• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मी पाहिलेले दिलीप कुमार

- दिलीप ठाकूर

दिलीप ठाकूर by दिलीप ठाकूर
July 14, 2021
in सिनेमा
0

हिंदी मराठी चित्रपटसृष्टीत मुहूर्त, मुलाखती, भेटीगाठी अशा समारंभांना, उपक्रमांना आणि सेटवरच्या शूटिंगला प्रत्यक्ष हजेरी लावून वार्तांकन करणा-या दुर्मीळ सिनेपत्रकारांपैकी एका ज्येष्ठ पत्रकाराने भेटीगाठींमधून आणि आठवणींमधून उलगडलेलं दिलीप कुमार यांचं अनोखं शब्दचित्र : भाग पहिला!
—-

संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलेल्या ‘अपने’ या मसाला मिक्स चित्रपटाच्या फर्स्ट लुकचा जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील इव्हेन्ट. अगदी दिग्दर्शक अनिल शर्मादेखील या धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्याच कुटुंबातील. या पॅकेजमध्ये कैतरिना कैफ नायिका.
चित्रपटसृष्टीचे इव्हेन्ट्स, पार्ट्या, प्रीमियर हे घड्याळाच्या काट्यावर चालत नाहीत आणि अवतीभवती इतके ग्लॅमरस वातावरण असते की घड्याळात पाहायचे भानच राहत नाही. अशातच दिलीप कुमार आणि सायरा बानो आले आणि वातावरण बदलले. सगळे फोटोग्राफर, चॅनेलचे कॅमेरे त्यांच्यावर खिळले. दिलीप कुमारच्या हस्ते अनेक चित्रपटांचे, त्यांच्या ऑडिओ रिलीजचे प्रकाशन झालेलं आहे (सूची द्यायची म्हटलं तरी एक लेख होईल).
दिलीप कुमारच्या येण्याने धर्मेंद्रची संपूर्ण देहबोली बदलल्याचे माझ्या सूक्ष्म निरीक्षणाने लक्षात आले. धरम पडद्यावर कितीही गरम (हीमॅन अर्थाने) असू देत, अनेक प्रसंगी तो भावुक होतो, कधी त्याच्यातील लहान मूल जागे होते.
तसा हा दिलीप कुमारच्या हस्ते पोस्टर रिलीजचा सोहळा. पण त्यासह घडलेल्या/ दिसलेल्या/ अगदी बिटवीन द लाइन्स गोष्टी महत्त्वाच्या.. धर्मेंद्र माईक घेत भावुक झाला. अतिशय हळुवारपणे तो बोलू लागलाच ‘गजबलेल्या पार्टीत’ बरीचशी शांतता पसरली (मध्येच सोडा और बर्फ डालना इतकेच एखाद्या बाजूने कानावर यायचे, फिल्मी पार्टी म्हटलं की हे होणारच) धरम बोलत होता, पंजाबमध्ये लहानाचा मोठा होताना दिलीप कुमारच्या चित्रपटांनी, त्यांच्या अभिनयाने मी झपाटून गेलो. आपणही अभिनेता व्हावे याची खरी आणि पहिली प्रेरणा मला युसूफ साहेबांमुळे मिळाली.. मी खरोखरच मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आलो. कधी वाटलं नव्हतं की या खूप मोठ्या अभिनेत्याशी माझे मैत्रीचे नाते निर्माण होईल.. एकदा दिलीपसाहेबांच्या पाली हिलवरील बंगल्यावर जाण्याचा योग आला. त्यांनीच मला गप्पांसाठी एका संध्याकाळी आमंत्रित केले होते. मी थरथरत होतो. गप्पांना कशाने सुरुवात करायची, नेमके काय बोलावं याचा दिवसभर मी विचार करत होतो आणि मला काही सुचतच नव्हते. अशातच संध्याकाळ कधी झाली हे समजलेच नाही.. त्यांच्या बंगल्यावरील हिरवळीवर ते आणि सायराजी यांच्यासोबत अतिशय शांतपणे, हळुवारपणे आमच्या गप्पा सुरू झाल्या. पुढ्यात खायला इतके आणि असे विविधतापूर्ण होते की ते पाहूनच पोट भरले.. मला थंडी लागतेय, ती वाढलीय हे दिलीपजींच्या लक्षात आले आणि ते बंगल्यात गेले आणि त्यांनी शाल घेऊन तर आलेच, पण त्यांनी स्वतः ती शाल माझ्या अंगावर टाकली. माझ्यासाठी हा अतिशय उत्कट, भावपूर्ण अनुभव होता. दिलीपसाहेबांच्या स्पर्शातील प्रेम मला जाणवलं. मी शहारून गेलो.. आजही ती शाल मी जपून ठेवली आहे आणि कधी ती मी जवळ घेतो तेव्हा त्यात मला दिलीपसाहेबांच्या प्रेमाची आठवण येते.. धर्मेंद्र बोलता बोलता थांबला. त्याचे डोळे बरेच काही बोलत होते..

