• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home कारण राजकारण

चिखल पॉलिटिकल

- खणखणपाळ (अराळ-फराळ)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 16, 2023
in कारण राजकारण
0
Share on FacebookShare on Twitter

शके १९४४च्या फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे आज. महाशिवरात्रीचा दिवस. सूर्योदय झालेला आहे. मुँह में राम, बगल में अदानी घेऊन भगवी वस्त्रे धारण केलेला एक भोळा-भाबडा चौकीदार गंगा नदीच्या दिशेने झपाझप चाललेला आहे. भगव्या छाटीवर उडालेले चिखलाचे असंख्य डाग गंगेच्या पाण्याने धुऊन निघतील, मनातील सगळी घाण धुतली जाईल आणि मग पवित्र तन-मनाने महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला निवांतपणे करता येईल, या हेतूने तो गंगेकडे निघाला आहे. अधून-मधून तो थबकतो- दाढीत हात फिरवतो- मागे वळून बघतो आहे- एखादा तरी फोटोग्राफर आपल्या मागे असेल म्हणून. पण त्याच्यामागे कोणीही नाहीय. गंगास्नानाच्या आणि महाशिवरात्रीच्या पुण्यात कोणीही वाटेकरी होऊ नये म्हणून त्यानेच तर एकट्याने गुपचूप ही योजना आखलेली आहे आणि म्हणूनच त्याच्या मागे त्याच्या पापातले वाटेकरी, सुरक्षारक्षक, फोटोग्राफर कोणीही नाहीयत. आणि ते बरंच आहे. तो एकटा सर्वांना पुरून उरणार आहे. या देशात लाखो राष्ट्रभक्त आहेत, पण चौकीदाराला सर्वश्रेष्ठ राष्ट्रभक्त म्हणून अमर व्हायचंय. तो सगळ्यांच्या राष्ट्रभक्तीलाही पुरून उरणार आहे. पहा पहा- राष्ट्रभक्तीच्या गर्वाने फुगून त्याची ५६ इंची छाती आता ७६ इंची झालेली आहे.
चालता-चालता ९ फेब्रुवारीला राज्यसभेत आपण केलेली जबरदस्त भाषणबाजी तो आठवतो आहे. किती घोषणा दिल्या त्यांनी- `अडाणी दडाणी भाई भाई’ काय म्हणाले, तानाशाही नही चलेगी’ काय म्हणाले, सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन `जेपीसी’ चाहिये म्हणून काय बोंबलत राहिले- मग शेवटी मला चायवाल्याचा औकातीवर येऊन भाषणाची गरमागरम चाय फेकावीच लागली त्यांच्या अंगावर- कीचड उनके पास था, मेरे पास चाय/ जो भी जिसके पास था, हायऽ हायऽ हायऽऽ। यापूर्वी का थोडा चिखल उडवला माझ्या अंगावर त्यांनी? राफेल झालं, पेगॅसस झालं, गोध्राचं भूत पुन्हा बाहेर काढलं, पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली म्हणून धिंगाणा घातला, नोटबंदीवर बोंबा मारल्या- अरे बोंबलत रहा हवे तेवढे- जोवर माझ्या देशभक्तीच्या दुकानात गिर्‍हाईकांची गर्दी आहे तोवर मी (कुणालाही) घाबरत नाही- सुप्रीम कोर्ट, सीबीआय ईडी, इलेक्शन कमिशन सगळ्यांना मी एकता पुरून उरलोय लक्षात ठेवा-
पोचला- तो दाढीवाला चौकीदार गंगेवर पोहोचलेला आहे. आता तो गंगेत डुबक्या मारेल आणि `हरहर महादेवऽऽ’ `ओम नमः शिवाय’ म्हणत महाशिवरात्रीची सुरुवात करेल. अरेच्चा! पण त्याच्या मुखातून उंच आवाजात `हरहर नेहरुऽऽ’ `ओम नम: गौतमय’ अशा घोषणा का बाहेर पडतायेत? हे असं का होतंय, त्याला कळत नाहीय. पण ही प्रत्यक्ष शिवशंकराचीच इच्छा असावी, असं मानून तो डुबक्या मारतोच आहे. भगवान शंकराची रूपमुद्रा डोळ्यांसमोर आणण्याचा तो प्रयत्न करतोय, पण त्याच्या डोळ्यासमोर सारखे श्री श्री रविशंकर येत आहेत. हुश्श! अंघोळ तर आटोपली. छे छेऽऽ गंगास्नान आटोपलं. चौकीदार पाण्याबाहेर येऊन काठावर उभा राहून पाहतो, तर काय- चक्क रामदेवबाबा पतंजलीचं शिवलिंग हातात घेऊन त्याच्या स्वागताला सिद्ध आहेत. `महाराज आप अब शिवलिंगपर अभिषेक करेंगे ये मुझे मालूम था- आपके इधर-उधर ढूंढने की जरूरत नही. ए स्पेशल शिवलिंग सिर्फ आपके लिए पतंजलीने तैयार किया है-‘
