• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home इतर पंचनामा

पॅपिलॉन (भाग २)

- प्रसाद ताम्हनकर (पंचनामा)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 16, 2023
in पंचनामा
0
Share on FacebookShare on Twitter

‘तुझ्या डोक्यात काय शिजते आहे?’
‘सर, ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायचे तर कायद्याच्या कक्षेत न बसणारी अनेक कामे करावी लागतील, अनेक परवानग्या मागाव्या लागतील; ज्या वरिष्ठांकडून संमत होणे शक्य नाही.’
‘मग?’
‘आता ह्या खेळात पॅपिलॉनलाच उतरावे लागणार आहे सर..’ शांतपणे राजन म्हणाला आणि पुढे आपल्याला कोण कोणती परिस्थिती हाताळावी लागणार आहे ह्या काळजीने सिन्हांना घाम फुटला.
– – –
राजन तू इतक्या आत्मविश्वासाने बोलतो आहेस, म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी
प्लॅन शिजलेला आहे.’
‘प्लॅन असा काही नाहीये सर, फक्त थोडा थोडा एक अंधुक असा विचार मात्र चालू आहे. पोहोचायचे कुठे आहे आणि तिथपर्यंतचा प्रवास कसा असेल ते मात्र ठरत नाहीये.’
‘मला समजेल असे बोलशील का?’
‘सर, हुक्केरीकरची रशिया ट्रिप, त्याचे हॉटेल अबिदाला उतरणे आणि त्यानंतर घडलेला हा सायबर गुन्हा हा सगळा योगायोग नक्की नाही.’
‘म्हणजे हुक्केरीकर..’
‘त्याच्यावर संशय आहे. पण गंमत अशी आहे की, हुक्केरीकर कंपनीच्या खर्चाने रशियात सहलीला गेला होता आणि त्याचे
हॉटेल बुकिंग देखील कंपनीकडून झाले आहे.’
‘इंटरेस्टिंग…’
‘म्हणजे कंपनीला पूर्ण कल्पना होती की, हुक्केरीकर कुठे जाणार आहे. पण एक गोष्ट अजून विचित्र आहे…’
‘ती कोणती?’
‘आजवर, म्हणजे गेल्या आठ वर्षात स्वत: रायचंदसकट एकूण पाच जणांनी विविध काळात, वेगवेगळ्या वर्षात कंपनीच्या कामासाठी रशियाचा दौरा केला आहे.’
‘मग त्यात विशेष काय आहे?’
‘प्रत्येकवेळी हा प्रत्येक माणूस मॉस्कोच्या ‘फोर सीझन’ हॉटेलला उतरलेला आहे. मग ह्यावेळीच ‘अबिदा हॉटेल’ का? आणि ते देखील मॉस्कोपासून ९७ किलोमीटर लांब असलेले?’ राजनच्या माहितीने आता सिन्हा देखील बुचकळ्यात पडले होते. राजन योग्य दिशेने चालला आहे ह्याची त्यांना खात्री पटायला लागली होती.
‘तू सुरुवात कुठून करणार आहेस?’
‘हुक्केरीकर, श्रीधर आणि खुद्द रायचंदचे फोन्स..’
‘रायचंद इज ए टायकून आणि त्यात राजकीय वरदहस्त लाभलेला माणूस आहे. त्याची परवानगी मिळणे अशक्य आहे. श्रीधर आणि हुक्केरीकरच्या मोबाइल रेकॉर्डसाठी
मी वरती शब्द टाकून बघतो. पण इतक्या मोठ्या उद्योगाचे अधिकारी असलेल्या लोकांची हेरगिरी करण्याची परवानगी मिळणे..’
‘नो वरीज! मग आपण सरळ प्लॅन बी राबवायचा.’
‘म्हणजे पॅपिलॉनला मैदानात उतरवायचे?’
‘अगदी बरोबर!’
‘पण त्याला तर तू ऑलरेडी मैदानात उतरवले आहेस ना? उगाच इतकी माहिती मिळाली का तुला?’ मिश्किलपणे सिन्हा म्हणाले आणि राजन खदखदून हसायला लागला.
