पाठीवर ‘स्टार’ असलेले कासव घरी ठेवणे भाग्यशाली समजले जाते. अशाच समजापोटी स्टार कासवांची अवैध विक्री वाढली आहे. वन्यजीव कायद्याप्रमाणे हे कासव दुर्मिळ प्राण्यांच्या वर्गात मोडतात आणि त्यांची विक्री किंवा जवळ बाळगणे हा गुन्हा समजला जातो. अंधेरीत असे स्टार कासव विकताना दोन जणांना वन विभागाने अटक केली.
अंधेरी (पूर्व) येथे शेख मोहम्मद दानिश अब्दुल रहीम (25), मोहम्मद नदीम जमील अहमद (23) हे स्टार कासव विकत असल्याची माहिती ठाणे वन्यजीव उप वनसंरक्षक यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वन अधिकाऱयांच्या पथकाने या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चार स्टार कासव जप्त करण्यात आले. त्यातील फक्त दोन जिवंत होते. त्यानंतर ते कासव वैद्यकीय तपासणीसाठी प्लॅण्ट अॅण्ड ऑनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) या संस्थेकडे सोपवण्यात आले.
सौजन्य- सामना