• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चार्ली चॅप्लिनचं आयुष्य मराठी रंगभूमीवर

- अ‍ॅडव्हान्स बुकिंग : नाटकवाला (द क्लॅप)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 17, 2022
in अ‍ॅडव्हान्स बुकिंग
0

मराठी रंगभूमीनं नेहमीच आशयघन नाटकांची परंपरा जपत नाट्यप्रेमींचं मनोरंजन केलं आहे. जिवंत अभिनय पाहण्याची मराठमोळ्या नाट्यरसिकांची हौस मराठी रंगभूमीवरील नाटकांनी नेहमीच भागवली आहे. कोरोनाकाळातही काही नाटकांनी रसिकांच्या मनोरंजनाचा वसा जपत आपलं काम चोख बजावलं आहे. रसिकांनीही अशा नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रवाहापेक्षा वेगळ्या नाटकांची निर्मिती करण्यात अग्रस्थानी असणार्‍या मिलाप ही नाट्यसंस्था एक नवे नाटक घेऊन येते आहे.
प्रत्येक खरा नाट्यकर्मी, रंगकर्मी वरच्या पायरीवर जाण्यासाठी कायम धडपडत असतो. त्यात कधी ठेचकाळतो, कधी थोडी माघार घेतो, कधी हवे ते साध्य करतो, तर कधी साध्य वाटत नसतानाही पलीकडे येऊन पोहचतो. मिलापमध्ये सगळे एकमेकांना हात देऊन हीच वाटचाल केली आहे. आता जागतिक पातळीवरील अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणार्‍या चार्ली चॅप्लिन या महानायकावर आधारित नाटक रसिकांसमोर सादर करण्याचं शिवधनुष्य मिलापनं उचललं आहे.
मिलाप, थिएटर टुगेदर, अस्तित्व, द बॉक्स आणि चार्ली स्टुडियोज या बॅनरखाली ‘द क्लॅप’ हे नाटक मुंबईत १९ मार्चला रात्री ८.०० वा. प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर येथे रंगभूमीवर आणण्याची योजना आखली आहे. या नाटकाच्या दृष्यसंकल्पनेची जबाबदारी प्रणव जोशी यांनी सांभाळली आहे. आपण सर्वचजण बालपणापासूनच चार्लीचे मूकपट पाहात आलो आहोत. केवळ संगीताच्या साथीनं चार्लीनं अभिनयाच्या बळावर असंख्य प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही त्याचे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांची करमणूक करत आहेत. त्याच्या आयुष्यावरील ‘द क्लॅप’ हे एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. वेगळं अशा अर्थानं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टी बर्‍याचदा समोर येत नाहीत. आपण काही घटना एकाच चष्म्यातून बघतो आणि त्या व्यक्तीबद्दलचं मत बनवतो. विशेषत: लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, ज्यांनी त्यांचं आयुष्य बदलतं. याच जोडीला त्यांच्याशी संलग्न असणार्‍या लोकांचंही जीवन पालटतं. चार्लीच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्या लोकांसमोर फार कमी आल्या आहेत. त्या गोष्टींमधून एक वेगळाच चार्ली आणि त्याच्याभोवतीची माणसं उलगडत जातात. चार्लीच्या आयुष्याचा हा प्रवास इंटरेस्टिंग आहेच, पण अजून बर्‍याच गोष्टी मनोरंजक आहेत, ज्या हे नाटक पाहताना रसिकांना अखेरपर्यंत बांधून ठेवतील आणि नाटक संपल्यावर ‘द क्लॅप’ म्हणजे टाळी आपसूक वाजेल.
चार्लीच्या ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्ससारखाच या नाटकालाही कृष्णधवल फील देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चार्लीचा ऑरा तयार करण्यासाठी तशा पद्धतीचे कॉस्च्युम्स आणि सेटसही डिझाइन करण्यात आले आहेत. डॉ. निलेश माने, स्वप्नील पंडित, नीरज कलढोणे यांनी ‘द क्लॅप’चं लेखन केलं आहे. या नाटकात पायल पांडे, सायली बांदकर, दुष्यंत वाघ, वर्धन कामत, सायली पुणतांबेकर, राहुल मुदगल, या कलाकारांच्या भूमिका आहेत. श्रुतिका वासावे यांनी वेशभूषा केली आहे.

Previous Post

ख-या खोट्याची गंमत

Next Post

राजगिरा : एक अमर सुपरफूड

Next Post

राजगिरा : एक अमर सुपरफूड

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.