ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, रवि धनु राशीत, प्लूटो मकर राशीत, शुक्र, शनि कुंभ राशीमध्ये, गुरु वृषभ राशीमध्ये,
राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ कर्क राशीत. दिनविशेष : २१ जानेवारी कालाष्टमी.
– – –
मेष : नोकरी-व्यवसायात तडजोड स्वीकाराल. सरकारी कामांत शॉर्टकट नको. नवीन गुंतवणुकीचा प्लॅन पुढे ढकला. आर्थिक नियोजन करा. तरुणांचा कामातला उत्साह वाढेल. व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल, पण, मोठे निर्णय घेताना घाई नको. काहींना नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. नातेवाईकांना मदत करावी लागेल. मोठा भाऊ, बहीण यांच्याशी वागताना काळजी घ्या. मतभेद घडू शकतात. कोणतेही काम सकारात्मक पद्धतीने करा. संततीकडून शुभवार्ता कळेल. सामाजिक कार्यातून समाधान मिळेल.
वृषभ : कामांत अडचणी येतील. तरीही उमेद ठेवून काम करा. नोकरीत संयम ठेवा. तरुणांना कष्टसाध्य यश मिळेल. घरात वादप्रसंग टाळा. पत्नी व मुलांच्या अपेक्षा पूर्ण करा. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अडकून पडलेली कामे पुढे सरकतील. व्यवसायातील नव्या कल्पनांना आकार देताना काटेकोर आर्थिक नियोजन करा. मित्रमंडळींशी वागताना बोलताना काळजी घ्या. त्यांचा गैरसमज होऊ शकतो. मौजमजेपासून दूर राहा. त्याचा परिणाम प्रकृतीस्वास्थ्यावर होईल. सासू-सुनांमध्ये भांडण होईल.
मिथुन : अचानक आनंदाची बातमी कळेल. उत्साह वाढेल. व्यवसायात वेळ आणि कामाचे गणित सांभाळा. नव्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. त्याचे अचूक नियोजन करा. नोकरीत तुमच्या शब्दाला महत्त्व राहील, कामे पुढे जातील. खाण्यापिण्याचा अतिरेक टाळा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तरुणांना करियरच्या नव्या संधी मिळतील. थकीत येणी वसूल होतील. कुटुंबियांसोबत पर्यटनाला जाल. महागडी वस्तू घरासाठी खरेदी कराल.सार्वजनिक जीवनात काळजीपूर्वक वागा आणि बोला. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुणाला सल्ले देण्याचा भानगडीत पडू नका.
कर्क : चांगले यश मिळेल. कामाचा जोर वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठ कामावर खूष होतील, नवी जबाबदारी मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. खर्च आटोक्यात ठेवा. व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळा. नवीन व्यवसायाची संकल्पना योग्य सल्ल्याने पुढे न्या. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात आमदनी वाढेल. संरक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होईल. व्यवसायाच्या विदेशात विस्ताराला यश मिळेल. जुना आजार डोके वर काढेल. कुटुंबात वाद टाळा. तरुणांना यशदायी काळ. निर्णय विचाराने घ्या.
सिंह : नोकरीत चांगले दिवस अनुभवाल. मनावरचा ताण वाढू देऊ नका. पैसे जपून खर्च करा. नियोजन करून कामे करा. शेजारधर्म पाळताना चुका टाळा. काम करताना चित्त थार्यावर ठेवा. व्यावसायिकांना नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक बाजू चांगली राहील. सरकारी काम मार्गी लावताना नियम तोडू नका. प्रेमात वाद होतील. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील. बुद्धिकौशल्याने मनोबल वाढवा. योगा, ध्यान करा. नातेवाईकांसाठी वेळ द्यावा लागेल. तोंडात गोडवा ठेवा, म्हणजे काम अलगदपणे पुढे सरकेल.
कन्या : एकाग्रता वाढवा. नोकरीतले किचकट प्रश्न लक्षपूर्वक सोडवा. निर्णय घेताना विचार करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या. घाई टाळा. आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील. कलाकारांच्या गुणांना वाव मिळेल. अभिनेते, गायक, संगीतकार, वादकांचा सन्मान होईल. बांधकाम व्यावसायिक, ब्रोकर, वित्तीय सल्लागार यांच्यासाठी चांगले दिवस. नातेवाईक, मित्रांशी बोलताना गैरसमज टाळा. महिलांचा उत्साह वाढेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी व्यक्त होणे टाळा. कुटुंबाला वेळ द्याल.