..दिलीप कुमारचे निधन झाले आहे, तुमची आदरांजली हवी, असा सकाळी आठ वाजता एका मराठी वृत्तवाहिनीवरून फोन आला आणि एकाच वेळेस माझ्या डोळ्यासमोर पडद्यावरचा आणि मी मीडियात आल्यावर फिल्मी जगतात असा विविध प्रकारे अनुभवलेला दिलीप कुमार तरळून गेला..
खरं तर साठच्या दशकात जन्माला आलेली माझी पिढी आईबाबांचा हात धरून प्रामुख्याने मराठी आणि कधी तरी हिंदी चित्रपट पाहत पाहत मोठी झाली. अशातच कधी तरी वडिलांकडून समजले की दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर यांचे चित्रपट पाहून त्यांची पिढी मोठी झाली होती. त्या काळात मराठी कुटुंब वाचनालयाचे सभासद असे आणि तेथून घरी येत असलेल्या साप्ताहिके, मासिकात सिनेमासंदर्भात काही वाचायला/पाहायला (पिक्चरचे फोटो या अर्थाने..) मिळे. माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी म्हणजे १९७० साली प्रामुख्याने रसरंग साप्ताहिकातून समजले की या एकाच वर्षी दिलीप कुमारचा ‘गोपी’, देव आनंदचा ‘जॉनी मेरा नाम’ आणि राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ प्रदर्शित होत आहेत. (याच क्रमाने परन्तु दरम्यान काही आठवड्यांचे अंतर ठेवून हे चित्रपट प्रदर्शित झाले हे कालांतराने लक्षात आले.) खरं तर राजेश खन्नाच्या सुपरस्टार क्रेझने सात ते सत्तर वर्षांच्या रसिकांना झपाटून टाकलेला हा काळ होता. पण शालेय वयात अभ्यासात इतिहास विषय असतो, तसेच व्यक्तिगत आयुष्यातही अनेक गोष्टीत पूर्वी काय घडले हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच. जुन्या काळातील चित्रपटविषयक ज्ञान होण्यासाठी तेव्हा रसरंगमध्ये इसाक मुजावर यांचे ‘फ्लॅशबॅक’ नावाचे सदर असे. त्यात कधीतरी समजले की, बॉम्बे टॉकीज निर्मित आणि अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘ज्वार भाटा’ (१९४४) या चित्रपटापासून दिलीप कुमारने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. एकदा कधीतरी एकदा माझी आजी मला म्हणाली, दिलीप कुमार तिचा आवडता नट, म्हणून तिने माझे नाव दिलीप ठेवले. हे समजले आणि दिलीप कुमारबाबत नकळत आपुलकी निर्माण झाली.
एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे गिरगावातील खोताची वाडीतील गल्लीबोळातून खेळणे, नियतकालिके वाचणे आणि थिएटरमध्ये अथवा गल्लीत चित्रपट पाहणे यात आयुष्य पुढे सरकू लागले. अशातच १९७२ साली दिलीप कुमारची दुहेरी भूमिका असलेल्या आणि बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘दास्तान’ फ्लॉप झाला असे वाचले. (चित्रपट फ्लॉप झाला म्हणजे नेमके काय असते हे समजण्याचे आणि समजून काही उपयोग नसल्याचे ते वय होते. आयुष्याचा खरा आनंद वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंतच असतो हे पन्नाशीनंतर समजले ते जाऊ दे.) १९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झाले आणि शनिवारी संध्याकाळी मराठी तर रविवारी हिंदी चित्रपट घरबसल्या पाहायची सोय झाली. आता वय वाढत असताना गल्लीत ‘राम और श्याम’, ‘गंगा जमुना’, ‘मधुमती’, मॅटिनी शोला ‘लीडर’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘संघर्ष’, रिपीट रनला ‘मुगल-ए-आझम’ असे दिलीप कुमारची भूमिका असलेले चित्रपट आवर्जून पाहू लागलो. याची दोन कारणं, एक म्हणजे वडिलांनी आवर्जून सांगितले होते की दिलीप, देव आणि राज कपूर यांचे जुने चित्रपट कुठेही पाह्यला मिळाले तर सोडू नकोस.. आणि दुसरं कारण म्हणजे, दिलीप कुमार आवडू लागला होता. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनची जबरा मोहिनी असूनही दिलीप कुमारची अभिनय शैली आवडत गेली, कधी भारावूनही गेलो.

