नरेंद्र मोदी
सभा घेऊन पाय थकले
भाषणे करून तोंड सुकले
महाराष्ट्र पिंजून काढला
तरीही वाटते माझेच चुकले
असली-नकली वादामुळे
उगाच हात शेकून घेतले
मशालीची धग लागताच
सारे अंगावरच बेतले
तेव्हा माझी होती लाट
आता हाती येईल खाट
चार जूनच्या निकालातच
भाजपाची आहे ‘वाट’
—————
अमित शहा
मला वाटले महाराष्ट्राची
जनता आहे अगदी भोळी
आमचे म्हणणे मुकाट ऐकेल
सारे उतरवू तिच्या गळी
अंदाज ठरला अगदी खोटा
बाण उलटले आमच्यावरती
पाहून तिचा रुद्रावतार
हादरली ती पावन धरती
आमचेच नाणे मुळात खोटे
कसे चालेल या महाराष्ट्रात
गद्दारांच्या नादी लागून
करून घेतला आमचाच घात
—————
एकनाथ शिंदे
माझी टिमकी वाजवायला
धर्मवीरांवर काढला पिक्चर
खोटे नाटे सीन पाहून
जनतेला तर आली चक्कर
गद्दारीला क्षमा नाही
हा तर दिघे यांचा उच्चार
त्याला धाब्यावरती बसवून
आम्ही झालो पक्के गद्दार
धर्मवीरांचे नाव घ्यायची
आमची नाही मुळीच लायकी
आता मोदी मोदी गाऊन
धन्य झाली माझी गायकी
—————
देवेंद्र फडणवीस
मी काय काय बोलतो ते तर
माझे मलाच कळत नाही
एकसुरी ही ऐकून टॅवटॅव
जनता कशी पळत नाही?
मी पक्का राजकारणी
खर्या-खोट्याची नाही चाड
खोटेसुद्धा रेकून बोलतो
असत्याचे करतो लाड
पक्ष फोडण्यात, घरे फोडण्यात
माझ्यासारखा नाही हुश्शार
फोडाफोडी हाच धंदा
नाही राहणार कधीही बेकार
—————
अजित पवार
धाकधूक धाकधूक, पाकपूक पाकपूक
काळजात माझ्या होते धडधड
कुठेच लक्ष लागत नाही
आत्ता माझी थांबली बडबड
सगळी ताकद पणाला लावून
निवडणुकीचा केला गेम
कळेल बारामतीकरांचे
माझ्यावरती किती प्रेम
बाकी गेले तेल लावत
मला त्याची पर्वा नाही
चार जूनला कळेल त्यांना
मी दादा की डेंजर भाई