हे मुखपृष्ठ आहे १९८२ सालातले. म्हणजे ४० वर्षांपूर्वीचे. शिवसेनेला आपण पहिल्यांदाच डिवचतो आहोत, अशी गैरसमजूत झालेल्या माकडांना हे कळायला हवे की शिवसेनेच्या जन्मापासूनच अशी माकडे आसपास नाचतच होती… शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात राहावी आणि मुंबईत महाराष्ट्रात राहावा, यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपशकुन करणे, हाच या माकडांचा एकमेव धंदा होता… त्यांना नाचवणारे मदारी याच कामासाठी त्यांना तेव्हा पोसत… मुंबई महाराष्ट्रातच राहिली आणि तिच्यावरचा मराठीजनांचा हक्क इथे राहणार्या सर्व अन्यप्रांतीयांनीही मान्य केला, शिवसेनेला आपले तारणहार मानले, राज्यात, देशात कोणी का असेना, मुंबईत शिवसेनाच असली पाहिजे, असा दंडक निर्माण झाला, त्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न कायम होत आले, आताही होत आहेत… आता आपल्यातल्याच काहीजणांनी गद्दारी करून माकडे बनून नाचणे पसंत केलेलं आहे, हे त्यांचं दुर्दैव… नाचण्याची योग्यता संपली की मदारी कुठे लाथ घालून हुसकावतो, ते त्यांना लवकरच कळेल… त्याचबरोबर जंगलाचा राजा असलेल्या वाघाची फेरी सुरू झाली की माकडांबरोबर मदार्यांचीही कशी पळापळ होते, तो खेळ सगळ्या राज्याला आणि देशालाही पाहायला मिळेल.