अशातच असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’मधील (१९७६) दिलीप कुमारच्या तिहेरी भूमिकेची (पिता आणि दोन मुले) खूप टवाळी होत असल्याचे वाचनात आले. पण दिलीप कुमारच्या नवीन चित्रपटाऐवजी जुने चित्रपट पाहत जा अशी शिकवण आणि सवय असल्याने ‘बैराग’कडे सहज दुर्लक्ष करु शकलो. सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’ येईपर्यंत मी फिल्म दीवाना झालो होतो, आणि आता असे महत्वाचे चित्रपट ‘पहिल्या तीन दिवसांत’ पाह्यची सवय लागली होती. रॉक्सी थिएटरमध्ये धक्काबुक्की असलेल्या रांगेत कसाबसा पुढे सरकत स्टॉलचे तीन रुपये तीस पैसे असे दर असलेले तिकीट एकदाचे हाती आले.
‘विधाता’ मी दिलीप कुमारला पाहण्यासाठी गेलो आणि संजीवकुमारला दाद देत बाहेर आलो (तोपर्यंत काही झालं तरी आपल्या आवडता हीरोच पडदाभर श्रेष्ठ अशीच एकनिष्ठ असण्याचे दिवस होते). दिलीप कुमारने याच सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चनला स्टार बनवणारी ‘अ‍ॅन्ग्री यंग मॅन’चीच व्यक्तिरेखा ‘अ‍ॅन्ग्री ओल्ड मॅन’च्या रूपात साकारली आहे, हे तर अमिताभने जे पेरले त्याचेच यश आहे असे वाटले. एव्हाना व्यावसायिक पातळीवरील हिंदी चित्रपट खूपच बदललाय, त्यानुसार आपणही बदलायला हवे असे व्यावसायिक शहाणपण दिलीप कुमारने दाखवलयं असेही लक्षात आले.
ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात मीच मीडियात आलो आणि स्टुडिओतील भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी आणि निरीक्षण याचा झपाटा लावला. आणि अशातच १९८४च्या दिवाळीच्या दिवशी सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ या चित्रपटाचा मेहबूब स्टुडिओत मुहूर्त आहे याचे आमंत्रण हाती आले आणि त्यावरील दिलीप कुमारचे नाव पाहून शहारलो. तोपर्यंत या मुहूर्त दृश्यात भाग घेतलेल्या नसिरुद्दीन शहा, जॅकी श्रॉफ (हा ‘हीरो’च्या प्रेस शोला न्यू एक्सलसियरच्या मिनी थिएटरमध्ये आला असता ‘कैसा है भिडू’ असे जणू जुनी ओळख असल्याप्रमाणे माझ्यासह अनेकांना भेटला), अनिल कपूर आणि अनुपम खेर यांच्यापेक्षा दिलीप कुमारला प्रत्यक्षात कधी पाहतोय असं झाले होते. आपल्या चित्रपटवेड्या देशातील अनेक फिल्म दीवाने आवडत्या हीरोला आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्षात पाहू देत असे स्वप्न घेऊन जगतात. मीदेखील या दिवसात अगदी त्याच ‘मास’मधील अथवा पब्लिक मधील एक होतो. त्यामुळे आमंत्रणावरील ‘दुपारी साडे अकरा’ अशी मुहूर्ताची वेळ होती तरी मी चक्क साडेदहा वाजताच पोहचलो. दिलीप कुमारला प्रत्यक्षात अभिनय करताना अनुभवायचंय यासारखे आयुष्यात दुसरे सुख ते काय असणार? याक्षणी माझ्यातील सिनेपत्रकार बाजूला पडला होता आणि ‘स्टॉलचा प्रेक्षक म्हणून अगणित चित्रपट एन्जॉय केले तो मी’ जागा झालो होतो. साडेदहा वाजता सेटवर फारसं कोणी नव्हतेच. बारा वाजता अनेक फिल्मवाले एकेक करत वाढत होते, पण माझे सगळे लक्ष कधी बरे एकदा हे मुहूर्तदृश्य सुरू होऊन दिलीप कुमारला पाहतोय याकडे लागले होते. साडेबारानंतर एकदाचा तो क्षण आला. भव्य स्टेजवर अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर आले, प्रत्येकाच्या धारदार संवादासह नाट्यमयता वाढत गेली, अंगावर रोमांच उभे राहिले आणि अशातच साक्षात दिलीप कुमार.. खरेच वाटेना. पण ही वस्तुस्थिती होती. या मुहूर्ताच्या शूटिंग रिपोर्टमध्ये मी फक्त आणि फक्त दिलीप कुमारवरच सगळा फोकस ठेवला. दिलीप कुमारवरचे वाचायला रसिकांना आवडते याची मला कल्पना होती, पण त्यातील बरेचसे लेखन ‘मुगल-ए-आझम’, ‘नया दौर’, ‘गंगा जमुना’ याभोवतीच फिरत होते आणि माझा कल ऐंशीच्या दशकातील दिलीप कुमारवर राहिला, कारण तो काळ मी अनुभवलाय.
याच काळात सुलोचनादीदींची त्यांच्या प्रभादेवी येथील घरी सविस्तर मुलाखत घेत असताना राज कपूर आणि देव आनंदप्रमाणेच दिलीप कुमारचा विषय निघणे अगदी स्वाभाविक होतेच. या तिघांसोबतचे त्यांचे अनुभव जाणून घेण्याची सर्वसाधारण चित्रपट रसिकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होतीच. अशा बुजुर्गांच्या मुलाखतीतून आपले ज्ञान, माहिती, संदर्भ हे वाढवावेत याकडे माझा जास्त ओढा होता. दिलीप कुमारसोबत सुलोचनादीदींनी एस. एच. रवैल दिग्दर्शित ‘संघर्ष’ (१९६८), मनोजकुमार दिग्दर्शित ‘क्रांती’ (१९८१) अशा काही चित्रपटांत भूमिका साकारली. त्या अगदी शांतपणे म्हणाल्या, दिलीप कुमार कधीही सकाळची शिफ्ट ठेवू द्यायचे नाहीत. दुपारी दोन ते रात्री दहा अशा शिफ्टमध्ये काम करण्यास प्राधान्य देत. इतकेच नव्हे, तर एखाद्या दिवशी अतिशय महत्त्वाचा प्रसंग चित्रीत होत असेल तर रात्री दोन वाजेपर्यंतही ते शूटिंग करत. याबाबत त्यांना एकदा विचारले असता ते म्हणाले, उद्या प्रâेश होऊन हा प्रसंग मी केला असता तर अगोदर केलेल्या शॉटमध्ये फरक वाटला असता. सिनेमात प्रत्येक दृश्याची वेशभूषेपासून अभिनयापर्यंत कंटिन्युटी असते. तीच जर सांभाळली गेली नाही तर त्या दृश्याच्या आविष्कारावर परिणाम होतो. तो प्रसंग जर संघर्षमय दृश्याचा असेल तर तो एका वेळीच पूर्ण करावा.. दिलीप कुमारचे हे म्हणणे सुलोचनादीदींनी ऐकले, तसेच ते कायम स्मरणात ठेवून अंमलातही आणले.