‘वेल जोक्स अपार्ट… राजन कुठल्याही परिस्थितीत ही केस लवकरात लवकर सोडवायला लागणार आहे. आता हा फक्त रायचंद ग्रुपचा विषय उरलेला नाही. जणू काही देशाच्या सुरक्षेवर हल्ला झाला आहे, देशाला भरभराटीपासून रोखण्याचा हा प्रयत्न आहे, अशी देशभावना बनायला लागली आहे. दबाव वाढत चालला आहे.’
‘तुम्ही काळजी करू नका सर. मी माझे संपूर्ण ज्ञान पणाला लावतो आहे.’
‘पण काळजी घे. उद्या कुठे काही चूक झाली, तर मी देखील तुला वाचवू शकणार नाही.’
‘नक्की सर!’ राजनला बेस्ट लक देऊन निघताना सिन्हा अगदी शांत भासत असले, तरी त्यांच्या मनावर प्रचंड ताण आलेला होता. खुद्द पंतप्रधान कार्यालय सतत अपडेट मागवून घेत होते, म्हणजेच उच्च पदावरील अनेक व्यक्ती ह्या तपासावर लक्ष ठेवून होत्या हे नक्की. त्यात आपण राजनला प्रâी हँड दिलाय. त्याची एक चूक आणि आपल्या ३० वर्षाच्या करिअरची एक क्षणात माती…
पुढचे १२ तास प्रचंड धावपळीचे होते. विविध खात्यांकडून विविध परवानग्या मिळवणे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळणी, दोन खात्यांमधला आड येणार बेबनाव, वरिष्ठांचे इगो असे सगळे काही सांभाळत सिन्हा तपासाचा घोडा पुढे दामटवत होते. पण फारसे असे काही अजून हाताला लागत नव्हते.
तिकडे राजन देखील झपाटल्यासारखा काम करत होता. प्रत्येक शंका, प्रत्येक संशय पुन्हा पुन्हा तपासून घेत होता. रायचंदचा डाटा सर्व्हर तर त्याने १०० वेळा उलथा पालथा घातला होता, पण कुठे काही पुरावा हाताला लागत नव्हता. आता राजनने मेन सर्व्हरला कनेक्ट असलेला प्रत्येक कॉम्प्युटर, प्रत्येक सिस्टिम तपासायला सुरुवात केली. सगळे नॉर्मल होते. अखेर भरपूर वेळ वाया घालवल्यावर राजनने हुक्केरीकर, श्रीधर आणि रायचंद ह्या तीन लोकांवर आपले लक्ष केंद्रित केले. बिंगो!! राजनच्या हाताला एक छोटा दुवा लागला होता.
‘सर एक छोटासा पण बहुदा महत्त्वाचा ठरेल असा दुवा हाताला लागला आहे.’
‘बोल बाबा बोल.. तरसले होते कान.’ राजनची माहिती ऐकून त्यांना घामच फुटला. त्यांनी सरळ त्याला युनिटच्या हेडसमोर नेऊन बसवले. तिथेच गृह मंत्रालयातील काही अधिकारी देखील उपस्थित होते. राजनने बोलायला सुरुवात केली.
‘सर, हा हुक्केरीकर रशियाला जायच्या एक महिना आधी त्याने मोबाइलवरून एका ईमेल अकाउंटला लॉग इन केले होते. हे ईमेल अकाउंट त्याने ह्यापूर्वी किंवा त्यानंतर पुन्हा वापरलेले नाही. मी हे खाते हॅक करून तपासले, मात्र खात्यात एकही ईमेल आलेली नाही किंवा पाठवली गेलेली नाही. विशेष म्हणजे ह्या खात्यात फक्त एकाच दिवशी हिंदुस्तानातून लॉग इन करण्यात आलेले आहे. तर इतर सर्व वेळी नायजेरिया देशातून लॉग इन करण्यात आले आहे, अर्थात प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्यात आलेला आहे. जसे दुबईवरून आणलेले सिम कार्ड वापरून मुंबईतून कोणाला फोन केला, तर तो दुबईवरून आल्याचेच भासते, साधारण तोच प्रकार.’
‘त्या ईमेल खात्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध आहे?’
