरीट किती सोज्वळ
फुकट त्यांची ती बदनामी
केवढे त्यांचे इडी कार्य
संकटकाळी येते कामी
आमच्यात आले, पवित्र झाले
कुणाचेही नाहीत फ्रॉड
सारे कसे सुरळीत आहे
त्यांच्याबद्दल लिहा ग्वाड
—– —– —–
राहुल नार्वेकर
शेवटी गद्दारांना जागलो
सुप्रीमवरती केली ताण
सगळे आधीच ठरले होते
लांबवत ताणला धनुष्यबाण
सुप्रीम कोर्टाच्याही वरचढ
मीच शहाणा होतो केवळ
उगाच केली नाटकं सारी
सत्यालाही आली भोवळ
तेव्हा वाटत होती मजा
आता पोटात आलाय गोळा
गद्दारांच्या भल्यासाठी
इमानाचा चोळामोळा
—– —– —–
किरीट सोमय्या
इडी नाचे माझ्या तालावर
मी पण करतो ता ता थैय्या
मला बघायला होते गर्दी
म्हणूनच म्हणतात किरीट सोमय्या
ढीगभर पुरावे गोळा करून
करतो इशारा जाता जाता
खर्या खोट्याची नसते पर्वा
सूड भावनेने पेटून येता
बोबड्या बोलांनी देतो मुलाखत
करमणुकीचा बनतो जोकर
नेहमीच मनात असते भीती
‘लोकशाही’ कधी देईल ठोकर
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
रेटून बोला, खोटे बोला
कधी मारावी उंच सिक्सर
संमेलनातील माझे नाटक
पाहून बोलती वाटतात फिक्सर
माझा अभिनय अगदी नामी
भल्याभल्यांना करतो गारद
कारण नसता काढतो खोड्या
म्हणून म्हणती कळीचा नारद
नवीन नाटक येतेय लवकर
हिरो होण्याची बघतोय संधी
दोन झिरोंना मागे सारून
मलाच मिळेल गोड गोड बुंदी