पुणेकर
जगतापना एक न्याय
टिळकांना दुसरा
बहुजन मतांसाठी
त्यागालाच हादरा
जिथे मते, तिथे नेते
ही भाजप-नीती
जात-पात राजकारणाची
किती ही अधोगती
टिळक घराण्याची
नाही यांना कदर
मुक्ताताई होत्या
कसब्याच्या मदर
—– —– —–
विरोधी पक्ष
इलेक्शन बिनविरोध करा
भाजपने दिली हाळी
नाहीतर आहे नक्की
पडायची पाळी
ब्राह्मण वर्ग कोपला
तोच शिकवील धडा
भाजपच्या पापांचा
भरत आहे घडा
बहुजन मते पाहून
यांचे फिरले डोळे
सरशी तिथे पारशी
तोंड करील काळे
—– —– —–
एकनाथ शिंदे
आव्हान स्वीकारण्याची
मला वाटते भीती
पडलो तर अब्रूची
साफ होईल माती
झोपेत सुद्धा सच्चे
शिवसैनिक दिसतात
माझे चाळे पाहून
फिदीफिदी हसतात
मोदी माझे देव
भाजप जणू पिता
ठाण्याच्या दादाला
तरी मिळतील लाथा
—– —– —–
नरेंद्र मोदी
मित्रासाठी माझ्या
देश वेठीस धरला
अदानीच्या कर्माने
जीवच थरथरला
तरी घाबरत नाही
देश त्याने लुटला
आमचेही तेच काम
तो तर सुसाटला
करू त्याची पाठराखण
निर्दोषित्व सिद्ध
त्यालाच मोठे करण्यास
मी वचनबद्ध
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
सरकारचे दिवस भरले
सारेजण बोलतात
किती टेकू लावणार मी
दाढीवाले डुलतात
माझ्या मार्गात बघा
कसली ब्याद आली
सोडून चालत नाही
पंचाईतच झाली
गोची झालीय माझी
सत्ता भोगताना
पुन्हा अंधार होणार
पडदा पडताना