‘सर, ज्या दिवशी हे खाते आपल्या देशातून उघडले गेले, अगदी त्याच दिवशी हे खाते पुढच्या दोन तासांत नायजेरिमधून उघडले गेले. दोन तासांत हुक्केरीकर इथून नायजेरियात पोहोचणे शक्य नाही. म्हणजेच हे एक खाते दोन लोक दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून वापरत आहेत.’
‘पण हे सर्व कशासाठी मिस्टर राजन? कारण ह्या खात्यात एकही ईमेल आलेली नाही किंवा गेलेली नाही,’ गृहखात्याला आता वेगळाच प्रश्न पडला होता.
‘ड्राफ्ट थेरपी’ म्हणतात सर ह्याला.
हॅकर्स, दहशतवादी, बेकायदा काम करणारे लोक कायम सावध असतात. आजच्या पुढारलेल्या तंत्रज्ञानाने एकमेकांना पाठवलेले ईमेल, मेसेजेस सहज ट्रॅक होऊ शकतात किंवा सुरक्षा यंत्रणांच्या हातात पडू शकतात हे त्यांना माहिती असते. त्यामुळे ते हा खेळ खेळतात. आपण ईमेल पाठवताना तो टाईप केला आणि पाठवलाच नाही, तर तो आपल्या खात्यात ड्राफ्ट म्हणून सेव्ह होतो. आता ज्याच्यासाठी हा गुप्त संदेश असतो, तो दुसर्‍या ठिकाणी हे खाते उघडतो आणि ड्राफ्ट वाचून डिलिट करतो. कुठलाही माग न सोडता एकमेकांना संदेश देण्याची प्रक्रिया पार पडते.’
‘म्हणजे हुक्केरीकरने जे खाते उघडले होते ते..’
‘येस सर. ते खाते अशाच कामासाठी वापरले गेले, अशी माझी पक्की खात्री आहे.’
‘पण ह्या सर्वांतून सिद्ध काय होणार आहे?’
‘सर, ज्या प्रकारे ही खाते हाताळण्यात आले त्यावरून मी ठामपणे सांगतो हे काम चायना ग्रुपचे नाही, तर येमेनमधला एक सायबर हॅकर्सचा ग्रुप आहे. चायनाचे यिन-यँग हॅकर्स संदेश पोहोचवण्यासाठी ऑनलाईन गेमची मदत घेतात. हुक्केरीकरने ती ईमेल वापरणे, त्याचे रशियाला जाणे आणि अबिदामध्ये उतरणे हा योगायोग नाही. त्याचे आणि ह्या हल्ल्याचे धागे नक्की जोडलेले आहेत.’
‘गुड वर्क मिस्टर राजन, पण हे सर्व कशासाठी? आणि ते सिद्ध कसे करणार आपण?’
‘सर, एका महिन्यापूर्वी म्हणजे हुक्केरीकर रशियाला जाऊन आल्यावर मेन सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि त्याच्या जागी दुसरे युनिट लावण्यात आले. पहिल्या युनिटला जोडलेल्या सर्व सिस्टिम पुन्हा नव्याला जोडण्यात आल्या, फक्त एक सिस्टिम सोडून, रायचंद साहेबांचा लॅपटॉप.’
‘सो?’
‘हा लॅपटॉप फक्त पंधरा दिवसांसाठी जोडण्यात आला होता आणि नंतर तो अचानक काढून टाकला. आधी कुठेही गेले तरी केबिनमध्येच रायचंद लॅपटॉप ठेवत. मात्र आता ते जातील तिथे हा लॅपटॉप त्यांच्याबरोबर असतो.’
‘त्यात विशेष काय आहे?’
‘तेच तर मला शोधायचे आहे सर.’
‘यू मीन… नो वे! आर यू आऊट ऑफ युवर माइंड राजन? सिन्हा डोके फिरलंय का ह्याचं?’
‘सर, आपण त्यांना विनंती..’
‘कशाच्या भरवशावर? तुमचा लॅपटॉप तपासायला द्या, कारण आम्हाला तुमचा संशय येतोय असे सांगायचे? आपण एखाद्या संशयित लॉटरी सेंटरवाल्याशी डील करत नाहीये. सिन्हा जरा समजवा ह्याला. तुमची दोन आणि माझे एक वर्ष उरलंय रिटायरमेंटसाठी. सुखाने जगू दे बाबा.’
हेड ऑफिसमधून बाहेर पडताना राजन आणि सिन्हा दोघेही विचारमग्न होते. हे असे घडणार त्याचा त्यांना अंदाज होताच, पण इतक्या ठामपणे नकार मिळेल असे वाटले नव्हते. नुसता नकारच नाही तर लवकरच दिल्लीवरून चार मोठे ऑफिसर केस हाताळायला येणार आहेत, त्यांना सहकार्य करा, असा आदेश देखील मिळाला होता.