रामदेवबाबांकडून शिवलिंग घेऊन चौकीदार निघाला आहे. चालतो आहे- चालतो आहे- आता दुपार झालीय… १३० करोड भारतीयांचं कवच भेदून घुसणारी तीव्र सत्तासूर्यकिरणे अंगाला चटके देऊ लागलीत. पण सर्वश्रेष्ठ राष्ट्रभक्त सगळं सहन करत पुढे पुढे चाललाय. मधेच तो हातातल्या शिवलिंगाकडे बघतो- मध्येच त्याची नजर अंगावर भगव्या कफनीकडे जातात- ते कफनीवरचे चिखलाचे डाग गंगेत एवढ्या डुबक्या मारल्या तरी अजून तसेच आहेत- उन्हामुळे चिखल सुकून डाग अधिकच ठळक घट्ट दिसू लागलेत- महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपली चस्तुरखुद्द महादेवाशी तुलना केलाय, हे आठवून या चिखलडागांकडे दुर्लक्ष केले पाहिजे- आपण महादेव आहोत आपणच आपली पूजा केली पाहिजे- निदान आज तरी- कारण आज शिवरात्र आहे!
रात्र झालेली आहे- कृष्ण पक्षातील चतुर्दशी असल्यामुळे वरती आकाशात एकही चांदणी दिसत नाहीये- त्यामुळे चौकीदाराच्या मनात फक्त नेहरू आहेत- तो आता शिवमंदिरात जाऊन शिवलिंगपूजनाला प्रारंभ करणार तोच भक्तांचा मोठा जमाव त्याच्याच नावाचा जयजयकार करताना त्याला दिसतो आहे- भक्त म्हणतायेत, `भगवान, तुम्हीच आमचे महादेव असताना, तुम्ही स्वतः या शिवलिंगावर अभिषेक करण्याची जरुरी नाही. ठेवून द्या ते बाजूला. आम्हाला तुमची पूजा करून पुण्य मिळवायचं आहे-‘ एक भक्त पुढे सरसावून ती डाग असलेली भगवी कफनी चौकीदाराच्या अंगावरुन ओढून काढून त्याला उघडा करतो आहे. बिचारा भोळा-भाबडा चौकीदार मुकाट्याने आसनमांडी घालून कमळासनावर बसलेला आहे. भक्तांनी बेल आणलेला नाही. पण काही अडचण नाही. कमलपुष्पे वाहून ते चौकीदाराला नमोनम: करत आहेत. नमोनम: करत आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील चिखलामधून उगवलेली ती रंगीबेरंगी कमळं आपल्या मस्तकावर आणि चरणांशी पडत असलेली पाहून चौकीदार प्रसन्न झाला आहे. अदानी, अंबानी, मल्ल्या, नीरव मोदी आदी प्रमुख भत्तâ मंडळी तसेच अर्णव, कंगना, साध्वी, नवनीत, संबित, निर्मला, कोश्यारी आदी उपभक्त मंडळी स्तुतीसुमनांचे मिश्रण असलेले भगव्या रंगाचे दूध चौकीदाराच्या दाढीवर ओतत त्याचा जयजयकार करत आहेत. त्याच्या गळ्यातील विषारी धर्मसर्प विरोधकांच्या नरडीला डसायला आतुर होऊन वळवळत आहे.
महाशिवरात्रीला भक्तांनी जागरण करायचं असतं आणि महादेवालाही त्यामुळे जागं राहावं लागतं. पण चौकीदाराला आता झोप येऊ लागलीय. आपण खरे महादेव नाही, हे त्याला माहित आहे. पण सोंग तर वठवलं पाहिजे- म्हणून तो झोप उडवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर २०२४ला काय होईल या काळजीनं त्याची झोप कधीच उडून गेलीय.

Previous Post

सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

Next Post

‘द न्यू वॉल’ची शंभरी!

Related Posts

कारण राजकारण

मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

March 23, 2023
कारण राजकारण

सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

February 16, 2023
कारण राजकारण

कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

February 2, 2023
कारण राजकारण

शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

January 5, 2023
Next Post
‘द न्यू वॉल’ची शंभरी!

‘द न्यू वॉल’ची शंभरी!

अखेर नाव रोशन केले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.