ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, मंगळ-बुध सिंह राशीत, रवि, शुक्र कर्क राशीत, मंगळ, बुध सिंहेत, प्लूटो, मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीमध्ये. विशेष दिवस : १७ ऑगस्ट निज श्रावण महिन्याची सुरुवात, २० ऑगस्ट विनायकी चतुर्थी, २१ ऑगस्ट नागपंचमी, २२ ऑगस्ट श्रीयाळषष्टी, २४ ऑगस्ट रोजी दुर्गाष्टमी.
मेष : तरुणांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. नोकरी-व्यवसायात किरकोळ वादांचा ताण घेऊ नका, गोडीत विषय मार्गी लावा. घरात समारंभ, धार्मिक कार्यांत मित्र, नातेवाईकांच्या भेटी घडतील. प्रेमप्रकरणात वाद टाळा. सामाजिक कार्याला वेळ द्याल. नव्या ओळखी होतील. चुकीचे काम अंगाशी येईल. सरकारी काम मार्गी लागेल. कलाकारांना मानसन्मान मिळेल. मनोरंजनात वेळ खर्च होईल. नवीन वास्तूचे योग आहेत.
वृषभ : विदेशात नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, एखादी शस्त्रक्रिया होऊ शकते. रागाच्या भरात उलट सुलट बोलू नका. तरुणांना यशदायक काळ आहे. नव्या नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी चांगला काळ. मनासारख्या घटना घडतील. दाम्पत्यजीवनात आनंद राहील. शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवा. सार्वजनिक ठिकाणी संयम ठेवा. नव्या संकल्पनांना आकार देताना घाई करू नका.
मिथुन : मनासारख्या घटना घडल्यामुळे घरात आनंद राहील. नोकरी-व्यवसायात चांगली फळे मिळतील. आर्थिक लाभ होतील. संसर्गजन्य आजारापासून सांभाळून राहा. व्यसनी मित्रांपासून लांब राहा. घरातल्या कटकटींकडे लक्ष देऊ नका. इनडोअर खेळ खेळणार्यांना चांगला काळ. ध्यानधारणेचा फायदा होईल. नोकरी-व्यवसायातील धावपळीचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका.
कर्क : घरात, सार्वजनिक जीवनात वाद घालणे टाळा. नवीन गुंतवणूक फायद्यात राहील. नोकरीत पुढे राहाल. वरिष्ठ खूष राहतील. प्रमोशन, पगारवाढ शक्य. व्यवसायात व्यवहारात पारदर्शकता ठेवा. नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. मौजमजेवर पैसे खर्च होतील. कलाकारांसाठी उत्कर्षाचा काळ. बोलताना-वागताना संयम ठेवा. धार्मिक कार्याच्या निमित्ताने बाहेरगावी जाल. विदेशात शिक्षणाच्या संधी चालून येतील. निर्णय घेताना चूक करू नका.
सिंह : अधिकचा लाभ मिळवण्यासाठी धावपळ करू नका. काहींना सुवार्ता कानावर पडतील. अनपेक्षित घटना घडू शकते. जुनी कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन लाभदायक जबाबदारी येईल. घरात, बाहेर विनाकारण वाद टाळा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. भाऊ-बहिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वाहन जपून चालवा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या : काम लक्षपूर्वक करा, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. आर्थिक बाजू सांभाळून घ्या. अवास्तव खर्च टाळा. इस्टेट एजन्ट, बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगला काळ. कोणत्याही ठिकाणी मध्यस्थी करताना योग्य काळजी घ्या. काहीजणांच्या बाबतीत निर्णय चुकू शकतात. बँकेची कामे मार्गी लागतील, पण कागदपत्रे पाहूनच सही करा. सोशल मीडियावर काळजी घ्या. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. देवदर्शनासाठी बाहेर जाल, मौल्यवान वस्तू जपा. नोकरदार मंडळींना चांगला काळ.
तूळ : तरुणांना नव्या संधी मिळतील. विवाहेच्छुकांची लग्ने जमतील. कौटुंबिक सहलीचे आयोजन होईल. धार्मिक कार्यामुळे नातेवाईक, जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. नोकरीत काळजीपूर्वक काम करा. वरिष्ठांना अरेला कारे करू नका. कोर्ट-कचेरीत यश मिळेल. व्यावसायिकांसाठी उत्तम काळ. नवा व्यवसाय सुरु होईल. आर्थिक नियोजनात काळजी घ्या. खेळाडू, कलावंतांना लाभदायक काळ. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक : नोकरीत कटकटीचे प्रसंग येतील. कामापुरते बोला आणि पुढे चला. डोक्यावर बर्फ तोंडात साखर हे तत्व ठेवा. मेडिकल व्यवसायात आर्थिक लाभ मिळवून देणारा काळ. तरुणांचे अडकलेले प्रश्न मार्गी लागतील. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. सासू-सुनामध्ये वाद होतील. मालमत्तेचे विषय मार्गी लागतील, घरात किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. सार्वजनिक जीवनात आपली भूमिका रेटू नका. सबुरीने घ्या.
धनु : आरोग्याची काळजी घ्या. घसादुखी, ताप अशा तक्रारी डोके वर काढतील. गुरूमुळे अनेक कामे मार्गी लागतील. सार्वजनिक जीवनात नियमाने चाला. घरात समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या, लगेच व्यक्त होऊ नका. सामाजिक कार्य करणार्यांना मानसन्मान मिळतील. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. नोकरीत कामासाठी बाहेर जावे लागेल. नव्या नोकरीसंदर्भात निर्णय घेताना आधी पूर्ण विचार करा आणि मगच त्यात पुढे जा.
मकर : नोकरी-व्यवसायात सबुरीने घ्या. व्यापारात काळजी घ्या, फसवणूक टाळा. नातेवाईक, मित्रांना विचारपूर्वक आर्थिक मदत करा. थकीत येणे वसूल होईल. खरेदी-विक्री व्यवसायात चांगला काळ आहे. कशातही मध्यस्थी करायला जाऊ नका. तीर्थाटन होईल. कामात आत्मविश्वास तगडा असेल तरच पुढे जा, नाहीतर थांबून पुढे जा. शिक्षक, संशोधकांसाठी उत्तम काळ आहे. जुना आजार बळावेल. काळजी घ्या.
कुंभ : आर्थिक बाजू भक्कम होईल्ा. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतात. सरकारी कर्मचार्यांना चांगला काळ. खानपानाच्या पथ्यात चूक करू नका. चटपटीत खाणे टाळा. पावसाळी वातावरणात पोटाचे विकार होऊ शकतात. नव्या वास्तूच्या संदर्भात चर्चा टाळा, कालांतराने निर्णय घ्या. शेअर, लॉटरीमधून चांगला लाभ होऊ शकतो.
मीन : कोणताही निर्णय संयमाने घ्या. घाई करू नका. आतापर्यंत अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. खिशात चांगले पैसे राहतील, पण अंदाधुंद पैसे खर्च करू नका. तरुण मंडळींसाठी चांगला काळ. नवे मार्ग सापडतील. नव्या गुंतवणुकीच्या मोहात पडू नका, फसगत होईल. नोकरीत तुमची बाजू भक्कम राहील. नव्या संधी चालून येतील. कुटुंबात ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. भावा-बहिणीच्या बरोबर वादाचे प्रसंग घडतील.