तूळ : ठाम राहा, चांगले फळ मिळेल. नोकरीत वागताना काळजी घ्या. मत व्यक्त करणे टाळा. व्यवसायात संयम ठेवा, कठीण कामे पुढे सरकतील. भागीदारीत किरकोळ कुरबुरी टाळा. आश्वासने देऊ नका. तरुणांना नशिबाची साथ मिळेल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. घरात किरकोळ वाद होतील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. संततीसंदर्भात चांगली बातमी कानी पडेल. व्यवसायात यश मिळेल. नोकरीनिमित्ताने भ्रमंती घडेल. घरातील सदस्यांचा सल्ला घेऊनच पुढे जा.
वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीला सुखद घटना घडल्यामुळे कामाचा आनंद वाढेल. विचार पटले नाहीत तर चर्चा करून विषय मार्गी लावा. व्यवस्थापन क्षेत्रात नवीन संधी येतील. संशोधक, प्राध्यापकांसाठी सर्वोत्तम काळ. सामाजिक क्षेत्रात सत्कार होईल. मित्रमंडळींशी चेष्टामस्करी टाळा. लेखक, प्रकाशक, कलाकारांना उत्तम यश मिळेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. प्रमोशन होईल. मनोरंजनावर वेळ आणि पैसे खर्च होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. सार्वजनिक जीवनात अहंकार नको. सरकारी कामात शिस्त पाळा. अति आत्मविश्वास टाळा. दांपत्यजीवनात आनंद देणारे दिवस अनुभवाल.
धनु : नोकरीत मनासारख्या घटना घडणार नाहीत, त्यात अडकून राहू नका. ध्यानधारणा करा. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. अहंकार बाजूला ठेवा. व्यवसायात आपण योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न महागात पडेल. अभियांत्रिकी व्यवसायात नव्या संधी येतील. चांगले अर्थार्जन होईल. कमी बोला, अधिक काम करा. तरुणांची महत्त्वाची कामे झटपट पूर्ण होतील. व्यवसायात त्रास होईल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. सॉफ्टवेअर क्षेत्रात यश मिळेल. घरासाठी वेळ द्यावा लागेल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील.
मकर : आत्मविश्वास तगडा ठेवा, पण, आपले विचार इतरांवर लादू नका. उधार-उसनवारी टाळा. कौटुंबिक वातावरण सांभाळा. लेखक, संगीतकारांना मानसन्मान मिळतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. घरात, सोशल मीडियावर काळजी घ्या. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. सौंदर्य प्रसाधन व्यावसायिक, सजावटकार यांची चलती होईल. वास्तूखरेदीचे योग जुळून येतील. आयटी व्यावसायिकांची उलाढाल वाढेल. खिशात पैसे आहेत, म्हणून उधळपट्टी टाळा. नोकरीत ताण वाढेल.
कुंभ : मनासारखी कामे होतील, नवी नोकरी चालून येईल, ती स्वीकारताना काळजी घ्या. व्यवसायातील नव्या संधी पुढे नेताना घाई नको. मित्रांसोबत सहल, मौजमजा कराल. कायदा पाळा. भागीदारीत किरकोळ वाद होतील. सुरुवातीपासून थोडी समंजसपणाची भूमिका घ्या. घरात छोटेखानी समारंभात नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत कामाचा ताण वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. छंदातून आनंद मिळेल. सरकारी कामात घाई नको. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या. ब्रोकरांसाठी चांगला काळ.
मीन : बँकेच्या व्यवहारात काळजी घ्या. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. मोठे व्यापार करण्याचे नियोजन थोडे पुढे ढकला. आर्थिक नियोजन चोख करा. मुलांकडून वायफळ खर्च टाळा. व्यावसायिकांना दगदगीचा काळ. मन:शांती टिकवून ठेवा. मुलांसोबत अधिक वेळ व्यतीत कराल. नोकरीत नवी जबाबदारी मिळेल, सकारात्मक ऊर्जेत वाढ होईल. नव्या ओळखीतून जुने काम मार्गी लागू शकते. महिलांना आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. त्याचा पोटावर परिणाम होऊ शकतो. कल्पनाशक्तीच्या जोरावर व्यावसायिक यश मिळवाल.