‘राजन, कसला विचार करतो आहेस?’
‘सर, जे चित्र दिसतंय त्यापेक्षा ते प्रचंड वेगळे आहे. हे सगळे इतके साधे, सोपे आणि सरळ नाहीये. खुद्द रायचंद यांच्या संमतीने हे सर्व घडत असेल, जर ते स्वत: हे सर्व घडवत असतील तर का आणि कशासाठी? इतके मोठे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळत असताना ते असा स्वतःच्या पायावर धोंडा का पाडून घेतील? हुक्केरीकर, श्रीधर ह्यांचा काही डाव असेल तर तो असा काय असणार आहे? दोघेही गेली वीस बावीस वर्षे रायचंद ग्रुपला जोडलेले आहेत. मानमरातब, प्रचंड पैसा पायाशी लोळण घेतो आहे. माझ्या अंदाजाने कंपनीचे काही शेअर्स देखील दोघांकडे आहेत. मग हे सर्व कशासाठी?’
‘माझे डोके देखील सुन्न झाले आहे राजन. ही केस इतकी विचित्र वळणे घेत आहे की गरगरायला होते आहे.’
राजन सुन्नपणे समोरच्या लॅपटॉपकडे पाहत बसला होता. सुवर्णसंधी वाटलेली केस भलतीच गाठ मारून ठेवणारी निघाली होती. त्यात आता नवीन ऑफिसर्स येणार. जवळजवळ ही केस त्याच्या हातातून गेलेली होती. कीबोर्डवर बोटे आपटत विचारांच्या नादात त्याने गूगलवर रायचंद इंडस्ट्री टाइप केले आणि समोर आलेली पेजेस तो चाळू लागला.
‘रायचंद ग्रुपचे मोठे यश, संरक्षण क्षेत्रात रशियाबरोबर अभूतपूर्व करार, रायचंद ग्रुपचे सर्वेसर्वा रायचंद लवकरच विमान क्षेत्रात उतरणार, रायचंद शेअरचे भाव उसळले. रायचंद ग्रुपच्या बातम्यांनी सगळे भरलेले दिसत होते. देशात सगळीकडे सध्या फक्त रायचंद ह्या एकाच नावाची चर्चा होती आणि त्या नावासाठी सहानुभूतीची लाट देखील. रायचंद शेअरचे वाढते भाव तेच तर दाखवत होते. बातमी वाचता वाचता राजन उठला आणि एकदम खाली बसला. त्याने पटापट रायचंद डायनॅमिक्स शेअरच्या महिन्याभराच्या चढउताराची माहिती शोधून काढली आणि तो ती अभ्यासायला लागला. गेल्या महिन्यातच नाही, तर त्याच्या आधीपासून म्हणजे दोन महिन्यांपासून रायचंद डायनॅमिक्सच्या शेअरची घसरण चालू होती. रशियाबरोबरच्या करारानंतर ती काही दिवस थांबली पण पुन्हा घसरणीला सुरुवात झाली होती. गेल्या दोन दिवसात मात्र शेअरने पुन्हा उड्डाण केले होते. झपाटलेल्या राजनने आता सर्वच्या सर्व बातम्या वाचायला घेतल्या. अगदी मन लावून तो एकेक शब्द चाळत होता. पंधराव्या पानावर त्याला एका छोट्या रशियन ब्लॉगची लिंक मिळाली, मात्र तो ब्लॉग पूर्ण रशियन भाषेत असल्याने त्याला ते ट्रान्सलेट करून वाचावे लागले. रायचंदसंबंधीच्या लेखाची शेवटची ओळ वाचून त्याने संपवली आणि एखाद्या मवाल्यासारखी बेभानपणे शिट्टी वाजवून तो मोकळा झाला.’
‘हॅलो सर…’
‘राजन अरे पहाटेचे तीन वाजलेत रे बाळा…’
‘वेळ काळ सोडा सर. दोन अत्यंत महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहेत.’
‘बोलत राहा..’
‘रायचंद आणि रशियन कंपनीमध्ये झालेल्या कॉन्ट्रॅक्टची पूर्ण माहिती मला हवी आहे आणि दुसरे म्हणजे रशियात पूर्वी कामाला असलेला आणि तुमच्या ओळखीतला एक निवृत्त राजदूत, ज्याचे तिथल्या जुन्या सैन्य अधिकार्‍यांशी चांगले संबंध असतील.’