आजकाल दिलीप कुमारबद्दल बोलताना ओरडून सांगावेसे वाटते की दिलीप कुमार म्हणजे केवळ ट्रॅजेडी किंग नव्हे हो. त्यापलीकडे जाऊन त्यांनी बरेच काही हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर केले आहे, प्रत्यक्ष आयुष्यात केले आहे. खरं तर अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘दाग’ (१९५२), झिया सरहादी दिग्दर्शित ‘फुटपाथ’ (१९५३), रमेश सैगल दिग्दर्शित ‘शिकस्त’ (१९५३), बिमल रॉय दिग्दर्शित ‘देवदास’च्या (१९५६) काळात दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग होता. पन्नासच्या दशकात. ती प्रतिमा मागे ठेवून दिलीप कुमारने केलेला बराच मोठा प्रवास आहे आणि प्रभावही आहे. सलीम जावेद यांच्या पटकथा संवादांनी सजलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’मध्ये (१९८२) दिलीप कुमारची नवीन ओळख, नवीन प्रतिमा होती. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पिता त्यांनी साकारला होता.
रूपेरी पडद्यावरील अष्टपैलुत्वासह दिलीप कुमारने कायमच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भान जपले. आणि अशा वैशिष्ट्यांमुळे दिलीप कुमार अधिकाधिक प्रगल्भ आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे कोणते चित्रपट ज्युबिली हिट ठरले आणि कोणते चित्रपट फ्लॉप झाले यापलीकडे जाऊन दिलीप कुमार यांची खूप मोठी वाटचाल होती. आणि तेच तर महत्वाचे आहे.

– दिलीप ठाकूर

(लेखक चित्रपटांचे अभ्यासक आणि आस्वादक आहेत)
उत्तरार्ध : पुढील आठवड्यात

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

निव्वळ अभिनेता नव्हे, सामाजिक कार्यकर्ताही!

Related Posts

सिनेमा

इतिहासात घडणारा मुळशी पॅटर्न

June 9, 2022
सिनेमा

दिसायला चांगला पण लवचिक!

December 1, 2021
सिनेमा

खवय्यांसाठी खास यूट्यूब चॅनेल : लवंगी मिरची

September 16, 2021
सिनेमा

शब्दांच्या पलिकडल्या आशाताई!

September 2, 2021
Next Post
निव्वळ अभिनेता नव्हे, सामाजिक कार्यकर्ताही!

निव्वळ अभिनेता नव्हे, सामाजिक कार्यकर्ताही!

नेहरूंच्या भारताचा नायक!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.