‘तुझ्या डोक्यात काय चालले आहे सैताना? ही कामे काय तुला सहज पॉपकॉर्न खाताना करण्याएवढी सोपी वाटली का?’
‘सोपी नाहीत म्हणून तर तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. प्लीज सर, आपण ही केस सोडवण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. उद्या कदाचित तुमच्याकडे ह्या केसचा चार्ज देखील नसेल. सो प्लीज सर.. बी फास्ट..’
राजनच्या विनंतीने सिन्हा चांगलेच विचारात पडले. राजन उगाच धरसोड वागणुकीचा अधिकारी नव्हता. थोडासा उतावळा होता, पण समंजस देखील होता. त्यांनी खूप विचार केला आणि हे धाडस करायचे ठरवले. पहिला फोन त्यांनी केला गृह मंत्रालयातील आपल्या खास दोस्ताला आणि दुसरा फोन होता त्यांचे गुरु आणि आता निवृत्त झालेले माजी राजदूत नरसय्या रमण यांना.
– – –
मीटिंग हॉलमध्ये प्रचंड शांतता पसरलेली होती. गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, आणि सैन्य दलातील प्रत्येकी एक अधिकारी व्यक्ती आणि त्यांच्यासमोर उभा असलेला राजन. सगळे थोडे स्थिरसावर झाले आणि राजननी आपले नाव, आपला हुद्दा यासंदर्भात माहिती देत केसकडे वळण घेतले.
‘वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तुमच्या प्रत्येक विभागाला मी इथे येण्याची विनंती केली, कारण ज्या केसवर मी काम करतो आहे, त्यासंदर्भात मला प्रचंड धक्का देणारी काही माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीचा तुमच्या प्रत्येक विभागाशी संपर्क येत असल्याने, आमच्या वरिष्ठांनी तुम्हा सर्वांना इथे येण्याची विनंती केली. तुमच्या वेळेचे महत्त्व जाणून मी लगेच विषयाला हात घालतो.’
‘रायचंद इंडस्ट्री ही देशातील एक मातब्बर संस्था. अनेक शाखा, उपशाखा असलेल्या ह्या ग्रुपचा कारभार देश विदेशात देखील पसरलेला आहे. अशा महत्त्वाच्या उद्योगाचा एक भाग असलेल्या इतर तीन उद्योगांच्या सर्व्हरवर हल्ला होणे, कंपनीची महत्त्वाची माहिती चोरीला जाणे हे अत्यंत गंभीर प्रकरण होते. आमचे संपूर्ण युनिट रात्रीचा दिवस करून ही केस सोडवण्याचा प्रयत्न करत होते. जसे जसे खोल शिरत गेलो, तसे तसे ही केस किती गुंतागुंतीची आहे याचा अंदाज येत गेला. एका क्षणी रायचंद ग्रुपची माहिती चोरीला गेलेलीच नाही किंवा खुद्द कंपनीने ह्या चोरीत सहभाग घेतला आहे, ह्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आणि पुन्हा गोंधळ उडाला. जर हे सत्य असेल तर असे करण्याचे कारण काय? कंपनीचा फायदा काय? प्रश्न सुटता सुटत नव्हते आणि अचानक माझ्या वाचनात एका निवृत्त रशियन सैन्य अधिकार्‍याचे लिखाण आले आणि हा झालेला सर्व गुंता सोडवायला मोठी मदत मिळाली.’
‘नक्की काय घडले आहे मिस्टर राजन?’
‘सर एखादी कंपनी किंवा तिचा मालक ह्यांची श्रीमंती कशावर ठरते? ती ठरते कंपनीच्या शेअरच्या किमतीवर. हा सगळा खेळ आहे शेअरचा. रायचंद ग्रुप्सच्या शेअरमध्ये आणि विशेषतः रायचंद डायनॅमिक्सच्या शेअरमध्ये घसरण थांबता थांबत नव्हती. रशियन कंपनीशी केलेला नवा करार देखील ही पडझड थांबवू शकत नव्हता. अशातच रायचंद ग्रुपला विमान उद्योगात उतरायचे होते. प्रचंड मोठी गुंतवणूक लागणार होती. शेअरचे भाव असेच पडत राहिले तर बँका देखील कर्ज देताना दहा वेळा विचार करणार होत्या. अशावेळी कंपनीचे त्रिदेव म्हणवले जाणारे रायचंद, श्रीधर आणि हुक्केरीकर ह्या तिघांनी एक नामी शक्कल लढवली. रशियन कंपनीशी झालेल्या कराराला प्रचंड प्रसिद्धी देण्यात आली. रायचंद म्हणजे जणू देशभक्त, देशाला भरभराटीकडे नेणारा उद्योगपती असे चित्र तयार केले जायला लागले. हे चित्र ठळक होऊ लागताच हा सायबर हल्ल्याचा प्लॅन पार पाडण्यात आला आणि जनभावना खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले. जणू देशावर सायबर हल्ला झाला असे चित्र निर्माण करण्यास सुरुवात झाली.’
‘ह्या सगळ्यामागे एक कारण आणखी होते, ते म्हणजे रशियातील एका पत्रकाराने आपल्या ब्लॉगमध्ये असा दावा केला होता की, रायचंद ग्रुप बरोबर झालेल्या करारात ज्या इतर काही देशातील छोट्या कंपन्या होत्या, ज्यांना रायचंद कच्चा माल व इतर मालाची ऑर्डर देणार होती, त्या सगळ्या कंपन्या रायचंद व त्याच्या नातेवाइकांच्या नामधारी कंपन्या होत्या. अर्थात ते काही फारसे चर्चेत आले नाही आणि पुढे हा ब्लॉग देखील नाहीसा झाला. मात्र ह्या बातमीचा उल्लेख एका रशियन निवृत्त सैन्याधिकार्‍याने चार ओळीत आपल्या ब्लॉगवर केला होता, तो मला मिळाला. त्यानंतर मी ह्या कराराच्या मदतीने त्या कंपन्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व कंपन्यांचे वय अवघे चार ते सहा महिन्यांचे आहे.’
‘मिस्टर राजन तुम्हाला असे सुचवायचे आहे की, ह्या कंपन्याच्या आडून..’
‘अगदी बरोबर सर. करारात मिळालेला पैसा ह्या कंपन्यांकडे हस्तांतरित करायचा आणि त्या कंपन्यांना तो पैसा रायचंद ग्रुप्सच्या शेअर्समध्येच गुंतवायला लावायचा. ह्या प्रचंड गुंतवणुकीमुळे शेअर्सचे भाव गगनाला भिडणार अन शेअरची प्रचंड ताकद पाहून एव्हिएशन अर्थात विमान वाहतूक व्यवसायासाठी बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध होणार आणि मुख्य म्हणजे नव्या व्यवसायाचे शेअर्स देखील धूमधडाक्यात विकले जाणार.’
राजनने आपले बोलणे संपवले आणि प्रत्येक अधिकारी एकही शब्द न बोलता सुन्नपणे बाहेर पडला. फक्त राजनला माहिती होते, ही वादळापूर्वीची शांतता आहे…

(समाप्त)

Previous Post

मी परीक्षार्थी…

Next Post

त्यांना पत्र लिहायला सांगू नका…

Related Posts

पंचनामा

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023
पंचनामा

कार्ड फ्रॉडची गोष्ट

March 9, 2023
पंचनामा

‘लोन फ्रॉड’पासून सावधान!

February 24, 2023
पंचनामा

इंद्रजाल

February 16, 2023
Next Post

त्यांना पत्र लिहायला सांगू नका...

पोक्याचं स्वप्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.